नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

आठ नोव्हेंबर २०१६ ला चलनबंदीच्या स्वरूपात अस्मानी नाहीपण जी सुलतानी देशावर कोसळली त्याचा वैयक्तिक आयुष्यावर, कौटूंबिक कार्यप्रसंगांवर काय परिणाम होतोय याविषयी प्रचंड उहापोह मायबोली आणि इतरत्रही झालेलाच आहे.
परंतु या चलनबंदीचा एकंदर उद्योगधंद्यांवर, कुशल /अर्धकुशल कामगारांवर, शेतीवर, शेतीआधारित व्यवसायांवर आणि परकीय गुंतवणूकीवरही काय परिणाम झाला हे पाहिले पाहिजे.

आपल्यापैकी कुणाचे स्वतंत्र उद्योगधंदे असतील, कुणी शेअर बाजारात गुंतवणून करत असेल, कुणी परकीय गुंतवणूकीच्या क्षेत्रात असेल, कुणी इतरांच्या उद्योगधंद्यात सहाय्यक म्हणून काम करत असेल किंवा कुणी नुसतंच या सगळ्या उलाढालींवर लक्ष ठेवून पुढच्या मार्केट इकॉनॉमीचा अंदाज घेत असेल. तर अशा लोकांनी आपापली मते, निरीक्षणे इथे मांडावीत म्हणून हा धागा. भारतीय/अभारतीय अर्थपंडितांची मते सुद्धा मांडता येतील.

(कृपया या धाग्यावर मे २०१४ पासूनचे सगळे काढायची गरज नाही. आठ नोव्हेंबर २०१६ नंतरच्या आर्थिक घडामोडी इतकेच या धाग्याचे परिप्रेक्ष्य आहे.)
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात छापील पुस्तके हा एक मरणपंथाला लागलेला धंदा आहे. भवितव्य इ-पुस्तकांना आहे. डी-मोनेटायझेशन मुळे जर कागदी पुस्तके कमी झाली तर ग्लोबल वॉर्मिंग कमी व्हायला मदतच होईल. इथेच मोदीजींची दूरदृष्टी दिसून येते. तुमचे छापखानाकामगार, शाई, कागद, पुस्तकविक्रेते, चित्रकार, बुक-बाइंडर्स, ऑफिस बॉयिज़, शिपाई, चहावाले, अगदी ग्लू पुरवणारे वगैरे यांना थोडा त्रास होईल पण तो कधी न कधी होणारच होता. तसंही सियाचेनच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत आपले सैनिक कित्येक पटीने जास्त त्रास अगदी हसत हसत सहन करतात. साहित्यव्यवहार मधले कोणीही रस्त्यावर उतरून जाळपोळ करताना दिसत नाहीत. म्हणजे त्यांना जास्त त्रास होत नसावा तेव्हा तुम्ही उगाचच टाहो फोडणे बंद करा

Proud

टग्या,
तुमचं खरं आहे.
हे तेच ब्रिगेडी नक्षली लोक जे भारतात संगणक आला तेव्हा कित्येक लोक बेकार होतील म्हणून रडत होते.
पण काय झालं शेवटी?
उलट कित्येक रोजगार वाढले.

'गो डिजीटल' असा मंत्रच आहे आजच्या युगाचा!

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे------

बीजेपी सरकार आणि पंतप्रधानांकडून इतक्या अपेक्षा होत्या अशी मला कल्पना नव्हती. Happy ह्या अपेक्षा पण पूर्ण होतील पण क्षितिजावर दिसायला निदान अजून दोन टर्म्स हव्यात बीजेपी आणि मोदींना. तेव्हा इथे ज्यांनी लिहिलंय; त्यांनी for starters २०१९ मध्ये बीजेपी+मोदी ला भरघोस मतांनी विजयी करा. अशी स्वप्न जर तुमची फक्त देशापुरति मर्यादित नसतील जर तुम्हाला तुमचे राज्य पण असेच हवे असेल तर राज्याचा मुख्यमंत्री पण बिजेपीचाच निवडा Happy

>>बीजेपी सरकार आणि पंतप्रधानांकडून इतक्या अपेक्षा होत्या अशी मला कल्पना नव्हती. स्मित ह्या अपेक्षा पण पूर्ण होतील पण क्षितिजावर दिसायला निदान अजून दोन टर्म्स हव्यात बीजेपी आणि मोदींना.

