मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रार, हायपॉथिसिस मांडायच्या आधी तू त्याबद्दल विचार केला असशीला ना? म्हणजे हायपॉथिसिस मनात येणे आणि तो कागदावर उतरवणे ह्या पायर्‍यांच्या मध्ये त्यावर थोडाफार विचार (वेगवेगळ्या शक्यतांचा विचार, ठोकताळे बांधणे वगैर) होतं असतील ना? (मी सायंटीस्ट नाही, त्यामुळे हा प्रश्न आहे). (हायपॉथिसिस मांडणे म्हणजे उ.जी.ला.टा. सारखं नसावं).

तर तुला स्त्रीने बलात्कार एन्यॉय केला तर करणार्‍याची मानसिकता बदलेल असं तुला का वाटलं ते ही लिही! शिवाय स्वातीने विचारलेला लिमिटचा प्रश्नही आहेच. हे लिमिट नक्की काय आणि कोणी/कसं ठरवायचं ?

युद्ध, यादवी या काळात घडणाऱ्या अनेक गोष्टी शांततेच्या काळात अशक्य कोटीतल्या वाटू लागतात. जेव्हा माणूस सतत मृत्यूच्या दारात उभा असतो तेव्हा घडणाऱ्या गोष्टी नॉर्मली घडणार नाहीत असं मला वाटतं.
रार, तू म्हणतेस ते घडणं अवघड आहे (घडू ही नये). लिंक दिलीस तर तुला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल.
सिंजी, लेख आजिबात पटलेला नाही. हे म्हणजे चोराला शिक्षा कशी होईल हे बघायचे सोडून त्याला चोरी करण्यास कसा अधिकाधिक वाव मिळेल याची तजवीज करण्यासारखे आहे.

रार यांचा मुद्दा प्रथमदर्शनी निषेधार्ह व अतर्क्य वाटत असेल. मला नाही वाटला. मला अजिबात पटला नाही हा भाग अलहिदा. पण त्यात निंदनिय काय आहे ? ठीक आहे, तिचे मत चुकिचे असेल. आपण ते चुकिचे सिद्ध करुयात ना. मुळात ज्या उद्विग्नतेतून व असहायतेतून हा विचार येऊ शकतो त्याचाही विचार व्हावा.

एखाद्या महिलेवर बलात्कार झाला म्हणजे तिचे सर्वस्व लुटले गेले हा टोकाचा विचारही एक समाज म्हणून आपण टाकून दिला पाहिजे. सैन्यात अधिकारी असलेल्या एका महिलेवर बलात्कार झाला. पण त्यानंतर तिला जे दिव्य सहन करावे लागले याचा लेख वाचून अंगावर काटा आला. महिलेचे शील म्हणजे काचेचे भांडे, ते तुटले की तुटले. असा जो विचार आहे तो चुकिचा आहे.

मूळ प्रश्नावर मत मांडा. कारण तो खरंच महत्ताचा प्रश्न आहे.
तुम्ही मांडलेल्या विचारांनी, मतांनी आणि उपायांनी काही फरक पडला समाजात तर उत्तमच आहे.

मी इथे काही लिहिलं होतं हे विसरा प्लीज. सर्टनली धीस इज नॉट द प्लेस फॉर दॅट काईंड ऑफ प्रश्न ह्या रीयलायझेशन बद्दल धन्यवाद्च तुम्हा सर्वांचे.

स्पीच्लेस.
बलात्कार होताना अराउज होतं होऊ शकतं ते बरंच साहजिक आहे इतपत वाचलं होतं, पण ते तसंच करावं आणि त्याने कदाचित बलात्कारी ते ही सामुहिक बलात्कार... जे पुरुषी पॉवर प्ले मधून होता आहेत त्या व्यक्ती काही शिकून त्या वेळच्या मॅनली/ लैगिक उर्मी दाबून निघून जातील!
चटकन शोधलं तर काही सापडलं नाही. लिंक प्लीज.

'रेप फॅण्टसी'बद्दल अनेकदा लिहिलं-बोललं जातं. पण ती 'फॅण्टसी' आहे.

'I enjoyed being raped' असं लिहिणार्‍या-सांगणार्‍या स्त्रियांचे अनुभव गूगल करून वाचले. त्यांना BDSMची आवड होती / BDSMकडे कल आहे, हे बलात्कार होताना लक्षात आलं, असं एकंदर ते अनुभव वाचताना जाणवलं. They were sexually submissive. पण तरीही तो बलात्कारच आहे. BDSMमध्ये परस्परांची अनुमती अध्याहृत असते, ती इथे नाही.

