छोटुसा,साधासा पण सुंदर असा पेठचा किल्ला !

Submitted by Yo.Rocks on 19 September, 2009 - 16:58

पेठ (कोथळीगड) -

जेव्हा भीमाशंकर केले होते तेव्हा तिथुन पेठचा किल्ल्याचे दर्शन झाले होते.. याचा शेंड्याचा आकार हा छोटा पेला उलटा करुन ठेवल्यासारखा दिसतो.. त्यामुळे हा किल्ला ओळखणे सोप्पे गेले होते.. रविवारी पुन्हा वेळ मिळाला नि ट्रेक मेटस या ग्रुपबरोबर इथे जायचे ठरवले.

इथे जाण्यासाठी कर्जत गाठावे लागते.. कर्जतहुन आंबिवली गावी जाण्यासाठी एसटी अथवा टमटम पकडावी लागते (अंतर जवळपास २५-३० कि.मी ) आम्ही जवळपास ३४ जण असल्याने टमटम बुक केली नि मार्गस्थ झालो.. ट्रेकमेट्स बरोबरचा हा माझा दुसरा ट्रेक पण पहिल्या ट्रेकचे कोणीच आले नव्हते ! पुण्याहून देखील ७-८ जण आले होते.. पण तेही नवखेच.. लिडर पण यावेळी वेगळा होता.. प्रिती पटेल म्हणुन कोणी मुलगी लिड करणार होती..!!

जवळपास एक दिड तासात आम्ही आंबिवली गावाच्या थांब्याशी आलो.. पावसाने नेहमीप्रमाणे दडी मारली होती पण हवामान ढगाळ होते.. तिथेच ओळखपरेड पार पडली नि आम्ही भल्यामोठ्या वाटेने जाउ लागलो.. सुरवातीला अतिशय साधी, दगड घालुन केलेली वाट लागते.. इतक्या साध्या वाटेने जाणे खुपच कंटाळवाणे वाटत होते.. बराच वेळ वळणे घेत रस्ता वरती जात होता.. या वाटेने जातान काहिच मजा येत नव्हती.. आजुबाजुलादेखील काहि विशेष पाहण्यासारखे नव्हते.. पुढे अचानक लिडरने एका पाउलवाटेचा शॉर्टकट घेतला जो गर्द हिरव्या झाडींमधुन जात होता.. बस्स ! त्या वाटेने वर गेलो नि समोरच बराचसा मोकळा हिरवळीचा गालिचा पसरलेला दिसला.. एका बाजुने उतरण होती.. नि ठराविक अंतरावर लहान झाडं होती.. ते बघुनच एकदम खुष झालो.. त्या हिरव्या गालिचावर मस्तपैकी लोळुन घेतले.. खालील फोटोवरुन हिरवाईचा अंदाज येईलच..
green platue.jpg
----
kho kho 2.jpg
--
OgAAAMiCF-XNsjnJFVAWnYN90J9Hrib-F4A4kAKB_PGpWnbQepAugL4WmywHc-tsV6GFVMh5wD_-K0dBkdvvQGcyiasAm1T1UCWhmPTu9l5zWjB9XRgpSw3lH9no[1].jpg

इतक्या सुंदर ठिकाणावरुन कोणी हलायलाच तयार नव्हते ! यापेक्षा मस्त नि जबरी स्पॉट पुढे आहे असे लिडरने सांगितल्यावरच सगळे पुढे निघाले.. दोघे तिघे तर पायातले बुट काढुन त्या हिरवळीचा आनंद घेत चालु लागले !

