निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या आठवड्यात मित्राच्या गावी सासवडला गेलो होतो. तिथलेच हे काहि प्रचि

कच्ची अंजिर
याचे शेत रस्त्याच्या जवळच असल्याने पानावर मातीचा धुरळा आहे.
 पिकलेली अंजिरे
खरंतर अंजिरांचा सीझन मार्च एप्रिल पण या महिन्यात पिकलेली हि काही
 सिताफळ
सासवडची अंजिर जितकी प्रसिद्ध तितकीच सिताफळंही. हे मित्राच्या शेतातलं. Happy

अरे वा नविन भाग आला.............. अभिनन्दन सर्वांचे.

जिप्स्या, पिकलेली अण्जिर मस्त दिसताहेत....

कलौन्जी म्हणजे कांद्याचे बी नाही. पण फुले मात्र खुप सुरेख आहेत. फुलांच्या शेंगाही होतील आणि घरची कलौन्जि मिळेल Happy

कलौन्जी म्हणजे कांद्याचे बी नाही. पण फुले मात्र खुप सुरेख आहेत. फुलांच्या शेंगाही होतील आणि घरची कलौन्जि मिळेल>> +१
कलौंजीचे शास्त्रीय नाव nigella sativa, कांद्याचा आणि याचा काहीच संबंध नाही. फुलं आणि सगळेच फोटो सुंदर आहेत.

नव्या भागाबद्दल सर्व निगकरांचे अभिनंदन!

Happy नवीन भागाबद्दल अनेकानेक शुभेच्छा...
सुंदर सुम्दर फोटो आहेत सर्वांचे..
मागील भागात मी कलौंजी बद्दल माहिती सांगितली होती .. Happy रिविजन करा पाहू सर्वांनी.. Wink Proud

भारतात अंजीर काहि ठराविक भागात होत असल्याने माझे काही गैरसमज होते .. पण त्याचे झाड कुठल्याही मातीत रुजू शकेल असे वाटतेय. मी भारताबाहेर न्यू झीलंडच्या समुद्रकिनार्‍यावर, मस्कत मधल्या वाळवंटी भागात आणि नैरोबी सारख्या हिलस्टेशन सारख्या ठिकाणी हि झाडे बघितलीत आणि सर्व झाडे फळावलेली होती..

आपल्याकडे मी एकाच रंगाची ( अंजीरी रंगाची ) बघितली पण भारताबाहेर पिवळी, हिरवी आणि काळी अंजीरे पण बघितलीत.

भारतात यावेळेस वेगळ्याच सुंदर आकाराचे सिताफळ बघितले त्याला म्हणे गोल्डन सिताफळ म्हणतात आणि दुसरे लाल रंगाचे.. दोन्ही चवीला सुंदर होती.

>>मागील भागात मी कलौंजी बद्दल माहिती सांगितली होती .. स्मित रिविजन करा पाहू सर्वांनी.. >>
:))
केली केली रिविजन!!
त्यात वेगळेच रंग आहेत कलौंजीचे.
आता घरच्या कलौन्जीला बिया येण्याची वाट बघते.

नि.ग. वरील निसर्गप्रेमींना एक आवाहन:

वाढत्या शहरीकरणामुळे जे अनेक परिणाम होत आहेत त्यातलाच एक म्हणजे मधमाशा, फुलपाखरे व अन्य कीटकांना जगण्यासाठी आवश्यक असणारी रानफुले, फुलोरा नष्ट होणे. यावर उपाय म्हणून (आणि आपल्या घराभोवतीचा परिसर रानफुलांनी सुशोभित व्हावा म्हणूनही) 'सीड बाँब' ही एक अफलातून संकल्पना अनेक ठिकाणी राबवली जाते. माती, शेणखत आणि नीमपेंड (नैसर्गिक कीडनाशक म्हणून)एकत्र करून हे मिश्रण(गोळे वळता येतील इतपतच)ओलसर करायचे आणि त्यात रानफुलांच्या बिया मिसळून त्याचे गोळे करून उन्हात सुकवायचे. पाऊस सुरू होण्याआधी हे गोळे घराभोवतालच्या रिकाम्या जागेत, रस्याकडेला, टेकड्यांवर विखरून टाकायचे. पाऊस सुरु होईल तेव्हा हे गोळे फुटतात, बिया रुजतात आणि पावसाच्या पाण्यावर वाढतात, फुलतात. याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास ही वेबसाईट पहा:

https://growtherainbow.com/

हे आपल्याकडे करायचे झाल्यास आपण तेरडा, सोनकी, कोरांटी, रानअबोली, गुलबक्षी, कारवी, निसुर्डी, झेंडू, शेवंती अशा फुलांच्या बिया वापरू शकतो. (कॉसमॉस, घाणेरी, चांदणीगवत वगैरे इन्व्हेडर्स चालणार नाहीत)

एप्रिल २०१७ मधे माझ्या मुलांच्या शाळेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आम्ही पालकांनी एक फनफेअर आयोजित करायचे ठरवले आहे. त्यात आमच्या वर्गाच्या पालकगटाचा फूलगोळ्यांचा स्टॉल असणार आहे. यातून काही नफा झाला तर आम्ही तो शाळेलाच मदत म्हणून देणार आहोत. यासाठी आम्ही आत्तापासून बिया गोळा करायला सुरुवात केली आहे. खरेतर बिया गोळा करण्यसाठी हाच योग्य काळ आहे.