'अनेक कॉलेज-विद्यार्थिनींनी बलात्कार एंजॉय केला' अशी काही सर्वेक्षणं वाचली. पण मला ती भंपक + भंकस वाटली. Peer-reviewed जर्नलांमध्ये असं काही सर्वेक्षण दिसलं नाही. तरी अजून शोधतो.

बलात्कार होत असताना उद्दीपित होणं, किंवा ऑर्गॅझम म्हणजे 'एंजॉय' करणं नव्हे. ती शरीरानं दिलेली रिअ‍ॅक्शन आहे फक्त.

(भारतीयांच्या दृष्टीनं) 'मुक्त लैंगिक संबंध' ज्या देशांत ठेवले जातात, तिथेही बलात्काराचं प्रमाण कमी नाही.

(भारतीयांच्या दृष्टीनं) 'मुक्त लैंगिक संबंध' ज्या देशांत ठेवले जातात, तिथेही बलात्काराचं प्रमाण कमी नाही. >> +१

रेप फॅण्टसी ?
एका सेमिनार मधे ऐकलं होतं की बलात्काराच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे बलात्कार करणा-या पुरुषाचीओरव्बाडून घेण्याची वृत्ती. अशांना देण्यात इंटरेस्ट नसतो, तर स्त्री वस्तू समजून हिसकावून घेण्यात आनंद असतो. त्यामुळे स्त्री एंजॉय करतेय , (आपल्यापासून घेतेय ) आणि आपण ऑब्जेक्ट ठरतोय ही जाणिव अशांना अस्वस्थ करू शकते.

पण हे वन ऑफ द रीझन झालं . यावरून रुल नाही बनवता येत.

काचेचे भांडे, महिलेचे शील वगैरे जाउदे. तु माझ्या परवानगीशिवाय मला हात लावलाच कसा? हा मुद्दा आहे स्वत्वाचा. जेव्हा गर्दीचा फायदा घेवुन धक्का मार्णार्या लो़कांच्या आपण मुस्काटात लगावतो, तिथे बलात्कार होताना काय अपेक्षित आहे?

ठीक आहे चल, आता मी एंजॉय करण्याचा प्रयत्न करते (असे कोणती स्त्री म्हणते? बलात्कार होताना)

Kinsey म्हणतो तसे प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याच्या सेक्शुअल फँटसीज वेगळ्या आहेत.

रेप म्हणजे काही केवळ ह्या फॅटसीज नाहीत. तुम्हाला 'नो' चा अर्थ नुसता माहित हवा असे नाही तर त्याचा मानही राखता यायला हवा.
गाढवांना हे शिकवायची, संस्कार करायची गरज आहे. जे इतकं करून ऐकत नाहीत त्यांना 'चौरंगा' सारखा कायदा हवा.

मुळ खरंतर आपल्या समाजरचनेत स्त्रीला असलेल्या दुय्यम स्थानात आहे. त्यावर कोण घाव घालणार?

ज्या काळात पॉलीगॅमी अगदी सर्रास होती त्या काळातही बलात्कार होतच होते की. मुळात स्त्री ही उपभोग घ्यायची वस्तू , कुणाच्या तरी मालकीची- मग तिची अब्रू म्हणजे त्या मालकाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न हे गृहितक. मग वासना शमवायला काय किंवा मालकाची प्रतिष्ठा धुळीला मिळवायला काय बळाने तिचा उपभोग घ्यायचा. त्यात तिच्या इच्छेचा विचारच नाही. अगदी पवित्र विवाह बंधन म्हटले तरी किती मुलींचे विवाह त्यांची मर्जी विचारात घेवून होत होते?/होतात? वर परत मुलगी आमच्या शब्दाबाहेर नाही ही मिजास!
दारुसाठी बायकोच्या कष्टाचे पैसे जितक्या सहजतेने हिसकावले जातात तितक्याच सहजतेने स्पाउजल रेप होतात हे वास्तव आहे. त्यामुळे बलात्कारासारख्या गुन्ह्याबाबत अनेक पातळीवर लढा आवश्यक आहे.
१. लहान पणापासून स्री च्या 'नाही' चा अर्थ 'नाही' हाच असतो हे ठसवणे आणि नाही म्हणण्याचा तिचा अधिकार मान्य करणे.
२. बलात्काराच्या केससाठी वेगळे फास्ट ट्रॅक न्यायालय, वैद्यकिय सोई सुविधा आणि केसचा तपास करणारी यंत्रणा यांना योग्य ते ट्रेनिंग- बरेचदा सिस्टिममधील या घटकांचा दृष्टीकोन देखील न्याय मिळवताना अडचण निर्माण करतो.
३. स्त्री/लहान मुले यांच्या शी अयोग्य वर्तन करणार्‍या गुन्हेगाराची नोंदणी
४. योनीशुचितेचे अवडंबर न माजवणे.
५. कठोर शासन.
आजकाल येन्केन प्रकारणेन बळकावण्याची वृत्ती वाढलेय आणि काहीही केले तरी शासन होणार नाही हा आत्मविश्वासही. अशा परीस्थितीत स्त्री वर अत्याचार करणे तर फारच सोपी गोष्ट! बलात्कारी व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांऐवजी पिडीत स्त्री आणि तिचे कुटुंब यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. मुलगी एवढ्या रात्री बाहेर का गेली? कुणाबरोबर होती? कपडे कसे घातले होते? दारू पित होती का? एक ना दोन. वर परत मुलीला स्वसंरक्षणाचे धडे द्या वगैरे उपदेशही.
मुक्त लैंगिक वगैरे म्हणायचे तर मग कँपसवर राजीखुशीने पार्टी करण्यासाठी किंवा डेटवर गेलेल्या मुलीवर जे बलात्कार होतात त्याचे काय? मला हवे आहे, मी ओरबाडून घेणार आणि वर मला शिक्षा होणार नाही हा सिस्टिमनेच दिलेला आत्मविश्वास!

