नाही बोलता येत आमच्या पोरांना मराठी, बरं मग?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 2 March, 2017 - 14:01

म्हटलं तर तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. ती आमच्याच ऑफिसमध्ये काम करणारी. दोन प्रायमरी स्कूलमध्ये जाणार्‍या मुलांची आई. स्वत:चे शिक्षण ईंग्लिश मिडियममध्ये झालेली. तरीही तिच्या आईवडिलांच्या कृपेने छान मराठी बोलता येणारी. तिची मुलेही ईंग्लिश मिडीयमचीच. पण ही त्यांच्याशी घरी ईंग्लिशमध्येच संवाद साधत असल्याने त्यांचे मराठी कच्चेच राहिलेली.

मराठी दिना दिवशीच आपल्याला मराठीचे भरते येत असल्याने ऑफिसमध्ये विषय साधारण तोच होता. त्यात एकाने म्हटले, अरे ती अमुक तमुक मराठी हिरोईन, तिच्यापेक्षा त्या अमुकतमुक हिंदी हिरोला चांगले मराठी बोलता येते. बरं मग? ती म्हणाली. त्या अमुक तमुक हिंदी हिरोने आपले मूळ नाव आणि आडनाव बदलले होते कारण त्या नावाला ग्लॅमरच्या दुनियेत आणि बॉलीवूडच्या मार्केटमध्ये काही किंमत नव्हती. त्या अमुकतमुक हिरोने आपल्या मातृभाषेला नेहमीच टांग देत फक्त हिंदी चित्रपटांमध्येच काम केले होते कारण पैसा आणि प्रसिद्धी तिथेच होती. आता त्याचे मराठी चांगले असल्यास त्याचे कारण म्हणजे मुंबईतील वास्तव्य. कदाचित मित्रपरीवार शेजारीपाजारी मराठी भाषिक असावेत. कारण काहीही असले तरी एखाद्या अमराठी व्यक्तीला मराठी बोलता येते ही छानच गोष्ट आहे. पण एखाद्या मराठी व्यक्तीला काही कारणांमुळे मराठी बोलता येत नाही तर यात त्याला हिणवण्यासारखे काय आहे. मुळात त्यामागे जी कारणे असतात त्यांना बरेचदा तो स्वत: जबाबदार नसतो. एखाद्या मराठी जोडप्याचे मूल अमेरीकेत जन्माला आले आणि तिथल्याच मित्रमैत्रींणींमध्ये वाढले तर ते कुठून शिकणार मराठी? आणि त्याने का शिकावी मराठी? हट्टाने शिकवावी का त्याला? आणि का? कारण आईबापांना मराठीचा अभिमान आहे म्हणून? की आपल्या समाजातील लोकं हसतील, आईबाप याला साधी आपली मातृभाषा शिकवू शकले नाहीत म्हणून..

बरं परदेशी वास्तव्यास असलेल्यांकडून ही अपेक्षा फारशी केली जात नाही, पण जे ईथे आहेत त्यांच्याकडून केली जातेच. आणि मग एखादे आईबाप आपल्या कॉन्वेंटमध्ये शिकणार्‍या मुलाला घरच्या घरी चांगले मराठी बोलायला शिकवू शकले नाहीत तर ते थट्टेचा विषय बनतात. त्यांची मुले थट्टेचा विषय बनतात. जसे वर उल्लेखलेली हिरोईन बनली. आणि ही थट्टा उडवणारे तरी कोण असतात? तर जे दिवसभर सोशलसाईटवर ईंग्लिश मिंग्लिश शब्दांचा वापर करून बनवलेले मराठी दिनाची थट्टा उडवणारे मेसेज फिरवत असतात.. आणि जेव्हा तिने त्यांना विचारले , की नाही बोलता येत आमच्या पोरांना मराठी, बरं मग?... तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नव्हते. कारण त्यांची पोरेही ईंग्लिश मिडीयमध्ये जात होती. आणि अजून दोन पिढ्यांनी आपल्या नातवंडांना पंतवंडाना मराठी बोलता येत असेल का याची खात्री त्यापैकी कोणालाच नव्हती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोपू द्या श्री, आणि या वेळेलाच मला त्रास होईल असे धागे हल्ली का निघतात मायबोलीवर.
उद्या कदाचित माझीच मुले मायबोलीवर धागा काढतील, नाही बोलता येत आमच्या बाबांना ईंग्रजी, बरं मग?
या प्रश्नाचा विचारही आधीच करायला हवा..
तरी उद्याच विचार करून सांगतो, तुर्तास शुभरात्री Happy