हेच तर मी सांगत होते. की काँग्रेसनी केलेले "राडे" साफ करायला मोदींनी किमान १५ वर्षं तरी टिकायला हवे होते.
आता काय होणार कोण जाणे.

पण या निर्णयामुळे नाही आले परत निवडून तरच जास्त भले होईल असे वाटायला लागले आहे. मिनिमम गव्हर्मेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स बदलून आता मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम मीडिया मॅनेजमेंट केलं पाहिजे.

राजसी आणि बीजेपी सेल यांचा २०१९ सालचा प्रचार चालू झाला का? छान

चालू द्या. नोट नही पीएम बदलो Wink

>>>काँग्रेसने कसले राडे केले होते ? पाच वर्षे वाजपेयीला व मोदीला ३ वर्षात नाही सापडले ?

सापडले नाहीतच. किंवा आपापसात मिटवले. पण मुद्दा असा की सारखा साठ वर्षांच्या भ्रष्टाचाराचा वास्ता देता तर निदान १५ वर्षं तरी सत्ता टिकवून दाखवावी. वाजपेयींचीसुद्धा कुठे टिकली? लोकशाहीत सत्ता टिकवणे जोक नाहीये. आणि पुन्हा पुन्हा युपीए निवडून आल्यावर आंतरजालावर शोकसभा भरायच्या. पण कुणीही असा विचार करत नाही की युपीएची सत्ता का टिकते? आणि पुन्हा पुन्हा काँग्रेस निवडून का येते?

पण मला अजून कळले नाही.

की राहूल गांधी भेटून आल्यानंतरच कसे मोदींनी जाहीर केले की पार्टींनी बँकेत पैसे टाकले तर त्यांची चौकशी होणार नाही?

राहूल कडे असणार्‍या भ्रष्टाचाराच्या पुराव्याला घाबरून की आत काही शिजले ?

>>>की राहूल गांधी भेटून आल्यानंतरच कसे मोदींनी जाहीर केले की पार्टींनी बँकेत पैसे टाकले तर त्यांची चौकशी होणार नाही?

राहूल कडे असणार्‍या भ्रष्टाचाराच्या पुराव्याला घाबरून की काही आत शिजले ?

हा थोडा मीडियाने हाइप केलेला मुद्दा आहे. हा नियम आधीपासूनच अस्तित्वात होता. त्यात काही बदल झाला नाही एवढेच. आणि तो करायला आत्ता वेळ नाहीये.

नियम आधी पासुन होता तो निव्वळ पैशांसाठी. पण जुन्या नोटा टाकल्या तर सर्व सामान्यांसारखी चौकशी होणार नाही हा नविन नियम काढला त्यांनी.

पण कुणीही असा विचार करत नाही की युपीएची सत्ता का टिकते? आणि पुन्हा पुन्हा काँग्रेस निवडून का येते? >>> करचोरी करता येते , भ्रष्टाचार मोकाटपणे करता येतो , गरिबांना मिळणारी अनुदानं लाटता येतात आणि गरीब बिचारा अनुदानाचे २ रुपये मिळाले ह्या आनंदात असतो .( त्याला बिचार्‍याला कल्पनाच नसते की आपले ९८ रुपये गेलेत.)

काय जोक मारला श्री. एकदम Lol

सत्तेवरून तुम्हाला हकलून लावले की दोष लगेच जनतेला द्यायचा किती सोप्पे आहे ना.

सापडले नाहीतच. किंवा आपापसात मिटवले.

Proud

हा काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर दाखवलेला विश्वास की भाजपाच्या मांडवली पॉवरवर दाखवलेला विश्वास समजायचा ?

Rofl

>>स्वरुप | 16 December, 2016 - 12:43
अजुन एक आखाडा का?

