आडनावासह नाव बदलायचे आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 19 November, 2016 - 05:26

लग्नानंतर प्रत्येक मुलीचे नाव बदलते. आडनाव नवर्‍याचे लावावे लागते. तसेच नावही बदलायचा पर्याय असतो. जो कधी तिच्या इच्छेने, तर कधी तिच्या ईच्छेविरुद्ध वापरला जातो. त्याचे नाव गौतम असेल तर आपले गौतमी, त्याचे नाव रामशंकर असेल तर आपले सीतापार्वती असे काही करावे लागते. आता मला हे पटत नसले तरी मी एकटी काही समाज आणि कायदे बदलू शकत नाही याची मला पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे माझेही नाव उद्या ना परवा बदलेलच. पण मला आजच बदलायचे आहे. कारण,

१) माझे नाव अर्चना - सैराट प्रदर्शित व्हायच्या आधी हे माझेच नाव होते. कोणी अर्चना म्हणूनच हाक मारायचे, तर कोणी प्रेमाने अर्चू बोलायचे. पण आता जो तो "आर्ची" या नावानेच हाक मारू लागला आहे. सुरुवातीला गंमत म्हणून काही वाटायचे नाही. किंबहुना आर्चीचे चित्रपटातील कॅरेक्टर भारी असल्याने बरेच वाटायचे. पण आज एवढे दिवस झाले तरी आता ग्ग बया, ए आर्ची, ए आर्चे चालूच आहे. मला वाटते हे नाव आता मला जन्मभरासाठीच चिकटले जाणार. देव न करो उद्या माझ्या होणार्‍या नवर्‍यालाही माझे नाव बदलायचे सुचले नाही तर हे आर्ची कॅरेक्टर काही माझा पिच्छा सोडणार नाही. त्यातच त्याचे नाव प्रशांत, परेश, परशुराम निघाले, तर त्याचाही परश्या व्हायला वेळ लागणार नाही. सो प्लीज, एखादे बदलायचे छानसे नॉनफिल्मी नाव सुचवा आणि ते कसे कुठे बदलता येईल याचीही माहिती पुरवा.

२) आडनाव आमचे सरकार - जातीपातीचा कसलाही वृथा अहंकार नाहीये हां मला. पण तरीही सरकार हे नाव माझ्या मैत्रीणींनाही कसले भारी वाटायचे म्हणून मी फार सुखावायचे. त्यात तो अमिताभचा सरकार चित्रपट आल्यापासून जरा जास्तच वट वाढली होती या नावाची. तसेच माझे घरचे लाडाचे नाव राणी असल्याने एकूणच राणीसरकार अश्या भारदस्त नावाने मी आमच्या ग्रूपमध्ये ओळखले जायचे. पण दहा दिवसांपूर्वी मोदी सरकारने मोठ्या नोटांवर बंदी काय आणली बघावे तिथे सारेच जण सरकारच्या नावाने शंख करताना दिसत आहेत. भले त्यांना अभिप्रेत असलेले सरकार वेगळे असावे पण ईथे उचक्यांनी माझा जीव जायची वेळ आली आहे. बस ट्रेनमध्ये कोणी सरकारला शिव्या घातल्या की उगाच माझ्या शरीराला भोके पडल्यासारखे होते. आता पुढचे अडीच वर्षे सरकार बदलणे तर काही माझ्या हातात नाही, तर का नाही आपलेच सरकार आडनाव बदलावे असा विचार करतेय. आता तेवढ्यासाठी म्हणून एवढ्यात लग्न करून आपल्या स्वच्छंदी आयुष्यावर धोंडा पाडायचा नाही, तसेच सद्यस्थितीत सरकारच्या मुलीशी कोणी लग्न करेल का?, हा ही एक प्रश्न आहेच. मग का नाही नावासोबत आपले आडनावही बदलून घ्यावे. सो प्लीज, एखादे बदलायचे छानसे वादग्रस्त नसलेले आडनाव सुचवा आणि ते कसे कुठे बदलता येईल याचीही माहिती पुरवा.

आता घरी माझी ही ईच्छा सांगितली तर मला कल्पना आहे की सरळ पंचांग उघडून सर्वात पहिला शुभमुहुर्त शोधून माझे लग्न लावून देतील. त्यामुळे त्यांना बदललेल्या नावाचे सरप्राईज देण्याचा विचार करतेय. वयाची अठरा वर्षे मागेच पुर्ण केली असल्याने अडचण येऊ नये. की यासाठी घरच्यांचे नो ऑब्जेक्शन सर्टीफिकेट लागते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आडनावाचे म्हणाल तर भारतातली सगळीच आडनावे काही न काही कारणाने वादग्रस्त आहेत. तेंव्हा एखादे इम्पोर्टेडच वापरावे लागेल. माझ्या मते ओबामा आडनाव लोकप्रिय आहे शिवाय वादग्रस्त पण नाही.

