GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

Submitted by राहुल on 11 August, 2009 - 15:24
ठिकाण/पत्ता: 
स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...

Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868

चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.

खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.

अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्‍यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440

शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

एकूण : १६ मोठे + ५ छोटे

===============================

शनिवारचा कार्यक्रम -

१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.

२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.

३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.

४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.

५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.

रविवारचा कार्यक्रम -

१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.

===============================
मेन्यू -

शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================

कामाची वाटणी -

सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फु.स.: तुमची १५ सिटर गाडी पूर्ण १५ लोक / कारसीट ने भरून जाणार असेल तर मागे सामान ठेवायला जास्त जागा उरत नाही त्यामुळे hard cover असलेल्या बॅग्स शक्यतो घेऊ नका.

शनिवार आणि रविवारचा मुख्य कार्यक्रम (प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे) ठरला की मग त्याच्या अनुषंगाने नाश्ता आणि जेवणाचे काय करायचे ते ठरवता येईल असे मला वाटते.
>> एकदम बरोबर.आपला मुख्य उद्देश फॉल कलर्स बघणे आणि मजा करणे आहे.आमचा आधीचा अनुभव असा आहे कि एकदा बाहेर पडलो कि ट्रेल्सवर बराच वेळ जातो.खूप चालल्याशिवाय चांगलं बघायला मिळत नाही.तिथे ज्यांना शक्य आहे आणि इच्छा आहे ते ट्रेकिंगला पण जाऊ शकतात.तेथे मोबाईलची रेंज बर्‍याच ठिकाणी गायब होते.त्यामुळे पुढे गेलेल्यांशी किंवा मागे राहिलेल्यांशी संपर्क होत नाही. बहुधा जेवण स्किप होतच.त्यांमुळे सकाळी बाहेर पडताना हेवी ब्रे.फा करुनच बाहेर पडावे हेच बरे.मुलांचं जेवण,खाणं-पिणं बरोबर ठेवूयात.तिथून विकत घेण्यासारखं काही ठेवू नये कारण दुकानं,रेस्टॉरंट्स सिटीमध्येच आहेत.आपण डोनट्स,बेगल्स,मफीन्स सुद्धा अटलांटामधूनच नेऊ.अजून एक करता येईल, मद्रास सर्वाना भवन मधून इड्ली-चटणी नेता येईल म्हणजे सकाळी काही करत बसायची गरज नाही.

आतापर्यंत माहिती असलेल्या गोष्टी -
१) ग्रिल करता -
फ्रेश चिकन : costco
भाज्या : aspargous, pepper, corn, mashrooms, tommatos, red potatos, paneer, पर्ल ओनीअन, झुकीनी, अननसाच्या फोडी
स्क्युअर्स (लागत असल्यास)
(आपण तंदूर मसाला/पेस्ट विकत आणणार आहोत का? असल्यास लक्ष्मी ब्रँडची तंदूर पेस्ट चांगली आहे)
२) दूध,चहा, कॉफी,साखर
३) मिसळीचे सामान
मोड आलेली मटकी
कांदा,टोमॅटो,कोथिंबीर्,लसूण,खोबरं,
तेल,मोहरी,जिरे,तिखट,हळद,मसाला,मीठ्,साखर
फरसाण,शेव,चिवडा,दही
पाव
४) रेडी टू ईट पराठे(हे का हवेत मिसळ असताना??)
५)पोहे -- मिसळीच्या सामानातलेच सामान.
६)दूधाचा मसाला
७)डिश वॉशिंग लिक्वीड
८)डिस्पो़जेबल प्लेट्स,चमचे,नॅपकीन्स,कप्स.
९)डोनट्स,बेगल्स,मफीन्स

लहान मुलांसाठी नेण्यासारख्या गोष्टी:-
१.डाळ,तांदूळ - वरण-भात/खिचडी साठी
२. रवा - ब्रे.फा ला उपमा/शिरा करता येईल.
३.योगर्ट
४.फळे- केळी,पेअर,प्लम्स
५.दूध
६.ब्रेड,जॅम,बटर