निगवरच्या सर्व निसर्गप्रेमीना माझी एक विनंती आहे की तुमच्या भटकंतीत तुम्हीही रानफुलांच्या बिया जरूर गोळा करा. शक्य असेल तर मला द्या, किंवा तुमच्या परिसरासाठी हा उपक्रम करा.

मी पुण्यात रहाते. कोणी बिया देऊ शकणार असेल तर त्या माझ्यापर्यंत कशा पोचतील हे आपण विपूतून ठरवू.
हे आवाहन मी निगवर पुन्हापुन्हा करत राहीन Happy

धन्यवाद!

-अश्विनी केळकर.

@ ऋतूराज....दुसरीकडे म्हणजे कुठे? व्हॉटसपवर वगैरे पाठवलेले मेसेज अनंत काळापर्यंत फिरत रहातात आणि सगळ्यांना त्यात रुची असतेच असे नाही. त्यामुळे मी फक्त इथेच पाठवला. इथे समानधर्मी मंडळी आहेत, नक्की प्रतिसाद देतील.
माझ्याकडून आवाहन म्हणून न पाठवता एक नवी संकल्पना म्हणून पाठवणार असाल तर मजकुरात बदल करून जरूर पाठवा.

माझ्याकडे चंदन व बकुळच्या बिया आहेत वृक्ष आहेत त्यामुळे चालणार नाही उपरमात पण इतर ठिकाणी लावू शकतो...

या बियांबरोबर मोहरी, अळशी, बडीशेप पण घ्या. या बिया सहज रुजतात आणि यांची फुले किटकांना आवडतात !
घरी सांडलेली मोहरी आपण टाकून देतो, ती सुद्धा वापरता येते.

होय अदीजो तुमचं म्हणणं पटतंय. >>>>+१

माझ्याकडे लावलेले ....
1650.jpg
यावर फुलपाखरे येतात.

शिवाय लिंबाचे लहानसे झाड आहे. त्यावर फुलपाखरे अंडी देखिल घालतात.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांना!
मोहरी, अळशी, बडीशेप.... हो त्याही घेणार आहोत. शिवाय तुळस, सब्जा वगैरे.
पण मुख्यतः रानफुलांवर भर आहे.
मधुरा मकरंद, हो ही फुले पण पण घेता येतील.

निगवरच्या सर्व निसर्गप्रेमीना माझी एक विनंती आहे की तुमच्या भटकंतीत तुम्हीही रानफुलांच्या बिया जरूर गोळा करा. शक्य असेल तर मला द्या, किंवा तुमच्या परिसरासाठी हा उपक्रम करा. >>>>>>माझ्याकडुन नक्कीच Happy

सर्वच फोटो सुंदर!
मधुरा, ही फुले मला फार आवडता. कोकणातून, सुकलेली फुले मागवून त्याचं बी पेरलं . पण लहान लहान फुले आली आणि मरुन गेली. Sad

जिप्सी, मंजूताई मस्त फोटो
बाकी जिप्सी चा कॅमेरा म्हणजे परीस आहे, कोणतीही साधी गोष्ट सुद्धा किती सुंदर टिपतो Happy

मधुरा ही फुलं गजर्‍यात असतात ना? घरी याला इतके दिवस 'सुपारीची' फुलं म्हणायचो आम्ही..पण तुमचं झाड तर छोटंसं दिस्तय!

जिप्स्या, कारवीच्या बिया आता धरल्या असतील. माझ्या आजोळी, शेताच्या बांधावर ती व्यवस्थित वाढली होती. त्यामूळे तिच्या बियांची लागवड करायला हवी. कुठे गेलास तर नक्की जमा कर. हे काम लोक तिच्या काठ्या तोडून न्यायच्या आधीच करायला हवे.

सगळे फोटो,गप्पा भारीच....:)
माझ्या कडे गुलबाक्षी आणि शेद्री. लीली च्या बीया आहेत, हव्या असतील तर कळवणे....

अरे वा अदिजो..खूपच सुंदर आहे उपक्रम ..तुला भरपूर बिया मिळोत आणी खूप

सारे फॉलोअर्स!!!

सर्व गप्पा , फोटोज छान आहेत!!!!

@ सुलक्षणा, आम्हीपण याला 'सुपारीची' फुलंच म्हणतो. गजर्‍यात असतात ती वेगळी. बहुतेक जांभळ्या रंगाची असतात. बटण शेवंती बरोबर असतात. झाड तर छोटंसं दिस्तय... खरेच आहे.

अदीजो, छान उपक्रम.good luck for that!
गुगल ला सुपारीची फुलं विचारली तर भरपूर रिझल्ट्स आले Happy
खूप छान रंगांमध्ये येतं हे. जांभळा, गुलाबी, पांढरा, लाल, फिका गुलाबी...संस्क्रुत सम्स्कृत संस़्रकृसंसकृ
संस्कृत, (हुश्श....आला हा शब्द एकदाचा!!!) हिंदी नाव रक्तमल्लिका. नेपाळी नाव मखमली. पण कश्मिरी नाव गुंडी Happy

Pages