चित्रपटगृहांत राष्ट्रगीत अनिवार्य - सुप्रीम कोर्टाचा आदेश

Submitted by भास्कराचार्य on 1 December, 2016 - 04:21

काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतर्गत निर्देशांनुसार (Interim Order) आता देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत वाजवणे, व अर्थातच नागरिकांनी त्यासाठी उभे राहणे, अनिवार्य आहे. येत्या १० दिवसांत ह्या निर्देशांचे पालन होईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.

http://timesofindia.indiatimes.com/india/National-anthem-to-play-before-...

ह्या निर्णयावर काहींनी असहमती दर्शवली आहे, तर काहींनी त्याचे जोरदार समर्थन केले आहे. मला स्वतःला 'राष्ट्रगीताचा सन्मान झालाच पाहिजे' हे वाटतेच. शाळा किंवा महाविद्यालयांतही अगदी ते रोज वाजवले गेले पाहिजे, असे वाटते. कारण ह्या संस्थांतून देशाचे नागरिक घडत असतात. परंतु चित्रपटगृहासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवून त्याचा सन्मान झाला पाहिजे, हा नियम काही कळत नाही. देशाच्या प्रतीकांप्रती आदर दाखवणे हे प्रत्येक नागरिकाचे संवैधानिक कर्तव्य आहे, व त्याने ते पाळलेच पाहिजे. परंतु ही प्रतीके अशी जनसामान्यांना चित्रपटगृहात दाखवून काही फरक पडेल का, हे कळत नाही. अर्थात, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावल्यावर मी उभा राहतोच, व राहीनही. पण हा नियम खरेच काही करेल, ह्याबद्दल शंका वाटते. महाराष्ट्रात हा नियम आधीपासूनच होता, पण आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला असल्याने तो देशभर झाला आहे, व तो सुप्रीम कोर्टाचा असल्याने त्यात बदल करणे अशक्यप्राय आहे. ह्याबद्दल मायबोलीकरांतही मतांतरे असतील, ती जाणून घेण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा मोठ्या परिप्रेक्ष्यातून पाहता -
सर्वसाधारणपणे कुठल्याही (नव्याने भासणार्‍या) अनिवार्य गोष्टी करायला आपला कायमच विरोध असतो.
आज्ञार्थी काहीही सांगीतले गेले की मी नाहीच करणार काय कराल? असे म्हणण्याची बुद्धी सुचते.
पण विद्यर्थी सांगीतले / बोलले गेलेले (नेहेमी खरे बोलावे च्या धर्तीचे) कितीही हिताचे असले तरी आपण कधीच अवलंबीत नाही.
म्हणजे उदा. हेल्मेट सक्ती - अजीबात नको. नाही घालत जा. पोलीस, हेल्मेट घातलंय का ते तपासणार असतील तर / त्याखेरीज पेट्रोलच मिळणार नसेल तर तेवढ्यापुरते मी घालेन अशी मनोवृत्ती आपल्यात नवीन नाही.

ह्या पार्श्वभुमीवर
चित्रपटगृहांतील राष्ट्रगीत सक्तीबाबत -
माझे प्रश्न
राष्ट्रगीत चित्रपटगृहांत अनिवार्य का?
राष्ट्रगीत कुठेही अनिवार्य का?
राष्ट्रगीत(च) का? (म्हणजे ते आहे, ते म्हटल्या /ऐकल्यानंतर सॉलीड्ड मस्त वाटते, वगैरे सगळे ठीक आहे. मुळातच ह्याची गरज ती काय, एखाद्या देशाचे काय अडेल राष्ट्रगीत नसेल तर)
बर पण मग आता ते आहेच तर मग नागरिकांनी / करता ते वाजवायचे तरी कधी आणि कुठे
पण अर्थातच अमांच्या द्वापारयुगातल्या ज्या कोणाला 'चित्रपटगृह' हे ठिकाण राष्ट्रगीत वाजवायला सुयोग्य असे वाटले असेल, त्याला ते का वाटले असावे ?
अशा क्रमाने उमटत जातात.

