जेवनाचे संगीत..

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

भुकेजल्या पोटी मी स्वैपाकघरात पाय ठेवला
तशी सगळी भांडी नाचू लागली गाऊ लागली..
परात म्हणाली, 'मला उचल अन् पिठ मळवं'
कढई म्हणाली, 'घेऊन मला कडेवर, हळूच ठेव आचेवर'
कुकर म्हणाले, 'हवा मला अंबेमोहोर, सुंगध दरवळेल घरभर'
पुढ्यात माझ्या सांडशी आली, कालथा आला, विडी आली, रवी आली
तवा, पोळपाट, लाटणं, बत्ता सारं सारं काही आलं
भांडयाला भांडं लागून आदळआपट व्ह्यायला लागली.
मी कान बंद केले तसा मला भास झाला..
आई म्हणाली 'कणिक मळताना हाताला जरासं तेलतूप लावावं'
कांदा चिरताना ताई म्हणाली 'पाण्यात आधी कांदा बुडवून घ्यावा'
प्रेमळ सुरात आजी म्हणाली 'वरणाला रवी लावताना पातेलं कस खोल असावं'
शेजारची सुलभा आली, वहिनी आली, मावशी आली, आत्या आली
आता आदळआपट थांबली, भासानी भरलेले घर शांत झाले,
आठवणींचे घुंगर वाजू लागले.. हळुहळु तेही मंद झाले
स्वैपाकघरातील दिवा मालवून, आवरून अन सावरून
कधी साग्रसंगीत जेवन पाटासमोर आले कळले देखील नाही..

- बी

विषय: 
प्रकार: 

आत्ताच्या आत्ता काही तरी चममचीत खावंसं वाटतंय.
आई, मावशी , आत्त्या वगैरे सतत स्वैपाकघरात असायच्या. पण त्यांच्या टेक्निककडे कधी लक्ष दिलं नाही याचे किती दूरगामी दु:ष्परिणाम भोगतेय मी?
छान लिहिलंयस - एक प्रश्न - विडी लिहिलंयस वर ते चिरायची 'विळी' समजले मी. त्याला विडी म्हणतात का तुमच्या इथे? मग फुंकायच्या 'विडी'ला ( गणेश छाप इत्यादी) काय म्हणतात?

शोनू, विदर्भात ऴ चा उच्चार कित्येकदा ड असा करतात. त्यामुळे वर चुक झाली. पण मी काही दुरुस्त करत नाही. परत चुक होऊ नये म्हणून आठवणीत ही चुक राहू दे. विडीला आमच्याकडे बिडी म्हणतात. आता इथे आम्ही बेंगाली नाहीहोत तर बिडी हिंदी भाषेतून उचलला आहे Happy

व्वा! व्वा! बी, वर्णनाने पोट ही भरले आणि मनही. जेवनाचे संगीत चांगलच जमलयं.

बी, जेवणाचे संगीत आवडले एकदम. पण खरोखरच तू बोलीभाषेत विळी ला विडी म्हणत असशील तर तसेच राहू दे ते.

बी छान आहे रे कविता. मनापासून आलीय अगदी.

शोनू, किशोर, फार ऐंड, संघमित्रा, पल्ला - अभिप्रिय कळविल्याबद्दल अनेक आभार.
- बी