मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अधिकृत शब्द्कोशांनुसार ही व्यु त्पत्ती चूक आहे( oxford & American Heritage). fuck हा मूळ 'Germanic' शब्द आहे. 'विकी' ने सुद्धा वरील व्युत्पत्तीला 'False etymologies' टाकलेले आहे.

विकी वरच्या माहितीसाठी २००८ साली प्रसिद्ध झालेल्या आर्टिकलचा संदर्भ दिला आहे. मी त्याच्याही खूप आधी हे कुठेतरी वाचले होते. Thanks for update anyways.

"धडा शिकवण्यासाठी किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी झालेले बलात्कार" आणि "केवळ वासना शांत नाही म्हणून केलेले बलात्कार" ह्या दोन्हीत संख्या जास्त कशाची आहे?

पहिल्या प्रकारात सामाजिक संवेदनशीलता असल्याने बातमी होतेच. दिल्ली, कोपर्डी, कोठेवाडी, कोकरुड्/शिराळा, तासगाव इत्यादी. व म्हणून ते आपल्याला माहित होतात.

पण दुसऱ्या प्रकारचे रोज लक्षावधी बलात्कार या देशात होत असतील. चार भिंतींच्या आत सगळे घडते. बलात्कार म्हणजे इच्छा नसताना जबरदस्तीने केलेला संभोग. मग तो नात्यातच, ओळखीच्या व्यक्तीकडून, नवऱ्याकडून इत्यादी काहीही असेल. यातील किती टक्के बलात्कारांची "बातमी" होत असेल? बातमी झाली नाही म्हणून त्याला बलात्कार म्हणायचे नाही का? प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेला. विवाह म्हणजे बलात्कार करायला कायद्याने दिलेली परवानगी. म्हणून नवऱ्याने केलेल्या बलात्काराची पोलीस केस होऊ शकत नाही. व म्हणून ती बातमी होत नाही. पण म्हणून काय आपणही इथे त्याला बलात्कार म्हणायचे नाही असे ठरवले आहे का?

>> Polygamy is now vanished as stepper evolution changed

हे विधान पूर्ण चुकीचे आहे. एका सर्वेक्षणानुसार अद्यापही सरासरी लैगिक जोडीदारांची संख्या काही देशांत १४ ते १५ पर्यंत आहे (टर्की) तर भारत आणि चीन मध्ये हेच प्रमाण ३ इतके आहे.

धडा शिकवण्यासाठी किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी झालेले बलात्कार <<< हे विशिष्ट ठि़काणीच बघायला मिळतात उदा. इसिस जे स्त्रियांसोबत करत आहे.
केवळ वासना शांत नाही म्हणून केलेले बलात्कार<<<< ज्याचा ऊहापोह जास्त होतो जर तो गुन्हा समोर आला तर.

'धडा शिकवण्यासाठी' याच प्रमाण जास्त असलं तरी वारंवारता कमीच आहे कि तुलनेने दुसरे जास्त फ्रिक्वेन्सी ने होतात.प्रमाण तुलनेने एकच येणार हो.आकडेवारी असेल तर तुम्ही मांडा.

Polygamy is now vanished as stepper evolution changed<<<< i have not said totally or completely vanished.Its relative statement.Choosing Sexual partners with mutual consent is again relative i.e. you choose or don't choose.Depends upon your nurture,psychology.Some consider it under culture and traditional violation or may be the part of life.

जोवर तुम्ही लैंगिकतेच्या व्याख्या व्यवस्थित संपूर्ण समाजाला समजावून देत नाही तोवर हे चित्र वाढतच जाणार. पाटलांनी प्रार्थना केली आहे.देव असेल तर तो ऐकेल आणि पाटलांचं म्हणे सगळंच ऐकावंच लागतं... काय पाटील?

@ सिंथेटिक जिनियस, माझा एक बाळबोध प्रश्न. आजचा जमाना एड्सचा आहे. मग मुक्त लैंगिक व्यवहार कोण स्विकारेल?

