ए ssss झब्बू! - मराठी खाद्यपदार्थ

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 00:47

बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती Happy

हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Runmesh
Kharvas katil re.mouthwatering

वा

प्रियान, त्यात्या चिंबोरी एक नंबर .. सहा आठ महिने तरी झाले शेवटचे खाऊन.. आई ग्ग ते त्याचे पोट आणि तोंडात घेत कचकन दाबल्यावर त्यातून ओघळणारा तो रस.. बेक्कार बेक्कार बेक्कार चव असते.. आईकडे लागलीच फर्माईश करायला हवी.. Happy

नलीनी फार छान पदार्थ. कौतूक आहे खरचं.
खरवस काय मस्त आहे.
दिवाळी फराळः

अंडे आणि चिकन खीमा यांच्यापासून बनवलेला कटलेटसारखा काहीसा प्रकार आहे. नक्की नाव माहीत नाही कारण ओळखीच्याएका घरातून आला होता. ते कोकणी मुसलमान असल्याने याची गिणती मी मराठी खाद्यपदार्थांतच केली आहे याची नोंद घेणे !

मी मस्तपैकी पावाच्या दोन स्लाईमध्ये कांद्याच्या चकत्यांसह बटाटाभजीसारखे भरले आणि सँडवीच बनवत खाल्ले Happy

chicken cutlet.jpg

चिंबोरीच कालवण जबरदस्त !

मृन्मयी, वांग्याची भाजीवरची तर्री पाहून भूक खवळली .

मजा आली या बाफ मुळे. झब्बू द्यायला , इतरांचे झब्बू बघायला. एकदम चविष्ट बाफ . मस्त

सीमाची फराळाची प्लेट आवडली. कुठेही सांडलवंड न करता मस्त दिसतेय . इथे मिळतील का अश्या प्लेट्स बघायला हव्यात.

निधी,

हे ही मस्तच दिसतच खेकड्याच कालवण....

आता कुठे खेकडे मिळाले तुम्हाला?

Pages