नि खरच काहि अंतर पार केले.. नि बर्‍यापैकी मोठे पठार लागले.. समोरच एका बाजुस पेठचा किल्ला नजरेस पडला.. दुरवरुन वा इतर गडावरुन हा किल्ला पाहिला तर चहुबाजुंनी तासलेला सुळका भासतो.. पण इथे तर चहुबाजुंनी तासलेल्या कड्यांच्या खांद्यावर हा किल्ला विराजमान झालेला दिसला.. पण याचा वरचा भाग मात्र ढगांमध्ये गायब झाला होता..
OgAAACk3UBHJTK66G8frddF4X7pOIqSUUhgVhCtXqUvrroToev3JtLSpb5FQdxica7MJ57sK8fcioWQZwHhPHCXIGAUAm1T1UEcXzuHNEZrzaj3y4DDX7e1-y2dn[1].jpg
इकडेच आम्हि पुन्हा विश्रांतीसाठी थांबलो.. विश्रांती नव्हतीच खरी.. फोटोशुटींगसाठी दिलेला वेळ होता.. इथे पुन्हा आम्ही धमालमस्ती सुरु केली..
upar.jpg
--
enjoy.jpg
काहिजण फुललेली सोनटकी नि अशीच विविध प्रकारची चिमुकली रानफुले कॅमेर्‍यात टिपत होता.. तर काही जण तिथेच कडेला लागुन असलेल्या झाडावरील पक्षी (Bee-Eater) न्याहाळत होते.. तर काहि़जण फुलपाखरांच्या मागे कॅमेरा घेउन धावत होते.. तर काही जण समोरील नयनरम्य दृश्यात हरवुन गेले होते.. हाच परिसर म्हणे भर पावसात ट्रेकर्स नि इतर हौशी मंडळीच्या गर्दीने फुलुन जातो.. कारण की इथुन जे धबधबे नजरेस पडतात त्यांचे एक वैशिष्ट्य आहे .. त्यांना "रिव्हर्स वॉटरफॉल" म्हणतात.. एवढेच की हवेने धबधब्याचे पाणी पुन्हा वर फेकले गेल्याने "रिव्हर्सचा इफेक्ट" येतो इकडच्या धबधब्यांना.. पण यंदा पाउसच हवा तसा झाला नाही त्यामुळे आम्ही सगळे मिसलो होतो.. ( त्यासाठी खास पुन्हा कधीतरी यावे लागेल)

हे सारे चालु असताना मलादेखील एक आगाउपणा करायची उचकी आली.. एकाने सहज त्या पठाराच्या कडेने असलेल्या उतरणीच्या टोकाला असलेला एक छोटासा मोकळा कडा दाखवला.. नि मला लगेच तिथे बसुन फोटो काढुन घेण्याची हौस झाली.. Proud नि भागवुन पण घेतली.. फक्त असलेला धोका लक्षात घेता त्या कड्यावर बसता नाही आले पण त्यावर पाय ठेवुन जरा टरकुनच बसलो Proud
OgAAABougvCKaDm8Q7iDrSZMY7Kxl-az4dOgBmKH3he7pdmKKbQAjnbe9lM6PckrMjZulwsza3D4dRZWXubKV3voIpkAm1T1UOyD3vFzMXl-7Pysmvc7d6MRQjRs[1].jpg --
fatrahihai.JPG
(मला तेव्हा त्या Dew शीतपेयाची जाहिरात आठवली..
"डर सबको लगता है ! गला सबका सुकता है ! लेकीन डरके आगे जीत है.. " पण च्यामारी "इधर डरके आगे मौत थी.." म्हणुन आवरते घेतले.. Lol )

काहि वेळाने आम्ही पुढे चालु लागलो.. आता मात्र पेठचा किल्ला ढगांच्या विळख्यातुन सुटला होता..
OgAAACQVKLgCkmxRYVsxIO-hCMpsOmxyoClAohBNGRxuiNSmPRZz7KjiKOj40ixrHwTFzgq4jdBtxgp5E3RLhaBb3UgAm1T1UIajoMurdBelc_3lJLy4l5bLv-Wh[1].jpg
संपुर्णतः हिरवेगार असलेला पट्टा मागे पडला नि लाल मातीची मोठीशी वाट लागली.. जसे जवळ जाउ लगलो तसे भातशेती दिसु लागली.. तिकडचे वस्तीतले लोक नजरेस पडु लागले.. काहि अवधीतच एक चिखल-वाट लागली.. जी काही अंतरावरील वस्तीकडे जात होती.. हीच पेठवाडी ! नि मागे असणारा डोंगर म्हणजे पेठचा किल्ला ! जवळुन बघताना जरा वेगळाच वाटत होता !
pethvadi with fort.jpg

क्षणातच आम्ही त्या वस्तीत पोहोचलो.. तिथेच एका घराच्या आंगणात थांबलो जिथे त्या काळची असलेल्या तोफेतील एक सुटा भाग ठेवला गेलाय..
toph.jpg
मला तर प्रथमदर्शनी 'घंटा'च वाटली पण नंतर त्याबाबत कळले ! तिथेच त्या किल्ल्याच्या बाबतीत माहिती दिली गेली.. नि तोफेचा वापर कसा गेला जात होता तेसुद्धा कळले.. मी या किल्ल्यासंबधित रक्तरंजित इतिहास वाचुन होतो.. हा किल्ला दिसायला छोटा असला तरी इथेच म्हणे दारुगोळ्याचा कारखाना होता.. मराठ्यांचे शस्त्रागार होते इथे !