@ सिंथेटिक जिनियस, माझा एक बाळबोध प्रश्न. आजचा
जमाना एड्सचा आहे. मग मुक्त लैंगिक व्यवहार कोण
स्विकारेल?>>>>>>>>> दिसेल त्या व्यक्तीशी ओळख काढून शरीरसंबंध प्रस्थापीत करावेत असे कुठे म्हणटले आहे मी? मुक्त लैंगिक व्यवहारात फक्त पेनिट्रेटीव्ह सेक्स अपेक्षीत नाही तर कंपॅनीयनशीपही अपेक्षीत आहे.ज्याच्याशी संबंध ठेवणार आहेत त्या जोडप्याने एकमेंकांना विश्वासात घेऊन असे व्यवहार करावेत.मुक्त लैंगिक व्यवहार म्हणजे स्वैराचार करावा असा अर्थ अपेक्षीत नाही.

Still there is no conclusion obtained from this debate...>>
चर्चेतून काही ठोस उत्तर निघेल असे वाटत नाही.

बरेच गुन्हे हे माणसाच्या नैसर्गिक उर्मीतून होत असतात. बलात्कार हा त्यापैकी एक. असे गुन्हे पूर्णपणे नष्ट होत नाहीत. कठोर शासन असल्यास त्याला काही प्रमाणात आळा बसू शकतो, इतकेच.

प्रबोधन जमेल तेवढे करायचे, आपले समाधान म्हणून. फार आशा नाही ठेवता येत त्यावर.
जैविक उत्क्रांतीमुळे माणसाला जशी उच्च बुद्धी मिळाली तसेच उच्च प्रकारचे कट, कारस्थान व गुन्हे करण्याची उर्मीही मिळाली.
त्यामुळे दरोडे, खून, बलात्कार, युद्धखोरपणा इ. गोष्टी माणसात अंगभूत आहेत. त्यासाठी कठोर शासनाची तरतूद असूनही त्या सर्वत्र होतच राहतात...........

मूल स्लोकः
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः।।1.43।।

English commentary by Swami Sivananda
1.43 दोषैः by evil deeds, एतैः (by) these, कुलघ्नानाम् of the family destroyers, वर्णसङ्करकारकैः causing intermingling of castes, उत्साद्यन्ते are destroyed, जातिधर्माः religious rites of the caste, कुलधर्माः family religious rites, च and, शाश्वताः eternal.No Commentary.

Hindi translation by Swami Ram Sukhdas
इन वर्णसंकर पैदा करनेवाले दोषोंसे कुलघातियोंके सदासे चलते आये कुलधर्म और जातिधर्म नष्ट हो जाते हैं ।।1.43।।

Hindi commentary by Swami Ramsukhdas
व्याख्या -- दोषैरेतैः कुलघ्नानाम् ... कुलधर्माश्च शाश्वताः -- युद्धमें कुलका क्षय होनेसे कुलके साथ चलते आये कुलधर्मोंका भी नाश हो जाता है। कुलधर्मोंके नाशके कुलमें अधर्मकी वृद्धि हो जाती है। अधर्मकी वृद्धिसे स्त्रियाँ दूषित हो जाती हैं। स्त्रियोंके दूषित होनेसे वर्णसंकर पैदा हो जाते हैं। इस तरह इन वर्णसंकर पैदा करनेवाले दोषोंसे कुलका नाश करनेवालोंके जातिधर्म (वर्णधर्म) नष्ट हो जाते हैं।कुलधर्म और जातिधर्म क्या हैं? एक ही जातिमें एक कुलकी जो अपनी अलग-अलग परम्पराएँ हैं, अलग-अलग मर्यादाएँ हैं; अलग-अलग आचरण हैं, वे सभी उस कुलके ' कुलधर्म ' कहलाते हैं। एक ही जातिके सम्पूर्ण कुलोंके समुदायको लेकर जो धर्म कहे जाते हैं, वे सभी ' जातिधर्म ' अर्थात् ' वर्णधर्म' कहलाते हैं, जो कि सामान्य धर्म हैं और शास्त्रविधिसे नियत हैं। इन कुलधर्मोंका और जातिधर्मोंका आचरण न होनेसे ये धर्म नष्ट हो जाते हैं ।।1.43।।
संदर्भः http://dharmic-jeevan.blogspot.in/2011/04/bhagvatgita-01-43.html

मूल स्लोकः
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम।।1.44।।

English translation by Swami Sivananda
1.44. We have heard, O Janardana, that inevitable is the dwellingfor an unknown period in hell for those men in whose families the religiouspractices have been destroyed.

