मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

काकेपांदा, tracking option ? मला समजले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे.
सपना, मायबोलीवरच कुठलं पान क्रॅश होतंय? का कुठलही?

हो. कुठलेही पेज क्रॅश होतंय. नवीन प्रतिसाद वर क्लिक केल्यावर हमखास होतंय ते. पण गेल्या तासाभरात अजून तरी झालेलं नाही.
स्क्रीनशॉट घेऊ का पुन्हा झालेच तर ?

१. मोबाईलवर पाहणे सोपे व्हावे म्हणून "नवीन लेखन" हे पान पाहताना (http://www.maayboli.com/new4me_all ) शेवटचा प्रतिसाद हा रकाना बंद केला आहे (फक्त मोबाईलवर). त्यामुळे आडवे स्क्रोल, कमी करावे लागेल अशी कल्पना आहे. पण त्या + चिन्हावर टिचकी मारली तर तो रकाना उघडेल आणि शेवटचा प्रतिसाद कधी आला ती वेळ कळू शकेल. इतरही काही पानांवर जिथे आडवे स्क्रोल करावे लागते आहे तिथेही ही सोय द्यायचा प्रयत्न असेल. ही सोय न होता त्याची अडचण होते आहे का? फीडबॅक वरून ही सोय इतर पानावर द्यायची का नाही हा विचार करता येईल.
२. इतरही काही छोटे बदल केले आहेत त्यामुळे मोबाईलवर उभे स्क्रोल न करताही लगेच काही मजकूर दिसेल.

इतरही काही पानांवर जिथे आडवे स्क्रोल करावे लागते आहे तिथेही ही सोय द्यायचा प्रयत्न असेल. ही सोय न होता त्याची अडचण होते आहे का? >>> होय, मला तरी अडचण वाटतेय. प्रत्येक वेळी ' + ' वर टिचकी मारीत बसावे लागतेय. त्या ऐवजी एक कॉमन ' + ' देता येतोय का ते पहा. जेणेकरून त्यावर टिचकी मारल्यास दिनांक आणि वेळेचा अजून एक कॉलम उघडेल. (अगोदरच्या पद्धतीचा view). ज्यास हवे तो ते वापरेल.

कमीत कमी इतर पानावर तरी ही सुविधा (?) देऊ नये. जास्त स्क्रोल करावे लागले तरी हरकत नाही. हे झाले माझे मत.

वेमा, मला तरी ही आडवे स्क्रोल न करण्याची सुविधा सोयीस्कर वाटते आहे.
शेवटला प्रतिसाद केव्हा हे आपण बहुतेक आपल्याला इंटरेस्ट असलेल्या धाग्या बाबतीतच पहातो ते + वर टिचकी मारुन लगेच पाह्ता येते, असे मला वाटते.

>>ही सोय न होता त्याची अडचण होते आहे का?<<

परफेक्ट! अडचण अजिबात नाहि. माझ्यामते काॅलम एक्स्पांड (+) करायची सोय सुद्धा काढुन टाका; हु केअर्स अबौट व्हेन वाज दि लास्ट रिस्राॅंस? पेज इज साॅर्टेड एनीवे इन टाईमस्टॅंप आॅर्डर...

वेबमास्टर, मला संपूर्ण मायबोलीवरचे नविन लेखन (मायबोलीवर नवीन) दिसतच नाहिये.. मोबाईलवरुन बघतोय मी. माझ्यासाठी नवीन व ग्रुपमधे नवीन दोन्ही दिसतायत... पण संपूर्ण मायबोलीवरचे नविन लेखनच (मायबोलीवर नवीन) फक्त दिसत नाहीये.. मी त्याचा स्क्रिनशॉट देतोय...
काही प्रॉब्लेम झालाय का?

@कैवल्यसिंह
काही कारणामुळे एक जावास्क्रिप्ट तुमच्या फोनवर नीट डाऊनलोड झाली नाही. कृपया रिफ्रेश करून पहा.
@वृन्दा१
जाहिरात विभाग ऊर्ध्वश्रेणीकरणासाठी बंद होता. कालपासून पुन्हा सुरु झाला आहे.

आज मायबोली छान दिसत्येय. (आयफोन+सफारी)
पहिल्या पानावर खूप धागे बघता येतायत.
रिकाम्या जागा कमी झाल्यात.
धन्यवाद वेमा!

