आयुष्यावर बोलू काही....

Submitted by पोलेकर प्रसन्न on 4 March, 2017 - 05:04

आयुष्यावर बोलू काही....
प्रश्न क्र....१) आयुष्यात काय व्हायला आवडलं असत..?झालो तर ?
उत्तर --साधारण १०वीत असताना पहिलं प्रेम झालेलं ..आणि तिने होकार हि दिला.जेमतेम दीड वर्षाचं relation मग घरच्यांचं विरोधामुळे break-up.नंतर खूप प्रयत्न केला तरी जुळवता नाही आलं...
break-up नंतरचा जो काही काळ असतो,स्वाभाविक पणे कोणाचा आवडता तर कोणाचा नावडता.मला मात्र खूप आवडायचा...काय दिवस असतात ना ते.. अगदी अप्रतिम !!..आठवणी,एकांत,तळमळ आणि सोबतीला दर्देदिल ...गाणी ...जणू दुःखाचा वर्षाव होत असतो मनावरती.किती वेदनादायक असतात ना ते गाण्यांचे बोल.? डोळ्यातून पाणी येणं हे मला शोभण्यासारखं नव्हतं हृदय मात्र नक्की रडायचं...
माझ्या आठवणीतलं एक गाणं "और इस दिल मी क्या रख्खा है ...तेरा हि दर्द छुपा रख्खा है..'' आणि मराठीत "दिवाणा झालो तुझा'' अल्बम मधील 'चाललो मी कुठेतरी'....."मन्या द वंडर बॉय" मधील
"नूरदा" ...मनाला आणखी घायाळ करायचे...
कोणीतरी खरच म्हटलं आहे "गायकीमध्ये जर दर्द नसेल तर गाणं व्यर्थच" तस मग एखाद्याला गाणं लिहायचं असेल तर बनवायचं असेल तर दर्देदिल लागतोच...माझं असं मत आहे..आणि माझं पण नेमकं तेच झालं ...तिच्या आठवणीत लिहायची सुरवात केली..त्याला तितकाच दर्देदिल संगीतही दिल.कालांतराने तिला विसरलो.पण तिच्यामुले मिळालेली हि कला,ती गाणी अजूनही हृदयाजवळ आहेत.बालपण कोकणात गेलं,मुंबईत आल्यावर संगीतकाराचं वेड practically घायला सुरुवात केली..
मग वेध सुरु झाला music composing चा ..
अजय-अतुल,अवधूत गुप्ते,निलेश मोहरील,ह्या संगीतकाराने मराठीत धुमाकूळच माजवला आहे ...तसेच ए.आर.रेहमान,प्रितम,विशाल-शेखर किती दिग्गज नाव आहेत हि हिंदी संगीतकारांमध्ये..
ह्या सगळ्यांचा आदर्श घेऊन मला हि मग वाटत दिवसभर कुठेतरी वही खरतडत बसावं.आठवणींच्या ओघात,स्वप्नांच्या दुनियेत मिळणाऱ्या शब्दांना आपलं असं एक नवीन संगीत द्यावं..अगदी विशाल-शेखर सारखं "देवा एक चांगली धून दे" असं देवाकडे मागणं मागावं ...मलाही वाटत संगीतकार व्हावं..
आतापर्यंत बनवलेल्या माझ्या गाण्यांचा एक संगीत अल्बम तयार होईल..ध्येयाला नशिबाने तेवढी साथ दिली ...तर नक्की तुमच्या पर्यंत पोहचवेन......

हे आहे माझं उत्तर ....माझ्या आयुष्यावरच .....तुम्हीही तुम्हाला काय व्हायचं आहे ? याच उत्तर जरूर छोट्या-मोठ्या शब्दात कंमेंट बॉक्स मध्ये लिहा.....

हा पहिला होता प्रश्न "आयुष्यवर बोलू काही" मधला ....क्रमशः ....पुढे चालूच राहिल प्रतिसाद नक्की द्या...

Group content visibility: 
Use group defaults

आता प्रतिसाद देते,

मस्त... हलक्या-फुलक्या शब्दात छान लिहिलय....
व्वाव! तुम्हाला म्युजिक कम्पोजर व्हायच हे वाचुन छान वाटल.....प्रयत्न चालू ठेवा...यश नक्की मिळेल...
All The Best!!! Happy

तुमच्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद...कावेरी..
मला संगीतकार व्हायचंय ...आणि तुम्हाला...?

मस्त लिहलयस. आयुष्यात मला काय व्हायचय हे काळ बदलेल तस बदलत गेलं. लहान असताना क्रिकेटर व्हायचं होतं नंतर कळल तमाम भारतीय मुलांना हेच वाटत म्हणूनच मी तमाम भारतीयांसाठी माझ्या स्वप्नांचा त्याग केला. पूढे जाऊन इंजिनियर बनायची इच्छा झाली तर ॲडमीशनच्या वेळेस सिध्दीविनाय (दादर ) ला संकष्टी ला असते तेवढी मोठी रांग होती ते पूर्ण करत असताना इकडेही तमाम भारतीय पोरांना इंजिनियर व्हायची इच्छा दिसली. माझे हे सगळे पराक्रम आणि दुसऱ्या बद्दलची दया आणि देशा वरील प्रेम बघून आदरनीय पिताश्रींनी आणि बंधूराजांनी मला आमच्या पारंपरिक बिझनेस मध्ये घुसवलय. थोडक्यात मला आयुष्यात काय करायचं हे आजूनही शोधतोच आहे. तुला तुझ्या अल्बम साठी शुभेच्छा !!

धन्यवाद अक्षय .....
क्रिकेटर आणि इंजिनीअर ...हे अजूनही तमाम भारतीयांचं स्वप्न आहे....
आयुष्यातील तुझा शोध तुला लवकरच होउदे ...हि सिध्दीविनायकाजवळ प्रार्थना....