मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीला वाटलेले की इंटेलेक्युअल डिबेट असावे. पण काहीच्या काही डिटेलिंग चाललंय... हद्दच झाली.

पुरूषाच्या बाहेरख्यालीपणाला गोंडस नावाखाली सूट हवी अशी फॅण्टसी असणा-या सर्वांना ओरडून सांगावेसे वाटतेय की आपल्या नात्यातल्या बायकांना ही सूट द्यायला तुम्ही तयार आहात का ? आधी केले मग सांगितले या न्यायाने पुढे लिहा..

पुरूषाच्या बाहेरख्यालीपणाला गोंडस नावाखाली सूट हवी
अशी फॅण्टसी असणा-या सर्वांना ओरडून सांगावेसे वाटतेय की
आपल्या नात्यातल्या बायकांना ही सूट द्यायला तुम्ही तयार
आहात का ? आधी केले मग सांगितले या न्यायाने पुढे लिहा..>>>>>>>>> असे स्वातंत्र्य वा सूट देणारे पुरुष कोण? ,हे स्वातंत्र्य ज्याने त्याने मिळवायचे आहे ,ते ही कायद्याच्या चौकटीत राहून.आणि बायकांना अशी सूट द्या असे म्हणने म्हणजे बायका पुरुषांची मालमत्ता आहेत अस अर्थ त्यातून ध्वनीत होत आहे,

धर्म अर्थ काम .... हे मायबोलीचे फेवरेट टॉपिक आहेत.

त्यावर भांडणे करुन आयडी मोक्षाला जातात.

anilchembur | 10 November, 2016 - 02:21 नवीन
धर्म अर्थ काम .... हे मायबोलीचे फेवरेट टॉपिक आहेत.>>>>>> करेक्ट,यातील धर्माचरण करायला पुर्वी प्रत्येकाला स्वातंत्र्य नव्हते ,आज ते आहे .अर्थाजन करायला माझ्यामते पहिल्यापासुन स्वातंत्र्य आहे वा आज तरी आहे.राहतो प्रश्न कामजीवनाचा ,त्यावर आजही अनेक बंधने आहेत .यावरच हा धागा आहे अनिलजी.

कामजीवनही मुक्तच आहे.

लग्न करा

माडी चढा.

तसेच फ्रँड जमवा.

धर्म बदलून अजुन लग्ने करा.

गे रहा.

एक बायको व एक गे ठेवा.

कोण अडवलय ?

चिंताजनक आणि शरमेची गोष्ट.......

'बलात्काराच्या क्रमवारीत भारत शेवटून चौथा'
- - वृत्तसंस्था

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:36 PM IST

नवी दिल्ली- जगभरात होत असलेल्या बलात्काराच्या जागतीक क्रमवारीत भारताचा शेवटून चौथा क्रमांक लागत आहे, असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

महिला पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी गांधी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘जगामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबतची आकडेवारी मिळविली आहे. या आकडीवारीनुसार जागतीक स्तरावर भारताचा शेवटून चौथा क्रमांक लागत आहे. यामध्ये स्विडनचा प्रथम क्रमांक आहे. दिल्लीत झालेल्या निर्भया अत्याचारा प्रकरणानंतर स्विडनचा दौरा केला होता. दौऱयावेळी भारतामध्ये येण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे एकाने सांगितले.‘

दरम्यान, गांधी यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनंतर सर्वच महिला पत्रकारांना धक्का बसला. परंतु, हि सत्य परिस्थिती असून आकडेवारी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.

खेदाची गोष्ट आहे,यावर विचारमंथन झाले पाहीजे .म्हणूनच एक वेगळी बाजू मी मांडून पाहीली आहे.

'बलात्काराच्या क्रमवारीत भारत शेवटून चौथा'
>>>
बातमी वाचून पटकन उलटे वाटले. शेवटचा म्हणजे सर्वात कमी अपराध घडणारा देश असे. धक्काच बसला खरे तर. मग बातमी पुर्ण वाचली तसे खरे काय ते समजले. पण तो ही धक्काच. कारण ईतर जगाच्या तुलनेत परीस्थिती ईतकी वाईट असेल असे वाटले नव्हते. ज्या देशातील पन्नास टक्के जनता, खरे तर लहान मुलांना पकडून त्याहीपेक्षा जास्ट टक्के जनता जेव्हा सुरक्षित फील करत नसेल, तो देश भविष्यात कुठे जाणार हे सांगायला कोण्या नॉस्ट्रेदेमसची गरज नाही

कामजीवनाचा ,त्यावर आजही अनेक बंधने आहेत .यावरच हा धागा आहे अनिलजी.

त्या साठी मुक्त लैंगिक व्यवहार हा उपाय आहे का, असा मुद्दा आहे ना?

