गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा!

Submitted by इनामदार on 3 January, 2017 - 23:07

राम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.

पण जे लोक पुतळा पाडल्याचा निषेध करत आहेत ते लोक प्रख्यात साहित्यिक "झोंबी" कार आनंद यादव यांचा उतारवयात जो छळ केला गेला तेंव्हा कुठे होते? काय असे लिहिले होते यादव यांनी तुकारामांविषयी? कि तरुण वयात तुकाराम आसपासच्या इतर चार तरुणांप्रमाणेच ऐहिक आनंदाच्या पाठी लागले होते. पण लवकरच त्यांना कळून चुकले कि हा मार्ग योग्य नव्हे. काय वादग्रस्त होते यात? या लिखाणाच्या प्रति आजही मटा च्या साईटवर इथे आणि इथे उपलब्ध आहेत.

4079921.cms_.jpg4079930.cms_.jpg

बस्स इतक्या लिखाणासाठी यादवांविरुद्ध वारकर्यांना उठून बसवले गेले. लिखाण आधारहीन आहे अशी ओरड केली गेली. आंदोलने झाली. यादवांच्या वैयक्तिक निंदानालस्तीवर लोक उतरले होते. त्यांना शिविगाळ करण्यापर्यंत मजल गेली. इतकेच काय त्यांना पोलीस कोठडी पण देण्यात आली. कोर्टाने हि पुस्तके फाडून टाकण्याचे आदेश दिले. या सगळ्याचे निमित्त करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून त्यांना बाजूला ठेवले गेले. या सगळ्यामुळे विलक्षण व्यथित झालेल्या यादवांनी यानंतर लिहिणेच सोडून दिले. एका सिद्धहस्त लेखकाची उतारवयात वाताहत झाली. शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याच पूर्वी केलेल्या लिखाणाची ते पारायणे करत जुन्या आठवणीत हरवून जात. सर्वांनीच त्यांना एका न केलेल्या गुन्ह्याबद्दल वाळीत टाकले.

आणि दुसरीकडे जिजाऊ महाराज, संभाजी महाराज यांच्यावर मुक्तहस्तपणे चारित्र्यहनन करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र भूषण देतात. पुतळे उभारतात. आणि त्याविरुद्ध कुणी कृती केली कि लगेच माध्यमांतून निषेधांची कोल्हेकुई सुरु होते. जरा राजसन्यास उघडून बघा गडकर्यांनी काय मुक्ताफळे उधळून ठेवली आहेत:
RaGaGadkari_RajSanyas.jpg

या लिखाणाची यादवांच्या लिखाणाशी तुलना करा आणि मग गडकरी यांचा उदो उदो करायचा असेल तर मग यादव यांचा अजून उदो उदो व्हायला हवा. आणि पुतळा पाडणाऱ्या वृत्तीचा निषेधच करायचा तर यादवांची पुस्तके फाडायला सांगणाऱ्या न्यायालयाचा आणि आंदोलने करणाऱ्या वारकऱ्यांचा सुद्धा निषेध व्हायला हवा. आहे हिम्मत?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'जनमानस' म्हणजे थोडक्यात मास सायकोलॉजी असे आहे

>> अगदी प्रामाणीकपणे सांगायचे तर ह्या मास सायकॉलॉजीचे नेमकं काय समजावं ते मला तरी कळलेलं नाही. किमान तीन महिने कोणतेही संपर्कसाधन, वर्तमानपत्र, न्यूजचॅनल न वापरता जर समाजात वावरलं तर भारतात काय चाललंय काहीही कळत नाही. लोकांना आपल्या रोजच्या जगण्याचेच प्रश्न महत्त्वाचे दिसत असतात. अगदी शेतकरी कुठे आंदोलनं करत रास्ता-रोको, दूध ओतुन दे उस पेटवून दे प्रकार करतो तेव्हाही ते त्यांच्यात्यांच्यापुरतं असतं,

पण जेव्हा टीवी लावतो, पेपर वाचतो, फोरम्स-फेसबुक बघतो तेव्हा जगात निस्ती आग धुमसत आहे की काय असे वाटते. कुठल्याही क्षणी सगळे लोक रस्त्यावर येउन कापाकापी होते की काय असे वाटू लागते. पण असे नसते.

नाशिकमधे दोनेक महिन्यांआधी जबरदस्त राडा झाला. अनेक गावं ठोकल्या गेली, रास्ता रोको वगैरे झाला. ती काही गावं सोडून इतर ठिकाणी व्यवहार स्वस्थ चालू होते.

हे जनमानस धुमसणे, वापरले जाणे, फिरवले जाणे वगैरे सर्व प्रकार खूप बेगडी, आणि वरवरचे वाटतात. त्याचा खर्‍या लोकसमुदायाच्या रोजच्या जगण्यामरण्याशी फार थोडा संबंध असावा. राजकारणी आणि माध्यमसम्राट यांच्या व्यवसायांची उलाढाल म्हणजे हे जनमानसाचे पेटणे, फिरणे, वगैरे असावे.

ह्यावर अधिक विचार व्हावा असे बर्‍याच दिवसांपासून मनात होते.

Pages