मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

>>>> सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
>>>> 10 वर्ष 8 months
>>>> FOLLOW
तर हा शेवटचा शब्द FOLLOW प्रत्येकाच्या सदस्यपानावर दिसतो आहे. त्याचा उपयोग काय? म्हणजे एखाद्याला फॉलो करता येणार आहे का? व्वा.... तसे असेल तर भारीच की....
(म्हणजे "ट्रोल्स आयडीज" चा पाठलाग करून टिपणे सोप्पे जाईल... Proud )

ते फॉन्टचे काहीतरी करा...

हेडर आणी नवीन प्रतिसाद लिहा ईतक्या मोठ्या अक्षरात का दिसतेय ?

कालपेक्षा आज बाकीची अक्षरेही खुप मोठी दिसतायेत

खुप विचीत्र दिसते ते

Untitled_0.jpg

फॉलो करायची सोय करणार असाल तर अतिशय आवडेल. परंतू वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ते बटण अ‍ॅक्टीवेटेड दिसत नाही अजून.

ते फॉलो चे बटन वेगळ्या कारणासाठी असेल जसे फॉलो ऑन फेसबूक, गुगल इ.
जसे @ चे बटन दिले आहे ते ट्विटर साठी.

संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन

माझ्यासाठी नवीन ........ग्रुपमध्ये नवीन.......... मायबोलीवर नवीन

हे देण्याचे प्रयोजन समज्ले नाही. कारण अगदी सुरुवातीला नविन लेखन यावर क्लिक केल्यावर त्याखाली ही ऑप्शन्स ऑटोमॅटीक येतात. मग पुन्हा हे परत देणे. जागा वाया नाही जात का ?

संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन
माझ्यासाठी नवीन ........ग्रुपमध्ये नवीन.......... मायबोलीवर नवीन

हे जे येतं...त्यात जर ग्रूप वर टिचकी मारुन आत जायचे असेल तर नाही जाता येत. म्हणजे उदा. काहे दिया परदेस असेल वर आणि त्याखाली उपग्रह वाहिनी -मराठी ग्रूप असेल - तर मला डायरेक्ट तो ग्रूप उघडायचा असेल तर इथून नाही जमत...आधी आत जावं लागतं....जे फार कटकटीचं वाटतं आहे!

limbutimbu
18 January, 2017 - 14:24
विपुमधेच प्रतिसाद देण्याची सोय छान आहे. फक्त अडचण अशी आहे की
मला आलेल्या विपुला मी प्रतिसाद दिला तर तो माझ्याच विपुमधे दिसत रहातो, त्याची एक प्रत संबंधित आयडीच्या विपुमधेही गेली असती तर बरे असे वाटते. अन्यथा, माझ्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत असलेल्या आयडीला मी प्रतिसाद दिलाय हे कळणार नाही, व त्याकरता माझ्या विपुमधे येत बसावे लागेल.
अन्यथा आयडीच्या विपुमधे जाऊन प्रतिसाद द्यावा लागेल पूर्वी प्रमाणेच.
limbutimbu
18 January, 2017 - 14:17
हे बर आहे... विपुमधे विपु करणाराचे नाव वरती येतय.....
मग धाग्यांवरच दुजाभाव का? तिकडेही नाव वरती येऊद्यात की..... Happy
बाकी चांगले आहे सगळे, हळूहळू स्थिरस्थावर होईल, लागी लागेल......

विपु किंवा धाग्यांवरील प्रतिसादात सभासदाचा फोटो येऊद्यात की.....
(मी आत्ताच नविन लावलाय फोटु माझा Happy )

@ limbutimbu, विपु किंवा धाग्यांवरील प्रतिसादात सभासदाचा फोटो येऊद्यात की.....
(मी आत्ताच नविन लावलाय फोटु माझा Happy )
>>> फोटो पाहिला! लई भारी दिसताय!!!!तुम्हाला पहायची इच्छा पूर्ण झाली.
वास्तविक पूर्वी विपुत फोटो दिसतच होता. प्रतिसादातही फोटो दिसण्याची कल्पना आवडली. वेमा आपण मनावर घ्याच.
खरंतर, विपुत edit entry ऑप्शन चुकीचाच आहे.
विपुत नावाचा फॉन्ट आहे तेवढाच प्रतिसादात नावाचा फॉन्ट आणि तोही फोटोसहित हवा.

धागाकर्ता पिवळ्या पट्ट्यांनी ठळक दिसायचा, ते ही असु द्या की कृपया <<< अनुमोदन.

(त्याचा या पानावरही बाकीच्या पोस्टींमधून पटकन 'आजचे बदल' टिपण्यासाठी उपयोग होईल. :-प )

बदल चांगले होतायत नवीन माबोत Happy
तरीही, लूक कॉम्पॅक्ट हवाय अजून. फार स्क्रॉलिंग करायला लागतं आहे प्रत्येक पेज ला. सॉर्ट ऑफ विसविशीत झालेत पेजेस...
फाँट्स, विरामचिन्हे आणि मराठी/इंग्रजी लिपीतला घोळ अजूनही तसाच आहे.

उदा. मिपाची साईट कुठल्याही ब्राऊजर/डिवाईस मधून पाहीली तरी नीटच दिसते आहे. तसलं काही शक्य नाही का?