बंधने आहेत म्हणजे काय?
जर उभयपक्षी लैंगिक व्यवहार यातच इंटरेस्ट असेल, तर तसे ते होतच रहाते, बंधन फक्त उभयपक्षी संमति नसेल तर,
तेहि काढावे म्हणता? तो बलात्कार नि गुन्हाच आहे. नैतिक, सामाजिक मानवी हक्क इ. सर्व दृष्टीने.

फक्त लैंगिक व्यवहार यासाठीच मनुष्य जगत नाही.
जगात कित्येक लोक आहेत ज्यांना उमजले की मनुष्याला लैंगिक व्यवहारांखेरीज इतर अनेक उद्योग आहेत, ज्ञानसंवर्धन, ज्ञानवितरण, राजकारण, क्रीडाक्षेत्र, प्रवास, परोपकार, इ. अनेक क्षेत्रे आहेत,

ज्ञानसंवर्धन, ज्ञानवितरण, राजकारण, क्रीडाक्षेत्र, प्रवास, परोपकार, इ. अनेक क्षेत्रे आहेत,

लैंगिक व्यवहार करणारे, लग्न करणारे लोक हे सर्व करत नाहीत काय ?

लैंगिक व्यवहार करणारे, लग्न करणारे लोक हे सर्व करत नाहीत काय ? >> अगदी अगदी.

बंधने आहेत म्हणजे काय?
जर उभयपक्षी लैंगिक व्यवहार यातच इंटरेस्ट असेल, तर तसे ते होतच रहाते, बंधन फक्त उभयपक्षी संमति नसेल तर,
तेहि काढावे म्हणता?
>> मुक्त लैंगिक व्यवहारात उभपक्षी संमती नाही, असे लेखात कुठेही म्हटलेले नाही वा त्याचे कोणी समर्थन करत नाही.

संमती ही पार पुढची गोष्ट झाली, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मुलामुलींत संवाद घडावा लागतो, हे निसर्गतः घडते एवढे स्वीकारण्याएवढा मोकळेपणा समाजात लागतो, तो तरी कुठे जाणवतो आजवर? एखाददुसरे अपवाद वगळता सगळा "दृष्टीआड सृष्टी" असा मामला. जावे तिथे नैतिक पोलिसगिरी करायला कोणी ना कोणी हजर असतो.
आजसुद्धा बऱ्याच पालकांच्या नजरेतून संबंधात मोकळेपणा म्हणजे नेमके काय? तर आपल्या पाल्यांना याबद्दलची शास्त्रीय माहिती देण्याइकाच. प्रत्यक्षात आपली मुलाचे-मुलीचे बाहेर शारीरिक संबंध असू शकतात, अन त्यात काहीही गैर नाही, हे किती पालक स्वीकारू शकतात?
जर याबद्दल घरात, समाजात कोणीही उघडपणे बोलत नसेल, तर मुलांमध्ये सुद्धा असे संबंध म्हणजे काहीतरी चोरून करायची गोष्ट असा समज होत नसेल का?
एखाद्या मुलीशी/मुलाशी बोलताना जेव्हा साऱ्यांच्या नजरा वाकड्या होतात, तिथे थेट शारीरिक संबंध उघडपणे ठेवता येतील, असे कुठल्या तरुण-तरुणीस वाटेल? मी तर म्हणेन, अर्ध्याअधिक टीनएज मुलामुलींचीइच्छा असूनसुद्धा गोष्ट संमतीपर्यंत पोहोचतच नाही. एकतर असे संबंध (तेही लग्नापूर्वी) म्हणजे काहीतरी अभद्र असा समज, अन त्यापुढे गोष्ट गेलीच तर समाजात हवा असणारा मोकळेपणा नाही.

मुक्त लैंगिक समाजाच्या जवळपास जर कोणता समाज जात असेल तर तो हा : http://www.dailymail.co.uk/news/article-2174389/Cambodian-fathers-build-sex-huts-13-year-old-daughters.html (National Geographic ची ही तीन मिनिटांची याबाबतची चित्रफीत)

आपला त्यापासून कोसो दूर आहे.

भारतात बलात्कार कमी नाहीत .. त्यांचे एफ आय आर दाखल होत नाहीत, म्हणून संख्या कमी दिसते.

बलात्कार झाले की विनयभंगाचे गुन्हे दाखल होतात.

विनयभंग झाला की त्याच्याही पेक्षा किरकोळ गुन्हे दाखल होतात.

अजुन किरकोळ गुन्हा असेल तर समज देऊन ( कागद न रंगवता ) सोडून देतात.

( एका हस्पिटलात एका कर्मचार्‍याने नर्सिंग स्टाफच्या चेंजिंग रुममध्ये चोरुन पहायचा प्रयत्न केला... त्या सिस्टरने नंतर त्याला त्याच्या टेबलवर जाऊन थोबाडले... हस्पिटलाने त्याला हाकलले, असे कळले .... कालची बातमी ... कायदेशीर तक्रार होणार का माहीत नाही. )

Pages