मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

लूक म्हणावा तसा काँपॅक्ट अजूनही नाहीये, स्पेशली पीसी/लॅप्टॉप वर वापरताना फार स्क्रॉल करायला लागतं आहे. याबद्द्ल काही करता येण्यासारखं नाहीये का?

एकाला जो काँपॅक्ट लूक वाटतो तो दुसर्‍याला खूप गिचमीडीचा वाटतो. सगळ्यांना जमेल असा सुवर्णमध्य मिळवण्यासाठी काही महिने यावर काम करावे लागेल (जे आम्ही करतो आहोतच). या अगोदरचा मायबोलीचा चेहरामोहरा जमायला वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून दीड-दोन वर्ष सहज लागले होते.
सध्याचा चेहरा अधिक सोपा करण्याचे काम सुरु आहे. पण ते तातडीने होण्यासारखे नाही. आणि हा बदल अनेक टप्प्यातून पुढील काही महिने चालू असेल.

पहिला प्रत्येक लेखा मध्ये उजव्या बाजुला हे पण पहा असे येत होते.
ते पण सुरु करता येईल का ते पहा कृपया.

वेमा, सध्याची मायबोली बरीच सुटसुटीत आहे. त्यामुळे मागचे पांढरे बॅकग्राउंड एकदमच पांढरे वाटते आणि वाचताना डोळ्यावर ताण येतो असे वाटते.
जर बॅकग्रांउंडचा मध्ये ग्रे स्केल आणली किंवा तशा कुठल्या रंगाची छटा आणली तर बरे होइल.

सध्याची मायबोली बरीच सुटसुटीत आहे. त्यामुळे मागचे पांढरे बॅकग्राउंड एकदमच पांढरे वाटते आणि वाचताना डोळ्यावर ताण येतो असे वाटते.>>>>>>>>>>+१

उजव्या बाजुला "हे पण पहा" पुन्हा सुरु झाले आहे.
(ते रंगीबेरंगी पानांवर, वाहत्या पानांवर दिसत नाही. पुर्वीही दिसत नसे त्यामुळे या पानावर दिसणार नाही)

धाग्याच्या नावावर क्लिक करण्याऐवजी प्रतिसादामधे जो आकडा दिसतो त्यातल्या दुसर्‍या आकड्यावर क्लीक केले तर जे प्रतिसाद तुम्ही अजून वाचले नाहित थेट तिथेच तुम्ही जाता. >>> हायला , ये तो मन्ने पताही नही था , धन्यवाद वेबमास्तर. >>
श्री :रागः तुझा निषेध
इकडे तिकडे चकाट्या पिटण्यापेक्षा जरा माबोचा गृहपाठ करित जा Wink Proud

वर प्रतिसादात आले असेल तर माहित नाही म्हणुन लिहिते. नवी विपु आलेली कळत नाही. प्रतिसाद दिला तर स्वतःच्याच विपु मधे येतो. सदस्यनाव मुख्यपानावर दिसत नाही.

"हे पण पहा" मुळे सर्वरवर खूप ताण येऊन मायबोली हळू चालत होती म्हणून ते सध्या काढून टाकले आहे. >>> चांगलं झालं. त्यामुळे गैरसमज पण वाढत होते विनाकारण Lol

मी मोबाइल वर युसी ब्राउजर वापरत आहे
निळ्या पट्टयामधिल फिक्कट निळी अक्षरं वाचायला त्रास होतो

मोबाईलवरून लॉगिन न करता मायबोली अ‍ॅक्सेस केलं तर कधीकधी धाग्यांवरच्या जुन्या पोस्ट्स किंवा वाहत्या धाग्यांवरच्या काही तासांपूर्वीच वाहून गेलेल्या पोस्ट्स दिसतात. लेटेस्ट पोस्ट्स दिसत नाहीत.
ब्राऊजर : क्रोम

@ rmd, मोबाईलवरून लॉगिन न करता मायबोली अ‍ॅक्सेस केलं तर कधीकधी धाग्यांवरच्या जुन्या पोस्ट्स किंवा वाहत्या धाग्यांवरच्या काही तासांपूर्वीच वाहून गेलेल्या पोस्ट्स दिसतात. लेटेस्ट पोस्ट्स दिसत नाहीत>>> मला वाटतं वेमा यांनी खाली दिलेल्या प्रतिसादामध्ये आपल्या समस्येचं उत्तर दडलेलं आहे.