मला स्वत:ला राष्ट्रगीत नीट म्हणता येते, म्हणायला आवडते जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती मी साधतो. पण म्हणून
इकडे नको का तिकडे नको का असे म्हणून मी वाढीव ठिकाणं अजीबात सुचवणार नाहीये Proud

सरतेशेवटी माझ्या मध्यमवर्गीय पापभिरू मनोवृत्तीनुसार मी बापडा सिनेमा बघायच्या आधी वाजवल्या / दाखवल्या जाणार्‍या राष्ट्रगीताच्या वेळी या आधीही उभा रहात होतो आणि यापुढेही आता तर 'कोर्टाचा आदेश' आहे ना मग पाळूयात असे म्हणून उभा राहीनच ( आधीच सांगतो, पाळू, पाळूया किंवा पाळूयात ह्यातले बरोबर काय ते ठरले की त्याप्रमाणे एकेक अक्षर उडवेन किंवा शब्द तसाच राहू देईन.

कोर्टापुढे जो विषय (वाद) येतो, कोर्ट त्यावरच आपला निर्णय देते. येथे सुप्रीम कोर्टापुढे विषय होता, चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवावे कि नाही. त्यावर कोर्टाने सर्वांगीण विचार करून निर्णय दिला कि चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजविले जावे. आणि त्याचबरोबर पाळण्याकरीता काही अटीही घालून दिल्या. त्यामुळे इथे का नाही, तिथे का नाही (जाओ! पहले उस आदमी का साइन लेके आओ) हे प्रश्न अप्रस्तुत आहेत.

पुढे कदाचित कुठे कुठे वाजवावे असा विषय कोर्टापुढे आला तर कोर्ट त्यावरसुद्धा कोर्टापुढे आलेल्या सर्व आक्षेपांवर विचार करून आपला निर्णय देईल.

Indian national anthem is my most favourite. It gives me goosebumps every time i sing/listen to it. It may be a very childish idea to play it before a movie but i superlike it since ages. Thats because there is no other frequent occasion where i can be a part of a large group of people who are bound by a common thread of national pride. (I am sure religious ppl must be feeling the same during mass-aarati-namaz in groups but i dont). Another reason i like it in movie hall is because of the superior audio visual experience.
However, i really dont want it to be made mandatory at every other place. It then can loose its charm and become a chore to hate.

नताशा ,
Another reason i like it in movie hall is because of the superior audio visual experience. हा मुद्दा आवडला.

Indian national anthem is my most favourite. It gives me goosebumps every time i sing/listen to it. It may be a very childish idea to play it before a movie but i superlike it since ages. Thats because there is no other frequent occasion where i can be a part of a large group of people who are bound by a common thread of national pride. <<< नताशा, +१.

>>Indian national anthem is my most favourite. It gives me goosebumps every time i sing/listen to it. It may be a very childish idea to play it before a movie but i superlike it since ages. Thats because there is no other frequent occasion where i can be a part of a large group of people who are bound by a common thread of national pride>> प्रचंड सहमत.

ओ भाशेठ, जरा खोलात शिरून रिसर्च करून माहिती द्या अजून Happy

कोर्टापुढे नक्की काय केस होती? वादी प्रतिवादी कोण होते? कोर्टाने कोणता कायदा एन्फोर्स करायला हे सांगितले, न केल्याने कोणत्या कायद्याचा भंग होतोय असे निष्पन्न झाले वगैरे सांगा.

जनहित याचिका आली होती हायकोर्टापुढे असे दिसते. कोणी आणली माहीत नाही. टाइम्स च्या वरच्या लिन्क मधे Taking an activist stance असे लिहीले आहे पण त्यापेक्षा जास्त खुलासा नाही. कोट्स जे दिले आहेत ते ही जेनेरिक आहेत, स्पेसिफिक कोणत्या कायद्याद्वारे वगैरे काहीच नाही त्यात.