दोन चार स्वानुभव आणि संतुलित अभ्यासपूर्ण पोस्टी आणि बाकी सगळी धुळवड!

मैने पैलेच बोला था Wink

Interest on provident fund deposits cut to 8.65% from 8.8%

short by Mansha Mahajan / 05:42 pm on 19 Dec 2016,Monday

Retirement fund body Employees' Provident Fund Organisation (EPFO) on Monday fixed 8.65% as the interest on provident fund deposits for 2016-17. This is against the 8.8% rate provided in 2015-16. The lower interest rate is due to the poor rate of return on investments made by the EPFO in all spheres, according to sources

नोटबंदीमुळे शेतकर्‍यांची त्यातही भाजीपाला माळवं करणार्‍या शेतकर्‍यांची कंबर पार खचली आहे.
आम्ही इथे तूर, उडीद, ऊस, सोयाबीन अशी नगदी पिके घेणार्‍या भागात रहातो त्यामुळे भाज्या आम्हाला नेहमी महागच मिळतात.
पण नुकतीच लातूरला जाऊन आले आणि तिथली स्वस्ताई बघून रडायला यायचं बाकी होतं.

आमच्याइथे जो फ्लॉवर ४०-६०रू किलोने मिळतो, लातूरला ५रू ते दहा रू गड्डा मिळत होता, कोबीचेही तेच.
कोथिंबीर दहा रूपयाला पाच मुठीएवढ्या जुड्या तर मेथी २०रू ला तीन मोठ्या जुड्या.

शेतकर्‍याचा लागवडीचा खर्च ही निघत नाही

फेसबुकवर काही शेतकरी मित्र आहेत.
त्यांनी सांगितलंय की भाजी विकण्यासाठी ट्रान्सपोर्टचा खर्च केला तर उलट तोटा होईल.ते टाळण्यासाठी त्यांनी कोबी/फ्लॉवर्/कोथिंबीरीच्या स्वतः मेहनत करून वाढवलेल्या शेतात गुरे ढोरे चरायला सोडली आहेत.
आणि ही वस्तुस्थिती अवास्तव नाही हे बाजारात कमालीच्या स्वस्त झालेल्या भाजीपाल्यावरून दिसते आहे.

मी सोलापुरात असतानाही भाजीपाला अतिशय स्वस्त झाला होता. एकीकडे ताजी मेथी पालक वगैरे पाच रुपये तेही घरावर घेण्याचा आनंद व दुसरीकडे ज्या शेतकर्‍याने घाम गाळून हे पिकविले त्याच्या आतोनात नुकसानाचे दु:ख!

हो गं!
म्हणूनच विचार कर तो फ्लॉवर तिथपर्यंत पोचविणार्‍या शेतकर्‍याचे काय हाल असतील.
फेबुवर एक पोस्ट शेअर करतेय ती वाच.

ओके.

>>तो फ्लॉवर तिथपर्यंत पोचविणार्‍या शेतकर्‍याचे काय हाल असतील.

बेसिकमध्येच लोच्या आहे.... अहो गावचा शेतकरी पुण्या मुंबईच्या मंडईपर्यंत माल नेवुन पोचवत नाही.... अर्थात आजुबाजूचे काही शेतकरी असतात जे स्वतः मंडईत जाऊन बसतात पण बाकी सगळा बाजार अडत्यांचा असतो..... ४०-६० रुपये गड्ड्यातले किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतील असे वाटतेय तुम्हाला?
त्यांना मिळायचे तेव्हढेच मिळतात बाकी जबराट फायदा/फायदा/कमी फायदा जो काही असतो तो अडत्यांचा असतो

भाव पडलेत हे मी नाकारत नाहीये.... पण ते आज पहील्यांदा पडलेले नाहीयेत.... आज १०-१५ रुपये किलोने मिळणारा कांदा ४०-५० रुपये किलोने पण घेतलाय वर्षा-दीडवर्षापूर्वी.... तेंव्हापण त्यातले ५-१० रुअपयेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होते
ही जी काही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याची आवई उठवलीय ती या नुकसान झालेल्या मिडलमॅन्सनी आणि विरोधक व पेड मिडिया ती उचलून धरतोय

शेतकरी पण आता शहाणा झालाय.... अडते माल उचलत नाहीत आणि भाव पाडून मागतात हे बघून हे लोक आजूबाजूच्या हायवेंवर भाज्या विकू लागलेत... शहरातल्या मंडयांपेक्षा स्वस्त आणि ताज्या भाज्या मिळाल्यामुळे गाडीवाले खुष आणि रोख पैसा मिळाल्यामुळे शेतकरी खूष !

