तुम्ही, तुमचे आप्तमित्र केवायसी कंप्लायंट आहात का?

Submitted by अश्विनीमामी on 28 November, 2016 - 02:57

परवा मंगळवारी २२.११.२०१६ एक एस एम एस आला. खालील प्रमाणे :

अर्जंट आणि महत्वाचे, आर बी आय गाइडलाइन्स नुसार तुमच्या आय सी आय सी आय बँके च्या अकाउंटचे केवायसी पेपर्स सबमिट करा सबमिशन करायची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. नाहीतर हे अकाउंट व त्याच्याशी संलग्न डीमॅट अकाउंट ब्लॉक होईल. के वायसी पेपर्स साठी खालील लिंक बघा.

ह्याचेच रिमांइडर गुरुवारी, शुक्रवारी. ह्यामुळे मला खूप स्ट्रेस आला होता. माझे डीमॅट अकाउंट फार आंजारून गोंजारून वाढवलेले बाळ आहे. अजून पहिलीतच असले तरी. सध्या काळजी करायला फारसे काही नसल्याने माझे बरेचसे प्रेम व लक्ष त्यावरच केंद्रित असते. तर असे हे एकदम ब्लॉक होणार म्हटल्यावर बीपी हाय. स्ट्रेस लेव्हल अप.

शनिवारी केवायसी काम करयला निघाले बाहेर पडल्यावर कळले कि आज बँका बंद!!!!! मग पिक्चर पाहिला व त्या केवाय्सी ओरिजिनलस वर चीज फ्लेवर पॉप्कॉर्न चा कचरा सांडून परत आले. पूर्ण वीकांत काय कसे अश्या त्रासात घालवला. आज गेले धीर करून.

तर पैसे भरणारी काढू पाह णारी गर्दी होतीच. पण केवायसी म्हटल्यावर मला आत सोडले. एका मराठी मुली ने सांगितले की के वाय सी हे दर दोन वर्शांनी करावे लागते. मी अकाउंट उघडल्यावर एकदा केले होते. आता आपन काय रोज नवा पॅन नंबर घेतो? का बर्थ डेट बदलतो? पण हा नियम आहे.

तिने नंबर बघून एक फॉर्म दिला व तो भरून, डॉक्युमेंट च्या झ्रेरॉक्स वर साइन करून सबमिट करायला सांगितले. पासपोर्ट झेरॉक्स करून आणून दिला. असे शक्यतो करू नये स्वतःच सर्व झेरॉक्स करून घेउन जा. फॉर्म भरायला त्या बॅकेत फ्लॅट सरफेसच नाही. सर्वत्र लोक्स. मग तिथेच एक टेबलवर

आय नीड अ सरफेस अशी फर्स्ट वर्ल्ड तक्रार करून मग तो फॉर्म भरला. सही केली. लाइनमध्ये उभे राहून तो सबमिट केला. त्या फॉ र्म साठी तुमचा एक फोटो पण लागतो तो ही घेउन जा. फोटो वर येइल अशी व अजून एका ठिकाणी सही लागते. सात दिवसात अपडेट होईल असे तिने सांगितले.

आय होप डिमॅट अकाउंट ब्लॉक होणार नाही. तुम्ही सर्वांनी सध्याच्या आर्थिक हातघाईत हे देखील चेक करा व नसल्यास केवायसी पेपर्स अपडेट करा. तुमच्या सिनीअर सिटिझन्स आईबाबांना सांगा. ह्या घडीला
बँक अकाउंट ब्लॉक होण्याची सूचना एस एम एस द्वारे येणे सुद्धा स्ट्रेस बिल्ड अप व्हायला कारणीभूत होउ शकते.

पेन्शनर्स नी सबमिट करायच्या लाइफ सर्टिफिकेटची मुदत देखील जानेवारी २०१७ परेन्त वाढवण्यात आली आहे. प्लीज बी चेकिंग.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Did you get an acknowledgement of submitting your kyc documents? It should have staff sign, date and name of the bank, branch. Hope you got it. If not please insist on it. Bank people will simply forget t o send your documents to head office. And such kind of blocking happens at head office level.

Even if someone stop doing transactions through certain account which used to be a primary account, someone may receive such kyc updating notice.

Some days back I received such sms for one of my credit card because I had stopped using it. After receiving such sms i did one transaction through it and I got message that everything is updated.

Bank people misplace kyc documents and if audit people catch it then branch people will send such sms to customers. Unless there is a change in your kyc details which you had not updated yet, There is no need to do it. Yes, RBI insist on it but it doesn't do it to trouble the honest customers but for migrant population and careless bankers.

