मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

अरारारा, गेला का नवीन लेखन पानावर मजकूर उजव्या बाजूला परत? वरती नवीन लेखन मधे जाऊन ड्रॉप डाऊन करून माझ्यासाठी नवीन मधे गेलं की मजकूर उजव्या बाजूला जातोय

स्मार्ट्फोनीय लूक चांगला आहे (क्रोम बाउझर)
डेस्क्टॉपवर फाफॉ मध्ये मराठी फाँट अतिशय बारीक दिसतो आहे, जुनाच फाँट वापरला तर वाचता येईल.
मी लिहिलेला प्रतिसाद वाचताना माझेच डोळे भिरभिरायला लागले. Sad

सर्व टीमचे अभिनंदन.
मी मोठ्या स्क्रीन वर आय ई आणि गुगल क्रोम दोन्ही वापरून बघितले. आय ई मधे फॉन्ट खुपच लहान दिसतोय. गुगल मधे ठिक आहे. सॅमसंग मोबाईलवर पण ठिक आहे.
सदस्याचे नाव मात्र मोठ्या अक्षरात आणि प्रतिसादाच्या वरच पाहिजे. ( फॉर ऑब्व्हीयस रिझन्स, काही सदस्यांचे प्रतिसाद
आवर्जून वाचावेसे असतात म्हणून )

फेसबुकपासुन सर्व साइट प्रतिसाद कर्त्याचे नाव वरती देतात ,तुम्ही खाली नाव दिल्याने भ्रमनिरास झाला आहे,हे कृपया बदला.ओपेरामीनीतून मायबोली नीट दिसत नाही आहे,एक आड एक धागे पांढरे व निळे दिसत आहेत.

फॉन्ट अतिशय सुंदर अन आल्हाददायक दिसतोय, मेहनत घेणाऱ्या समितीचे कौतुक करावे तितके कमीच आहे, मोबाईलवर वापरणे अतिशय सोईस्कर झाले आहे , सगळ्या टीम अन मायबोली संचालकांचे मनःपूर्वक आभार.

ती ऑउट्लाईन असे काहीच दिसत नाही. आणि फोंट एकदमच विचित्र आणि छोटा दिसतोय. रंग तर एकदमच धूसर फिक्कट वाटतो.
अश्याने मला चष्मा लागेल हो नाहीतर ह्या लूक मुळे मलाच मायबोलीला सोडावे लागेल. Proud
जोक्स अपार्ट, लूक जराही फ्रेंडली नाही वाटत आहे. पण सवयीचा भाग असू शकतो. म्हणून वाट बघेन.
आयपॅड वापरतेय(१०.७ का काहितरी आहे) आणि सफारी आहे.

आयफोन ६ वर सुद्धा ठिक नाही दिसत आहे. सफरी वर.

आत्ता चेक केले मोबाईलवर.
मी यु सी ब्राऊझर वापरते
नविन माबो मला मोबाईलवर सुद्धा नाही आवडली
जुनी माबो ईझीली फिट टु स्क्रीन होती.. आता खुप जास्त स्पेस खातीये, नुसतीच पांढरी... कंटाळा येतो सारखे वर खाली करुन वाचायला.

संगण कावर सुद्धा, हेडर खुप मोठे दिसतायेत बाकी पेक्षा, अगदी लांबुन पण वाचता येताय. ऑफीसमध्ये ते चांगले नाही ना दिसत.. अश्याने दिवसभर माबो ऊघडायचे सुद्धा वांदे व्हायचे

उर्ध्वश्रेणीकरण हा शब्द मस्तय, ज्याने सुचवला त्यांना. नमस्कार! एक दोन मिनिटे डोक्यावरून गेला मग संधी फोडून समजला.

पुर्वीचा टॅब मेनू पटकन दिसायचा. हे क्लीक वाढवले. युझर नाराज आहे.