आणि नावाचे म्हणाल तर खेडेगावातली मुलींची अनेक नावे अजून फिल्मी वगैरे झाली नाहीत. आपला लहेज राखून आहेत. जसे कि इंदुबाई वगैरे

तेंव्हा इंदुबाई ओबामा कसे वाटते?

आयडी बदला नाव बदलेन Happy

जोक्स द अपार्ट, दुसर्‍या कोणीतरी काहीतरी वाईट काम केल्याने आपले नाव बदनाम झाले अशी भावना असेल तर अशी नाव बदलण्याची पळवाट शोधण्याऐवजी असे काही तरी भरीव काम करा की तुमचे नाव तुमचे स्वताचेच म्हणून त्या चांगल्या कामासाठी जगभरात ओळखले जाईल Happy

टाळ्या !!!!

हे तुम्ही किती सिरीयसली लिहिले आहे माहिती नाही पण माझ्या मते एकदा नाव बदलल्यावर परत बदलता येत नाही, नायतर लोक तेच करत बसले असते, आता बदलून जे नाव घ्याल तेच लग्नानंतरही राहील, त्यामुळे नवऱ्याचे एक आणि तुंमचे एक, आणि नंतर मुलांच्या अडमिशनच्या वेळी बराच वैताग होतो

आता घरी माझी ही ईच्छा सांगितली तर मला कल्पना आहे की सरळ पंचांग उघडून सर्वात पहिला शुभमुहुर्त शोधून माझे लग्न लावून देतील. त्यामुळे त्यांना बदललेल्या नावाचे सरप्राईज देण्याचा विचार करतेय. >>>> हे मस्तेय

माझ्या मित्राच्या बहीणीचं नाव अर्चना आणि तिच्या नवर्‍याचं नाव प्रशांत आहे. त्यांच्या जन्मापासुन्च. सैराट आला तेव्हा आम्ही पण आर्ची-परश्या वैगेरे सगळं केलंच. पण आता गेलं की ते भुत.

आणि नाव काहीही असलं तरी काहीजणांना त्याची तोडफोड / अपभ्रंश केल्याशिवाय बोलायला आवडतच नाही.अशांसाठी आजवर २०-२२ वर्षे असलेले आपले नाव आणि आपल्या घरचे पुर्वापार आडनाव बदलणे योग्य वाटत नाही. बाकी तुमची मर्जी.

आणि लग्नानंतरही नाव न बदलायचा ऑप्शन असतोच की.

अशांसाठी आजवर २०-२२ वर्षे असलेले आपले नाव आणि आपल्या घरचे पुर्वापार आडनाव बदलणे योग्य वाटत नाही.
>>>>
हा जरा भावनिक मुद्दा झाला. चुकीचा नाही. पण व्यक्तीपरत्वे भावना बदलतात. मी सुद्धा भावनाप्रधान माणूस आहे, मला माझे नाव कसेही अचकट विचकट टायपाला कठीण असले तरी आवडते. मला कोणी पैसे दिले तरी बदलणार नाही. पण याच उलट माझ्या गर्लफ्रेंडला तिचे नाव लग्नानंतर बदलायचे आहे, तिला ते फारसे आवडत नाही. तिच्यामते ते ओल्डफॅशन आहे. लगेच काय ते विचारू नका, बदलल्यावर सांगेनच किंवा काय बदलून ठेवू जे ऋन्मेष या नावाला सूट होईन असा धागा ईथेच काढेन. तुर्तास वेळ आहे. निश्चिंत राहा.

आणि लग्नानंतरही नाव न बदलायचा ऑप्शन असतोच की.
>> नाव बदलणे न बदलणे ऑप्शन असतो. पण हे आडनावालाही लागू का? ते देखील बदलले नाही तर चालते का?

पण माझ्या मते एकदा नाव बदलल्यावर परत बदलता येत नाही, नायतर लोक तेच करत बसले असते,
>>>>
एक राज बब्बरचा की कोणाचा चित्रपट पाहिलेला, तो त्यात व्हिलनपासून (बहुधा डॅनी होता) वाचायला शहरे आणि नाव अगदी धर्मासह कित्येकदा बदलताना दाखवला आहे. पोलिसांच्या मदतीने अगदी कायदेशीर प्रक्रियेने..

