"घायाळ बळीराजा"

Submitted by कृष्णा तोंडे on 24 January, 2017 - 00:30

.......

" घायाळ बळीराजा "
ःःःःःःःःःःःःःः

जोडोनी कर शरण आलो देवरायाला ,
सुखी ठेव माझ्या,भोळ्या बळीराजाला....!

हेची मागने मागतोआज, तुज परमेश्वरा ,
तुचं तारक तुच मारक , हे दयासागरा....!

निधड्या छातीचा तो, माझा बळीराजा ,
त्याच्या डोहीवर,नेहमी संसाराचा बोजा....!

करतो मेहनत,तो बाळा घेऊन कडेवर ,
तरी त्याचा संसार कारे येतो उघड्यावर....!

कष्ट करुन होतो,त्याच्या काळजावर घाव ,
कधी मिळेल,का त्याच्या मेहनतीला भाव....!

कष्ट करुन थकतो हा ,बळीराजा बापडा ,
का ,नाही वाढत त्या मेहनतीचा आकडा....!

उन पाऊस न बघता,मेहनत करतो अनवाणी,
मार्केटचा भाव ऐकताच डोळ्यात येते पाणी....!

बी-बीयाणे सर्वांचाच बाजारात वाडतो भाव ,
बळीराजाच्या मेहनतीस , कुठेच नाही वाव....!

बाजारात बसुन सर्वच करतात,मालाचा भाव,
त्यांस काय ठाऊक,त्याच्या काळजावरचे घाव...!

मळकट सदर्यातुन टिप -टिप ओघळणारा घाम,
त्याच्या घामाचे मुल्य, शुन्य बाजारातील दाम..!

.........कृष्णा तोंडे
(किल्ले धारूर)जी,बीड.
मो,९४२२०८४३७७.
email:-tondekrishna56@gmail.com

.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

....

" अवकाळी "
ःःःःःःःःःःःः

जमीन नांगरुन , भुस भुसीत
केली ,
घायाळ त्याची नजर, नभावर
गेली......................!

वाट पहातो त्याची,जिव धरुन
ऊरी ,
कधी येईल म्हणे,वरुणराजाची
स्वारी....................!

ढगांचा गढ - गढ नाद , कानी
आला,
मन - मनीच तो खुप आनंदी
झाला....................!

आभाळ सांडल, झाला शिवार
पाणी पाणी,
आले ओठावरती बोल त्या,निसर्गाची
गाणी....................!

हे वरुणा, तु ठेवीतो शेतकर्याची
जाणं ,
बी- पेरीत-पेरीत, गातो औतावरच
गाणं.....................!

जिकडं- तिकडं, हिरव शिवार डौलू
लागल ,
अपुर्ण आशांच स्वप्न,भलतच रंगुन
गेल......................!

मध्येच पावसान,हाती आलेल पीक
लुटलं ,
रंगवलेल्या स्वप्नांच,भांड केव्हांच
फुटलं...................!

जेवढ पीक जोमात आल,ते मातीमोल
झाल ,
हाती काहीच नाही,डोहीवर माञ कर्ज
आलं....................!

कशी म्हणुन रे लावू ,मी तुझ्याकडे
कशाचीआशा ,
कधी अवकाळ कधी सुकाळ,फक्त
पीकांची दुर दशा ...!

काहीच उरले नाही, सगळे काही
विखुरले ,
पीकाची पाहून ही दशा,मन त्याचे
गहीवरले ..............!

........ कृष्णा तोंडे
(किल्ले धारुर)
मो.९४२२०८४३७७
email:-
tondekrishna56@gmail.com

......

...... " जात " .......
ःःःःःःःःःः

कुठून आली ही जात,जात पात असलं
काहीच नसतं,
तुझ माझं करता , इथं सगळ्यांच रक्त
लालच असतं...........!

जो तो उठतो , अनं आपल्याच जातीचे
घेतो नावं,
जाती-जातीच्या वादातच , आज मरतो
सारा गावं................!

जातीच्याच नावाखाली,करून दंगे सारे
कशाला जोर आणतां,
माणूसचं माणसाचा ,आज घेतोय जीव
हिच कारे मानवतां.....!

द्या सोडून आता हे सर्व , रहा उभे एक
दुसर्याच्या पाठीशी,
ह्या जातीच्याच नावानं,कुठवर लढतालं
आपल्याच मातीशी....!

गाडून टाका आता ही , जाती जातीची
असली परंपरा,
मानव हीच खरी आहे एक जात , मनी
हाच मंत्र धरा...........!

......कृष्णा तोंडे.
(किल्ले धारुर)जी,बीड.
मो,९४२२०८४३७७.
वा,८७९४६३६४९१.
ईमेलः-
tondekrishna56@gmail.com

......

....

......." जननी "......
ःःःःःःःःःःः

काही केल्या फिटनार नाहीत, कधीच उपकार
तिच्या दुधाचे ,
जन्मास घालुन तुला, तीने चित्र दाखवलयं या
सा-या जगाचे.........!

तुझ्या गाढ झोपेसाठी , तुला मांडीवरती घेवून
बसत होती ,
रात्र सारी जागी राहून, तुझ्यासाठी अंगाई गीत
गात होती.............!

गुटगूटीत रहावं बाळ , म्हणून नाही लागू दिला
बाहेरचा वारा ,
आरोग्यासाठी तुझ्या, तिनं आपल्या स्वतःचाचं
केला पोटमारा........!

कधी छोटीशी इजा झाली तुला,तर घाव तिच्या
काळजावर होतो ,
मग,तारुण्यातच त्या जन्मदात्या जननीला कारे
विसरून जातो........!

आपल्यासाठीच आयुष्यभर,खडतरं वाटेवरून
राबत असते ,
मग उतरवयात ती वाट,वृद्धाश्रमाकडे कुणामुळे
घेवून जाते...........!

एवढं केलच नसतं तीनं,तर हे जगाचे चित्र कधी
दिसलेच नसते,
नका जावू विसरून तीला, जननी स्वर्गापेक्षाही
मोठी असते.........!

.......... कृष्णा तोंडे
किल्ले धारूर.
मो.९४२२०८४३७७.

......