सामानाची यादी बघता प्रत्येकाने कपड्याचा फक्त १ जोड आणावा ही विनंती Lol

सँटी, बघायला तिथे बरच आहे.. ट्रेल्स पण बरेच आहे. व्हिक्टोरीया फॉल्स च्या जवळचा एक साधारण ६ मैल चा ट्रेल आहे.. शिवाय पिक पाँईट आहे तिकडेही बराच चढ आहे. जरी त्या पिक पाँईटवरून दिसणारा व्ह्यू फारसा ग्रेट नसला तरी ते तिथलं एक मेन अ‍ॅट्रॅक्शन आहे... गॅटलीनबर्ग गावात टिपी करता येऊ शकतो, टिपिकल टुरिस्टी खेडं आहे... तिथे केबल कार वगैरे पण आहे ईंटरेस्ट असेल तर.. शरूकी गावात नेटिव अमेरीकन एरिया आहे.. तिकडे काही बाकी कार्यक्रम चालू असतात नेहमी... रस्त्यात मधे मधे व्ह्यू पॉईंट बरेच आहेत... जिथे थांबून फोटो काढता येतील..

पण...

आपल्या बरोबर बरीच लहान मुले आहेत... तर सगळ्यांना मोठ्या ट्रेलना येणं जमणार आहे का ? जर काही अडचणींमुळे कोणी येऊ शकणार नसेल तर त्यांना तिथेच ठेवून बाकीच्यांनी मोठ्या ट्रेल इ. ला पुढे जायचं आहे का ? तसं असेल तर पुरेश्या गाड्या आहेत का? माझ्या मते जेव्हा ग्रुप ने ट्रिपला जायचं असेल तेव्हा सगळ्यांना एकत्र राहून करता येईल अश्या activities शोधणं गरजेचं आहे. ह्यावर प्रत्येकाचे preferences काय ? अर्धे लोकं केबीन वर किंवा इतर आणि अर्धे पुढे अशी situation झालेली चालणार आहे का?

आणखीन एक खुलासा..... जेवण (पोहे, ग्रील, अगदी चहा कॉफी सुध्दा.) घरी बनवत बसायचा माझा आग्रह नाही !!! मला त्याची फार आवड वगैरे आहे असं तर गैरसमज तर अजिबातच नको...
पण सकाळच्या वेळात इतक्या माणसांच्या अंघोळी, लहान मुलांचं आवरणे/खाणे ह्यात खूप वेळ जाणार आहे.. I am sure आपण ११/११:३० च्या आधी घराबाहेर पडू शकणार नाही.... त्यानंतर इतकी जणं घेऊन बाहेर खायला जाणे.. जागा मिळणे, ऑर्डर करणे आणि खाणे, individual बिलींग करणे, लहान मुलांच्या हाय चेअर्स, एका पालकाने आधी खाणे एकाने नंतर (हे आमच्या तिन्ही गटगंमध्ये झालं होतं) ह्यात आणखी १.५/ २ तास जाणार... ह्यापेक्षा जशी जशी आवराआवरी होईल तसे केबीनवर पराठे, टोस्ट खाऊन निघणे हे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने जास्त सोईचं होईल असं वाटतं नाही का? लंच/डिनर बाहेर केलं तरी इतक्या सगळ्यांना एकत्र बसण्याची जागा कुठेच मिळत नाही मग सबग्रुप्स फॉर्म होतात.. सगळ्यांचं नीट बोलण्म वगैरेही होतं नाही... त्यापेक्षा केबिनवर एकत्र बसून गप्पाटप्पा/ टिपी होऊ शकतो.. तेव्हा त्यादृष्टीने प्लॅनिंग करणं जरूरीचं आहे... केबीन वर बर्‍याच ठिकाणी गेम्स, पत्ते, मुव्हीज च्या सिडीज इ. ठेवलेलं असतं त्यामुळे केबिनवरही बराच दंगा करता येऊ शकतो...

त.टी : ह्यातला कुठलाही भाग विनोदात लिहीलेला नाही..

अडमा,
सगळे बरोबर लिहिले आहे. माझेही म्हणणे तेच आहे की जे सोयीस्कर आहे ते करूयात. म्हणूनच ट्रेल्सही सुचवा असे लिहिले आहे. अगदी ढोबळ मानाने जरी ते ठरलं तरी इतर गोष्टी पटपट ठरतील. पण फक्त केबिनवरच टाईमपास करत बसलो, असंही नको व्हायला म्हणून खाण्याबरोबर ट्रेल्सचंही प्लॅनिंग करुयात असे म्हणालो.

मुलांचे आणि नाष्ट्याला लागणार्‍या वेळांचे म्हणणे पटले. म्हणून मग ज्यांची मुले आहेत आणि जे जाऊन आले आहेत त्यांनीही अनुभवाप्रमाणे ठिकाणं सुचवा..