Example (my sms )

6/९/१६

To avoid deactivation of xx Bank Credit Card ending xx, pls submit self-attested ID,Address proof and KYC Form.

1०/९/१६
Rs.1१२२.00 was spent on ur xxCBank CREDIT Card ending xx on 2016-09-10 time at xxx

Date २६/९/१६
Dear Cardholder, KYC documents for xx Bank Credit Card ending xx are updated in our records. Kindly ignore the KYC document submission request.

बँकेतून केवायसी सबमिट केल्याची पोचपावती नक्की आणि न विसरता घ्याच... सध्यातर त्यांच्या कामाच्या धबडग्यात केवायसीचे कागद पुढे पाठवले आहेत की नाहीत हे त्यांच्यापण लक्षात रहाणार नाही..

माहितीतल्या दोन केसेस आहेत.. ६ महिन्यांपूर्वी केवायसी करुन सुद्धा परत केवायसी करा म्हणून समस आले आहेत. आणि त्यात ब्रँच वाल्यांचीच हलगर्जी होती.. दिलेले पेपर गहाळच केले होते..

आणि प्रूफ म्हणून दिलेल्या पेपर्सवर सही करताना तारिख आणि कशासाठी पेपर दिले आहेत हे लिहायला अजिबातच विसरू नका..

एकदा माझ्या मुलीला माझे पासबुक भरायला बँकेत पाठवले होते. क्लार्कने तिच्याबरोबर KYC फॉर्म पाठवून दिला आणि सांगितले कि फॉर्म भरून जमा करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. मला टेन्शन आले. मला थोडेसे आठवत होते कि मी नुकताच काही महिन्यांपूर्वी kyc फार्म भरला होता. मग परत फॉर्म भरायला का लावतायत. आणि मी जमा नाही केला तर विनाकारण अकाउंट बंद करायचे. मग पुन्हा ते चालू करायचे उपद्व्याप माझ्या मागे लागायचे. म्हणून मी धावत पळत बँकेत गेलो. आणि क्लार्कला सांगितले कि फॉर्म नुकताच भरलाय म्हणून. किती वेळा सारखा सारखा मागताय. पण कोणी ऐकून घेईनात. मग त्यांच्या साहेबांना सांगितले. साहेबांनी कॉम्पुटरवर बघितले तर मी kyc फॉर्म आठ महिन्यांपूर्वीच भरलाय. मग माझे पासबुक पाहिले तर त्यात क्लार्कने kyc फॉर्म भरल्याची नोंदच केलेली नव्हती. आणि नोंद नसल्याची पाहून क्लार्क मला फॉर्म भरण्यास सांगत होते. मला बँकेत फुकटचा हेलपाटा मारायला लावला. आणि मला गॅसवर ठेवले होते ते वेगळेच. Rofl

ग्यास एजंसी वाल्यांना पण केवायसी आणि इन्कम डिटेल द्यायला विसरू नका लोकहो------
माझ्या अल्पमतीप्रमाणे हे विधान एकदम चूक आहे. एखादा उपहास असल्यास चालू दे.

माहिती चा धागा आहे म्हणून हेलपाटे वाचावेत ह्या उद्देशाने माहिती दिली.

कोणत्याही एसेमेस मधिल लिंकला क्लिक करु नका. फक्त याच नव्हे, कुठल्याच.

>>>> एका मराठी मुली ने सांगितले की के वाय सी हे दर दोन वर्शांनी करावे लागते. मी अकाउंट उघडल्यावर एकदा केले होते. आता आपन काय रोज नवा पॅन नंबर घेतो? का बर्थ डेट बदलतो? पण हा नियम आहे. <<<
(माबोवरील) सुशिक्षितांना यामागिल अर्थ समजावुन सांगावा लागावा ना? Wink

पेन्शनरांना दरवर्षी जिवंत असल्याचे सर्टिफिकीट द्यावे लागते.
तद्वतच, बेनामी/मृत व्यक्तिची खाती तशीच चालू राहू नयेत, याकरता हे केवायसी सक्तिचे केले असावे! दोन वर्षातुन एकदा माहिती, व "नजिकचा (लेटेस्ट हो) " फोटो सबमिट करायला काय हरकत आहे?

याशिवाय राजसीने "कार्डावरील व्यवहारशून्यतेचे" कारण दिलेच आहे.

