पुतळ्या पुरता - रा. ग.

Submitted by राम्या on 5 January, 2017 - 01:13

पुतळ्या पुरता - रा. ग.
(व्हाट्सअँप ग्रुप वरील चर्चेचा प्रतिसाद म्हुणुन लिहिलेला प्रतिसाद)

या पुतळा प्रकरणा मुळे, राम गणेश गडकरी कोण आहेत हे गूगल केले . आधी ते कोणी तरी एक मराठी मधले लेखक का नाटककार आहेत एवढेच माहिती होते . बाकी व्हाट्सअँप आणि फेसबुक “विद्यापिठातून” काही माहिती मिळण्याची अपेक्षा नव्हती, पेपर मधील कंमेंट्स पण त्याच ज्ञानाच्या आधारावर असल्या मुळे गुगल / विकी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. सध्या तरी एवढेच कळले कि वादातीत नाटक हे अपूर्ण आहे , त्यातील उतारा हा फारसा संधर्भ घेऊन दिला नाही वगरे.

पण त्यांच्या विषयी कळलेली इतर माहिती म्हणजे त्यांना मराठी भाषेचे विशेष ज्ञान वयाच्या १९ वर्षय पर्यंत नव्हते, नंतर त्यांनी मराठी , इंग्रजी आणि संस्कृत भाषेचा अभ्यास करून नाटके (विनोदी सुद्धा), कविता वगरे लिहिल्या. अजून काही माहिती साहित्य वाचता आले तर पाहतो.

बाकी राष्ट्र पुरुषाचा केलेला अपमान हा नाटकाचा उद्देश आहे का ?,का हा केवळ संदर्भहीन उतारा आहे? संवेदनशील मनाला धक्का लावण्या सारखे काय आहे हे नाटक वाचून पाहतो. कोणी खरेच नाटक वाचले असेल तर प्रकाश टाकावा.

"यदा कदाचित" नाटकात पांडव / कृष्ण यांची विडंबनात्मक पत्रे आहेत, आपण सुद्धा शाळा , कॉलेज मध्ये विडंबन नाटके केलीत (हे नाटक विडंबन आहे का , अपमान करणारे आहे का अर्धवट उतारा आहे हे अजून माहित नाही ) - पण एवढ्या खालच्या दर्जाच्या शिव्या देण्या इतका सात्विक राग आला आहे का ? कोणी खरेच लिखाण पूर्ण पहिले/ वाचले आहे का?

आता पहिला प्रश्न खोटा इतिहास - गडकरी हे नाटककार होते का इतिहासकार?
इतिहास / नाटककरानी संभाजींना बदनाम करण्यासाठी बरेच काही लिहिले आहे असे म्हणले तर बाजीरावांच्या इतिहासात काय लिहिलंय? ते न वाचलेला माणूस सुद्धा बाजीराव म्हणाल कि पेशवा नंतर आधी "मस्तानी" म्हणतो. अरे ते पण मराठी साम्राज्याचेच सेवक होते ना ? त्यांचा अपमान तो मराठी साम्राज्याचा अपमान नाही ? का जात बघून प्रतिक्रिया द्यायची आणि तेढ वाढवायची हाच उद्देश आहे का?

इतिहास हा वर्तमान काळात पडताळून पाहता येत नाही, त्याला संदर्भ आणि दाखलेच शोधावे लागतात. आणि असे दाखले म्हणजे त्या काळाच्या कुणाचे तरी मतच - फॅक्ट आणि ओपिनियन (सत्य आणि मत) यात फरक असू शकतो. उदाहरण म्हणजे १८५७ चा उठाव हिंदी लेखकांच्या नोंदीत "स्वतंत्र संग्राम" तर ब्रिटिश मिलिटरीच्या नोंदी मध्ये लष्करी बंड. मराठी इतिहासात शिवाजींनी सुरतेवर "स्वराज्यासाठी स्वारी केली" तर गुजराथी इतिहासात "शिवाजींनी सुरत लुटली".

दुसरा मुद्दा म्हणजे राष्ट्र पुरुष हे समूह पुरते मर्यादित ठेवायचा अट्टाहास का ? अरे “शिवाजी महाराज कि” म्हणल्यावर "जय" आणि "जय भवानी" ऐकल्यावर "जय शिवाजी" हे प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडात आपसूकच येते. कोणता हि मराठी माणूस (मग तो कितीका नालायक असेना) मुद्दामून तरी त्यान्ची चेष्टा करणार नाही.

बाकी नेते , महापुरुष समाजापुरते असतील पण शिवाजी तरी नक्कीच नव्हते. पण उगीच बिग्रेड, हि सेना/ती सेना करून ते आमचेच दैवत आणि त्यांचा मान-सन्मानाचा कॉपीराईट आमचाच हा गोंधळ कशाला ? म्हणजे बाकीचे काही बोलले कि त्यात काय वादग्रस्त सापडतय का पाहायचे. एवढी मन हळवी झाली आहेत का कि जरा कुठे काही दिसले (मुद्दामून लिहिले असेल तर ते पडताळून बडवायलाच पाहिजे) कि लगेच भावना दुखावतात का ? तिकडे "चार्ली हेब्दो" प्रकरणात मुसलमान अतिरेक्यांनी केलेला गोळीबार वाईट मग हा पुतळा तोडफोड प्रकार समर्थनीय कसा ? दोन्ही कडे मने आणि पूजनीय दैवतेच दुखावली ना?