जाता जाता अवांतर - मागे कुठेतरी वाचलेले. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी भाषा अशुद्ध बोलत असते. तेव्हा याचा अर्थ तिला नक्कीच आणखी एखादी भाषा येत असते, म्हणजेच किमान दोन भाषांचे ज्ञान असते.

असं कसं असं कसं???
तुम्ही इंग्लिश मिडीयमात शिका नैतर मुलांना शिकवा. तुमची माय्मराठी मातृभाषा ही तुम्हाला आलीच पाहिजे आणि ती ही शुध्ध्ध्ध्द

जाता जाता अवांतर - मागे कुठेतरी वाचलेले. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी भाषा अशुद्ध बोलत असते. तेव्हा याचा अर्थ तिला नक्कीच आणखी एखादी भाषा येत असते, म्हणजेच किमान दोन भाषांचे ज्ञान असते. >>>>>> कसलं भारी Happy

चिल. Wink

बरं मग... माहित नाही पण हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारसरणीचा प्रश्न आहे...

मला तरी नक्कीच अभिमान वाटतो माझ्या मुलांना "शुभंकरोती कल्याणम" बोलताना ऐकून आणि त्यापेक्षाही जास्त अभिमान वाटेल जेव्हा त्यांना मराठीत आरत्या म्हणता येतील... आता परत "नाही आल्या त्या बोलता मग?" असा प्रश्न विचारणार्यांना निरुत्तर वगैरे करायची मला गरज वाटणार नाही...

मराठी भाषा न येणे हा जेवढा मोठा प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे नी न येण्याचा अभिमान वाटणे. आपल्या मुलांना आपली मातृभाषा येत नाही ह्याचा अभिमान वाटावा की लाज वाटावी???

भाषा आली की संस्कृती, साहित्य, चालीरिती ह्याची ओळख होते. हा आपल्या अस्तित्वाचा आणि स्वत्वाचा एक प्रमुख भाग आहे. ह्याने काही फरक पडत नसेल तर अजून एक कारण आहे. कालच ह्या विषयावर माझ्या एका मावस बहिणीशी मी चर्चा करत होते. आम्ही दोघी यु. के. मध्ये रहातो. ती म्हणत होती की "आपल्या मुलांना मराठी आलेच नाही तर त्यांचा आजी-आजोबांशी बंधच निर्माण होत नाही. कारण ईंग्रजी येत असले तरी आजी-आजोबांना अक्सेंट कळत नाही आणि नातवंडाशी बोलताच येत नाही". हे मला तंतोतंत पटले. ह्याला पण "बरं मग??" असेच विचारणार असाल तर अजून एक शास्त्रीय कारण देते. एका अभ्यासात म्हटले आहे की जेवढ्या भाषा तुम्हाला येतात तेवढा तुमच्या बुद्धिवर सकारात्मक परिणाम होतो, तुमची आकलनशक्ती वाढते. मग इतर भाषा (फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जॅपनीज, इ.) शिकायच्या आधी मातृभाषा का नको ह्याचे उत्तर "बरं मग" असे विचारणारे लोक देऊ शकतील का?

सद्ध्या झालंय काय की कशातही प्राविण्य मिळविण्याआधी लोक फायद्याचा विचार करतात का, पैसा मिळणार का, मार्क मिळणार का, प्रवेश मिळणार का वगैरे...तेच लोक असा प्रश्न विचारतात. पण प्रत्येक फायदा असा मूर्त स्वरूपात मोजता येतोच असे नाही हे कळायला हवे.

