कथा अथवा लेख दिसत नाही

Submitted by मदत_समिती on 26 June, 2010 - 15:08

मायबोलीवरील लिखाण हे त्यावरच्या प्रतिसादांच्या वेळेनुसार क्रमवारित असते. त्यामुळे नविन आलेले साहित्य बर्‍याचदा 'नवीन लेखनात' मागच्या पानांवर जाते. आपले लिखाण तिथे आहे का पहा. तसेच तुमचे लिखाण तुमच्या सदस्यत्व खात्यातही दिसते. माझे सदस्यत्व >> पाउलखुणा >> लेखन या क्रमाने दुव्यांवर गेल्यास आपले सर्व लिखाण दिसेल.

एखादे लेखन बरेच दिवस अप्रकशित ठेवून मग प्रकाशित केले तर ते लेखन नवीन लेखन मध्ये पहिल्या पानावर न दिसता ज्या दिवशी लिहायला सुरूवात केली आहे त्या तारखेनुसार बर्‍याच मागच्या पानावर सापडते सबब आपले लेखन प्रकाशित झाले नाही असे लेखकांना वाटते.
लेखन ज्या दिवशी प्रकाशित केले त्यादिवशीच्या लेखनात ते येत नसल्याने ते 'नवीन लेखना'च्या पहिल्या पानावर दिसत नाही. त्यावर जर कोणी प्रतिसाद दिला तरच ते प्रतिसादाच्या वेळेनुसार क्रमवारीत येते.

एखाद्या कथेत/लेखात जर परिच्छेद खूपच मोठा असला त्यावेळेसही असे होते आहे. कथेत/लेखात योग्य ते परिच्छेद दिल्यास कथा/लेख दिसू लागेल. शक्यतो कथा/लेख ही सलग, परिच्छेद न देता लिहीणे या प्रमुख कारणास्तव ती दिसत नाही. बदल करूनही कथा/लेख दिसत नसल्यास मायबोली प्रशासकांशी संपर्क साधावा.

पियुपरी

>> जुन्या हितगुजवरचे लिखाण दिसत नाही असे नाही.

त्यासाठी रूनीने सांगितल्याप्रमाणे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरा किंवा ही झीप फाईल उतरवून घ्या आणि त्यातले फाँट तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करा.

राफ्टींग ह्या ओळखीचा शब्द आणी शीर्षक व्हाईट वॉटर राफ्टींग असे देऊन लेखन केले होते बरेच, ते अचानक कुठेतरी गेलं आणी मी पुन्हा नविन लेखन करा अश्या पानावर आलो,
ते अर्धवट लेखन काय झालं ? कुठे शोधु मी ते आता ?

कृपया मदत करावी.

धन्यवाद.

परब्रम्ह, एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल? या मदतपुस्तिकेतल्या दुव्यावर लिहिल्यानुसार तुम्हाला तुमचे सर्व लेखन बघता येईल. जर तुमचे लेखन मायबोलीवर सेव्ह झाले असेल तर त्यात दिसेल, अन्यथा तुमचे लेखन सेव्ह झालेले नाही. मग मात्र तुम्हाला पुनर्लेखनाशिवाय पर्याय नाही.

अ‍ॅडमीन साहेब, नमस्कार.
माझ्या "सेवा जगदंबेची" या लेखा साठी प्रतिक्रीया २९ च्या १७ झाल्या नंतर काल २७ होत्या आज परत १६ च दिसत आहेत असे का होत आहे ? कृपया पहावे आणी योग्य ते करावे .

विनायक. दि.पत्की., तुम्ही चालू केलेला "सेवा जगदंबेची" हा धागा 'लेखनाचा धागा' न होता 'गप्पांचं पान' बनल्यामुळे प्रतिसाद वाहून जात असल्याची शक्यता आहे.
अ‍ॅडमिनच्या विचारपुशीत या धाग्याची लिंक देऊन तो लेखनाचा धागा बनवण्याची विनंती करा.

अ‍ॅडमिन,
मला जुन्या कथा दिसत नाहियेत.
"हा ग्रुप सुरु होण्याआगोदर --> गुलमोहर मराठी कथा"

अ‍ॅडमिन,
मला जुन्या कथा दिसत नाहियेत.
"हा ग्रुप सुरु होण्याआगोदर --> गुलमोहर मराठी कथा" >>> मलापण

अ‍ॅडमीन, चुकून आधी माझा लेख साधना मी ललितमध्ये पोस्ट केला. आता संपादन केले तरी जुन्या लेखाचा धागा तसाच दिसतो आहे. कृपया ललितमधील धागा काढून टाकावा.

Pages