अरे या (खोट्या) संवेदनशीलते मुळे आपण दहशत तर नाही ना पसरवत ? थोर माणसे / नेते / संत / राजे चांगलीच असतात पण त्यांचे अनुयायी कशे वागतात त्यावरून त्यांना इतर ठिकाणी मिळणार मान ठरतो, मला उल्लेख टाळायचा होता पण, अनेक महापुरुष, शांतीचा संदेश देणारे नेते हे नक्कीच चान्गले होते पण त्यांच्या सध्याच्या अनुयायांनी मांडलेला बाजार आणि जयंती पुण्य तिथीला घातल असलेला गोंधळ पाहून - त्या थोर माणसा बद्दल "न वाचताच" काय इमेज आहे बाकी समाजात?
उद्या कोणी तुमच्या समोर त्या महा पुरुषांच्या पक्षाचा/विचाराचा म्हणल्यावर तुमच्या मनात त्यांच्या विषयी काय मत होते?

मित्रानो आपल्या राजांची प्रतिमा आपणच सांभाळायची आणि वाढवायची का असले अप्रकाशित साहित्य शोधून काढून त्यांना फुकट प्रसिद्धी द्यायची, त्या जेम्स ला कोणी ओळखत तरी होते का ? किंवा त्याने काय लिहिले ते तरी आपण कुणी वाचले का? फुकट त्याला प्रसिद्धी देऊन तेवढे वाईटच प्रसिद्ध झाले कि नाही ? मराठी माणसाच्या मनात असल्या लिखाणानी शिवाजी आणि छत्रपती घराण्याचा आदर कमी होणार नाही पण बाहेर काय message जातोय ते तरी पहा ?

अश्याने फक्त मूठभर लोकांना दहशत निर्माण करायची संधी मिळते आणि बाकीचे बदनाम होतात. अरे शिवाजी ग्रेट आहेतच वादच नाही पण त्यांच्या नावावर - अमेरिकन विद्यापीठात १०० मार्कांचा विषय काय ? पुतळा आहे काय ? ग्रीनिज बुक मध्ये नाव काय ? असले मेसेज पाठवून काय मिळते लोकांना ? का हस करताय - गूगल वर तरी पडताळून पहा.

तामिळनाडूत देव असलेला रजनीकांत बाहेर विनोद आहे आणि मराठी साम्राज्याचा राजा गुजराथेत हल्लेखोर म्हणून ओळखला जातो - आपणच आपल्या राजाची बदनामी रोखली नाही तर बाहेरच्यांना काय उज्ज्वल इतिहास सांगणार आपण ? माझा राजा महान होता आणि राहणारच पण एखाद्याच्या अतिरेकी पण मुळे चेष्टेचा विषय ना बनो एवढीच इच्छा.

सगळेच लोक असा भडक विचार करत नाहीत पण आंधळे फॉर्वर्डस आणि विचारहीन चर्चा या मुळे फक्त आणि फक्त गौरसमज पसरतात. वैचारिक मतभेद असणार आणि पाहिजेत. लिहिणाऱ्याला जसे वक्ती स्वतंत्र आहे जाते विरोध करणाऱ्याला हि आहे पण भडक कृती नंतर पसरल्या जाणाऱ्या अफवा थांबवणे हे एक सशक्त समाजाचे लक्षण आहे.

उगीच संधर्भ हीन व्हाट्सअँप वरचे messages, बढाया त्या मुळे विनाकारण राग आणि गैर समज निर्माण होतात आणि फायदा शून्य होतो ते तरी विचार करा.
व्याकरण चूक भूल देणे घेणे आणि चुकून भावनेच्या भरात काही कमी जास्त लिहिले / दाखले दिले असतील तर माफी - वाटले म्हणून लिहिले - लोभ असावा

~ तुमचा प्रमोद (राम्या)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं झाल पुतळा फोडला ते. त्यामुळे नवीन पिढीला कळले तरी राम गणेश गडकरी कोण होते ते?

@ प्रकाश घाटपांडे - खरय ,
लोकांची स्मरणशक्ती लघुकालीन असते ते खरंय. आता ते पुतळा फोडणारे आणि परत बसवणारे आणि त्याची बातमी करून TRP मिळवणारे सगळे गायब
पण वाईट बाबतीत लघुकालीन स्मरणशक्ती हे वरदान आहे.

"बाकीचे काही बोलले कि त्यात काय वादातीत सापडतय का पाहायचे." - वादातीत म्हणजे वादाच्या पलीकडे. ज्यावर वाद होऊ शकत नाही असे. तुम्हाला अभिप्रेत असलेला शब्द वादग्रस्त आहे.