बर्‍याचश्या आर्टिकल्स मधे राष्ट्रगीताचा आपण कसा मान ठेवला पाहिजे वगैरे जनरल माहिती आहे. त्याला कोणाचाच विरोध नाही. पण सिनेमा हॉल मधे ते का वाजवले पाहिजे याबद्दल काहीच माहिती दिसली नाही.

>>अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.<<

पडद्यामागे मोदि सरकारचाच हात यात आहे अशी मला शंका आहे. डिमोनटायझेशनच्या गोंधळातुन जनतेचं लक्श डायवर्ट करुन देशप्रेमाकडे ते वळवलं जावं हा अंत:स्थ हेतु त्यात आहे...

ओ भाशेठ, जरा खोलात शिरून रिसर्च करून माहिती द्या अजून स्मित
कोर्टापुढे नक्की काय केस होती? वादी प्रतिवादी कोण होते? कोर्टाने कोणता कायदा एन्फोर्स करायला हे सांगितले, न केल्याने कोणत्या कायद्याचा भंग होतोय असे निष्पन्न झाले वगैरे सांगा
. >> हेच म्हणतो !

कुठल्या केस च्या संदर्भात हे आदेश आहेत ते समजल्याशिवाय या निर्णयावर चर्चा करण्यात अर्थ नाही कारण कोर्ट फक्त हातात असलेल्या केसवर कायद्यांच्या आधारे निर्णय देते.

नताशाला मम !
पहिल्या काही ट्रेलर्सनंतर सैलावून बसलं असताना मध्येच उभं राहायचा कंटाळा येतो कधीकधी पण तरी राष्ट्रगीत सुरु झालं की ते फीलिंग दरवेळी तितकंच भारी असतं. शिवाय दर वेळी निदान चार-पाच लोकं तरी नुसतं उभं न राहता स्वतःही गातात, त्याने तर अजूनच छान वाटतं.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रगीत फार काही मोठं नाही, लगेच संपतं. मोठं असतं तर ताटकळल्यासारखं होऊन जुलुमाचा राम-राम वाटायची फारच मोठी शक्यता होती.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवायची सक्ती नको हे तत्त्वतः अगदी मान्य आहे पण हा धागा वाचल्यावर मनात विचार आला की कितीतरी वाईट, घातक गोष्टींची सक्ती पदोपदी होतेय रोजच्या आयुष्यात ( लोकांनी राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखे पावलोपावली थुंकणे, वाहतुकीचे नियम न पाळणे इत्यादी इत्यादी ) आणि ती मुकाट्याने सहन करावी लागतेय तर ज्या काही सेकंदांनी मनस्ताप व्हायची सुतराम शक्यता नाही ( किंवा गरज नाही- शेवटी राष्ट्रभावनेला हात घालणारे गीत आहे ते ) अशा गोष्टीविरुद्ध कशाला आवाज उठवायला जायचे ( मी !!! ). उद्या उठताबसता राष्ट्रगीत म्हणायची सक्ती व्हायला लागली तर बघू.

वाजूद्या की राष्ट्रगीत. आधीही वाजायचं की! सक्तीचं नव्हतं इतकंच. काही चित्रपटगृहं राष्ट्रगीत लावायची तिथे माणसं उभी रहायचीच ना. आत्ताच नेमकं का टोचतंय मग?
ऋ ने लिहीलंय तसाच काहीसा फंडा असावा यामागे की के३जी पिक्चरमधे 'वंदे मातरम' वाजतं आणि परदेशी नागरिक पण त्याचा सन्मान करताना दिसतात तेव्हा एकदम देशाबद्दल अभिमान वगैरे वाटून जातो. तीच भावना रूजवण्यासाठी केलं असेल हे कदाचित. पण मग देशाबद्दल अभिमान वाटणार असेल तर नेमकं बिघडणार काय आहे त्यात? का आता देशाबद्दल काहीही चांगलं वाटणं हेच चुकीचं झालंय? सक्तीचं केलं म्हणून का होईना पण एक मोठा समुदाय एकत्र येऊन काहीतरी चांगलं करणार असेल तर हरकत काय आहे?
यानिमित्ताने आठवलं. इथे काही दिवसांपूर्वी एक मॅरॅथॉन पाहण्यासाठी गेले होते. तिथे रेस सुरू होण्याआधी अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं होतं. का बरं असं केलं असेल? सगळेजण शांतपणे, एक हात छातीवर ठेवून उभे होते ते संपेपर्यंत. मला तरी कोणाच्याही चेहर्‍यावर 'रेसच्या आधी कसले राष्ट्रगीत म्हणतायत!?' असा प्रश्न नाही दिसला.

