क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौराष्ट्रच्या विनू मांकड, सलीम दुराणी व कर्सन घावरी यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे >> मधल्याचे किस्से वाचलेले आहेत. बाकीच्या दोघांबद्दल फारसे माहित नाहि. फक्त मांकड कपिलच्या दर्जाच्या अष्ट्पैलू खेळाडू होता असे ऐकले आहे.

उद्यापासून सुरू होणारी टेस्ट चुरशीची होईल असे वाटते. इंग्लंड वाटतो तेव्हढा कमकुवत संघ नाही असे माझे मत आहे. कुक नेहमीच भारतात चांगला खेळत आला आहे नि उत्तम सलामी मिळाल्यावर बहुतेक संघांचा खेळ उंचावतो. त्यांची बॅटींग डेप्थ किवीजपेक्षा अधिक आहे नि खाली येणारे मोईन अली, बेअर स्ट्रो, वोक्स, स्टोक्स चांगले खेळाडू आहेत. बांग्लादेशच्या सिरीजनंतर त्यांच्या कमकुवत दुव्यांची जाणीव त्यांना झाली असणार जी एरवी पहिल्या १-२ सामन्यां नंतर होते. इंग्लंड साठी एक तापदायक गोष्ट म्हणता येईल तर दौर्‍याचे स्केड्युल. अगदी बीसीसीआय ने बनवल्यासारखे वाटते.

" इंग्लंड वाटतो तेव्हढा कमकुवत संघ नाही असे माझे मत आहे." - ईंग्लंड कमकुवत संघ वाटत ही नाही. पहिल्यांदाच भारताला ह्या सीझन मधे तगडा प्रतिस्पर्धी मिळालाय असं मला वाटतं. कूक, अँडरसन, रूट, मोईन अली, स्टोक्स, बेअरस्ट्रॉ हा तगडा लाईन-अप आहे.

सद्ध्या रणजी मधे रिषभ पंत सुटलाय. एक त्रिशतक, तीन शतकं, त्यातली दोन एकाच मॅच मधे - त्यातलं एक सर्वात वेगवान (४८ चेंडूत). हे सगळं ११३ च्या स्ट्राईक रेट ने.

असामी,
विनू मंकड हा लाला अमरनाथनंतर भारताकडून खेळलेला पहिला खराखुरा ऑलराऊंडर. भारताने जिंकलेल्या पहिल्यावहिल्या टेस्टमध्ये विनू मंकडनेच इंग्लंडची वाट लावली होती. सलिम दुराणी म्हणजे मागणीप्रमाणे सिक्स मारणारा बॅट्समन म्हणून मशहूर होता. करसन घावरीने फार काही भव्यदिव्य केलं नसलं तरी बर्‍याचदा कपिलला सपोर्ट बॉलर म्हणूनच त्याला वापरला गेला. दुर्दैवाने बेदीमुळे सुरवातीला बराच वेळ त्याला कुजवला होता सिलेक्टर्सनी आणि कॅप्टन झाल्यावर खुद्दं बेदीनेही.

इंग्लंडची बॅटींग लाईनअप मुख्यतः कूक आणि जो रुट यांच्यावर अवलंबून आहे हे माझं मत. बेन डकेटने बांग्लादेशविरुद्धच्या दुसर्‍या टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं असलं, तरी रिव्हर्स स्वीप मारण्याच्या स्वतःच्या उतावळेपणावर त्याला ताबा ठेवता आला नाही तर त्याचं कठीण आहे. बॅरीस्टोव्ह, अली हे बॅट्समन म्हणून इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रीकेत चालले तरी भारतात चालण्याची शक्यता कमी. बेन स्टोक्स आजच्या खेळाडूंमधला अत्यंत ओव्हररेटेड क्रिकेटर आहे. आणि बॉलिंगबद्दल म्हणायचं तर स्वान आणि मधुसूदन सिंगच्या जवळपासही त्यांचा एकही स्पिनर जाऊ शकत नाही.

