वडील

Submitted by वृन्दा१ on 27 December, 2016 - 02:57

माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद म्हणणे फारच कृत्रिम वाटते.असेच प्रेम राहू दया.एक शेर आठवलं,'हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिल को खुश रखने को ग़ालिब ये ख्याल अच्छा है।'

एकाच धाग्यात का नाही लिहीत तुम्ही? दर २-४ ओळींसाठी नविन धागा? Uhoh काय लिहीत आहात त्याची अजिबातच लिंक लागत नाही त्यामुळे.

असं नका हो बोलू गिरिदा..त्यांचं दुःख समजून घ्या ..
आणि हो ते तडका प्रमाणे करू शकतात??

edit करा धागा अन लिहून पुन्हा पुन्हा सेव्ह करा, म्हणजे सगळ्या चारोळ्या एकत्र राहातील.

उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला
तो पोहोचला हे लगेच कळतं
त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत

माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?

डोळयांसमोर झळाळतं
तुमचं राजस रूप
भेटत जा ना स्वप्नांत
बोलत जाऊ खूप

प्रत्यक्षाहूनही उत्कट
तुमचे सततचे भास
मन थकून जातं
पण संपत नाही आस...

आता कसली कोजागिरी
आणि कसलं काय
भरलेल्या डोळ्यांवर
आठवांची साय....

डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट

या असल्या शिक्षेपेक्षा
परवडला तुमचा राग
कशानेच शांत होत नाही हो
ही अंतरातली आग.....

कृपया,अशी एक सलग कविता एकाच धाग्यात देता येईल तर पहा!

तुमच्या भावना सहज कळताहेत वृंदा१.
सहज ओघाने आल्या
आणि त्याच ओघाने प्रतिसादपण.

लिहीत रहा.

आणि ओघाने यातून बाहेरपण या Happy

शुभेच्छा!

स्मरणातल्या बाप्पा
बाप्पाला आणायचात तुम्ही
भक्तीनं अन् हौसेनं
तुम्ही देखणे आणि बाप्पाही
आम्ही पळायचो मस्तीनं
आताच्यासारखी तेंव्हा
सजावट नसायची खूप
जुन्याच मोत्याच्या माळेने
बाप्पांचं खुलायचं रूप
एक रंगीत लाईटचा दिवा
तुम्ही सांभाळून लावलेला
बाप्पांपुरताच कोनाडा
डिस्टेम्परने सजलेला
मोठमोठ्यानं म्हणायची
तुमच्यासोबत आरती
शब्द विसरायचा एखादा
नजर जायची खालती
भूलवायचा आम्हाला
मोदकांचा ढीग
घरोघरच्या प्रसादाची
लावायची रीघ
जुनाच कागदाचा पंखा
आणि टिकल्यांचे तोरण
त्या रत्नांच्या क्षणांचे
सतत होते स्मरण
दहा दिवस जायचे
कसे भुर्रकन उडून
विसर्जनाच्या दिवशी
घ्यायचे गुपचूप रडून
बाप्पांचा निरोप घ्यायला
मुद्दाम लावायचा वेळ
कळायचा नाही ना तेंव्हा
सुखदुःखाचा अजब खेळ
तुमच्या गोऱ्यापान कांतीवर
मुकटा तेजानं शोभायचा
बाप्पासुद्धा हसतमुखानं
फक्त तुम्हाला न्याहाळायचा
स्मरणातल्या बाप्पा
आता एकच मागणं
आमच्या दादांना
सतत सुखी ठेवणं ......