आजचे बदल
माझ्यासाठी नवीन (अजून वाचायचंय) आणि ग्रूपमधे नवीन (माझ्या ग्रुपमधलं नवीन लेखन) ही दोन्ही पाने मोबाईल सुलभ वाचनासाठी बदलली आहेत.
http://www.maayboli.com/my_not_read
http://www.maayboli.com/new4me_group

माझ्यासाठी नवीन या पानावरून तुमच्या आवडीच्या ग्रूपमधली पाने आणि ज्या पानांवर तुमच्या अगोदरच्या भेटीनंतर नवीन प्रतिसाद आले आहेत फक्त त्याच पानांची यादी दिसते. मायबोलीवर येऊन निवांत वाचायला वेळ नसला, तरी पटकन मोबाईलवरून तुमच्या आवडीच्या ग्रूपपुरतं , न वाचलेलं पाहता येईल.

या अपग्रेड नंतर फोटो पटापट अपलोड होत आहेत . आधी फार वेळ लागायचा . आता फोटोज पटकन आणि स्पष्ट डाऊनलोड होत आहेत Happy

रोमन व देवनागरी अक्षरांची फाँटसाईज एकच ठेवली, तर देवनागरी खूप छोटे दिसते. हा प्रॉब्लेम लवकर सोडवला जाईल तर बरे. Otherwise typing in roman will be a better option.

माझ्यासाठी नवीन (अजून वाचायचंय) आणि ग्रूपमधे नवीन (माझ्या ग्रुपमधलं नवीन लेखन) ही दोन्ही पाने मोबाईल सुलभ वाचनासाठी बदलली आहेत.>>>,मोबाईल वर अजून हे पाहिलं नाही. पण डेस्कटॉप वर या तिन्ही टॅब (तिसरं मायबोलीवर नवीन) वर क्लिक केल्यावर आधी सगळं डावीकडे, उजवीकडे सरकायचं ते आता बंद झालं क्रोम वर... आता सगळंच डावीकडे दिसतंय. तसंच या तिन्ही टॅबपैकी कुठेही असलात तर उजवीकडे आता माझे सदस्यत्व आणि जाण्याची नोंद दिसत आहे. जी पूर्वी दिसत नव्हती, त्यामुळे जाण्याची नोंद करण्यासाठी मुखपृष्ठावर जावं लागायचं.. ते आता बंद झालं..
धन्यवाद..

मी "पाककृती विभागात", "अंबाडीच्या फुलाचे लोणचे" येथे प्रतिसाद दिला आहे. पण तो धागा पाककृती विभागात वर येत नाही. पान क्र. ३ वरच रहातो.

MB.png

माझाच प्रतिसाद मी संपादित केला तर नवीन प्रतिसाद + आधीचा अर्धवट पोस्ट झालेला प्रतिसाद दोन्ही दिसतायत. विंडोज ७, फायरफॉक्स ५०.१.०

बाकी फार काही प्रॉब्लेम दिसत नाहीये, पण तेव्हढं मराठी आणि इंग्रजी फॉण्टचा साईज नीट मॅच होईल येव्हढा कराच... वाचताना फारच कसं तरी होतं..

नवीन मायबोलीची सवय व्हायला वेळ लागेल पण जे केलेय ते चांगल्यासाठीच असेल ही खात्री आहे Happy

By the way.... मला गेले काही दिवस एक नवीनच प्रॉब्लेम येतोय.... मराठीत प्रतिसाद लिहताना पहीला शब्द बरोबर उमटतो पण त्याच्या पुढच्या शब्दाची गाडी शेवटच्या दाबलेल्या अक्षरावरच अडकून बसते.... हा प्रॉब्लेम अधूनमधून येतो... नेहमी नाही

Whatsapp आणि इतर साइटस वर मराठीतून लिहताना हा प्रॉब्लेम येत नाही

(अर्थात हे upgradation च्या आधीपासूनच होतय)

स्वरुप,
अशी समस्या मला अधूनमधून फेसबुकावरही येते. त्यावर इलाज सापडलेला नाही. आणि हे गेले अनेक महिने होतं आहे.

आत्ता मला डेस्कटॉपवरच्या फायरफॉक्समधून छान दिसतंय. लॅपटॉपवर नीट दिसत नाही. फाफॉ दोन्हीकडे सेम व्हर्जन आहे. 50.1.0
विंडोज एक्सपीवर चांगलं, ७ वर खराब. असं होऊ शकतं का?

मलाही हा लिहिण्याचा प्रॉब्लेम गेल्या काही दिवसांत यायला लागलाय. म्हणून मी प्रतिसाद बाहेर मेमोमध्ये लिहितो आणि येथे येऊन पेस्ट करतोय. काय करणार?.... पूर्वी असं काही होत नव्हतं. व्यवस्थित चालायचं सगळं.

पण बाकी नवीन मायबोली मोबाईलवर आता मस्त झकास दिसतेय. बाकी काही त्रास नाही. सर्व ऑप्शन मस्त चालताहेत.
वेब मास्टर यांचे अभिनंदन!!!

By the way.... मला गेले काही दिवस एक नवीनच प्रॉब्लेम येतोय.... मराठीत प्रतिसाद लिहताना पहीला शब्द बरोबर उमटतो पण त्याच्या पुढच्या शब्दाची गाडी शेवटच्या दाबलेल्या अक्षरावरच अडकून बसते.... >>> मला पण सेम प्रॉब्लेम आला होता शेव्टी कंटाळुन बॅकपेज करत गेलो नंतर नाही आला. jumping0006.gif

Pages