बॉलिंगबद्दल म्हणायचं तर स्पिनपेक्षाही रिव्हर्स स्विंग चा धोका अधिक वाटतो मला. इंग्लंड बॉलर्स त्यात पटाईत आहेत नि त्यांची हाईट, पेस त्यासाठी सूटेबल आहे.

कॅप्टन कूक तंबूत परत!
१/४७

कूक ची डाळ शिजू दिली नाही! आता रूट आलाय त्याला मुळ धरु देऊ नये! Wink

<< करसन घावरीने फार काही भव्यदिव्य केलं नसलं तरी बर्‍याचदा कपिलला सपोर्ट बॉलर म्हणूनच त्याला वापरला गेला >> घावरी हा खरं तर तसा खूप भेदक गोलंदाज नसला तरीही गावसकरने मात्र त्याचा छान उपयोग करून घेतल्याचं आठवतं; डावर्‍या गोलंदाजाचं ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पहिल्या/दुसर्‍या स्लिपच्या दिशेने टाकलेला चेंडू ' स्ट्रेटन' करण्याचं कसब, ही घावरीची खासियत होती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व बर्‍यापैकी फलंदाजी ही देखील त्याची उपयुक्तता होतीच.
<< फिरकीची डाळ पुरेशी शिजलेली नाहीये..>> इंग्लंडकडे चांगले फिरकी गोलंदाजही आहेत, याला ह्या मालिकेत खूप महत्व येणार आहे .

रूट रुतून बसलाय... त्याला नाही उखडता आले तरी आजुबाजूच्या फांद्या तरी तोडायला पाहिजेत पण ते ही जमत नाहीये..

पहिल्या/दुसर्‍या स्लिपच्या दिशेने टाकलेला चेंडू ' स्ट्रेटन' करण्याचं कसब, ही घावरीची खासियत होती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व बर्‍यापैकी फलंदाजी ही देखील त्याची उपयुक्तता होतीच.>>>

घावरीचा उदय बेदीच्या काळात तेंव्हा पहिल्या काही ओव्हर्स चेंडूची लकाकी घलविण्या पुरती जलदगती आणि मग लेफ्ट आर्म आथोडोक्स स्पीन करायला लावायचा बेदी घावरीला!
गावस्कर कॅप्टन झाल्यावर आणि कपील जोडीला आल्यावर मात्र बरीच मध्यमगती गोलंदाज म्हणून भुमिका पार पाडली! पण ६+ फुटाचा घावरी अगदी हॅंडसम! आमच्या एक टुर्नामेण्टला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेले ९५-९६ मध्ये तेंव्हा जवळून भेटण्याचा योग आलेला! Happy

बर्‍यापैकी पीचवरची आपल्या स्पीनर्सची कामगिरीच त्यांचा खरा दर्जा ठरवूं शकते, या माझ्या मतामुळें मी बरीच नाराजी ओढवून घेतली असली तरी मीं अजूनही त्यावर ठाम आहे.

या सामन्यात तर ईंग्लंडने छान पकड घेतली आहेच. पण मालिकेसाठीही धोक्याची घंटा पहिल्याच दिवशी वाजली आहे. रंगतदार होणार ही ५ सामन्यांची मालिका हे नक्की Happy

ईंग्लंड ची टेस्ट टीम जबरदस्त आहे असं कालच मी आणी असामी ईथे बोलत (टंकत?) होतो. स्कोअरकार्ड ने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं.

अर्थात ही टेस्ट मॅच आहे. लगेच एकाच दिवसात धोक्याची घंटा वाजवायचं कारण नाही.

पण आपल्या फिल्डींग चा ढिसाळपणा मात्र नजरेत खुपणारा होता. त्या तीन सुटलेल्या कॅचेस विषयीच नव्हे पण ग्राऊंड फिल्डींग सुद्धा स्लॉपी होती.