कायेना, हल्ली हल्ली आम्हि शहरी सुशिक्षित फारच लाले बनत चाललो आहोत... जरा कुठे अमुक तमुक नियम पाळा म्हणले की आमच्या भुवया कपाळात शिरतात.... Proud मग होणार्‍या त्रासाकरता आम्ही जनसामान्यातले अतिसामान्य असतो तेव्हा... Lol

राजसी, तुम्हाला काहिही वाटतं.
के वाय सी काय फक्त ब्यांकेतच लागतं असं नाही, ग्यास एजंसीतपण लागतं.

घाबरू नका. काही जणांचे केवायसी नाही म्हणून सर्वांनाच मेसेज जातो.
सर्वात सोपा उपाय म्हणजे एकदा स्वत: सही करून सेविंग्ज अकाउंटातून पैसे काढा ( जे नेट ब्यान्किंगमुळे होत नाही. ) त्याचवेळी विचारून घ्यायचे फोन नंबर,इमेल,केवायसी,पत्ता कोणता आहे.

केवायसी सरकारी नवीन कनेक्शन घेताना, उगीचच नाही. कारण कार्ड, बँक खाते न वापरून चालत. घरगुती गॅस का नाही वापरणार? सहा-महिने वर्ष घर बंद ठेवण्यात असेल तर एजन्सीला सिलेंडर परत करून मग जात येत. ते पण कंपल्सरी नाही. गॅस साठी कुठे इन्कम डिटेल लागतात? नवीन कनेक्शन साठी आजकाल रेशन कार्ड लागते त्यासाठी इन्कम डिटेल लागत असतील. गॅस साठी डायरेक्ट कुठे लागतात.

Kyc doesn't means income details. Photo, Id proof, address proof and pan card.

पुर्वी रेडिओवर "पुन्हा प्रपंच"; "प्रपंच" श्रुतिका लागायची त्यातले "पंत" हे पात्र म्हणजे limbutimbu ?
हाहाहा!!

राजसी,
तुम्ही भारतातच रहाता ना?

नविन गॅस कनेक्शनसाठी नाही, असलेले चालू ठेवायलाही सगळ्यांचे के वाय सी पुन्हा भरून घेतले इथे.
इन्कम डिटेल्स तुम्हाला सब्सिडाईज्ड ग्यास द्यायचा की रेग्युलर यासाठी.

असो.
तुमचा नी माझा भारतच नव्हे तर कर्नाटकही वेगळं आहे.

>>> असलेले चालू ठेवायलाही सगळ्यांचे के वाय सी पुन्हा भरून घेतले इथे. <<<<
आमच्याइकडे दीडवर्षापूर्वीच घेतलेत भरुन.... कर्नाटकच इतके मागे कसे पडले? इतक्या उशीरा घेताहेत ते? Wink

लिंबू केवाय सी दर दोन वर्शांनी अपडेट करायचे आहे. ते बघून घे. अचानक पंचाइत व्हायला नको.

खरंच! मला नाही अजून kyc मागितले. Subsidy आम्हीच नको सांगितली म्हणून मग इन्कम डिटेल्स विचारले नसतील. बाकी गॅस रेफिल घरीच येतं ना? मग तेच kyc नाही का? बॅंका kyc साठी गॅस मागतात / चालत, मग गॅसला कोणाचे द्यायचे बँक स्टेटमेंट का? सबसिडी नको संगीतल्यापासून एकदम privileged treatment मिळते हं गॅसकडून. बुक केला की दुसऱ्या दिवशी नाहीतर लगेच्च शनिवारी सकाळी गॅस हजर. डोळ्यांत पाणी हो माझ्या!

>माहितीतल्या दोन केसेस आहेत.. ६ महिन्यांपूर्वी केवायसी करुन सुद्धा परत केवायसी करा म्हणून समस आले आहेत. आणि त्यात ब्रँच वाल्यांचीच हलगर्जी होती.. दिलेले पेपर गहाळच केले होते..

माझी तिसरी केस समजा. बँक आयसीआयसीआय. कोथरूड डेपो शाखा. आता पर्यंत दोन लागोपाठ वर्ष केवायसी करूनही तुमचे केवायसी करायचे राहिले आहे अशी ईमेल आली.
माझी साडे तिसरी केस. त्याच शाखेत नवीन NRO खाते उघडले , त्या बरोबर केवायसीचे सगळे कागदपत्र पुन्हा जोडले . माझी दोन्ही खाती एकाच नावाने संलग्न जोडली आहेत. तरी पुन्हा जुन्या खात्याचे (जे गेली २० वर्षे आहे आणि त्याचे सहा महिन्यापूर्वी केवायसी केले होते ) पुन्हा केवायसी करायला हवे अशी ईमेल आली आहे.

आजचा अपडेट - केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या खातेदारांना महिन्याला फक्त पाच हजार रुपये काढता येणार ----