कॉकटेल - मोहितो

Submitted by बाहुबली on 4 November, 2016 - 15:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लिंबू, बर्फ, स्प्राईट, पुदिन्याची ताजी पाने, व्होडका (खरंतर मोहितो हे रम बेस्ड कॉकटेल आहे, पण आम्ही पडलो होतकरु आचारी Happy जे मिळेल ते वापरले. इथे स्मर्न ऑफ - ग्रीन अ‍ॅपल फ्लेवर वापरली आहे.), चिमुटभर चाटमसाला

क्रमवार पाककृती: 

दिवाळी संपली की तुळशी विवाहाचे वेध लागतात. तुळशी विवाह झाला की माणसांच्या विवाहाचे मुहुर्त सुरु होतात. मग काय? बॅचलर पार्ट्यांचे पण मुहुर्त सुरु होतात. सोबत दिवाळीचा उरला सुरला फराळ असतोच चखणा म्हणून!

तर आमच्या एका मित्राच्या लग्नाची तारीखही तशी जवळच येत होती. आम्ही सगळे कधीपासुन त्याच्या मागे लागलेलो होतो, पण पठ्ठ्या श्रावण, गणपती, नवरात्र, दिवाळी अशी कारणे देत टंगळमंगळ करत होता. आता लगीन महिन्या भरावर आले आणि त्याचे आईवडील पत्रिका वाटायला गावाला गेले मग काय? हा मुहुर्त साधुन आम्ही बॅचलर पार्टीचे नियोजन केले. अर्थातच त्याच्याच घरी.

ह्यावेळी बॅचलर पार्टीसाठी मित्राने बराच रिसर्च करुन कॉकटेलच्या परवडण्याजोग्या रेशिपी शोधुन काढल्या. साहेब ह्या कलेत एकदम निष्णात हो. त्यानेच स्वहस्ते करुन पाजवलेल्या कॉकटेल्सपैकी हे कॉकटेल.

कॉकटेल बनवायचे म्हणजे प्रमाण अचुक असायला हवे, त्यासाठी औषधाबरोबर मिळणारे मोजपात्र वापरले. Happy

आधी मला वाटलेले की हा करायला जातोय मोहितो पण होणार आहे फजितो! Biggrin पण जेव्हा मोहितो तयार झाले तेव्हा बघुनच मस्त वाटले आणि चाखल्यावर तर क्या बात!!

मग काय हातोहात रेसिपी विचारुन घेतली आणि लगोलग माबोवर पण लिहीली.

ही माझी इथली पहिली वहिली पाकृ आहे, काय चुकले असेल तर समजुन घ्या.
काही अ‍ॅडिशन करायची असेल तर नक्की सांगा.

कृती:
१. एका ग्लासात बर्फ फोडुन त्याचे तुकडे टाका. ग्लास १/३ बर्फाच्या चुर्‍याने भरला पाहिजे.
२. त्यात १५ मिली लिंबाचा रस ओता. लिंबाच्या सालीचा एक तुकडा पण ग्लासात टाका. लिंबाच्या साली मुळे एक हलकासा गंध मिसळतो.
३. पुदिन्याची ९-१० कोवळी पाने स्वच्छ धुवुन, हाताने हलकीच चुरडून ग्लासात टाका. जास्त चुरडू नका नाहीतर कॉकटेल कडवट लागते.
४. चिमुटभर चाट मसाला टाका. नेटवरच्या रेशिपींमध्ये चाटमसाला नव्हता, पण इथे चाटमसाल्याने मोहितो मस्त झाले होते.
५. आता यात आपले मुख्य रसायन - स्मर्न ऑफ - ग्रीन अ‍ॅपल - ३०मिली ओता.
६. चमच्याने मिश्रण ढवळून घ्या.
७. आता ग्लासाच्या कडेने हलके हलके स्प्राईट ओता. ग्लास भरत आला की बस करा.
८. पुदिन्याची एक काडी सजावटी साठी टाकली तरीही चालेल.
९. आता एक चियर्स म्हणा आणि मस्त घुटके घेत घेत आस्वाद घ्या मोहितोचा

