मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

"ती सध्या काय करते?"
याचे माबोबद्दलचे उत्तर
"ती चालू आहे"
हेच अपेक्षित होते आत्ता Happy

वेमा, अ‍ॅडमिन व कार्यकर्ते - माबोला वेळेवर चालू केल्याबद्दल आभार!

ती सध्या काय करते?"
याचे माबोबद्दलचे उत्तर>>>

नविन रुपात जुने जपून आली आहे! Happy

नवा लूक इतका काही आवडला नाही. सवय व्हायला थोडा वेळ लागेलच. चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय.
आधी प्रतिसाद कुणी दिलाय ते कगेच कळुन यायच. वर प्रतिसाद देणार्‍याचं नाव असायचं. ह्यात ते शोधावं लागतंय.
जागा खूप मोकळी सोडलीय. आधीच्या ठेंगणी सुबक च्या जागी एकदम मोकळी ढाकळी फटफटीत दिसतेय माय्बोली. Happy

सातीला +१००

फायरफॉक्स मध्ये मराठी अक्षरे बारीक दिसतात आणि इन्ग्रजी खूप खूप मोठी दिसत आहेत...
पण एकंदर लूक आवडला...
वही वर लिहिण्या ऐवजी मोठ्ठया चार्ट पेपर वर लिहितोय असं वाटतयं !

मला ईतका नाही आवडला नवीन लूक..जूनी मा बो जास्त सहज,सोपी होती..

प्रतिसादकर्त्याचे नाव कृपया सुरूवातीस आणि जरा ठळक फाँट मध्ये येऊ द्या. +१

ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीयेत, पण मायबोलीच्या चांगल्यासाठी केल्या गेल्या आहेत, त्या यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन +१

छान दिसतोय नवा लुक.
प्रतिसाद वाचल्यानंतर कळतं की कोणी लिहिलाय , त्यामुळे प्रतिसाद वाचायचा की ओलांडुन पुढे जायचं लवकर ठरवता येत नाही. Lol

छान आहे नवा लूक, सवय व्हायला जरा वेळ लागेल पण चांगला आहे.
कुणी कुणास म्हटले पेक्षा काय म्हटले यावर जास्त भर दिलाय, ते चांगलंच आहे Lol

मस्तय नवीन लुक! Happy
मी मोबाईल वरूनच माबो वापरते. त्यामुळे मला एकदम मस्त वाटतंय. क्रोममधून काहीच प्राॅब्लेम नाहीये बहुतेक. अजून
फार वापरली नाहीये. आज दिवसभरात कळेल काय नि कशा अडचणी येतात त्या.

प्रतिसादकाचे नाव शेवटी केलेय त्याने सुरुवातीलाच गोंधळायला झाले. पण आता वाटतंय.. पूर्वग्रहदूषित नजरेने प्रतिसाद वाचले जाणार नाहीत. आधी काय म्हटलेय ते वाचा मग वाटलं तर प्रतिसाद कोणी दिलाय ते पहा. Wink छानय.

निवडक दहा सगळ्यांचेच गायब झाले का? ज्या माबो आयडी युद्धात धारातीर्थी पडल्या आहेत, त्याचं लेखन कसं वाचायचं? मी किरण्यकेच्या कविता आणि लेख १० मधे ठेवले होते. त्या आता वाचता येणार नाहीत का?

अभिनंदन!!
नविन लुक आवडला फारच, छान सुटसुटीत वाटतय वाचायला (मोबाइलवरून).
पानांच्यासाठी असलेले चौकोन इनफ मोठे दिसत आहेत (वाचायच्या युज्वल कम्फर्टेबल झुम आउट/इन सेटिंगला), पण हे चौकोन वरही दिसायला हवेत, नाहीतर पहिले सगळे पान स्क्रोल डाऊन करून मग 'शेवट' वर क्लिक करावे लागतेय.

माबोला नवीन रूप देण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार.
नव्या रुपाची आणि सोयी वापरायची सवय व्हायला वेळ लागेल थोडा.

एक सजेशन - पानांचे आकडे आधीप्रमाणे धाग्याच्या वरच्या बाजूलाही असायला हवेत. पुढच्या पानावर जाण्यासाठी पूर्ण पान स्क्रोल करून खाली येऊन क्लिक करावे लागत आहे. ही सुविधा नवीन लेखनाच्या पहिल्या पानावरसुद्धा मिळाली तर फार बरं होईल.
धन्यवाद.