त्या वस्तीतुनच पुढे जंगलातुन चढणीची वाट सुरु होते.. वाट थोडीफार खडकाळ आहे.. आता कुठे ट्रेक सुरु झाल्यासारखे वाटत होते ! Proud पण चढणीचा आनंद काही काळच टिकला.. कारण पंधरा वीस मिनिटातच किल्ल्याचा पुर्णतः उध्वस्त झालेला दरवाजा लागला..
door.jpg
तिथुनच पुढे गेले असता गुहा नजरेस पडते.. जिच्या सुरवातीलाच एक देउळ लागते.. कसले ते कळले नाही पण दोन दगडात कोरलेल्या मुर्ती आहेत..
unknowntemple.JPG
त्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश बंद आहे.. त्या मंदिराला लागुनच डावीकडे भलीमोठी गुहा (भैरोबाची गुहा) आहे.. एकदम सपाट जमिन, कोरीव नक्षिदार खांब नि थंड हवा इथे लक्ष वेधुन घेतात..
shilpkaam.jpg
त्या गुहेतुन बाहेर आलो नि पावसाचे टपोरे थेंब पडु लागले ! आमच्या स्वागतासाठीच आला होता जणु.. त्या मंदिराच्या उजव्याबाजुला दुसरी छोटी गुहा आहे.. तिकडुनच आत शिरलो.. ह्या गुहेतुनच किल्ल्याच्या शेंड्यावरती जाण्यास चक्क पायर्‍या बांधल्या आहेत !!!
Image229.jpg
---
stepss.JPG
----
तेव्हा लढवलेली ही युक्ती खुपच आवडली.. आतापर्यंत दुरवरुन भासणार्‍या ह्या उलट्या ग्लासातुन आम्ही चक्क आता वरती जाउ लागलो..
वीस तीस पायर्‍या चढुन गेलो नि शेंड्यावरती पोहोचलो ! एव्हाना पुन्हा ढगांनी विळखा घातला होता.. त्यामुळे क्षणभर का होईना मस्त थंड वातावरण होते.. तिथेच एका झाडाला आमच्यातल्या एकाने आणलेला भगवा फडकवला !

पाच एक मिनिटांनी ढग पसरुन गेले नि आम्हाला सभोवतालचा नजारा बघायला मिळाला.. इथे कमरेपर्यंत वाढलेले हिरवे गवतपण लक्ष वेधुन घेत होते..
Image209.jpg
--
twosome.JPG

इथेच एका मोकळ्या ठिकाणी बसुन प्रत्येकाने आपापले डबे उघडले नि अक्षरक्ष तुटुन पडले !

जेवण उरकताच काहि वेळानंतर आम्ही आता दुसर्‍या वाटेने त्या शेंड्यावरुन खाली उतरु लागलो ! म्हणजे जशी एक वाट आतुन वरती येते तशीच दुसरी वाट बाहेरुन देखील आहे..
Image214.jpg
पण दुसर्‍या बाजुने(किल्ल्याची मागची बाजु).. ही वाट किंचीतशी अवघड आहे.. पण उतरताना खालील दृश्य मस्तच वाटत होते..
mastrout.JPG
----
vaat hirvi.jpg

जवळपास पंधरा वीस मिनीटातच तो शेंड्याचा भाग उतरुन खाली आलो नि आपण कुठुन उतरलो ते लक्षात आले...
lilla.JPG