सद्ध्या झालंय काय की कशातही प्राविण्य मिळविण्याआधी लोक फायद्याचा विचार करतात का, पैसा मिळणार का, मार्क मिळणार का, प्रवेश मिळणार का वगैरे...तेच लोक असा प्रश्न विचारतात. पण प्रत्येक फायदा असा मूर्त स्वरूपात मोजता येतोच असे नाही हे कळायला हवे.>>> +१

लेखाचा सारांश:
१. मुलांची मराठी शिकण्याची इच्छा नसल्यास त्यांना जबरदस्तीने शिकवु नये.
२. ज्या मुलांना मराठी शिकण्यास वाव मिळत नाही त्यांची मराठी येत नाही म्हणुन थट्टा करु नये.
३. अशी थट्टा करणारे लोक हे इंग्लीश मिंग्लीश शब्दांचा वापर करुन मराठी दिनाची थट्टा उडवत असतात.
बरोबर का?

सरकारबाई, तुम्ही फक्त समस्या सांगितलीय. उपाय नाही.
तुम्ही स्वत: काय करता अशा वेळी ? म्हणजे घरी मुलांशी फक्त इंग्रजीतच बोलता किंवा कसे ?

कारण काहीही असले तरी एखाद्या अमराठी व्यक्तीला मराठी बोलता येते ही छानच गोष्ट आहे. पण एखाद्या मराठी व्यक्तीला काही कारणांमुळे मराठी बोलता येत नाही तर यात त्याला हिणवण्यासारखे काय आहे.
>>
वरील वाक्यातील मराठी माणसाची नक्की व्याख्या काय?

जर मुलांना मराठी येत नसेल तर त्यांनी मराठी येणार्‍या नातेवाईकांशी कोणत्या भाषेत बोलावे?
जर त्या नातेवाईकांनी (किंवा इतर भाषा न येणार्‍या लोकांनी) "नाही बोलता येत आम्हाला इंग्रजी" असे सांगितले तर?

मराठी भाषिकांच्या मुलांना मग ते परदेशात असो कि मायदेशी ... मराठी येणे हे आवश्यक वाटते. अन्यथा त्यांना लॉर्ड कृष्णा , पांडवा उच्चारात महाभारताज वॉर काय लेवल पर्यंत कळू शकेल त्याचा अंदाज न केलेलाच बरा ! श्रीकृष्ण समजायला गोपगोपींचे प्रेम आणि गोकुळ समजून घेण्यासहच श्रीमद भगवद गीता सुद्धा ज्ञात होणे आवश्यक आहे.

माझ्या मते, बरं मग ? करून हा प्रश्न सोडून देण्याएवढा सोप्पा नक्कीच नाही. जर जर्मन लोक आपले वेद शिकण्यासाठी संस्कृतचा अभ्यास करतात पर्यायाने प्राचीन भारतीय संस्कृतीचा ... तर आपण आपला हक्काचा ठेवा असा नुसता भाषा न शिकण्याच्या अट्टाहासाने का बरे दूर लोटावा ?

मराठीत बोला असा धागा मायबोलीवर काढून डाफरणारे एक महान व्यक्तिमत्व , तुमचे व तुमच्या मुलांचे शिक्षण कोणत्या मेडियमात झाले, या प्रश्नावर निरुत्तर होऊन गायब झाले होते.

ते आलेत का पुन्हा ?