<<<<<<येण्याची नोंद न करता ते जे पान दिसते ते १-२ तास जुने असून शकते. ही पाने मधून मधून Refresh केली जातात. येण्याची नोंंद केली असेल तर सगळ्यात ताजे पान दिसते. मायबोलीवर येण्याची नोंद न करता येणार्‍या वाचकांची (आणि न वाचकांची उदा Search engine robots ) संख्या ही लॉगीन करून येणार्‍यांच्या १० पट तरी आहे त्यामुळे सर्वरवर येणार भार कमी होतो. हे फार पूर्वीपासूनच आहे अशात त्यात मोठा बदल झाला नाही. तुम्ही पाहण्याच्या काही मिनिटेच अगोदर पान Refresh झाले असेल तर कदाचित तुम्हाला दोन्ही सारखेच दिसतील.>>>>>
Submitted by webmaster on 24 January, 2017 - 01:44

या पान रिफ्रेश न होण्याच्या सुविधेमुळेच तर मी कित्येक वाहत्या पानांचे एसेस २-३ दिवसांनतरही संदर्भासाठी घेतलेत व वापरलेत Wink

कदाचित असेल तसं. मायबोली अपग्रेड होण्याआधी असं कधी झालं नव्हतं म्हणून नमूद केलं इतकंच. >>> आधीही होत होतं , मला बर्‍याचदा जुने मेसेजेस दिसायचे. मला वाटलं लोकांना जसं भविष्य समजतं तसं मला बहुतेक भुतकाळ समजत असावा म्हणुन मी नाद सोडुन दिला . Proud

'संथ चालती ह्या मालिका' हा धागा (http://www.maayboli.com/node/2361) 'उपग्रह वाहिनी - मराठी' या ग्रूपमध्ये दिसतो. पण तिथे इतर भाषेतल्या मालिकांवरच अधिक चर्चा होतात. पूर्वी हा ग्रूप (बहुतेक) 'उपग्रह वाहिनी - इतर' अश्या ग्रूपमध्ये होता (ना?)

>> क्रोम वर सीपीयू खूपच खात आहे मायबोली साईट. त्यामुळे कॉमेंट लिहिणे खूप संथ होतेय. जवळजवळ अशक्य. Waiting for cas.criteo.com अशा सारखे मेसेज सातत्याने येत आहेत. याचा अर्थ सतत इन्टरनेट एक्सेसिंग सुरुच राहत आहे. इथे खाली स्क्रीनशॉट पहा.
Submitted by atuldpatil on 30 January, 2017 - 12:36

हि समस्या पुन्हा उद्भवली आहे. मागचे दोन दिवस अनुभवत आहे.

>> क्रोम वर सीपीयू खूपच खात आहे मायबोली साईट. त्यामुळे कॉमेंट लिहिणे खूप संथ होतेय. जवळजवळ अशक्य. Waiting for cas.criteo.com अशा सारखे मेसेज सातत्याने येत आहेत. याचा अर्थ सतत इन्टरनेट एक्सेसिंग सुरुच राहत आहे. इथे खाली स्क्रीनशॉट पहा.
Submitted by atuldpatil on 30 January, 2017 - 12:36 >>>

मला वाटलं माझ्याकडेच ही समस्या आहे..

atuldpatil, सपना हरिनामे, राया
अजून२४ तासांनंतरही ही समस्या येत असेल तर कृपया येथे कळवा.

अजून२४ तासांनंतरही ही समस्या येत असेल तर कृपया येथे कळवा. >> आता नाही येत. पण नवीन समस्या सुरू झाली आहे. मायबोली पेज सारखे क्रॅश होतेय. बहुधा हा क्रोमचा दोष असावा. फेसबुक चालतंय ठीक.

Pages