बाकी राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभं राहणं, त्याचा आदर करणं हे आपोआपच व्हायला हवं. त्यासाठी सक्ती करावी लागतेय यातच सगळं आलं.

१. जनतेच्या मनात राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती निर्माण करणं हे कोर्टाचं काम नाही. आजचं निकालपत्र नीट वाचलं, तर त्यात अनेक गफलती आहेत. १९८६ साली सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आणि हा निर्णय यात पूर्ण फरक आहे.

२. कोर्टानं शिवाय 'constitutional patriotism' असा शब्दप्रयोग केला आहे. असा प्रयोग करून कोर्टानं दिलेला अंतरिन आदेश मात्र पूर्णपणे घटनेच्या चौकटीला धक्का लावणारा आहे.

३. मी उभा राहिलो नाही, तर मला शिक्षा कोण करणार? शिक्षा काय असेल? २७ तारखेला पुन्हा सुनावणी होईल, त्यात काही बाबी स्पष्ट होतील, अशी अपेक्षा आहे.

४. राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती अशी सक्तीनं निर्माण करता येते का? ती निर्माण झाली, असं नक्की कोण आणि कसं ठरवतं? थोडी सक्ती आणि पुष्कळ सक्ती यांत काय फरक आहे?

५. राष्ट्रगीत ऐकायला आवडतं, थेटरातल्या ध्वनिव्यवस्थेमुळे मज्जा येते वगैरे ठीक. पण मुळात मी पैसे खर्च केलेले असताना मी काय पाहायचं, हे दुसरं कोणी का ठरवावं?

६. मला ते गाणं आवडतं, म्हणून मी सक्ती सहन करत असेन, तर अशीच सक्ती मी नावडती गोष्ट करण्याच्या बाबतीतही सहन करेन का?

७. ही सक्ती चित्रपटगृहातच का? तेही दरवाजे बंद करून? म्हणजे सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाविरुद्ध असलेली क्रिया करून? म्हणजे ही जबरदस्तीच. नाटकांच्या वेळी का नको राष्ट्रगीत? नाटक ही तर जीवनावश्यक बाब आहे.

८. राष्ट्रगीत म्हणून, तेही चित्रपट बघण्याच्या आधी, देशभक्ती सिद्ध होते का? होत असल्यास, कशी? मी माझं काम प्रमाणिकपणे करतो, वाहतुकीचे, स्वच्छतेचे नियम पाळतो, सरकारी / सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत नाही, कर चुकवत नाही, हे पुरेसं नाही का?

९. राष्ट्रवाद ही संकल्पना आपल्याकडे युरोपातून आली. भारतातल्या बहुविधतेला ही संकल्पना छेद देते. बाकी सगळ्या पाश्चात्त्य संकल्पनांना तुच्छ लेखणारे आपण, हीच संकल्पना कवटाळून का बसतो?

१०. रवीन्द्रनाथ ठाकूर हे राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पनांचे कट्टर विरोधक होते. राष्ट्रगीत आवडतं म्हणून ऐकायला काय हरकत आहे, किंवा सक्ती हवीच असं म्हणणार्‍यांनी गुरुदेवांचा 'Nationalism' हा निबंध वाचला आहे का?

११. राष्ट्रगीत थेटरात ऐकायला हरकत नसणार्‍यांनी हायपर-राष्ट्रवाद किती घातक असू शकतो, याबद्दल वाचलेलं नाही का? इटली, जपान, जर्मनी यांनी जगाचा किती छळ केला, हे आपण इतक्यात का विसरलो?

