२०१७ - घरांच्या किमती, व्याजदर, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, SIP इत्यादी

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मागच्या सात-आठ वर्षात पुण्यातल्या किंवा एकूणच घरांच्या वाढलेल्या किमतींबद्दल आपण खूप ऐकले/वाचले . अर्थात मी स्वत: योग्य वेळी (म्हणजे किमती प्रचंड वाढलेल्या असताना) घर घेतल्यामुळे सुखी आहेच. परत नवे घर घेण्याचा माझा अजिबात प्लॅन / तयारी /ऐपत नाही. "आता घरांचे दर निम्म्याने कमी होणार" ही गोष्ट मागची बरीच वर्षे ऐकत आलो. मी घर घेतल्याच्या दुसर्‍या दिवशीच मला एकाने ही गोष्ट ऐकवली होती.

पण कालच्या (२३ डिसेंबर २०१६) ईकॉनॉमिक टाईम्समधे वाचलेल्या या बातमीमुळे मनात विचार आला, "च्याऽयलाऽ!!!"

(हे मोदींमुळेच झाले यावर माझा ठाम विश्वास आहेच्च.. पण विषयांतर नको.. )

तर मुळ मुद्दा हा आहे, की इथून पुढे ज्यांना घर घ्यायचे आहे, किंवा घर/फ्लॅटमधे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त गोष्टी 'माहिती' म्हणून समजून घ्यायच्या आहेत. तसेच, सततच्या मार्केटिंगच्या चूकीच्या प्रभावापासून स्वतःला वाचवण्याबद्दलचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत.
उदा.
१. मोठ्ठा डिस्काऊंट देणारे बिल्डर्स, बांधकाम/ अ‍ॅमेनिटी मधे १००% तडजोड करणार. (डिस्काऊंट न देताही बिल्डर्स ही सोय देतात. काळजी नसावी..)
२. फार्म हाऊसच्या जाहिराती वाचून "हे फार महाग नाही" असे वाटले, तरी त्यात प्रॅक्टीकली गुंतवणूक करणे सामान्य लोकांना अशक्यच. त्यांचे एक युनीट तितके महाग नाही असे वाटले, तरी प्रत्यक्ष फार्म हाऊस घेऊन तिथे घर बांधायचे झाल्यास किमान दोन युनीट्स तरी घ्यावी लागतातच.. परत ते फार्महाऊस असतात "मोराची चिंचोळी" ला..
३. फार्म हाऊसच्या जाहिरातीमधे तीन वर्षात दामदुप्पट अशी बायबॅक ऑफर असते. => हा हा हा!

पुढील मुद्दे आधीच माहिती आहेत असे समजून चर्चा झाली तर बेस्टच..
१. २०१७ मधे नवीन घर घेणार्‍यांनी रेडी पझेशन घरच घ्यावे, अण्डर कन्स्ट्रक्शन स्कीम मधे चुकूनही बुकींग करु नये.
२. कर्ज काढून सेकंड होम घेण्याइतका मूर्खपणा नाही.
३. सेकंड होम घ्यायचेच असेल, तर ईएमआय, येणारे भाडे, मेंटेनन्स आणि इतर कॉस्ट्सचा विचार करून मगच त्यात पडावे.
४. "गावाबाहेर एखादा प्लॉट घेऊन ठेवावा, आणि दहा वर्षांनी विकावा", हे जरी खरे असले, तरी तिथला गावगुंडांचा वावर इत्यादी मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.

ह्यात मोदींची चूक नाही, पण सध्या एफ.डी. चे दर ७.१५ टक्क्यापर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे पैसे शिल्लक राहिलेच, तर ते गुंतवायचे तरी कुठे? असा प्रश्न पडल्यास शेअर बाजार हा एक योग्य पर्याय आहे. त्याबद्दल काय मत आहे?

मी स्वतः बरीच वर्षे शेअरबाजारात थोडीथोडी गुंतवणूक करून काही प्रमाणात फायदा करुन घेऊ शकलो आहे. आणि आत्ता शेअरच्या पडलेल्या किमती ही गुंतवणूक करायची चांगली संधी आहे, असे मला वाटते. वैयक्तिकरित्या मला पुढील एका मुद्द्यामधे इंटरेस्ट आहे: -
फंड्सइंडिया, बिर्ला इत्यादी कंपन्यांचे SIP वापरण्यामधे कितपत पॉईंट आहे? तुम्ही स्वतः ते करता का?

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

$$ विषय गंभीर आहे. त्यामुळे आपण खंबीर रहायलाच हवे. इतर धाग्यांप्रमाणे इथेही ट्रोलींग नक्कीच होईल, पण एकूणच महत्त्वाचा आणि सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्याने शक्यतो सकस चर्चा करुया! सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींचा विचार करता अर्थकारण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही इथे लिहीलेली माहीती सर्वांना उपयुक्त ठरेल, त्यामुळे शक्यतो सोप्या शब्दात उलगडून सांगा!!

$$ ह्या विषयावर पुर्वीही चर्चा झाली आहे, पण वरची बातमी पाहता २०१७ मधे समीकरणे बदलू शकतात म्हणून चर्चेसाठी नवा धागा उघडला आहे. इथे न लिहीलेल्या पण महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल नक्की लिहा! इतर काही प्रश्न असतील, तर अ‍ॅड करा..

टीप : ह्या धाग्यावर चुकून जर विषयाला धरुन डीटेल चर्चा झालीच, तरी ती केवळ माहिती म्हणून वापरावी. तेच अंतिम सत्य वगैरे समजू नये. Happy

२०१७ सर्वांना सर्वार्थाने चांगले जावो ही सदिच्छा!!!

(मायबोलीवर सगळ्यात पैल्यांदा हॅन्यूई म्हणणारा धागा आपलाच वगैरे... ♪)

प्रकार: 

मार्केट रोजच पडत आहे.
नोव्हेंबर पासुन फिल्डींग लावलेली आहे.
पहिला वाटत होतं ३० डिसेंबर पर्यंत थांबावं व नंतर एंट्री मारावं, आता वाटत आहे बजेट पर्यंत थांबाव.

>>मार्केट रोजच पडत आहे.
मग आत्ता कमी भावात शेअर्स घेतले तर चांगले नाही का ?? नंतर भाव वाढले की फायदा.

mahesh, ajun kiti padnar he samjat nahiye na..
He jyala samajata, ani thodafar nuksan sahan karu shakato tyala changla fayda milawata yeu shakato..

>>>> >>मार्केट रोजच पडत आहे.
मग आत्ता कमी भावात शेअर्स घेतले तर चांगले नाही का ?? नंतर भाव वाढले की फायदा. <<<

महेश,
मार्केट मध्ये अजुन ही अनिश्चितता आहे. मार्केट अजुन खाली येऊ शकतं.
समजा तुम्ही आता खरेदी केलीत, आणि मार्केट पडलं तर तुम्ही खरेदी केलेले शेअर्स ची भाव ही घसरु शकतात (depends on which shares you have purchased)

Pages