त.टी : ह्यातला कुठलाही भाग विनोदात लिहीलेला नाही..
>> तू एकही स्मायली टाकली नाहीयेस तिथे, त्याच्यावरुनच समजलं की. वेगळं का लिहिलंस? Proud

एका पालकाने आधी खाणे एकाने नंतर (हे आमच्या तिन्ही गटगंमध्ये झालं होतं) ह्यात आणखी १.५/ २ तास जाणार >>> सॉरी अडम. आमच्यामुळे तुझा दर वेळेला हे सहन करावे लागते. (विनोद नाही, सिरियसली लिहिलय)
सगळ्यांनी मोस्टली चांगले पॉईंट्स लिहिले आहेत. पिव्हीच पटलं कॉन्फ कॉल बद्दल. आता निर्णयाची घडी येतेय ;). कमी वेळात लवकर निर्णय घेण्यासाठी कॉन्फ कॉलच सोयीचा पडेल.
सगळ्यांची मतं मांडून झालेली आहेत असे वाटतेय :).

अ‍ॅडमाचा बाहेर जाऊन नाष्टा, जेवण न करण्याविषयी मुद्दा बरोबर आहे. फक्त घरी जे करणार आहोत त्याचा फार मोठा घाट घालु नये असे सर्व म्हणत आहेत. उदा: फ्रोझन पराठ्यांऐवजी फ्रेश पराठे आणले तर गरम करण्याचा वेळ खूप कमी होइल. ऑम्लेटऐवजी हार्ड बॉइल्ड एग, टोस्ट + बटर + चटणी/फ्रूट स्प्रेड, ऑ.जु., फळं, दूध + सीरिअल असा नाष्टा पटापट तयार होइल. असो, फारच पोष्टी पडल्या ह्या स्वयंपाकावर तर हेमाशेपो Happy

मुलांना घेऊन जाण्याची तयारी असली तरी तिथे कुठे वय/वजन/उंचीचे बंधन असेल तर मुलांना नेता येणार नाही. तसेच अवघड ट्रेल्सवर इतर लोक गेले असताना त्यांची वाट बघत एखादे ठिकाणी थांबणे अथवा इतर अ‍ॅक्टिविटी करणे ह्याला आमची काही हरकत नाही.

कॉन्फ कॉलला हरकत नाही. पण रविवार संध्याकाळ आधी थोडे अवघड वाटतेय. त्याआधी सर्वांना सोयीचे असेल तर कॉल उरकुन घ्या. आमच्या बरोबर येणारे कपल दोघेच आहेत तेव्हा त्यांचा काही प्रश्न नाही. लहान मुल असलेल्यांच्या गटासाठी जे ठरेल त्यात आम्हाला काउंट करा.

शनिवारचा आणि रविवारचा दिवस बाहेर ट्रेकला जायचे आहे त्यामुळे लवकर निघावे लागेल. त्यामुळे नाष्टा आणि दुपारचे जेवण दोन्ही दोन्ही करणे शक्य होणार नाही त्यापेक्षा दोन्ही वेळा हेवी नाष्टा (पराठे/सँडविच) करुन आणि सगळ्यांसाठी स्नॅक्स घेवून बाहेर पडायला लागेल. लहान मुलांच्या पालकांनी काय काय करता येणे शक्य आहे नाही ते सांगा. सचिन म्हणतो तसे अगदी हाच ट्रेल करायचा असे नाही पण एकंदरीत रुपरेषा ठरलेली हवी. म्हणजे तिथे वेळ जाणार नाही.
तसच ट्रेक केल्यावर दिवसभर फिरल्यावर कोणाला जेवण बनवण्याचा उत्साह/ एनर्जी रहाते हा पण प्रश्न आहे त्यामुळे
रात्रीचे जेवण ठरवतांना तो पण विचार करायला हवा.
माझ्या मते असे मेन्यु हवा की लोकांना स्वत: स्वत:ला करुन खाता आले पाहिजे, पराठे गरम करणे, पिटा ब्रेड + फलाफल तयार नेले असतील तर ते बनवणे, सँडविच/बर्गर चे सामान नेले असेल तर आपापले बनवुन खाणे, नाही तर करणारे त्यात अडकतील.
मला स्वतःच्या खाण्यापिण्याचा काही खास आवडी निवडी नाहीत. जेवणात सगळे जे काय ठरवत असतील ते चालेल. शाकाहारी आणि पोटभरीचं झाले की बास. कोणीतरी एकाने चार्ज घेवुन मेन्यु ठरवुन टाका. गेटलीनबर्ग गाव जवळ असेल तर तिथुन अगदी पिझ्झा आणला २ दिवस तरी मला चालेल.
आम्ही इथुन विमानाने येत असल्यामुळे स्वयंपाकाचे काही करुन घेवुन येणे मला शक्य नाही पण अटलांटात आल्यावर काही विकत घ्यायचे असेल तर ते करु शकु. दुसरे काही आणण्यासारखे असेल तर सांगा.
तसच १५ जणांच्या व्हॅन मध्ये मुलांचे कारसीट+ स्ट्रोलर + माणसी १ बॅग एवढ सगळे नक्की बसते का याबद्दल आधी खात्री करुन घेता येत असेल तर चांगलच. वेळेवर गडबड नको.
मी ट्रेल शोधणे किंवा मुलांसह काय काय एक्टीव्हिटी करता येईल यासाठी लागेल ती शोधाशोध करायला तयार आहे.