English commentary by Swami Sivananda
1.44 उत्सन्नकुलधर्माणाम् whose family religious practices are destroyed, मनुष्याणाम् of the men, जनार्दन O Janardana, नरके in hell, अनियतं for unknown period, वासः dwelling, भवति is, इति thus, अनुशुश्रुम we have heard.No Commentary.

Hindi translation by Swami Ram Sukhdas
हे जनार्दन! जिनके कुलधर्म नष्ट हो जाते हैं, उन मनुष्योंका बहुत कालतक नरकोंमें वापस होता है, ऐसा हम सुनते आये हैं ।।1.44।।

Hindi commentary by Swami Ramsukhdas
व्याख्या -- उत्सन्नकुलधर्माणाम् ... अनुशुश्रुम (टिप्पणी प0 30) -- भगवान्ने मनुष्यको विवेक दिया है, नया कर्म करनेका अधिकार दिया है। अतः यह कर्म करनेमें अथवा न करनेमें, अच्छा करनेमें अथवा मन्दा करनेमें स्वतन्त्र है। इसलिये इसको सदा विवेक-विचारपूर्वक कर्तव्य-कर्म करने चाहिये। परन्तु मनुष्य सुखभोग आदिके लोभमें आकर अपने विवेकका निरादर कर देते हैं और राग-द्वेषके वशीभूत हो जाते हैं, जिससे उनके आचरण शास्त्र और कुलमर्यादाके विरुद्ध होने लगते हैं। परिणामस्वरूप इस लोकमें उनकी निन्दा, अपमान, तिरस्कार होता है और परलोकमें दुर्गति, नरकोंकी प्राप्ति होती है। अपने पापोंके कारण उनको बहुत समयतक नरकोंका कष्ट भोगना पड़ता है। ऐसा हम परम्परासे बड़े-बूढ़े गुरुजनोंसे सुनते आये हैं।मनुष्याणाम् -- पदमें कुलघाती और उनके कुलके सभी मनुष्योंका समावेश किया गया है अर्थात् कुलघातियोंके पहले जो हो चुके हैं -- उन (पितरों) का, अपना और आगे होनेवाले-(वंश-) का समावेश किया गया है।सम्बन्ध -- युद्धके होनेवाली अनर्थ-परम्पराके वर्णनका खुद अर्जुनपर क्या असर पड़ा? इसको आगेके श्लोकमें बताते हैं ।।1.44।।

संदर्भः http://dharmic-jeevan.blogspot.in/2011/04/bhagvatgita-01-44.html

वर्ण संकराने कुल नष्ट होते !

पूण्यात राहूनही हे घोर अज्ञान !

पेशव्यांचा ब्राह्मण ब्राह्मण सजातीय लग्ने असलेला ब्राह्मण वंश नष्ट झाला.

बाजीराव मस्तानी वर्णसंकराचा वंश अजून शाबूत आहे.

@limbutimbu आणि anilchembur कृपया विषयाला धरुन चर्चा करा अशी विनंती.नेहमीच्या धर्म जात पंथ वादाकडे हा विषय वळवू नका ही नम्र विनंती.

>>> @limbutimbu आणि anilchembur कृपया विषयाला धरुन चर्चा करा अशी विनंती.नेहमीच्या धर्म जात पंथ वादाकडे हा विषय वळवू नका ही नम्र विनंती. <<<
माफ करा, पण मी तुमच्या विषयाला अनुसरुनच, श्रीमद्भगवत गीतेतील श्लोक काय म्हणतात याचा संदर्भ घेतला आहे. Happy

>>पण मी तुमच्या विषयाला अनुसरुनच, श्रीमद्भगवत गीतेतील श्लोक काय म्हणतात याचा संदर्भ घेतला आहे.
नंतर कोणी विद्वेषी कमेन्ट्स टाकून विषय भलतीकडे वळवायचा प्रयत्न केला ते दिसतेच आहे.
असल्या प्रतिसादांपेक्षा अन्य धर्मग्रंथांमधे काय लिहिले आहे ते द्यायचे होते.

