सवाई गंधर्वच्या निमित्ताने ...

Submitted by अमर विश्वास on 9 December, 2016 - 00:54

पुण्यात यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव संपन्न होत आहे ...

त्या निमित्ताने : सवाईला अनेक वर्षे गाण्याचा आनंद घेतानाच केलेले एक निरीक्षण

सवाईला दोन प्रकारचे लोक येतात

पहिल्या प्रकारचे लोक ....
हे बरेचदा ऑफिस मधून डायरेक्ट येतात. जमाल तर योग्य करणे देऊन राजाही मिळवतात .
हे लोक स्वतःच्या कपड्यांचा फारसा विचार करत नाहीत. जीन्स , टी शर्ट , स्वेटर असे काहीही चालते. हे लोक एकमेकांची जागा धरतात. यांना पटकन राग ओळखता येईल याचे खात्री नसते. पण ते "हा राग कोणता ? " असे बिनधास्त विचारतात. पण असे असले तरी गाण्याचा मनमुराद आस्वाद घेतात.आणि मागे असलेल्या भेळ, थालीपिठ. खिचडी यांचाही अनमान करत नाहीत. मागे लावलेल्या जुन्या फोटोंचे प्रदर्शनही आवडीने बघतात. थोडक्यात सर्वसामान्य रसिक ...

पण ही जी दुसरी जमात आहे .. ती फारच उच्चं ... अभिरुची वगैरे शब्द वापरणारी ,,, हे ओळखायची लक्षण कोणती ?
१. हे लोक हमखास झब्बा घालतात.. वर एखाद जाकीटही
२. हे लोक गाणं ऐकायला येत नाहीत तर "संगीताचा आस्वाद" घ्यायला येतात
३. भूपात सगळे स्वर शुद्ध असतात इतपत त्यांना संगीताचे ज्ञान असते.. मुळात त्यांनी संगीत "वाचलेले" असते.. पण ऐकलेले नसते
४. ही लोक गाणं सुरु झाले की हा राग कुठला यावरच चर्चा करतात. पण मूळ मुद्दा आपण पूर्वी हा राग कुठे कुठे ऐकला हा असतो.
५. दुसऱ्या दिवशी अशोक रानडे प्रभुतींचे सकाळ मधील लेख वाचून यांना काल काय गायले याचा बोध होतो. मग ते त्याची चर्चा पुढच्या सवाई पर्यन्त करतात
६. सर्वात महत्वाचे म्हणजे यांचा ताल व लयीचा अंदाज अगाध असतो .. त्यामुळे समेवर द्यायची दाद हमखास उशिरा देतात

तेंव्हा बघा यंदाच्या सवाईला ही जमत तुम्हाला ओळखता येते का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलाकारांबद्दल खुप जण लिहितात पण ( बिचार्‍या ) रसिक प्रेक्षकांबद्दल कुणी लिहित नाही. लिहाच ...

सवाई गंधर्व स्वतःचा यू ट्यूब चॅनेल का सुरु करत नाही ? किमान दर्जेदार क्लीप्स तरी बघता येईल.

कॉलेजमधे असताना एके वर्षी सवाई ला गेलो होतो. सवाईचा माहौल अनुभवायचा होता.
तर मंडपात एक गृहस्थ रात्री साडेबारानंतर चक्क आडवे पडुन घोरायला लागले होते. ऐकवेना ते घोरासुराचे आख्यान. शेवटी आम्हि मित्रांनी काहीतरी करुन उठवलेच त्यांना.

सवाई गंधर्व स्वतःचा यू ट्यूब चॅनेल का सुरु करत नाही ? किमान दर्जेदार क्लीप्स तरी बघता येईल.>>>
सगळ्यात वाईट प्रकार आहे सवाईचा... बाकी भारतातले सगळे मोठे समारोह डीडीभारती चॅनेल वर दाखवतात, पण सवाई कधीच दाखवत नाहीत..

छान आहे लेख पण अजून खूप लिहिता आले असते!! संगीत कळणारा पण प्रेक्षकवर्ग असेलच की!!

त्यामुळे समेवर द्यायची दाद हमखास उशिरा देतात >>>> Lol

>>त्यामुळे समेवर द्यायची दाद हमखास उशिरा देतात
काहीवेळा आगाऊ दाद देतात, मागच्या वर्षी निलाद्रीकुमार यांचे सतार वादन शेवटच्या टप्प्यात आले असताना लोकांनी टाळ्या चालू केल्या तर ते चिडले, थांबा असा हाताने इशारा करून उरलेला तुकडा संपवला.

सुमुक्ताजी

वर हर्पेनसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्रोटक झाले आहे ...
मुळात थोपुच्या एका पोस्टला उत्तर म्हणुन लिहिले ..
पण तुमचं म्हणणं मान्य .. संगीत समजणारा मोठा वर्ग आहे ...
मी त्यांना सवाईचे वारकरी असेच म्हणतो ... जमलं तर आज त्यांच्या बद्दलही लिहितो ....

अजुन एक वर्ग आहे:

जो सवाईला जाणार असल्याची जिथे तिथे आगाऊ जाहिरात करतो, मंडपात पाय ठेवल्याक्षणी फेसबुकावर चेक-इन करतो, ज्याला गाण्यात काडीइतकाही रस नसला तरी आजुबाजुच्या श्रोत्यान्मध्ये प्रचंड इंटरेस्ट असतो, गाण ऐकण्यापेक्षा तो ते रॅकॉर्ड करण्यातच मग्न असतो, त्याचा बराचसा वेळ खवाई गंधर्वच्या स्टॉल्सवरच जातो अन दुसऱ्यादिवशी ऑफिसात त्या मैफिलीचे वर्णन "बाई काय गायल्या म्हणून सांगू .... तुम्ही यायला पाहिजे होतेत लेको" असल्या दोनचार वाक्यात संपते!

तुम्हाला तुमच्या ऑफिसात किमान एखादा तरी असला नग सापडेल!