बालेवाडीत येवून एकदा बघा किती मोठा शेतकरी बाजार भरतो ते!

रडगाणे न गाता थोडासा जरी सकारात्मक विचार करायचा ठरवला तरी बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत असतात आजुबाजुला!

स्वरूप,
अडत्यांचं मला माहित नाही म्हणता का?
अहो मी ग्रामिण भागात रहाते.
जसे शेतकरी माझे पेशंटस आहेत तसेच अडते माझे पेशंट आणि नातेवाईकही आहेत.
अडते काय चीज असते हे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त माहित आहे.

माझ्याकडे जेव्हा एखादा पेशंट अ‍ॅडमिट होतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांकडे ३-४ पर्याय असतात.
एक -गावच्या पाटलाला फोन लावून त्याच्या भरवशावर कॅशलेस ट्रीटमेंट घेणे, पाटील येऊन पैसे भरतात.
दोन- बाजूच्या भंगारलाईनमध्ये जाऊन दागिना गहाण ठेऊन पैसे घेऊन येणे
तीन -अडत दुकानावर जाऊन त्यावर्षीच्या एखाद्या एकरातील मालाचा अडत्या म्हणेल त्या रेटने सौदा करणे
चार- माझे पैसे डुबवून फ्री उपचार करून घेणे.

तर प्लीजच ग्रामिण भागात कामे करणार्‍या डॉक्टरला तुम्ही अडत्याचा हिशोब सांगू नका.

अहो पण ते चुकीचं काहीतरी सांगतायत किंवा माझ्या याबाबतच्या बेसिकमध्ये राडे असल्याचा आरोप करतायत.

काल मोरया गणपतीच्या यात्रेला गेलो होतो, जत्रा भरलीहोती.
लिंबीने चारपाच ओढण्या वगैरे घेतले, पाचशे रुपये झाले, माझ्याकडे २००० ची नोट होती, ती पुढे केली, आता (रस्त्यावरला फेरीवाला) दुकानदार मोड नाही म्हणून सांगेल, अन माल परत घेईल, अन माझे पैसे वाचतील असा माझा होरा होता, तो खोटा ठरला. त्या "फेरीवाल्या दुकानदाराने" हसत हसत नोटांच्या चवडी/गठ्ठ्यातुन १०० च्या पंधरा नोटा काढून माझ्या हातात कोंबल्या, अन माझा पोपट झाला....
अन एकदा उरलेले दीड हजार १०० च्या नोटांमधे सुट्टे झाल्यावर त्याचा "खुर्दा उडायला" फारसा वेळ लागला नाही.

स्वरुप,

मुद्दा पटला,

मुंबईतील डोंगरी मध्ये सरकारी अधिकार्याने नाशिक च्या आजुबाजुच्या शेतकर्यांच्या मदतीने तिन चार ट्रक भाजीपाला, फळ मुंबईतील डोंगरी येथे मागवुन घेतली, त्याच शेतकर्यांनी तेव्हढा माल बाजार दरा पे क्षा स्व स्तात दोन दिवसात विकुन चांगला नफा कमावला. आता दर गुरुवारी असा बाजार डोंगरी येथे भरवणार आहेत. ( लोकसत्ता न्युज )
Devendra Fadnavis opens Mumbai’s first farmer-to-consumer market
http://www.livemint.com/Politics/8zWvT51A3H3Ny6kgrGBVFI/Devendra-Fadnavi...

Soon, farmers can sell their produce directly to consumers
http://www.dnaindia.com/mumbai/report-soon-farmers-can-sell-his-produce-...

Pages