ओबामा आडनाव लोकप्रिय आहे शिवाय वादग्रस्त पण नाही>>> ओबामा हे नाव वादग्रस्त नाही हाच एक वादाचा विषय आहे असे मला वाटते. पण ओबामा हे आडनाव आहे हे एक क्षण लक्षातच आले नाही आणि मला पुरुषाचे नाव काय म्हणून सुचवत आहात असे गोंधळून गेले Uhoh
तर जे नाव आहे की आडनाव आहे हे चटकन ओळखता येत नाही ते राहूनच देऊया Happy

पण आता गेलं की ते भुत.>>>> यही तो, आमच्याकडे ते भूत नाही तर वेताळ आहे.

लज्जागौरी हुमनाबादकर असे नाव करा. >>> स्पेलिंग थोssssssssडी लांबलचक होईल Happy

ऋन्मेष टाळ्या!!!!!>> टाळ्या, पण सर्वांनाच प्रसिद्ध होणे शक्य नसते. किंबहुना शक्य झाले असते तर प्रसिद्ध या शब्दालाच काही अर्थ उरला नसता नाही का Happy

पण माझ्या मते एकदा नाव बदलल्यावर परत बदलता येत नाही >>>> चालेल की. लग्नानंतरही तेच राहिले तर. नवरा त्याचे, मी माझे. पण मुलांच्या अ‍ॅडमिशनचा गोंधळ नाही समजला. आईवडीलांची आडनावे वेगळी असल्याकारणाने एडमिशन नाकारतात??

चालेल की. लग्नानंतरही तेच राहिले तर. नवरा त्याचे, मी माझे. पण मुलांच्या अ‍ॅडमिशनचा गोंधळ नाही समजला. आईवडीलांची आडनावे वेगळी असल्याकारणाने एडमिशन नाकारतात?? >> काही घोळ होत नाहीत. बिनधास्त रहा!

नाकारत नाहीत पण दर वेळी सगळे समजावून सांगावे लागते, वडिलांचे आडनाव एक, मुलांचे एक आणि आईचे वेगळेच हा तिढा होतो, मॅरेज सर्टिफिटकेत दाखवत बसावे लागते, माझ्या एका बहिणीने आडनाव काढून तिच्या आईचे नाव लावले, लग्नांनातरही तेच आणि त्यांना अजूनही एक मॅरेज सर्टिफिकेतची प्रत बरोबर ठेवावी लागते. पास्पोर्टलाही वैताग झालेला

http://changeofname.in/online-application-for-name-change-in-gazette/

Get your Gazette Notification for Change of Name for the following :

- Gazette for Change of Name after Marriage for Women,

- Gazette for Change of Name after Divorcee for females

- Gazette for Change of Name in Birth Certificate & School LC

- Gazette for Changing your Father’s / Middle name,

- Gazette notification Spelling Mistakes in Old Name

- Gazette notification for Change of Name After Adoption

- Gazette notification for Changing Due to Numerology or Astrology

- Gazette notification for Change of Name & Change of religion.

>> यात आवडत नाही म्हणून नाव बदलायचेय किंवा -इतर- असा पर्याय दिसत नाहीय. मी १८ वर्षांची झाल्यावर आवडत नाही म्हणून नाव बदलायला गॅझेट ऑफिसमधे गेले होते पण त्यांनीही हे कारण चालत नाही असं सांगितलं नव्हतं. फॉर्म दिला होता भरायला. कदाचित यातला काहीही पर्याय किंवा काहीच संयुक्तिक नाही वाटलं तर सरळ शेवटचा पर्याय देता येईल असं वाटलं असेल. पण नंतर मीच रद्द केलं ते काम. परत परत बदलता येत नाही असही म्हटलं नव्हतं.
( सिरियस प्रतिसादाबद्दल क्षमस्व)

अर्चना सरकार , आयडी चांगला आहे पण आडनाव तरी किमान मराठी घ्यायचं, सरकार आडनाव मोस्टली बंगाली आहे.

शरी धन्यवाद

आशूचॅम्प ओके तेवढे वैताग सहन करायची तयारी मग ठेवावीच लागेल.

