मला पडलेली स्वप्ने

Submitted by यदुनाथ on 5 December, 2016 - 05:40

कधी कधी आपल्याला कशाहीप्रकारची स्वप्ने पडतात. अशाच काही स्वप्नान्ची माहीती इथे द्यावी..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक "मला पडलेली स्वप्ने" आहे, मग तुम्हीच सुरुवात करा कि तुमच्या स्वप्नाने. नाही तर धाग्याचे नाव "तुम्हाला पडलेली स्वप्ने" असे ठेवा.

एका भयाण मध्यरात्री मी मायबोलीवर धागा काढतो आणि ब्रश करायला जातो. ब्रश करून येतो, पेज रिफ्रेश करतो, एकही प्रतिसाद नसतो. मी वेळ बघतो. धागा काढून सहा मिनिटे झाली असतात. मी स्वत:ला समजावतो. वेडा आहेस का? एवढ्यात कसा येणार प्रतिसाद? कोणी धागा काढल्या काढल्या वाचला तरी सात मिनिटे लागतील. त्यावर प्रतिसाद टंकायला दोन. एकूण नऊ. त्यात एक मिनिटाची मार्जिन. दहा मिनिटांच्या आत प्रतिसाद येणे शक्यच नाही. मग मी आत जाऊन दूध तापवायला येतो. एक नजर घड्याळावर असतेच. मोजून दहा मिनिटे होताच मी गॅस काढतो आणि दूध जेवढे गरम झाले असेल तेवढे एका कपात घेऊन पुन्हा लॅपटॉप उघडतो. अजूनही प्रतिसाद आला नसतो. मी एकेक घोट दूध पित अधूनमधून पेज रिफ्रेश करत राहतो. अगदी सावकाश. एक दोन साडे माडे तीन म्हणावे तसे मी दहा ते बारा मिनिटे दूधच पित असतो. अजून एकही प्रतिसाद आला नसतो. हळूहळू मला झोप येऊ लागते. मग मी झोपेच्या आधीची तयारी म्हणून बाथरूमला जातो. डोक्यात हेच घोळत असते की अजून एकही प्रतिसाद कसा आला नाही. धाग्यात मसाला टाकायला विसरलो का? पटकन अर्धी बादली पाणी ओतून पळतो आणि पुन्हा जागेवर येऊन धागा वाचतो. पर्रफेक्ट. लास्ट लाईनीला जो पंच टाकलाय त्यावर तरी एखादा प्रतिसाद एव्हाना यायलाच हवा होता. पण बघता बघता तास झाला असतो. ईतर धागेही फार काही वर खाली झालेले नसतात. मग मला हळूहळू जाणीव होते की मीच घुबडासारखा जागतोय पण उर्वरीत जग यावेळी झोपलेले असेल. नाही म्हणायला एक अमेरीका तेवढी जागी असेल. पण तिथल्या भारतीयांना चाळवावे असे काही माझ्या धाग्यात नाहीये. पुढच्या वेळी टाकायला हवे किंवा नसल्यास ते धागे सकाळीच काढायला हवेत. तर आता झोपूया म्हणत लॅपटॉप बंद करत, मोबाईल कुशीतच घेऊन मी झोपतो. गाढ डोळा लागेपर्यंत दर पाच दोन मिनिटांनी मोबाईलवर पेज रिफ्रेश करणे चालूच असते. अचानक थोडा डोळा लागतो. झोपेत वेळ कसा भरभर जातो समजतच नाही ना. डोळे उघडून पाहतो तर हलकेसे उजडू लागले असते. मायबोलीवर उजाडले का म्हणत मी पुन्हा पेज रिफ्रेश करतो. आणि काय आश्चर्य! ८ नवीन प्रतिसाद. मी हपापलेल्यासारखे सारे प्रतिसाद वाचून काढतो. त्यातील तीन प्रतिसादांना कडक रिप्लाय द्यायचे ठरवतो. जेणेकरून त्यावरण आणखी आठ त्रिक चोवीस प्रतिसाद येतील. तीन उत्तरे तीन वेगळ्या प्रतिसादांत लिहून मी तिथेच आठाचे अकरा प्रतिसाद बनवतो. पण मधल्या काळात आणखी चार प्रतिसाद आलेले असतात. ते देखील धागा पुढे नेणारे. लोकं माझ्या धाग्यातला मुद्दा घेऊन आपसात भांडायला लागले असतात. आता हे लोकं दिवसभरात माझा धागा शतकाजवळ नेणार याची स्पप्नं मला पडू लागतात. मी आता काही न टंकता फक्त पेज रिफ्रेश करत राहतो. दर दोन मिनिटांनी आता दोनचार नवीन प्रतिसाद वाढलेलेच दिसू लागतात. एवढ्या वेगाने जे माझा वाचायचा स्पीड देखील त्यापुढे कमी पडू लागतो आणि मी त्या आनंदाच्या झटक्यानेच जागा होतो. अलार्म वाजायच्या अर्धा तास आधी. मला समजते ते स्वप्न होते. तरी मन ऐकत नाही. ते मोबाईल चेक करायला सांगते. मी पेज रिफ्रेश करतो. ते स्वप्नच असते हे समजते, पण तरीही चक्क तीन प्रतिसाद आलेले असतात. १) काही कामधंदे नाहीत का रे तुला? २) मलाही तेच वाटते ३) मला आवडलं ... यांना माझा लेख आवडलेला असतो की पहिले दोन प्रतिसाद या गोंधळात न पडता मी तिसर्‍या प्रतिसादाला धन्यवाद बोलून पुन्हा झोपून जातो. कारण अजून अलार्म वाजायला पंचवीस मिनिटे शिल्लक असतात ...