@ वेबमास्टर मी ब्राऊजरची कुकीज व कॅशे साफ केली व सगळा डाटा क्लिअर केला.. रिफ्रेश पण केला.
. तरी पण संपूर्ण मायबोलीवरचे नवीव लेखन (मायबोलीवर नवीन) दिसत नाही. व मी दुसऱ्या ब्राऊजर वर पण ट्राय केल हाच प्रॉब्लेम येतोय..

tracking option ? मला समजले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे
>>
http://www.maayboli.com/user/1/track
हिते तुमी काई लिवले न्हाई म्हनतुया. पैले काय, कुटं, कदी ते सांगायचा ना ते बंद केलया का म्हुन इचारलय त्येंनी.

ते बंद करून अनेक वर्षे झाली आणि परत सुरु करायचा विचार नाही कारण त्यामुळे सर्वरवर खूप ताण येतो.

हे मात्र व्यवस्थीत चालू आहे. http://www.maayboli.com/user/11901/created

तुम्ही बंद केलेलं ओ, पण आमी तरीपण बघायचो. असो, गेले ते दिन म्हणायचं नी काय!
मोबाईलवरून मस्त दिसतय पहिलं पान. आवडेश.

ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी या पुन्हा दिसू लागली आहे. उदा. पाककृती विभागात प्रादेशिक किंवा प्रकारानुसार पाककृती शोधणे पूर्वी इतकेच सुलभ झाले आहे.

वरती उजव्या बाजुला "Navigation" जे लिहिले आहे तिथे "आयडीचे नाव" असायला हवे ना ?

ते जुन्या सॉफ्टवेअरच्या वर्जन मधे होते सध्याच्या नाही. ज्याना सारखे आयडी बडलून लिहावे लागते ते सोडून इतरांना त्याचा फरक पडू नये.
आता वर तिथे Navigation च्या ऐवजी तुम्हालाच तुमचा आयडी दीपस्त आहे याची आठवण करून दिल्याने काही फरक पडेल का?

नवीन लेखनचा बुकमार्क चालत नाही. ज्या ग्रुपवर सामील झालो तेवढेच माझ्यासाठीमध्ये दिसते॥ बाकी लोक वारेमाप स्तुति करत आहेत चानचान पण आहे पण पार बेजवारा उडालाय. जाऊदे. उत्तर देऊ नका. कधी ठीक झालं तर परत येईन अथवा संपलं सारं.

नवीन लेखनचा बुकमार्क चालत नाही.>> कुठला बुकमार्क चालत नाही ते कळवाल का? सुरुवातीपासून http://www.maayboli.com/new4me_all हाच दुवा होता. आणि तो आताही व्यवस्थीत चालतोय.

"नविन लेखन" वर माउस नेला की तीन ड्रॉप डाउन ऑप्शन्स येतात "माझ्या साठी नविन, ग्रुपमध्ये नविन, निवडक मायबोली".
त्यामुळे कदाचित त्या तिन पैकीच एकावर क्लिक करावे असे कुणाला वाटु शकते. तसे काही आहे का? ड्रॉप डाउन ऑप्शन्स आले तरी नविन लेखन वरच क्लिक करावे.

"माझ्यासाठी नविन" आणि "ग्रूपमधे नविन" यात काय फरक आहे?
म्हणजे वेगळे वेगळे दिसते पण का? कित्येक बा. फ. बरेच दिवस दिसतच नाहीत नि मग गेल्या चार पाच दिवसात अनेक प्रतिसाद दिसताट. मग ते तेंव्हाच का दिसले नाहीत?

काही कारणा वास्तव वेब पेज खुप स्लो प्रतिसाद देत आहेत...
अस वाटतय पेज लोड झाल्यावर आजुन काही तरी प्रोसेस करतय बॅकग्राउण्डला ... त्या मुळे स्क्रोलींग आणि बाकिचे सगळ खुप स्लो होतय..

पेज अर्धवट लोड केल्यावर ते व्यवस्थीत प्रतिसाद देत.. म्हणजे बेसीक पेज लोड झाल्यवर आजुन काही तरी प्रोसेस करतय का , त्या मुळे खुप स्लो होण्याचा अनुभव येतोय सारख...

मला तांत्रिक माहिती कमी असल्याने प्रॉब्लेम नीट सांगता येत नाही. कालपासून लॅपटॉप वर कुठलाही नवीन नोड उघडला की एक नवीन पेज ओपन होतेय (माबोबाह्य) . बाकी कुठल्याही वेबपेज ला असे होते नाही. सिक्युरिटी सिस्टीम मायबोली कुकीज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पेजेस ओपन होत नाहीत. आणखी कुणाला असा अनुभव आला नसेल तर लॅपटॉप दुरुस्तीला टाकून पाहीन.

Pages