मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

नंद्याभौ, मी फाफॉच वापरत होते. Happy
पण फॉर्मॅटिंग आणि टॉगल दोन्ही नाही म्हणजे स्मायल्या ॲड करता येत नाहीत. Happy

वेमा, प्रतिसाद संपादित करताना म/ई बटण (फॉरमॅटिंग मेनूच) दिसत नाही ही अडचण आहे.

स्वाती_आंबोळे,
काहीतरी कारणामुळे तुमच्या ब्राउझर मधे फॉरमॅटिंग मेनूची जावास्क्रीप्ट लोड होत नाहीये किंवा झालेली खराब झाली आहे. दुसरा ब्राऊझर, मोबाईल हातासरशी असेल तर पडताळून पहा. आणि त्या ब्राऊझर ला ताजेतवाने करणे हाच एक उपाय आहे.

उजव्या बाजूच्या साईडबार मधे भाषा बदलण्यासाठी लिस्ट आहे तिथूनही टॉगल करता येते क्रोम मधे Ctrl + \ नाही तरी हे चालते.

@स्वाती_आंबोळे
माफ करा, मी तुमची अडचण नीट वाचली नाही. आता मला कळाले आहे. हा तुमच्या ब्राउझर चा प्र श्न नाही. नवीन प्रतिसादाला फॉरमॅटिंग मेनू लागतो आहेस, संपादन करण्यासाठी नाही. हा आमच्या कडून राहिलेला प्रॉब्लेम आहे. पाहतो काय करता येते ते

हम्म्म. रीफ्रेश करून बघेन. पण मला आयफोनवरूनही संपादन करताना तो मेनू दिसत नाहीये.
तुम्ही म्हणालात तसं भाषेच्या यादीतून इंग्रजी निवडता येते आहे. धन्यवाद. Happy

ओके. Happy

आता दिसतो आहे मेनू! yaay! Happy

मल्टिपल पानं असलेल्या धाग्याच्या शेवटच्या (किंवा कुठल्याही स्पेसिफिक) पानावर जाण्यासाठी पहिल्या पानावरचे सगळे प्रतिसाद स्क्रोल करावे लागत आहेत. तो बार वर नाही घेता येणार का?

आजचे बदल
नवीन लेखनात मजकूर लिहण्याची खिडकी पुन्हा दिसू लागली आहे.
प्रतिसाद देणार्‍याचे नाव आता थोड्या मोठ्या फाँट मधे आहे.
नविन प्रतिसादांअगोदर लाल रंगात "नवीन" पुन्हा दिसू लागले आहे.
प्रतिसाद संपादित करताना एडिटर बटन पुन्हा दिसू लागले आहे.

फोटो सहज टाकता येतील असे काहीतरी करा ना. मोबाईल वरन साईज ऍडजस्ट करून टाकणे तितके सोपे नाहीय

आजचे बदल>>> लई भारी!!!

वरती There are 129 Comments दिसतंय. याची खरंच काही गरज आहे का? हे तर धागा उघडायच्या अगोदर लिस्ट मध्ये दिसतेच आहे की!!! तेवढीच पानावरची जागा वाचेल.

आणि शेजारचा 'शेवटचा प्रतिसाद'चा काऊंट चुकलाय का?

प्रतिसाद देणार्‍याचे नाव आता थोड्या मोठ्या फाँट मधे आहे.>>> फॉन्ट अजून थोssssssडासा वाढवता येतोय का पहा ना!!! नाव वाचताना एवढा त्रास होतोय कि कालपासून मी नाव वाचणेच सोडून दिलंय.

Mobile Varun(Android) khoop white space vaya geli ahe pratyek pratisadat . Tyamule unnecessary scroll karayala lagatay.
Baki unfriendly kahi vatal nahi.

मोबाईलवर नाही चेक केला अजुन, पण मला नाही आवडला हा लुक, यापेक्शा जुनी माबो जास्त युझर फ्रेंडली वाटायची........+१

देवनागरी अक्षरं आणि रोमन अक्षरं यांच्या आकार-मापात खूप फरक आहे. त्यामुळे तर प्रतिसाद देणार्‍या सदस्याचं नाव वाचताना आणखीनच गिचमीड वाटतं. याचं काही करता नाही येणार का? विरामचिन्हंही अती मोठी दिसतायत.
नाव वाचताना एवढा त्रास होतोय की कालपासून मी नाव वाचणंच सोडून दिलंय. >>> +१

>देवनागरी अक्षरं आणि रोमन अक्षरं यांच्या आकार-मापात खूप फरक आहे.
कृपया कुणीतरी स्क्रीनशॉट देईल का इथे, आणि ब्राऊझरचे नाव +वर्जन. आज काही तासांपूर्वी फाँट्चा आकार वाढवला आहे तरी इतका त्रास का होतोय ते समजत नाहीये.

नवीन मायबोली, क्विक फीडबॅक...

नवीन माबो पाहिली. या कामी मेहनत आणि जबाबदारी घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. नवीन लूक चांगला आहे. पण...