>>> हे क्लीक वाढवले. युझर नाराज आहे. <<<<
"(नोटबंदीमुळे) जन्ता नाराज आहे (केव्हाही दंगल करू शकेल)" याच धर्तीवर वाचायचे ना हे? Wink

पुर्वी पाककृती विभागात, नवीन पाककृती ( नवीन लेखन करा ) हा पर्याय होता, तो आता दिसत नाही. तसेच पाककृती विभागात फोटो देण्यासाठी बराच सायास करावा लागतो, तो नाही का टाळता येणार. फोटोसाठी अजूनही १५० एवढीच साईझ आहे का ?

टेस्ट - पांशा
टेस्ट - लाल शाई
टेस्ट - लाल शाई
टेस्ट निळी पार्श्वभुमी

टेस्ट "टेस्ट" टेस्ट निळीवर लाल बोल्ड

हिरवी शाई

"Without Prejudice"

***

माझी कॉमेण्ट पोस्ट करण्यात आली आहे . धन्यवाद..

आमची मायबोली

छान! अधून मधून बदल हवाच! मला मोबाईलवर माबो जास्त छान वाटले. लॉग इन केले नव्हते पण अँड्रॉईड ६.०.१ क्रोम आणि फायरफॉक्स दोन्हीकडे व्यवस्थित वाचण्यासारखे छान दिसले. पीसीवरही ठीक दिसत आहे. थोडी कामे व्हायची आहेत हे लक्षात येत आहे, पण ती होतील.

हल्लीच मिसळपाव.कॉम वरही थीम बदलून मोबाईल फ्रेंडली केली तेव्हा जास्त स्क्रोल करावे लागते असा काही लोकांचा सूर होता. पण आता मोबाईलवर फक्त एकाच दिशेत स्क्रोल करावे लागते हा एक फायदा म्हणायला हरकत नाही. आधी उभे आडवे सगळ्या बाजूना स्क्रोल करावे लागत होते. मिसळपाव.कॉम वर आधी सवय झाल्यामुळे स्क्रोल करावे लागणे हा मला मोठा इश्श्यु वाटत नाहीये! =))

संगणकावर इतके छान वाटत नाहीये, पण मोबाईलवर खुप सुटसुटीत झाले आहे. इतका बदल होतच असेल तर निवडक दहा ची संख्या वाढवता येईल का. फक्त १० म्हणजे कमी आहेत.

मी कधीच मोबाईल वर मायबोली वाचत नाही. वाचावी काय ?
मागच्या वेळ सारखाच फारसा आवडला नाही नवीन लूक. मागच्या वेळी पण आवडला नव्हताच Wink
पण सवय होईल . ऍडमिन टीम आणि प्रकल्पासाठी काम केलेल्या टीमचे आभार Happy

Admin विचारपुस मधे एक मोठा प्रॉब्लेम दिसला. कुणी मला विपु केली असेल तर ती डिलीट करता येते हे ठिक आहे पण ती एडीट्पण करता येते आहे. उद्या कुणीही मुद्दाम त्यात नको तो मेसेज लिहुन त्याचा गैरफायदाही घेऊ शकतो. तेव्हा लवकर ते बंद करा.

कांदेपोहे +११११ मला पण पण हे जाणवलं होत .
दुसर्यांनी आपल्या विचारपुशीत लिहिलेला प्रतिसाद आपण कसा एडिट करू शकतो ?
चुकीचंच आहे ते Happy

कांदापोहे + १
आपण इतरांना केलेली विपु आपल्याला एडीट करता आली तर चालेल, पण इतरांनी आपल्याला केलेली विपु आपल्याला एडीट करण्याची मुभा नसावी.

डिलीटींग इज ओके.

अय्या! रंगित अक्षरांची सोय आली का परत? :इश्शः
बरं झालं बै! नव्या स्माय्ल्या पण अ‍ॅडल्यात का अ‍ॅडमिन?

Pages