पण आपल्या फिल्डींग चा ढिसाळपणा मात्र नजरेत खुपणारा होता >> हो ते थोडे आश्चर्याचे होते खरे. गेले काहि सिरीज हा बार अतिशय वर गेलेला होता. पहिल्या दिवशीच्या बॅटीम्ग धार्जिण्या पिचवर अशा घोडचूका महाग पडू नयेत अशी आशा ठेवूया.

उद्या स्टोक्स कसा खेळतो ह्यावर बरच काहि ठरेल.

मोईन अली पण डेंजरस आहेच की... फक्त आज त्याला ९९ वर लटकवला सुरुवातीला तर मात्र विकेट जाऊ शकते लवकर त्याची..

इंग्लंड ४००/५. मोईन अलीने शतक झळकावले आणि बाद झाला. बेन स्टोकने अर्धशतक झळकावले आहे. इंग्लंडची बॅटिंग स्ट्रेंग्थ बघता ते पाचशे सहज पार करतील असे वाटते.

न्युझीलंडच्या फलंदाजाना नाचविणार्‍या भारतिय गोलंदाजाना इन्ग्रजांनी जामिनीवर आणले पहिल्याच डावात ही चांगले झाले एकंदरीत!

<< भाऊ पहिला दिवस होता फक्त, पाच सामने थांबण्याची तयारी दिसत नाही ? >> असामीजी, गेल्या तीन-चार वर्षांत आपल्याकडे ऑसीज, द.आफ्रिका व न्यूझीलंड हे पाहुणे संघ आले. या सर्व मालिकांत त्यांचं फक्त एक कसोटी शतक व फक्त एका डावात ३००च्यावर धांवा ! ! नाही पटत ! समज आल्यापासून आपल्या विजयासाठी प्रार्थना व विजयानंतर नाचणार्या माझ्यासारख्यालाही हें खटकतंच व त्यांत कांहीं चुकतंय असं नाही वाटत मला ! कदाचित, ही मालिका खेळपट्टीचा अवाजवी फायदा न घेतां आपण जिंकलो किंवा लढलो, तर मात्र माझा आनंद निखळ असेल .

बर्‍यापैकी पीचवरची आपल्या स्पीनर्सची कामगिरीच त्यांचा खरा दर्जा ठरवूं शकते, >> भाऊ ह्या वाक्यात तुम्ही बृयाच जणांच्या धोतराला हात घालता आहात, फक्त देसीच नाही तर देशाबाहेरच्या. फक्त बोलर्स कडे बोट दाखवताना बॅट्समनना खेळण्याचे तंत्र नाही हा मुद्दा दुर्लक्षिला जातो हे पण येतेच.

आपण पहिल्या डावात चांगले खेळलो तर अनिर्णित राहू शकेल.

@ धोक्याची घंटा म्हणजे हा संघ बांग्लादेशकडून मात खाऊन आला म्हणून न्यूझीलंड वा वेस्ट ईंडिज नाही ही धोक्याची घंटा.. ते असते तर त्यांच्या पहिल्या फलंदाजीलाही आपण या फलंदाजधार्जिण्या खेळपट्टीवर त्यांना ३५० पर्यंत गुंडाळत तिसर्‍यादिवस अखेर ५००-५५० मारत नंतर फिरकीवर गुंडाळला असता, असा काहीसा स्कोअरकार्ड असता. पण तेच ईंग्लडने चांगला टॉस जिंकल्याचा फायदा उचलत कुठेही आपल्याला संधी न देता सामन्यावर पकड घेतली. एखाददुसरी मोठी भागिदारी नाही तर तिघांनी शतक मारले. आणि हे पहिल्याच सामन्यात.

बहुधा आपली पहिल्या सामन्यासाठीच्या खेळपट्टीची निवड चुकली. बळ दिले त्यांच्या आत्मविश्वासाला. उद्याचा दिवस महत्वाचा. दिवस अखेर साडेतीनशेला ४-५ विकेट फार तर यापेक्षा वाईट स्कोअरकार्ड असेल तर अवघड प्रकरण होईल. कारण त्यापुढचे दोन दिवस खेळपट्टी काय रंग दाखवेल सांगता येत नाही.

Pages