तुमच्या प्रोफाइल फोटो मध्येच त्याचे उत्तर दडले आहे. सैराट दाखवा. अर्चीकडे बघितल्यावर आपोआपच मराठी शिकायची इच्छा होईल त्या मुलांची. असो. हा झाला विनोदाचा भाग. भाषेबरोबर आख्खी संस्कृती नांदत असते. बऱ्यावाईट गोष्टी सर्वत्र असतात. आपल्या संस्कृतीचा भाषेचा अभिमान बाळगावा कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर न येणाऱ्या गोष्टीबाबत उद्धट प्रश्न विचारून त्याचा तिरस्कार करण्याचे संस्कार करणे चुकीचेच आहे. त्याऐवजी भाषेची/विषयाची गोडी लावून अभ्यासू वृत्ती मुलांमध्ये निर्माण केली तर ते त्यांच्याच जास्त फायद्याचे होईल. नाहीतर याच धर्तीवर ती मुले उद्या "नाही येत मला अभ्यास करता. बरं मग??" "नाही मला शाळा शिकायची. बरं मग?" "नाही करणार मी कामधंदा. बरं मग?" "नाही राहायला आवडत मला तुमच्या सोबत. बरं मग?" असे प्रश्न विचरू लागली तर तक्रार करू नका. Happy

सरकारबाई
कुठल्यातरी एका भाषेत पारंगत असले तर अडचण काय आहे ? हा ज्याच्या त्याच्या आवडीचा, सोयीचा आणि प्राधान्याचा विषय आहे. आई वडील घरात एकमेकांशी इंग्रजी बोलत असतील तर मुलांना इंग्रजीतून शिक्षण देणे त्यांना सोयीचे पडते. भाषा कुठलीही असो, त्या भाषेत जर उत्कृष्ट साहीत्य, ग्रंथ , नाटके इत्यादी असेल तर त्याची गोडी लावली पाहीजे. इंग्रजीत हे नाहीये का ?

व्हर्नाक्युलर माध्यमात शिकल्यानंतरही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता येते. पण आईवडीलांचे इंग्रजी यथातथ्या असताना इतरांचे पाहून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवल्यास अडचणी येतात असे मला वाटते. अर्थात पहिल्यांदा इंग्रजी शिकणा-या प्रत्येक पिढीला या दिव्यातून जावे लागले असणार.. चुभूदेघे.

बरं मग या फोडणीमुळे विषय भरकटला आहे. तसाही इतरत्र चावून चोथा झालेला विषय आहे.

बरं परदेशी वास्तव्यास असलेल्यांकडून ही अपेक्षा फारशी केली जात नाही, पण जे ईथे आहेत त्यांच्याकडून केली जातेच. आणि मग एखादे आईबाप आपल्या कॉन्वेंटमध्ये शिकणार्‍या मुलाला घरच्या घरी चांगले मराठी बोलायला शिकवू शकले नाहीत तर ते थट्टेचा विषय बनतात.
>>>>>

जर विषय थट्टेचा असेल तर मग फक्त इंग्रजी व अर्धवट मराठी बोलणाया मुलांचीच नाही तर अशी थट्टा एखाद्या खेड्यातुन आलेल्या मुलाची, त्याची भाषा एकुन त्याला अशुध्द भाषा अस हिणवुन ही केली जाते, जे पुर्ण चुकिच आहे..

मला वाटत, भाषा ज्याला जेवढी आणि जशी येते त्याचा सन्मान राखुन, त्याला आणखी शिकण्यास प्रोत्साहीत करणे हेच योग्य असेल..!!

ता.क :
या अगोदर वेगवेगळ्या लेखांमध्ये हा मुद्दा मी मांडलेला आहे.

मराठीत बोला असा धागा मायबोलीवर काढून डाफरणारे एक महान व्यक्तिमत्व , तुमचे व तुमच्या मुलांचे शिक्षण कोणत्या मेडियमात झाले, या प्रश्नावर निरुत्तर होऊन गायब झाले होते. >>> लोल. ते निरूत्तर वगैरे अजिबात झाले नव्हते. अनेकांनी तेथे दिव्य प्रतिसाद दिले होते. विषयावर चर्चा होण्याआधी लोक लेखकावरच सुटले होते.