आत्ताच या विषयावर तासभर बडबड करून आल्यानं तूर्तास इतकंच.

rmd,

खेळ आणि चित्रपट यांत फरक नाहीये का?

महाराष्ट्रात राष्ट्रगीत वाजवणं निदान दहा-बारा वर्षं सक्तीचं आहे. इतरत्र नव्हतं. ते आता झालं.

देशाबद्दलचा अभिमान सर्वोच्च की व्यक्तिस्वातंत्र्य? आणि राष्ट्रगीत गाऊनच ती रुजते? शाळेत तर रोज सगळेच राष्ट्रगीत म्हणतात. दहा वर्षं रोज राष्ट्रगीत गाऊनही देशभावना रुजली नसेल, तर चित्रपटाआधी राष्ट्रगीत गाऊन ती रुजणार आहे का?

देश म्हणजे फक्त देशाच्या सीमा आणि देशाची प्रतीकं इतकंच नसतं. किंबहुना देश म्हणजे आधी माणसं येतात. प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, सुरक्षितता यांची जाणीव झाली की आपोआप त्या भूमीबद्दल आणि समाजाबद्दल प्रेम, आदर या भावना तयार होतात. त्यासाठी सक्तीची भक्ती आवश्यक नसते.

चिनूक्सा, तुझ्या मुद्द्यांवर विचार करतेय. लॉजिकल आहेत.

सिनेमाच्या सुरूवातीला राष्ट्रगीत लावलं तर व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येतं असा कधी विचार नव्हता केला. याचप्रमाणे सुरूवातीच्या जाहिराती, ट्रेलर्स तरी मी का सहन करते (जर मी त्यासाठी पैसे खर्च केलेले नसतात) असा विचार पण करते आहे.

त्या जाहिराती थेटरमालकाला उत्पन्न मिळवून देतात. त्या जाहिराती तू टीव्हीवरसुद्धा बघतेस. त्यासाठीही तू पैसे खर्च केलेले नसतात. पण तुला मिळणार्‍या सोयींची किंमत त्या जाहिरातींमुळे कमी होते.

भारतीय घटना राष्ट्रगीताची सक्ती करत नाही. १९८६च्या निकालातही विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहिलं नाही, तर चालेल, असं कोर्टानं सांगितलं होतं. तीन न्यायाधीशांचा निर्णय या दोन न्यायाधीशांनी उलटवला हेही कायद्याला धरून नाही.

कभी खुशी कभी गम बघताना थेटरात चोक्सीसाहेब एकटेच सिनेमातल्या राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिले, म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेतली. तेव्हाही सुप्रीम कोर्टानं करण जोहरच्याच बाजूनं निर्णय दिला होता.

सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निर्णय व्यक्तिस्वातंत्र्याला प्राधान्य देणारे होते.

नक्की कुठे राष्ट्रगीत वाजवलं तर तुझं व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येईल? सर्कस, गाण्याची मैफल, नाटक या ठिकाणीही सक्ती चालेल का? म्हणजे मी रोज कुठे ना कुठे राष्ट्रगीत म्हणत राहायचं?

कोर्टाचं कामकाज चालू होताता राष्ट्रगीत म्हणण्याचा पायंडा कोर्टानं का पाडला नाही?

अमेरिकेत ध्वज जाळला तरी चालतो. भारतात नाही चालत. अमेरिकेत थेटरात राष्ट्रगीत वाजत नाही. इथे वाजतं. व्यक्तिस्वातंत्र्य देशनिरपेक्ष नको का?

संघाच्या प्रवक्त्यानं मला विचारलं, राष्ट्रगीताबद्दल बोलताना टागोरांचा उल्लेख का करता?

टागोर तर देशद्रोहीच आहेत आजच्या वातावरणात.

A Madurai-based lawyer, R Pandi Maharaja, felt that cinema halls in Tamil Nadu should not be allowed to play the national anthem before a movie because some people don't stand up for it, causing disrespect. The Madras High Court dismissed the petition last year. As it happens, the law doesn't require you to stand up for the national anthem.

बहूदा यामुळे श्याम मनोहर चौस्की यांनी त्यांच्या पीआयएल मधे तशी विनंती केली.