इथेच एक तोफ ठेवलेली दिसते..
त्या पायथ्याशीच ग्रुप फोटो झाला.. नि आम्ही गड उतरण्यास सुरवात केली.. ! दोन तासभरातच गप्पाटप्पा करत आम्ही पुन्हा आंबिवली थांब्यावर कधी पोहोचलो ते कळलेच नाही Happy जाताना मात्र आम्ही शेवटची एसटी पकडली.. शेवटची सीट पकडुन बसमध्ये केलेली धमाल अगदी वविप्रमाणेच..:)
एकंदर हा ट्रेक सुंदर हिरवळीमुळे चांगलाच स्मरणात राहील..
याव्यतिरीक्त संपुर्ण ट्रेकमध्ये विविध प्रकारची फुले नजरेस पडली.. एक देखणा कोळीही दिसला.. तर दोघातिघांच्या नशिबाने चक्क सापाचेही दर्शन झाले.. माझ्या मित्रमंडळीनी टिपलेल्या त्या काही मुद्रा इथे दाखवतो..
whats this.jpg
--
whitelily.jpg
---
khup chhan fool.jpg
--
bee.jpg
___
chikna spidy.jpg
-----
OgAAACD088mALB3j7gJNZKpKUknxpRlWCrU_JC2eI-X-K3psAwMDAaQlhcqBCqfLuec7mnj6czMiZSyilGADwlJbN-IAm1T1UD_SLFs6bjgZ6r06G4rN7y57Fwrd[1].jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णन आणि फोटो खास आहेत. एक सल्ला. कड्याच्या कडेला जाण्याचा आगाऊपणा परत करू नका. माती भुसभुशीत असू शकते तिथली.

यो रॉक्स
अरे तू किती ट्रेक्स करतोस, असे सारखे ट्रेक करायला जाणार्‍यांचा फार हेवा वाटतो मला. फोटो आणि माहिती दरवेळेसारखीच खास.

परत एकदा YO अक्षरशः ROCKS Happy

जमेल तेव्हढ ट्रेकिंग करत रहा रे (आणि इकडे टाकत रहा आमच्यासारख्यांसाठी) Wink

योग्या आता ह्यावर झब्बु फोटो लवकरच टाकते Proud पावसाळ्यात हा ट्रेक केला तर दिसणारी हिरवाई ह्या विकांताला गेलो तेव्हा हिरवाई गायब होऊन नुसती भेगाळलेली जमिन बनुन पसरलेली होती. करवंदीची जाळी, चाफा, कॅक्टस, घोस्ट ट्रि वगैरे मुळे थोडी हिरवळ राखुन ठेवली होती, गवत तर पार सुकुन गेल होतं. अर्थात धमाल आली नेहमी प्रमाणे ट्रेकला. लहान मुलांचा कँप नेलेला.

बाकी आता खालती गावात पण हॉटेल कोथलीगड चालु झालय. रहाण्याची सोय मस्त होते. वरती ते तोफेचा पार्ट ठेवलेल घर दिसतय ना तुझ्या फोटोत त्याच्याच भावाच हे आंबिवलीतल घर. आमचा मुक्काम त्याच्या घरी होता नी पेठ उतरुन येताना दुपारच जेवण हे पठारावरच्या तुझ्या फोटोत दिसतय त्याच्या घरात होतं

अजुनही इलेक्ट्रिसिटि आलेय तरी फार प्रॉब्लेम जाणवतो. १५ दिवस झाले अख्ख्या गावात वीजच नव्हती ट्रान्सफॉर्मर जळला म्हणुन. Sad पाणी पाईप टाकुन काही तरी करुन गावात घेत होते त्यात पण गडबड झाल्याने सध्या तर पेठ किल्ल्यावरुन सगळ पाणी खाली आणाव लागत लोकांना. गावातली विहीर अजुनही तशीच कोरडी आहे Sad

यो रॉक्स मस्त फोटु.. रखरखीत उन्हळ्यात हिरवाई चे नुसते फोटो बघुन पण बरं वाटतय.. Happy
कवे थॅन्क्स ग. हा धागा वर आणल्याबद्द्ल!

१५ दिवस झाले अख्ख्या गावात वीजच नव्हती>>> Sad

नुसती भेगाळलेली जमिन बनुन पसरलेली होती. >> अशातुन भर उन्हात मार्गाक्रमण करणे म्हणजे वैतागवाडीच !

गावातली विहीर अजुनही तशीच कोरडी आहे >> कठीण आहे.. अजुन पावसाळ्याला दोन महिने आहेत.. Sad

बाकी तुझ्या झब्बुची वाट पाहत आहोत Happy

Pages