१. मी क्रोम डेस्कटॉप मधून पाहतोय. नवीन लेखन धाग्यांच्या यादीत मोकळी जागा खूप दिसत आहे. त्यामुळे पूर्वीसारखे खूप धागे एकाच पानावर पाहायला मिळत नाहीत. "शेवटचा प्रतिसाद" ह्या कॉलम मधल्या तारखेसाठी तब्बल तीन ओळी का दिल्या आहेत ? खूप मोकळी जागा आणि मोठ्या फोन्ट मुळे साईट अंकलिपी सारखी वाटतेय. लहान मुलांकरिता असावी असे काहीतरी.

२. धाग्यात प्रतिसाद कर्त्याचे नाव वरती द्यायला हवे या सिंथेटिक जिनियस यांच्या मताशी सहमत. कृपया ते पूर्ववत करा.

३. विचारपूस मधील इतरांनी पाठ्वलेले संदेश एडीट करता येतात? हे भलतेच काहीतरी. हि (गैर)सोय कृपया बंद करा. याउलट विपू मधील संदेश इतरांना दिसणे चुकीचे आहे. विपु हा पब्लिक फोरम नव्हे. ते संदेश दिसू नये अशी सोय करता येते का ते पहा. जास्त सोयीचे होईल.

Windows 8.1 Pro, FireFox 51.0. मी डेस्कटॉपवर पाहते आहे.

मोठी विरामचिन्हं :

screen shot-1.jpg

देवनागरी अक्षरं आणि रोमन अक्षरं यांच्या मापातला फरक :

screen-shot-2.jpg

याच प्रतिसादातल्या पहिल्या दोन ओळींमध्येही हा मापातला फरक दिसेल.

धाग्यात प्रतिसाद कर्त्याचे नाव वरती द्यायला हवे >>>>

मला वाटते नांव खाली आणि बारीक अक्षरात देण्यामागे चांगला सुप्त हेतु दिसतोय! उगा एखादा प्रतिसाद पटला तरी प्रतिसाद कर्ता हा नावडता आहे म्हणून त्या विरुद्ध बोलणार्‍यांसाठी असावे... त्यामुळे मायबोलीवर बर्‍याच लोकांमध्ये सुसंवाद सुरु होईल कदाचित!! Wink

क्रोममध्ये यातलं काहीही होत नाही. पण क्रोममध्ये टाईप करता करता मधेच काही डिलीट करून परत टाईप करायचं असेल तर फार वैताग येतो. म्हणून मी माबो फायरफॉक्समधेच बघते.

धन्यवाद ललिता-प्रीति, स्क्रीनशॉट बद्दल. प्रश्न नीट समजला आहे पण लगेच उत्तर सापडले नाही अजून.
काय होते आहे की जो फाँट आम्हाला अपेक्षीत आहे तो आणि त्या आकारात दिसत नाही. तर प्रत्येकाचे ब्राऊझर वेगळे फाँट वापरत आहेत.

अ‍ॅड्मीन, पूर्वी, नविन पोस्ट्स ला क्लिक केलं की डायरेक्ट त्या पोस्ट च्या ठिकाणी पेज लोड व्हायचं, आता नविन पोस्ट्स ला क्लिक केलं तरी त्या पानाच्या सुरवातीचा मजकूर दिसतो.
अजुन एक, पानांची यादी आधीसारखीच मजकूराच्या सुरवातीला आणि शेवटी देता येइल का ? कमीत कमी की-माउस करून जास्तीत जास्त वावर (नेविगशन) करता येइल असं बघाल का ?

पुर्वी एका गृपवर क्लीक केल्यास त्या गृपमधील सर्व धागे दिसत असत. आता तसे होत नाही. किंवा त्यासाठी वेगळी काही सुविधा आहे का? उदा. मी विरंगुळा हा गृप क्लीक केल्यास विरंगुळाच्या अन्तर्गत सर्व धागे दिसत..

अडमिन टीम,अभिनंदन ! ! ! मायबोलीचा नवीन लूक आवडला...कॉम्पुटर पेक्षा मोबाईल वर छान दिसत आहे मायबोली....

एक रिक्वेस्ट होती,ती पानांची यादी पूर्वीप्रमाणे सुरुवातीला आणि शेवट अशी देता येईल का???,आणि ते प्रतिसाद कर्त्याचे नाव सुरुवातीला आणि मोठ्या अक्षरात दिली तर छान वाटेल....
धन्यवाद...

स्वतःच्याच विपुमधे लिहिता येणे (स्वगत?) ही सुविधा अतिशय आवडली. ती तशीच राहुद्या.

मात्र दुसर्याने आपल्या विपुत लिहिलेल्यात बदल करता येतो (एडिट करता येते), ते तसे नको. स्वतःची विपु स्वतःला एडीट करता आली तरी पुरे आहे.

हा फॉण्ट कोणता आहे? तो मिळू शकेल काय?
येथिल मजकुर कॉपीपेस्ट केला तर वर्डमध्ये तो मंगल फॉण्ट मध्ये दिसतो, जो बराच बोल्ड्/जाडाभरडा आहे.
म्हणून येथिल व अन्य काही युनिकोड फॉण्ट मिळण्याची सुविधा दिली तर फार उपकार होतील. हा फॉण्ट सीडॅकचा तर नाहीये?
टेस्ट = तिसर्‍या (अर्धा र करता)
अर्धा ल बरोबर येत नाहीये.

Pages