नवीन धागा न काढता ईथे लिहिलेस म्हणुन असावे. >>> हा हा Happy
मला खरे तर नवीन धाग्यापेक्षा प्रतिसाद लिहिण्यातच मौज वाटते. आपणच एक विषय ठरवून लिहिण्यापेक्षा समोरून आलेल्या विषयात गंमत असते तसेच. आणि स्वतःच्या धाग्यावर प्रतिसादांत आता आणखी काय लिहायचे हे ही सुचत नाही. पण मी माबोवर ऑनलाईन असताना कुठल्या धाग्यात काही लिहिण्यासारखे नसले किंवा लिहून संपले तर नाईलाजाने आपलेच धागे काढावे लागतात. सतत काहीतरी लिहित राहायची भूक ईथे तिथे प्रतिसाद लिहून भागत नाही हे देखील माझ्या धागा कढायच्या हौसेचे एक कारण आहे Happy

महेश Proud

५ डिसेंबरचा धागा होता, आज २९ ला कोणीतरी पहिली पोस्ट देत वर काढल्याने मी त्यावर धाग्यातले पहिले स्वप्न लिहिले, जे खुद्द धागार्त्यानेही लिहिले नव्हते. तर धागा योग्य दिशेने चालू केल्याबद्दल यदुनाथ माझे आभारच मानतील की...... उगाच नावानेच बदनाम आहे मी Happy

Happy मी ही लिहेन एखाद दोन स्वप्नं. पण मला टायपिंगचा भारी आळस आहे. तीन चार ओळींच्या वर लिहिले जात नाही. मराठी टायपिंग तर खुपच चुकते. ते करेक्ट करता करता लिहायचा मुडच जातो.

राया, आणि मी अगदी उलट. मोबाईल व्हॉटसप फेसबूक मायबोली जिथे तिथे निव्वळ मराठीच .. पाण्यासारखा लिहितो आणि त्या स्पीडसाठीच ओळखला जातो..... हा नवीन धाग्याचा विषय आहे, उद्या बनवतो.. आता शुभरात्री Happy

श्री, हो, मध्यरात्रीच्या धाग्यावर म्हणजे आणखी कोण .. रात्रपाळीचेच सभासद Happy

असा एक बीबी आहे ना ऑलरेडी...

अशे अनेक बीबी आहेत ऑलरेडी Proud

सारखं सारखं त्याच झाडावर काय?

ऋन्मेष, स्वप्नं लिहायची आहेत. स्वप्नांच्या नावाखाली सत्यकथा नाही Lol इथेही .............. Proud

माझं नावच सपना आहे म्हटल्यावर आणखी काय सांगणार !!