लिंब्या, अरे भाऊ, धर्मात खुप चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत पण त्यातलं हवं ते घेऊन, वाट्टेल तसा त्याचा विपर्यास करुन लोकं एकिकडे वर वर आमची संसकृती महान ह्याचा टेंभा मिरवत दुसरीकडे बलात्कारासारखी कृत्य करत आहेत तो प्रॉबलेम आहे. आणि त्या बाबतीत सुरु आहे ना ही चर्चा?

>>> धर्मात खुप चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत पण त्यातलं हवं ते घेऊन, वाट्टेल तसा त्याचा विपर्यास करुन लोकं एकिकडे वर वर आमची संसकृती महान ह्याचा टेंभा मिरवत दुसरीकडे बलात्कारासारखी कृत्य करत आहेत तो प्रॉबलेम आहे. आणि त्या बाबतीत सुरु आहे ना ही चर्चा? <<<< नाही.... (हे वाक्य म्हणजे अजुन एक "विपर्यास आहे" कारण बलात्कार करणारे वा बलात्कारांचे आडुन/उघड समर्थन करणारे नरपुंङव, बलात्काराच्या निमित्तास धर्माचा आधार घेत नाहीत, ते "बलात्कार करणे" ही शारिरीक/भावनिक/मानसिक/सामाजिक गरज आहे असे प्रतिपादन करत आहेत त्यातुनही हिंदू धर्म सोडून अन्य कोणत्या धर्मात परधर्मिय स्त्रीवर बलात्कार करा असा धार्मिक आदेश असेल, तर मला कल्पना नाही(?), हिंदू धर्मात तसे नाहीये).

मात्र बलात्कारांच्या वास्तवाचे निमित्त करीत भावनिक/शारिरीक गरजेच्या(?) चर्चेत गुंतवुन, तसेच मानव म्हणुन जगताना, वेळेस मात्र "नर जनावरांच्या वर्तणूकीचे दाखले देत", "वर्णसंकरास" उत्तेजन देता येईल का याची "चाचपणी" चालू आहे , ज्या संपुर्ण चर्चेत "मानव स्त्रीस" केवळ जनावरातील "मादी " म्हणूनच गृहित धरले जात आहे, असे माझे मत.

कुटुंबव्यवस्थेचा मुख्य निकष नवराबायकोची एकमेकांप्रति लैंगिक व भावनिक एकनिष्ठता "या श्रद्धाविषयासच" सुरुंग लावायचा प्रयत्न असे विषय पेरुन होत आहे असे माझे मत.

बाकी चालुद्यात, कारण कलियुगात काय होईल, याचे जे वर्णन आहे, त्यास अनुसरुनच हे होते आहे Proud मी फक्त त्यानुसारचे गीतेतील श्लोक दिले इतकेच.

लिंब्या , एकप्त्नीव्रताचे हिंदू ढोंग हे गेल्या दोन चार दशकातले - एक विवाह कायदा आल्यानंतरचे आहे.... त्यापूर्वी बहुपत्नित्वच होते.. 

आणि विवाहबाह्य संबंध हे तर सर्वत्र व सर्वकालीन आहेत.

>>> लिंब्या , एकप्त्नीव्रताचे हिंदू ढोंग हे गेल्या दोन चार दशकातले - एक विवाह कायदा आल्यानंतरचे आहे.... त्यापूर्वी बहुपत्नित्वच होते.. आणि विवाहबाह्य संबंध हे तर सर्वत्र व सर्वकालीन आहेत. <<<
पुन्हा एक वैचारिक भेसळ....
हिंदू धर्मात एकपत्नि वा बहुपत्नि असण्यालाही "नियम" होतेच, शिवाय "स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तसे करण्याची" सुतराम परवानगी नव्हती, त्याचा संबंध "बळजोरीने विकृत वासना पुर्तिसाठी स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केल्या जात असलेल्या बलात्काराशी" कसा काय जोडता आहात? का? तसेच "बलात्कारी नर पुरुष" केवळ हिंदू धर्मातच उत्पन्न होतात असे म्हणायचे आहे का? यासच मी वैचारिक भेसळ म्हणतो आहे. असो.

