चांद्रयानाला गवसलं चंद्रावर पाणी...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

भारतानं गेल्या वर्षी अंतराळात सोडलेल्या चांद्रयानाला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शोध आहे. भविष्यात हाती घेण्यात येणार्‍या चांद्रमोहिमांना या शोधामुळे अतिशय वेगळी दिशा आता मिळणार आहे.

चांद्रयानावर असणार्‍या NASAच्या Moon Minerology Mapper (M3)नं मिळवलेल्या dataच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

चंद्रावरील मानवी वसाहत, अंतराळातील जीवसृष्टीचा शोध यांनाही आता वेग मिळू शकेल.

केवळ पन्नास वर्षांच्या कालावधीत ISROनं हे अभूतपूर्व यश मिळवलं आहे. सॉ. विक्रम साराभाई, प्रा. सतिश धावन आणि डॉ. वसंत गोवारीकर यांच्या दूरदृष्टीमुळंच आज हे यश आपल्याला मिळालं आहे.

चांद्रयान मोहिमेत सहभागी असणार्‍या सर्व शस्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!

प्रकार: 

मी देखील आजच वाचली ही बातमी.. सर्व शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांचे अभिनंदन.. हायड्रोजन-ऑक्सीजन मॉलेक्युलचे स्पेक्ट्रम सापडले त्यावरुनच हा निश्कर्ष काढला ना?

नासाने पाठवलेल्या उपकरणांत एक spectrometer होते. त्यांना H-O या hydroxyl बंधाचे पुरावे मिळाले आहेत.
अधिक माहितीसाठी http://www.space.com/scienceastronomy/090923-moon-water-discovery.html

नासाचंही संशोधन चालुच होतं. १९९९ साली नासाच्या कॅसीनी नावाच्या यानाने चंद्रा जवळून जाताना जे फोटो घेतले होते त्यात त्यांना पाणी असल्याची शंका आली होती. तसेच जुन २००९ मधे ही इपॉक्सी नावाच्या यानानेही चांद्रयाना वरील एम थ्री या उपकरणाने घेतलेल्या फोटोंना दुजोरा दिला होता. असं तीन यानांनी (त्या वरील उपकरणांनी) मिळुन केलेल्या संशोधना नंतर नक्की झालेली माहिती "सायन्स" जरनल मधे प्रकाशित केलिये....

नासाला हे आधीच कसे कळले नाही? त्यान्चेही संशोधन चालु आहे ना इतके वर्ष?? >>> खोटारडे आहेत ते , चंद्रावर न जाताच चंद्रावर उतरले म्हणुन जाहीर केलयं त्यांनी .

खोटारडे आहेत ते , चंद्रावर न जाताच चंद्रावर उतरले म्हणुन जाहीर केलयं त्यांनी .

\\>>
वैदिक काळात भारतीय चन्द्रावर आणि सूर्यावरही जाऊन आल्याचे चन्द्रपुराणात उल्लेख आहेत....

मला वाटतं नासा चे instrument भारताच्या यानावर होते. नासाच्या लेखात तसे श्रेय दिलेले आहे.

नासाचं उपकरण चांद्रयानावर होतं. चंद्रावरच्या अनेक भागांची छायाचित्रं चांद्रयानानेच प्रथम मिळवली आहेत.