The petition also prayed that directions should be issued that the National Anthem should be played in cinema theatres across the country before the screening of the feature film

अरे मुला, तेच लिहीलंय मी वरती. कदाचित 'सिनेमाच्या आधी' लिहील्याने कन्फ्युजन झालं. पण खरंच असा विचार कधीच केला नव्हता की कुठेही राष्ट्रगीत वाजवल्याने व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येत असेल. माणसाला विचार करायला काय वेळ देशील की नाही? तुझं ऐकून मी ताबडतोब माझं मत बदललं असं तर होणार नाही ना!

अवांतर नको पण अमेरिकेत ध्वज जाळला तरी चालतो. हे कदाचीत बदलेल आता Lol

बाकी गोष्टींबाबत मला काही वाटत नाही पण राष्ट्रगित सुरू असताना उभे असणे ही शिस्त शाळेपासून लागलेली आहे आणि ती अजुनही पाळली जाते पण याच निर्णयामधले - दरवाजे बंद करण्यात यावेत हे मात्र मला अजिबात आवडलेले नाही कारण ते पब्लिक सेफ्टी आणि सगळ्या अग्निशमन नियमांच्या विरूद्ध वाटते. १०० - २०० लोक जेव्हा एका बंद जागेत बसलेले आहेत तेव्हा दरवाजे उघडे हवेत. दिल्लीतच एका थिएटर मध्ये मागे मोठी आग लागली होती त्यामुळे अशा घटनांमध्ये निघून जाणे सोपे हवे - अजुन अवघड नको.

आणि वर म्हटलं आहे की ती मला शिस्त आहे - देशप्रेम आहे पण जर मला कोणी उभे राहीले नाही म्हणून शिक्षा करणार असेल तर हे देशप्रेम न होता जुलूम होईल असे मला तरी वाटते.

Rmd +1
Isn't it silly to say that you must be shown only what you want when you have paid for it?
What about the advertisements before the movie? Aren't they intrusive? And there is no SC mandate that you must attend the National Anthem if you hv purchased a movie ticket. You still hv a choice to go in later if its so intrusive or offending.

नताशा,
कुठल्याही विचारसरणीचा विशेषणं न लावता प्रतिवाद केल्यास उत्तर देऊ शकेन.
मी काय लिहिलं आहे, ते वाचल्यास वरच्या पोस्टीतल्या काही प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील.

You did. तसं न करता चर्चा करता आल्यास उत्तरं देऊ शकेन.

जाहिराती आणि राष्ट्रगीत एकाच पातळीवर आहेत का? जाहिराती बघताना मी पॉपकॉर्न खाऊ शकतो, गप्पा मारू शकतो. तशी सूट राष्ट्रगीत सुरू असताना आहे का? सिनेमा सुरू झाल्यावर इतरांचा आणि माझा रसभंग करत मी थेटरात प्रवेश का करावा?

मुळात माझ्यात पुरेशी देशभावना आहे की नाही, याचा निर्णय इतर कोणी का घ्यावा? मी ठरवेन मी देशभक्त आहे की नाही ते. चित्रपटगृह ही माझ्या देशभक्तीची परीक्षा घेण्याचं ठिकाण नव्हे.

चिनोक्स +१००

एखाद्याला राष्ट्रगीत ऐकायचे नसेल तर त्याने ते सम्पल्यावर चित्रपटग्रुहात प्रवेश करावा हे कितपत प्रॅक्तिकल आहे ? शिवाय दार बंद करून घेणे म्हणजे धोकादायक आहे.

एक इंग्रजी वाक्य आठवले

The beatings will continue till the morale improves !

चित्रपटगृह ही माझ्या देशभक्तीची परीक्षा घेण्याचं ठिकाण नव्हे.>>> totally agree. But then who said that it is where your patriotism will be tested. If you dont like it, what do you do in Maharashtra movie halls? this rule is there since so many years already.
i Genuinely want to know. I never ever realized that there might be some ppl who must be getting so annoyed with it.

Pages