फायरफॉक्सवर नवीन लेखनाचा धागा काढायचा प्रयत्न केल्यास धाग्याच्या टेक्स्टसाठी बॉक्स दिसत नाही. शीर्षक, शब्दखुणा, इ. सर्व दिसते, पण धागा लिहावा तो बॉक्स दिसत नाही.

मायबोली छान दिसते आहे. तुमचं अभिनंदन व कौतुक!

मस्त आहे नवीन मायबोली.. मोबाईलवरुन एकदमच झक्कास दिसतेय...
पन..
लेख, प्रतिसाद व इतर ठिकाणी जी वेळ दाखवतात ती २४ तासांची दाखवतात.. त्याऐवजी जर १२ तासांची नाही का करता येणार? म्हणजे वेळे पुढे AM/PM आसे नाही का लावता येणार?

नवीन प्रतिसाद आल्यावर आधी प्रत्येक प्रतिसादा पुढे 'नवीन' असे लाल आक्षरात लिहुन यायचे.. पण आता तसे दिसत नाहीये.. त्यामुळे कोणता प्रतिसाद नवीन आलाय ते ओळखताच येत नाहीये.. हि चूक दुरुस्त व्हायला हवी..

अ‍ॅड्मिन,
मी वर लिहिलेल्या अडचणी आयफोन - सफारी वापरताना येत आहेत.

मस्त दिसतेय नविन मायबोली. अभिनंनदन!!

submitted by मजकुराच्या वर अस्ता तर जास्त चांगल झाल असत. मोठा प्रतिसाद असेल तर नाव नविन पानावर जाईल.
तसच प्रतिसादाचा फोन्ट आणि सबमिटेट बाय च्या फॉन्ट मधे जरा जास्तच फरक आहे. मी क्रोम वर आहे.

अजुन एक ब्रॉझर टॅब वर द्रुपल चा फेस दिसतोय. आधी मायबोलीचा लोगो दिसायचा.

सर्वात आधी इतकं मोठ्ठं काम वेळेत संपवल्याबद्दल अभिनंदन
इतरांनी लिहिलेल्या आहेतच पण तरी मी पण सूचना लिहिणार Proud
१. मोबाईलवरून वाचायला पूर्वीपेक्षा सुटसुटीत पण तरीही फॉन्ट छोटा वाटतो आहे. प्रतिसादाची खिडकी फारच छोटी आणि फॉर्मॅटिंगचे चौकोन फारच मोठे दिसत आहेत.
२. मोबाईल आणि कॉम्प दोन्हीवर माबो फारच मोकळीढाकळी जागा सोडून दिसते आहे. खूप स्क्रोल करायला लागत आहे
३. पीसीवर फायरफॉक्समधून बघताना मराठी अक्षरं डोळ्याला त्रास होईल इतकी बारीक दिसत आहेत. कंट्रोल प्लस करूनही फारसा उपयोग होत नाहीये
४. प्रतिसादकर्त्याचे नाव ठळक अक्षरात आधी असलं तर जास्त सोयीचं जाईल (हा कदाचित सवयीचा भाग असेल पण तेच जास्त सुटसुटीत असं वाटत आहे)

बाकी छोट्या मोठ्या अडचणी (नवीन प्रतिसाद मार्क न होणे, बखर न दिसणे, इ.) हळूहळू मार्गी लागतील त्यामुळे त्याविषयी तक्रार नाही. Happy

प्रतिसादाची खिडकी फारच छोटी आणि फॉर्मॅटिंगचे चौकोन फारच मोठे दिसत आहेत. >>> प्रतिसादाची खिड्की ओढुन मोठी करु शकता.

छान. Happy
माझ्याकडे, वरील प्रतिसाद मोठ्या अक्षरात दिसत आहेत. = तो आकार जरा लहान झाला तरी चालेल.
तर प्रतिसादकाचा तपशील अतिशय लहान अक्षरात, पोस्टच्या खालिल बाजुस दिसत आहे. = हा आकार वाढवुन व पोस्टचे वरील बाजुस आला तर बरे होईल.
मी गुगल क्रोम वापरीत कॉम्प्युटरस्क्रिनवरुन बघतो आहे.

Pages