सोनू सिरीअस प्रतिसादाबद्दल धन्यवाद तुम्हाला कोणाला सॉरी बोलायची गरज नाही.
एक प्रश्न, वैयक्तिक वाटल्यास नका देऊ उत्तर, तुम्ही खरेच नाव आवडत नाही म्हणून बदलायला गेला होतात का? आणि मग विचार का बदलला? म्हणजे जो काही विचार केला तो शेअर कराल का, तसेच काही असले तर मलाही फेरविचार करता येईल म्हणून विचारतेय.

श्री बरोबर ओळखलेत आपण, माझे वडील बंगालीच आहेत. वर कोणीतरी मला ओबामा हे अमेरीकी नाव सुचवलेय, जर मी त्यांचे ऐकले असते तर तुम्हाला मला "आडनाव तरी किमान भारतीय घ्यायचं" असे म्हणावे लागले असते Happy

आत्ता जरी तुम्ही नाव आणि आडनाव दोन्ही बदलून घेतलंत . तरी लग्नानंतर आडनाव बदलेलाच कि ( भले नाव नाही बदलू दिल तरी ) किव्वा हे तुम्ही नवीन घेतलेलं नाव आडनावंच ठेवायचा असेल तर होणाऱ्या नवऱ्याला ठणकावून सांगता आलं पाहिजे कि लग्नानंतर माझं नाव आणि आडनाव दोन्ही बदलणार नाही. दुसरी गोष्ट तुमच्या स्कूल लिविंग सर्टिफिकेट वर /कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट वर / तसेच व्होटर आयडीवर / प्यानकार्ड वर /ब्यांकेच्या सेव्हिंग अकाऊंट वर/आधार कार्ड वर पासपोर्टवर आणखीन कशाकशावर तुमचा जुन नाव आणि आडनाव दोन्ही असेल तर सगळ्या ठिकाणी बदलून घेण्याचा तुम्हाला उपद्वाप करावा लागेल ( स्कूल लिविंग सर्टिफिकेट वर /कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट सोडून ) . तेव्हा हा उपद्वाप करण्याचा त्रास सहन करण्याची तयारी आहे का ? तर करा . शुभेछया Happy

@ अर्चना सरकार, आपला लेख आवडला. मस्त जमलाय. सद्याच्या तत्कालिक परिस्थितीचा संदर्भ घेऊन आणि त्याचा आपल्या नावाशी सांगड घालून लेख लिहिणे खरोखरीच कौतुकास्पद आहे. आणि आलेल्या प्रत्येक प्रतिसादावर आपण देत असलेले प्रति-प्रतिसाद तर लाजवाब!!!! (टाळ्या!!!). आपले पुढील लिखाण वाचण्याची आतापासूनच उत्सुकता लागून राहिलीय. पुलेशु.

নিম্নলিখিত জন্য নাম পরিবর্তন জন্য আপনার গেজেট নোটিফিকেশন পান:

- মহিলাদের জন্য বিবাহ পর নাম পরিবর্তন জন্য গেজেট,

- নারী জন্য ডিভোর্সি পর নাম পরিবর্তন জন্য গেজেট

- জন্ম শংসাপত্র & স্কুল এলসি মধ্যে নাম পরিবর্তন জন্য গেজেট

- আপনার পিতার / মধ্যম নাম পরিবর্তন করার জন্য গেজেট,

- প্রাচীন নাম গেজেটে প্রজ্ঞাপন বানান ভুল

- নাম পরিবর্তন গ্রহণ করার পর জন্য গেজেটে প্রজ্ঞাপন

- সংখ্যাবিজ্ঞান বা জ্যোতিষ কারণে পরিবর্তিত জন্য গেজেটে প্রজ্ঞাপন

- নাম ও ধর্ম পরিবর্তন পরিবর্তন জন্য গেজেটে প্রজ্ঞাপন.

श्री बरोबर ओळखलेत आपण, माझे वडील बंगालीच आहेत. >>> सरकार आडनावाचे दोघे मराठी पाहण्यात होते. त्यातला एक कॉलेजला होता. दुसरी एक आमच्या नेहमीच्या हॉलीडे कंपनीत आहे कामाला.

नाव म्हणजे काय कपडे आहेत का, मनाला आलं की बदलायला !!!
आजूबाजूच्या चिडवणार्‍या लोकांना unfriend करून टाका!

अर्चना, जितका त्रास तुम्ही करून घ्याल नावाचा तितका तो होईल . जे तुम्हाला अर्ची वगैरे हाक मारतात त्यांना स्पष्टपणे माझ नाव अर्चना आहे हे सांगून टाकायचं. सांगूनही कळत नसेल तर अश्याना प्रतिसाद द्यायचाच नाही कितीही झालं तरी. आपोआप सरळ येतील .