आर्जे, आपल्याला रविवारी केबिन कधी सोडायची आहे.
लोकहो, रवीवारी अ‍ॅटलांटाकरता साधारण किती वाजता निघायचा प्लॅन आहे? (म्हणजे त्याप्रमाणे रविवार दिवसाच्या प्लॅन बनवता येईल.)
माझ्या मते अ‍ॅटलांटाला ७ च्या आत पोहोचू असे निघूयात कारण दुसर्‍या दिवशी परत सगळ्यांचे ऑफिस किंवा इतर रुटीन सुरु होईल. बाकिच्यांना काय वाटते?

मिसळ करणार असेल कोणी तर मी इथुन मटकी भिजवुन त्याला मोड आणुन घेवून येवु शकेन. किती मटकी (अर्धा किलो/एक किलो) ते मात्र सांगा मला अंदाज नाही.

लोकहो, कॉन्फ कॉलची वेळ आता आली आहे. शुक्रवार संध्याकाळ, शनिवार सकाळ-संध्याकाळ, रविवार सकाळ-संध्याकाळ असे पर्याय आहेत कॉल ला.
जास्त गोंधळ नको म्हणून मी रविवार दुपार १२:३० प्रपोज करतेय. सगळ्यांना चालेल का? नाहीतर वर सांगितलेलली कोणतीही एक वेळ सजेस्ट करा.

खालील गोष्टीबद्दल चर्चा अपेक्षित आहे. खूप संक्षिप्त यादी आहे. तुम्हाला सुचतील त्या बाकीच्या गोष्टी पण तिथे टाका.

१. दुसरा कार चालक
२. कोण कोण काय आणणार
३. कोणकोणते पदार्थ बनवायचे/खायचे (प्रत्येक दिवशीचे ब्रेफा, लं. डि. फायनल करु)
४. शनिवार दिवसभराचा प्लॅन (ट्रेल, ट्रेकींग इ.)
५. रविवारचा शॉर्ट प्लॅन
६. रविवारी कितीपर्यन्त परतायचं

संध्याकाळी/रात्री उशीरा चालेल का कॉन्फरन्स कॉल?
घरी कार्टी जागी असली तर धड काही बोलता येत नाही. तेव्हा शनिवारी साधारण ९:३० / १०:०० ला निवांत कॉल चालू करायचा का?
(रच्याकने : २ मिनीटात बोलुन होणार्‍या कामासाठी कॉन्फरन्स कॉलवर किमान २ तास सहज मोडतात, आणि कामाव्यतिरिक्त बाकीचच बरच काही नॉलेज मिळतं, हा अगदी ताजा अनुभव आहे :फिदी:).

आत्ता पाहिला मेसेज आणि कोणीच नाहीये जिमेल वर Happy
आर्जे, तू कॉन्फरन्स साठी ब्रिज इन्फो टाकणार आहेस का?
आज दिवसा कधीही मला चालेल.

काल (शनिवारी) रात्रीसाठी होता तो संदेश. झाला नाही का कॉल ? आज होणार असेल तर मला दुपारी तीननंतर कधीही चालेल.

मला वाटले फोनवर होणार होता कॉन्फरन्स कॉल.

माझा लॅपटॉप पूर्णपणे गंडला आहे. शुक्रवारपर्यंत चालू होईल. त्यामुळे जीटॉकवर कॉन्फरन्स करणार असाल तर या विकांताला करूयात का?

कॉ कॉ झाला असेल तर अपडेट द्या इकडे. नसेल झाला तर कधी होणार आहे ते सांगा. जीटॉकवर टायपुन बोलायचे म्हणजे फार वेळ जातो त्यापेक्षा व्हॉइस चॅट किंवा डायरेक्ट फोन कॉल बरा.