(भारतीयांच्या दृष्टीनं) 'मुक्त लैंगिक संबंध' ज्या देशांत ठेवले जातात, तिथेही बलात्काराचं प्रमाण कमी नाही. >> +१+१
याशिवाय, कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य असणार्‍या अमेरिकेसारख्या देशात, अनेक बलात्कारित स्त्रिया त्याबद्दल तक्रार करणे आणि न्याय मागणे टाळतात. हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.

लेखकाचा ह्या मागचा विचारच एवढा गंडलेला आहे की त्याबद्दल हसावे की रडावे ते कळत नाही. लेखकाला एकंदर डॉल्बी चा धिंगाणा असो वा पॉलिगामी भावना व्हेंट होणं फार महत्त्वाचं आहे असं का वाटतंय कुणास ठाऊक, आणि त्यासाठी कुणाला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालतंय म्हणतात. कीव येते आहे ह्या विचारांची.

पॉलिगामी ( ज्याच्यात्याच्या चॉईस चा मामला आहे) आणि बलात्कार ह्यांचा एकमेकांशी संबंध कुठे येतो नक्की हे कोणी सांगेल का?

लग्नामध्ये १००० आमंत्रित जेवायला आहेत म्हणून रस्त्यावरचं कोणीही येवून पंगतीत बसलेलं सुद्धा कोणी खपवून घेणार नाही. दोन टोटली वेगळ्या मानसिकता आहेत अर्थाअर्थी नाही आणि दूरवरही नाही कसलाच ओवरलॅप नाहीये पॉलिगामी आण बलात्कारामध्ये.
पब्लिक पण काय टँजंट बोलत आहेत काही कळत नाही. अवघड आहे.

@ हायजेनबर्ग ,तुम्हाला ओव्हरलॅप दिसत नसेल पण मला दिसतो ,म्हणुन धागा काढला आहे.कदाचित मी चूक ही असु शकतो.

सांगा बरं काय ओवरलॅप आहे तो.
कायद्याने सज्ञान नसलेल्या वयातली पोरंही बलात्कार करत आहेत तर ती कुठल्या मोनोगामी नी बांधलेली आहेत ते सांगा पाहू आधी.

एबीसीडी .. एनीबडी कॅन डान्स.. सारखा एबीसीआर झालाय आपला समाज.. एनीबडी कॅन रेप साला.. कारण समोरून प्रतिकार कमी.. समोरून म्हणजे फक्त स्त्रियांकडूनच असे नाही तर स्त्रियांना प्रोटेक्ट करणारी एकंदरीतच सिस्टम.. त्यात पुरुषही आले.. तिचे नातलग आले.. कायदा सुव्यवस्था सरकार सारे आले.. एखादी मुलगी कराटे शिकेन जिला नाही जमणार ती पर्समध्ये मिरचीपूड ठेवेन.. पण पुढे काय.. वापरायलाही हिंमत आणि ताकद लागते.. ती नाहीये अश्यातला भाग नाही.. पण बसमध्ये एखादा शेमडा पोरगा मागाहून चिकटतो तेव्हा सण्णकन त्याच्या एक कानाखाली पेटवावीशी वाटते.. पण ती पेटवतानाही शंभर वेळा विचार केला जातो आणि ती वेळ निघून जाते.. फार तर एखादी रागाची नजर दिली जाते.. पण त्यानंतरही शरम मुलीलाच.. आजूबाजूच्या नजरा तिच्याकडेच.. का राग दिला हिने.. काय मजा केली असेल त्याने.. रोजचे हे येताजाता स्पर्शाने आणि नजरेने घडणारे बलात्कार थांबतील या उपायाने??