मला आश्चर्य याचे वाटते आहे, की एरवी "स्त्रीमुक्तिवादाची" मशाल घेऊन जिथेतिथे फुटकळ विषयांमधे रण पेटवित असणार्‍या "आयडीज" या धाग्यावर मात्र फिरकतही कशा नाहीत? याबाबतही असोच!

हा धागादेखील मुक्त संबंधांसाठी आहे... बलात्कार समाजमान्य व्हावेत , असे या धाग्याचे प्रयोजन नाही.

हिंदू धर्मात एकपत्नि वा बहुपत्नि असण्यालाही "नियम" होतेच.

कुठल्या पुस्तकात आहेत हे नियम ?

>>> कुठल्या पुस्तकात आहेत हे नियम ? <ं ते कशाला हवेत आत्ता इंडियन पीनल कोड अस्ताना?
मनुस्मृत्या तर जाळून टाकल्यात ना? Wink

कुटुंबव्यवस्थेचा मुख्य निकष नवराबायकोची एकमेकांप्रति लैंगिक व भावनिक एकनिष्ठता "या श्रद्धाविषयासच" सुरुंग लावायचा प्रयत्न>> Biggrin
लिंब्या, हिंदू देवदेवतांची तरी ही एकनिष्ठता होती का रे? किंवा 'वर्णसंकर' अगदी प्राणपणे जपणे? जा पुराणांत आणि इतर ग्रंथांमधे जाऊन तपास जरा... जगात सगळ्या धर्मांमधे, प्रदेशांमधे आणि काळामधे लैंगिक 'अनेकनिष्ठता' होती, आहे, असेल. समाजमान्यता आहे का, असावी का हा वेगळा प्रश्न आहे (जो या बीबीचा विषय आहे).
उगाचच गीतेतली वगैरे एकांड्या श्लोकाची फुटकळ उदाहरणे देऊन विषय भरकटवू नकोस

Proud

सगळ्या कॉप्या जळल्या काय ? संघाच्या ऑफिसात , शंकराचार्यांच्या मठीत एखादी असेल की.

आणि त्या मनुस्मृतीत , उच्च वर्णीय पुरुष खालच्या वर्णाची स्त्री भोगू शकतो , पण उलट केले की सैराट करावे असे आदेश आहेत ना ?

mi_anu | 8 November, 2016 - 02:37 नवीन
प्रत्येक धागा धर्मांच्या चर्चांनी हायजॅक व्हायलाच पाहिजेय
का?>>>>>>> अनु,दुर्दैवाने असे होत आले आहे.पण अश्या गळेकाढू प्रतिसादांकडे दुर्लक्ष करुन पुढे जाता येऊ शकते.
इथे पुन्हा एकदा सांगतो,मुक्त लैंगिक संबंध म्हणजे फक्त समागम अपेक्षीत नाही,तर स्त्री पुरुषांची निखळ मैत्री अपेक्षीत आहे ,स्त्री अप्राप्य वस्तु आहे हा पुरुषी विचार खोडून काढायला जेंडर इंटरॅक्शन अपेक्षीत आहे.अश्या मैत्रीतून कुणाला परस्पर संमतीने कुणी लैंगिक संबंध ठेऊ ईच्छित असतील तर त्याकडे निकोप दृष्टीने बघायला पाहीजे,हे अपेक्षीत आहे.

राहुल१२३ | 8 November, 2016 - 10:13 नवीन
वर्णसंकर म्हणजे आंतरजातीय विवाह ना?>>>>>>>>>@राहुल,निसर्गाला फक्त नर मादी हे दोन भेद अपेक्षीत आहेत ,बाकीचे मनवनिर्मित व तकलादू आहेत.आपण ही चर्चा धर्म वगैरेकडे नको वळवायला.

Pages