आपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत. त्यातल्या सगळ्या गोष्टी अर्थातच त्या वयात समजल्या असं अजिबातच नाही, पण कुठेतरी मनावर 'आर्ट' पाहण्याचे संस्कार झाले असावेत. पुढे वाचनातून, पाहण्यातून, विविध देशात हिंडण्यातून, विविध लोकांशी झालेल्या गप्पांमधून रंग, रेषा, निर्मीती, अभिव्यक्ती ह्याच्याशी जवळीक घडत गेली. गेल्या काही वर्षांत, आपल्या लहानपणी 'काय गिरगटलंय' असं ज्याला 'गिरगटणं' म्हणलं जायचं, त्या प्रचंड इफेक्टीव्ह, परीणामकारक 'टँगल आर्ट' ची ओळख झाली. आधी डूडल्स वर ओझरती नजर टाकली जायची. मग नकळत डूडल्स बारकाईनं बघायची सवय लागली, त्या रेषांतून अर्थ काढण्याचा, कलाकाराच्या भावना, त्याचं व्यक्त होणं समजून घेण्याचा खेळ मनात रंगायला लागला. गंमत म्हणजे' गेली अनेक वर्ष मी वेळोवेळी 'गिरगटण्यातून, रेषांमधून स्वतःला व्यक्त करायची धडपड करतीये' याची जाणीव मला गेल्या ३-४ वर्षात झाली. आजही अनेक वेळा डोक्यात विषय असतात, त्याचं इंटरप्रीटेशन , व्हिज्युअल, त्यातली प्रत्येक उभी आडवी रेष, रंग, टेक्चर असं समोर दिसतं, पण अनेकदा हातातून हवं तसं उतरत नाही. अशा वेळी लहानपणी 'शास्त्रोक्तरीत्या चित्रकला शिकली नाही' ह्याची खंत प्रचंड बोचते, जाणवते. दरवेळी मला शब्दातून व्यक्त व्हावसंच वाटत नाही. एखादं डूडल काढलं जातं. कधी जमतं- कधी जमत नाही. पण त्यातून व्यक्त झालं निदान स्वतःसाठी की मग दुसर्या अभिव्यक्तीची गरज नाही वाटत. स्वस्थ-शांत वाटतं. I am totally tangled in this tangle art ! अनेकदा स्वतःच्याच लिमीटेश्न्स जाणवतात, पण रेषा स्वस्थही बसू देत नाहीत. त्या उमटायच्या तश्या उमटतातच. या डुडल्सच्या, टँगल आर्ट च्या जगात मी नवखी असले तरी या व्यक्त होण्यातली धडपड, तडफड, नशा, मजा अनुभवण्यात एक गंमत आहे.
ही अशीच काही डुडल्स. २ मिनीटापासून २० मिनीटापर्यंतची मायक्रो-मिनी प्रोजेक्टस ....
हे काही बुकमार्क्स....
आणि ही काही आय-पॅडवर त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे , विचारांप्रमाणे काढलेली डूडल्स
पतझड मे कुछ पत्तोंके गिरने की आहट...
The 'नूज ' is all over the 'न्यूज' ...
हे परवा थँक्सगिव्हींला केलेले डूडलींग. कॉफी शॉपमधे बसल्या बसल्या, गप्पा मारताना केलेले. अगदीच अनप्लॅन्ड.
Turkey Doodle
धन्यवाद ऑल... हर्पेन, उगा
धन्यवाद ऑल...
हर्पेन,
उगा दुसरा धागा काढला म्हणुन ओरडा होईल अस वाटल त्यामुळे नाही काढला... पण मी काढलेले डूडल्स ची संख्या बघता दुसरा धागा काढावा का असे मनात येत आहे...हाहाहा..बघते...
Teena, excellent!
Teena, excellent!
आहाहा.. सर्वच आवडलीत.. एक से
आहाहा.. सर्वच आवडलीत.. एक से बढकर एक.. टर्की इज हायलाईट्,,सुपर लाईक
रार, हर्पेन, टीना--सुंदर
रार, हर्पेन, टीना--सुंदर डुडल्स!
चालना मिळाली
टीना, मस्त डूडल्स .... भारीच
टीना, मस्त डूडल्स .... भारीच !
सगळ्यांना धन्यवाद.
गेल्या वर्षभरात मीच डूडल्स मधे बरेच करतीये. ह्यापेक्षा थोडी जास्त कॉप्लेक्स डूडल्स इथे पहा -
माय आर्ट इस डूडलींग (भाग ३) http://www.maayboli.com/node/60565
सध्या काही थीम्स वर काम करतीये. पुढच्या आठवड्यात पोस्ट करते.
थँक्स रार...अगं त्याच
थँक्स रार...अगं त्याच धाग्यावर टाकणार होती पण शोध घेतल्यावर हा धागा सापडला सो इथच पोस्टले मी..
मी बरेच पॅटर्न्स सुद्धा काढले आहेत..
जमल्यास नविन धागा काढेल मी.. तिथे जरा सुटे सुटे देता येतील... प्रत्येकाची गिरवायची हातोटी वेगळी असते ना..इथं सारं मिक्स होतयं म्हणुन वेगळा धागा काढावा म्हणते..
विपू बघ...
सुंदर. बूकमार्क्स आवडले.
सुंदर.
बूकमार्क्स आवडले.
Pages