हम्म... एकंदरीत एवढ्या लोकांना एकदम कॉन्फरन्स करायला जमणार नाही असे दिसते. तोपर्यंत इथेच लिहूयात.

मला ब्रेकफास्ट्चे अडमचे म्हणणे पटले. त्यामुळे ब्रेकफास्ट केबिनवर करायला हरकत नाही. ऑम्लेट चालेल. कांदे वगैरे चिराचिरी करायची असेल तर मी करेन.

सिंडीची पराठ्याची आयडीया मला चांगली वाटते. पराठे ब्रेकफास्ट किंवा जेवणात पण खाता येतात. तसेच रात्रीच्या जेवणासाठी आरजेची मिसळची आयडीया पण चांगली आहे. वेळही कमी लागेल. लागेल त्या गोष्टी मी चिरुन देईन. मिसळीबरोबर पराठे खातात की नाही माहीत नाही, पण मला काही हरकत नाही. किंवा मग दही आणि लोणचे आणता येईल.

आता इतरांनी आपापलं मत सांगा. उद्या किंवा परवा ट्रेलबद्दल लिहीतो. किंवा मग जाऊन आलेल्यांनी सर्वांना जाता येईल अशा ट्रेल सांगा. शिक्कामोर्तब करून टाकू. Happy Proud

आता फक्त एकच विकेंड राहिला तयारीसाठी.आपण कॉल करणार कधी आणि ठरवणार कधी.त्यापेक्षा प्रत्येकानी काय काय आणता येणं शक्य आहे त्याप्रमाणे लिहा यादीमध्ये.
सर्वांसाठी यादी पुन्हा टाकत आहे.काही राहिलं असेल तर ते पण अ‍ॅड करा.

आतापर्यंत माहिती असलेल्या गोष्टी -
१) ग्रिल करता -
फ्रेश चिकन : costco
भाज्या : aspargous, pepper, corn, mashrooms, tommatos, red potatos, paneer, पर्ल ओनीअन, झुकीनी, अननसाच्या फोडी
स्क्युअर्स (लागत असल्यास)
(आपण तंदूर मसाला/पेस्ट विकत आणणार आहोत का? असल्यास लक्ष्मी ब्रँडची तंदूर पेस्ट चांगली आहे)
२) दूध,चहा, कॉफी,साखर
३) मिसळीचे सामान
मोड आलेली मटकी
कांदा,टोमॅटो,कोथिंबीर्,लसूण,खोबरं,
तेल,मोहरी,जिरे,तिखट,हळद,मसाला,मीठ्,साखर
फरसाण,शेव,चिवडा,दही
पाव
४)पराठे (सिंडी)
५)पोहे
६)दूधाचा मसाला(सिंडी)
७)डिश वॉशिंग लिक्वीड
८)डिस्पो़जेबल प्लेट्स,चमचे,नॅपकीन्स,कप्स.(सिंडी)
९)डोनट्स,बेगल्स,मफीन्स

लहान मुलांसाठी नेण्यासारख्या गोष्टी:- (पीव्ही)
१.डाळ,तांदूळ - वरण-भात/खिचडी साठी
२. रवा - ब्रे.फा ला उपमा/शिरा करता येईल.
३.योगर्ट
४.फळे- केळी,पेअर,प्लम्स
५.दूध
६.ब्रेड,जॅम,बटर

४,६,८ मी आणते आहे. रवा भाजूनच आणणार का ? तसेही फक्त लहान मुलांसाठी आहे त्यामुळे जास्त लागणार नाही. मुलांसाठी अ‍ॅपल बार आणले तर बरोबर नेता येतील.

हम्म्म्म्म कॉकॉ च अवघड दिसयत खरं.. मला कॉकॉ रात्री ९ नंतर कधीही चालेल.. नाही केला तरी चालेल.. फ्रोजन पराठे चालतील.. साधे पण चालतील.. ब्रेफा केबिन वर चालेल.. बाहेर पण चालेल.. ट्रेल कुठलाही चालेल.. नाही गेलो ट्रेलला आणि घरी नुसता टिपी करायचा असेल तरी चालेल... मिसळ केली तरी चालेल.. सिंडीला मसाला नुसता परत देऊन टाकला तरी चालेल..