बाकी सरकार आडनावाबाबद्दल तुम्ही उगाच त्रास करून घेत आहात असे दिसते. इथेही जस्ट इग्नोर ही पॉलिसी राबवा . Happy

जे तुम्हाला अर्ची वगैरे हाक मारतात त्यांना स्पष्टपणे माझ नाव अर्चना आहे हे सांगून टाकायचं. >>>" मराठीत कळत नसेल इंग्लिश मध्ये सांगु" म्हणुन बघा नक्की ऐकतील Lol

सुजा, तो त्रास नेमका किती आणि कुठे हेच तर जाणून घ्यायचेय. सध्या होणार्‍या मानसिक त्रासापेक्षा जास्त असेल तर नक्कीच विचार बदलता येईल.

सचिन काळे, धन्यवाद, पण आपली व्यथा कोणाला कथा वाटावी यापेक्षा दुसरे दुर्भाग्य ते काय !

जाई, इग्नोर करता येणे या सारखा रामबाण उपाय नाही या आणि अश्या समस्यांना. मात्र ते कितपत जमावे हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असते.

सपना, @ सरकार आडनावाचे दोघे मराठी पाहण्यात होते. >>> हो, आणि आम्हीही मराठीच सरकार आहोत. ते अवांतर वाद वाढू नये यासाठी बंगाली म्हणून मोकळी झाले. अन्यथा नाव गाव जात गोत्र कुळ वगैरे त्या त्या सर्टिफिकेटनुसार सिद्ध करता येईल. पण सोशल माध्यमांवर तेवढीच माहीती शेअर करा जेवढी तुम्हाला व्यक्त होण्यासाठी गरजेची आहे या मताची मी आहे. बाकी माझ्या मराठी असण्यावर शंका काढली म्हणून कसलाही राग वगैरे नाही.

श्री, तुमचा उपाय म्हणजे आपल्याचा पायावर धोंडा आहे Happy

अरे पण आपण स्वतःला त्या नावाने ओळखत असतो.आईवडिलांनी हौसेने नाव ठेवलेले असते.मग इतरांसाठी ते कशाला बदलायचे? त्या इतरांमधे नवराही आला.आता तुम्हालाच जर नाव आवडत नसेल तर गोष्ट वेगळी.

देवकी +१

काय हो, अर्चना ताई, सैराट मुळे त्रास होतो म्हणता आणि त्याचंच चित्र व्यक्तीरेखेत का लावलंय ? Uhoh

स्वारी, फार आधी लावलेय ते. अकाऊंट काढायच्या वेळचे, तेव्हा त्रास नव्हता. झालेच तर जरा बरेच वाटत होते, असे वर नमूदही केले आहे. सैराट आजही माझा आवडताच चित्रपट आहे, यात त्याचा काय दोष नाही. पण हो, ते तिथे लावलेय हे मी विसरून गेलेले आणि बदलायला हवे याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

देवकी, एका अर्थी आपण म्हणता ते देखील बरोबर आहे. पण नाव आपल्याच सोयीसाठी बदलायचे आहे. जे चिडवतात त्यांच्या त्रासाने म्हटले तरी त्यांचा राग करण्यात काय हशील नाही. ती मित्रमैत्रीणींची टेंडेंसीच असते. चिडवायला एखादे नाव मिळाले की ते सोडणार नाहीतच. मित्रमैत्रीणींच्या ग्रूपमध्ये हे चालतेच. पण मग अश्यात जे लांबचे असतात ते उगाच चान्स मारायला बघतात.

ईतरांमध्ये नवराही आला तरी तो नाही तरी त्याच्या घरचे त्याला बायकोचे नाव बदलायला मुद्दाम भाग पाडतात असे पाहिलेय. काहीतरी सुखावते त्यांचे आतमध्ये असे केल्याने बहुतेक. सूनेवर हक्क गाजवायची सुरुवात ईथपासून होते असे म्हणूया हवे तर.

बाकी नाव ज्या आजोबांनी हौसेने ठेवले होते त्यांचेही आता फक्त नावच या जगात आहे, तर त्यांना वाईट वाटणार नाही.

तुम्ही नाव बदलून घेतलंत तरी तुम्हाला मूळ नावाने हाक मारणे बंद होणं कठीण आहे. शेवटी सवय असते इतक्या वर्षांची. नवर्याने नाव बदललं तरी माहेरची माणसं पहिल्याच नावाने हाक मारतात. तसंच आहे हे.

Pages