दवा रोज उरते

Submitted by द्वैत on 20 February, 2017 - 06:52

आता दारूखाण्यात दवा रोज उरते
जरा घोट घेता तिचे नाव स्मरते
आता आसवाणीचं मी भरतो हे प्याले
अताशा सयांचीच नशा फार होते

उन्हे कोवळी ती आता रुक्ष झाली
फुले लाजरी ती कशी दुष्ट झाली
कसे ओस पडले हे सारे नजारे
उगा सागराने बदलले किनारे
आता ही उदासी मला धुंद करते इथे
इथे खोल ती आग अजून मंद जळते
अशी मग भडकते जरा घोट घेता
कधी आगीला का दवा ही विझवते

आता दारूखाण्यात दवा रोज उरते
जरा घोट घेता तिचे नाव स्मरते

कवी- dwait

Group content visibility: 
Public - accessible to all site users