ए ssss झब्बू! - मराठी खाद्यपदार्थ

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 00:47

बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती Happy

हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो. राखी, सशल, धनि प्राजकता, सीमा यांना तडीपार करा. कु ऋ यांचे शंभराहून अधिक धागे झाले असले तरी या धाग्यावरच्या पोस्टींनी शंभरी भरली असल्याने त्यांनाही तडीपार करा प्लीज : भुकेकंगाल, आशाळभूत बाहुली :

संयोजक,
सशलच्या फोटोतले वडे हे शंभर टक्के मराठी आहेत. गेल्या शंभर वर्षांतल्या पाककृतींच्या मराठी भाषेतल्या पुस्तकांत त्यांची कृती आहे.

क्या बात है एक से एक खाद्यपदार्थ !
पाटवड्या कारल्याच्या वड्या, मसला शेपु मस्तच

शेव
shev

plooma , धन्यवाद!

Pages