तात्पर्य: मंडळ जे काय ठरवेल ते माण्य... मला काय आणि किती आणायचंय ते सांगा... Happy

आतापर्यंत झालेल्या चर्चेवरुन मी खालील यादी derive केली आहे. ह्यात प्रत्येकाने काय आणु शकतो त्या वस्तुपूढे स्वत:चे नाव घाला. ह्यात जर एखादा बदल करायचाच असेल किंवा काही राहिले असेल तर बदल करुन टाका. पण कृपया हे केले तरी चालेल किंवा ते पण आणु शकतो असे म्हणु नका Happy ट्रेलविषयी माहिती वगैरे सँटी आणि अ‍ॅडम, इतर कुणी तिथली माहिती असणारे असे मिळुन ठरवा आणि फायनल झाले की इथे "एकच" पोस्ट टाका.

शुक्रवार रात्र
१. वॅन पिक अप
२. चावी पिक अप (**)
३. काय आणि कुठे जेवायचे प्रत्येकाने आपल्या सोयीने ठरवावे. गटागटाने येणारी मंडळी एकमेकांत फोनाफोनी करुन ठरवा.

शनिवार
नाष्टा
पोहे (पोहे, कांदे, मिरच्या, दाणे, कडीलिंब, कोथींबीर, मोहोरी, तेल, खोबरे/नारळ, मीठ, तेल)
चहा (चहा पावडर, दूध, आले/चहा मसाला, साखर)
मुलांसाठी *- केळं, दूध

दुपारचे जेवण
पराठे (सिंडी)
लोणचे
ज्युस (कॉस्टको किंवा तत्सम दुकानातुन कार्ट)
मुलांसाठी *- योगर्ट

स्नॅक्स
चिप्स
चिवडा अथवा तत्सम देसी स्नॅक
सोडा/पाणी
मुलांसाठी *- न्युट्री बार्स, अ‍ॅपल्स

रात्रीचे जेवण
स्टार्टर्स-
फ्रेश चिकन (costco)
भाज्या (aspargous, pepper, corn, mashrooms, paneer)
मॅरिनेशन (दही, तंदूर मसाला पेस्ट, दीपची फ्रोझन कोथींबीर चटणी)
ऑइल स्प्रे
ग्रिलिंग ट्रे
अ‍ॅल्युमिनिअम फॉइल
स्क्युअर्स

मेन कोर्स-
मिसळ पाव (कांदे, टॉमॅटो, कोथींबीर, मटकी, बटाटे, मिसळ मसाला, फरसाण, पाव, दही, लिंबं/रस, मीठ, बटर, तेल)
मुलांसाठी * - डाळ/तांदूळ खिचडी (मुगाची डाळ, तांदूळ, जिरं, कोथींबीर, गरम मसाला, कडीलिंबं, तेल)

डेझर्ट-
ग्रिल्ड अननस (अननसाचे तुकडे, व्हीप्ड क्रीम, वॅनिला आइस क्रीम)
मसाला दूध (दूध, मसाला- सिंडी)

रविवार
नाष्टा
ब्रेड, बटर, जॅम
चहा (चहा पावडर, दूध, साखर)
सिरीअल (कॉर्न फ्लेक्स, दूध)
मुलांसाठी* - दूध, चीरीओज

इतर
डिश वॉशिंग लिक्वीड
डिस्पो़जेबल प्लेट्स, चमचे, नॅपकीन्स, कप्स (सिंडी)
डाव, ग्रिलिंगसाठी चिमटे इ., भांडी (केबिन)
फर्स्ट एड किट (सिंडी)
पाण्याच्या बॉट्ल्स (कॉस्टको मधुन कार्ट)
गार्बेज बॅग्स (लहान, मोठ्या)
सतरंजी/डिस्पोजेबल मॅट, टेबल कवर
झिप लॉक्स
आइस बॅग्स/बॉक्स
अ‍ॅल्युमिनिअम ट्रे (मॅरिनेशनसाठी)

* अगदी लहान मुलांसाठी (असल्यास) ज्यांना पोहे अथवा इतर सॉलिड फूड चालणार नाही त्यांचे आई-वडील आपापल्या पोरांचे खाण्यापिण्याचे घेऊन येतील.
* मुलं पोहे किंवा इतर पदार्थ खाऊ शकतीलच पण हे पदार्थ त्यांच्यासाठी अ‍ॅडिशनल असतील.
** चावी घेणारी मंडळी केबीनवर सर्वात आधी पोचली पाहिजेत. तुम्ही किती वाजता तिथे पोचणार हे इथे लिहुन ठेवा.

Pages