मित्राने अगदी तुटपुंज्या साहित्यात (औषधाचे माप वगैरे) असे लाजबाब पेय बनवले की बास्स्स!! मी मनातल्या मनात पक्के केलेच की याला आहेरात बारचा किटच द्यायचा.
पण पार्टी संपल्यावर त्याने लग्नाची पत्रिका दिली त्यात लिहीले होते की ( कृपया आहेरात भांडी आणु नयेत. ) Proud

वाढणी/प्रमाण: 
३० मिली फक्त एकासाठी :)
अधिक टिपा: 

मोहोतो (mojito) हे रम वापरुन करायचे पेय आहे, इथे आम्ही वोडका वापरुन केले, पण तरीही छानच लागले. (मला तर सगळ्याच दारु चांगल्या लागतात. Wink )
नवशिक्यांसाठी : रम, वोडका हे दारुचे प्रकार आहेत. वर दिलेले पेय मादक पेय आहे

माहितीचा स्रोत: 
मित्र
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

ऍपल फ्लेवर त्यात लिंबू पुदिना. खरंच छान लागतं का?
30 ml म्हणजे लिंबू सरबतच झाला की. बघू ट्राय करून. Wink

एक क्वार्टर आणलेली दिसते आहे बॅचलर पार्टी साठी. मग पर हेड ३० मिलीच येणार. कठीण दिवस आलेत आजकालच्या ब्याचलरांना.

ग्रीन अ‍ॅपल नेक्स्ट टाईम अ‍ॅपि मधे ट्राय करा.

प्रतिसादांसाठी सर्वांचे धन्यवाद Happy

दिनेश,
आम्ही शेकर, स्ट्रेनर असलेला सेट देणार होतो, काॅकटेल ग्लास सेटची आयडिया छान आहे.

फिल्मी,
मला पण तसंच वाटलेलं, पण खरंच छान लागले.

३० मिली सर्वसामान्यांसाठी, बाकी ज्याने त्याने आपल्याला झेपेल तेवढे घ्यावे. Wink

झाडू,
बाकी इतरही माल होता हो. शिवाय घरीदेखील सुस्थितीत यायचे होते.
अॅपी + ग्रीन अॅपल नाही ट्राय केले. केल्यावर नक्कीच सांगीन.

आपण जाणकार दिसता म्हणून एक शंका विचारतो.
अॅपी आणि ग्रीन सॅपल व्होडका दोन्हीची चव सारखीच ना? काॅकटेलमध्ये फ्लेवर + त्याच चवीचे अल्कोहोल मिसळायचे असते का? की दोन वेगळ्या चवींची सरमिसळ करायची?

बाहुबली,

कॉकटेलात फ्लेवर्स एन्हान्स करणे बघायचे.

उदा. पिना-कोलाडा मधे अननस + शहाळं असतं, तशीच मालिबू नावाची खोबरा स्वादाची (कोकोनट लिक्युअर) रम देखिल असते. अल्कोहोल अधिक कडक हवं तर बकार्डी सारखी व्हाईट रम मिक्स करायची.

डार्क रम असेल तर कल्हुआ सारख्या कॉफीत, किंवा उसाच्या रसात मिक्स करून सुपर्ब लागते. रम मुळातच उसाच्या रसापासून बनते.

लिमिटलेस काँबिनेशन्स आहेत. जितकी करून पहाल तितकी कमी.

मोहितो न पिणाऱ्याना पण आवडते. बाकी सगळे प्रमाण तसेच ठेऊन फक्त लिंबू, पुदिना आणि sprite बर्फाच्या चुऱ्यात. हे झाले व्हाइट मोजीतो आणि कोक टाकून केले की डार्क. दोन्ही प्रकार छान लागतात.
पार्टीला न पिणाऱ्यांसाठी

Please try once with plain vodka. Green apple is strong flavour by itself. If using green apple vodka try skipping the mint. And add a thin slice of granny Smith apple. To the glass. Mint. Lime and green apple all three are very strong flavour families. If using mint try mint liqueur. Party on!!