हाच बाफ म्हणताय ना?
http://www.maayboli.com/node/58935

तेथे लेखकाचाच खुलासाही आला होता
हो, पण खालच्या पातळीवर येऊन तुम्ही विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अपेक्षित 'नसलेली' आहेत हे नमूद करतो.

तो बाफ पाहिला (वाचला नाही). तिथेही यापूर्वी एक बाफ आला होता आणि लेखक पळून गेले असा उल्लेख आहे प्रतिसादात. म्हणजे आद्य बाफ वेगळाच असावा..
(माबोवर पण हा विषय चाचो झाला बहुतेक )

असं माबोवर बर्‍याच वेळा म्हणतात, विषय चाचो झाला किंवा काय तेच तेच दळण. पण नवीन येणार्‍या लोकांना सगळे जुने धागे, चर्चा, संदर्भ माहित नसतात. आणी कुठलाही विषय रिविझीट व्हायला काय हरकत आहे? आपलीच मते आपल्याला नव्याने कळु शकतात किंवा त्यात फरकही पडु शकतो की.

लेखाच्या शीर्षकातील प्रश्न विचारणारी माझी ऑफिसमधील मैत्रीण आहे. तिच्या प्रश्नाने ऑफिसमधील मंडळींना निरुत्तर केल्याने तो प्रश्न मी ईथे घेऊन आले.
मला स्वत:ला मराठी छान बोलता येते. अविवाहीत असल्याने अजून मुलबाळं नाही, पण जेव्हा होतील तेव्हा आमच्या घरात मराठीच बोलले जात असल्याने ईंग्लिश मिडीयमध्ये घातले तरी ती मराठी ठिकठाकच बोलतील.

वर एका प्रतिसादात विचारले आहे,
<<<< आपल्या मुलांना आपली मातृभाषा येत नाही ह्याचा अभिमान वाटावा की लाज वाटावी??? >>>>
आपल्या मुलांना आपली भाषा येत नाही यात अभिमानाचे नक्कीच काही नाहीये? प्रश्न आहे याची लाज वाटली पाहिजे का? आणि का वाटली पाहिजे?

भाषेचे महत्व संस्कृती आचार विचार ईतिहास भूगोल सारे मान्य. पण ते आपल्याच मराठी भाषेत आहे का? जर एखादा मराठी स्पिकींग आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलाने ईंग्लिश फ्रेंच जर्मन तत्सम भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि त्यातले साहित्य वाचत ज्ञान मिळवले तर भले मराठी साहित्यापासून तो वंचित राहीला तर त्यात काही बिघडले का? आणि बिघडल्यास यात नक्की कोणाचे नुकसान? त्या मुलाचे जे तो मराठीपासून वंचित राहिला? की मराठी साहित्याचे ज्याने एक वाचक गमावला?

सपना, आपण असे का लिहिलेत?

<<<<< सरकारबाई, कुठल्यातरी एका भाषेत पारंगत असले तर अडचण काय आहे ? >>>>>

ऊलट आपली मते तर जुळली आहेत. माझ्या मूळ लेखातील पोस्टवरून तसे समजत नाहीये का? काही मिसकम्युनिकेशन होत असेल तर सांगा.

मानव पृथ्वीकर यांनी माझ्या पोस्टचे योग्य सार काढले आहे बघा
सोबत थोडे सुके म्हावरे मिळाले असते तर आणखी मजा आली असती Wink

अतुल,
विनोदानेच का होईना सैराटच्या पोस्टरची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. बदललेल्या मायबोलीने माझ्यासारख्या छोट्या गावातून आलेल्या मुलीलाही पोश्टर गर्ल केले आहे हे ध्यानात आले नाही Happy
बदलायला हवा तो डिपी

मराथि इत्के पन अवघद नाहि आहे... मला कोनि नाहि शिकवले... मि स्वतच शिक्लो>>कशाला? त्यापेक्षा तुम्ही 'मराठी' शिका.
च्रप्सबोली हे मराठीचे ईपत्य आहे..>> Lol

Pages