>>>>>>>>>>

एक मुलगी म्हणून (किंवा एका मुलीचा बापभाऊ म्हणून) विचार करता हे मनात आले.
बदल हा मानसिकतेतच घडायची गरज आहे पण त्यासाठी कुठली पावले उचलताना सोबत पुरेश्या कडक कायद्यांची गरज आहेच. कारण सध्या परीस्थिती एवढीच खराब आहे.
पहिला घाव हा झोपडपट्टी गुंड मवाल्यांवर घालायला हवा..
दुसरा रोड रोमिओ..
तिसरा कॉर्पोरेट बास्टर्डस..
एकदा सुरुवात केली रट्टे द्यायला की काही ज्यांना उगाचच बळ चढलं असते ते कारवाई होतेय हे बघताच शांत होतील.. आणि अश्यांची संख्या अफाट आहे.

बलत्काराच्या वेळी येणार्र्या फ़िलिन्ग्स बद्दल नाहि लिहु शकत.. पन एक साधा प्रश्न आहे.. एक माणुस म्हणुन आपण एक शिवि पण सहन करु शकत नाहि अन लोक रेप एन्जोय करायच्या गोष्टी करत आहेत.

अव्यक्त, माझ्या अगदी असंच मनात आलं इथल्या काही पोस्ट्स् उडालेल्या पाहून.
Few unwelcome पोस्ट्स सहन न करू शकणाऱ्यांनी unwelcome sexual acts enjoy करण्याबद्दल हायपॉथीसिज मांडावेत हे फारच विचित्र वाटतं.

बलात्कार हे वर्चस्व गाजवण्याच्या भूमिकेतून होत असल्यामूळे मुक्त लैंगिक संबंध हे त्याचे उत्तर होउ शकत नाही.

मुक्त लैंगिक व्यवहार म्हणजे काय?

अहो लग्ना आधी, लग्नानंतर, हे संबंध स्त्री व पुरुष दोघेहि भरपूर करतात, पूर्वीहि केले, व पुढेहि चालू रहातील. पण त्यात उभयता संमति असते. त्याची जाहिरात केली म्हणजेच ते मुक्त झाले असे म्हणायचे? त्यातूनहि इतरहि कित्येकांना त्यांचे हे उद्योग माहित असतात तरी आपले चालूच रहातात.

समजा सगळ्यांनी तुमचे लैंगिक मुक्ततेचे नियम मान्य केले तरी पुनः उभयपक्षी संमति नसेल तर बलात्कारच ना?

मला तर अशी शंका येते की तुमच्या मते बलात्कार झाले तरी त्याला शिक्षा होऊ नये! अहो मानवी हक्काचे काय?

किंवा मला असे वाटते की तुम्हाला म्हणायचे आहे की जसे एखाद्याजवळ पैसे नसतील खायला अन्न नसेल तर कुणी तरी त्याला पैसे द्यावेत, खायला द्यावे तसे त्याचे लैंगिक दमनपण करावे? त्यासाठी पैसे देऊन स्त्रिया/पुरुष उपलब्ध करून द्यावेत? कदाचित उद्योगधंदे, नोकर्‍या वाढवणे या साठी तुम्ही हे व्यवसाय सुचवता आहात? विशेष शिक्षण नको, अनुभव नसला तरी चालेल!

आणि समजा कधी कधी हवा ते उपलब्ध झाला नाही तर दिसेल ते जबरदस्ती घ्यायचे - शिक्षा नाही?

तुम्हाला बलात्कार भारतात जास्त ऐकू येतात कारण तिथे लोकसंख्याच जबरदस्त, अव्वाच्या सव्वा (शे कोटी) झाली आहे म्हणून. त्यातून रिकामटेकडे लोक अनेक. काम करणारे थोडे.

बलात्कार हे वर्चस्व गाजवण्याच्या भूमिकेतून होत असल्यामूळे मुक्त लैंगिक संबंध हे त्याचे उत्तर होउ शकत नाही.>> अशक्य.
एकवेळ मान्य करू की काही बलात्कार सूडभावनेने प्रेरित आहेत. पण मग लहान मुले, वृध्द स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराचे काय? २-३ वर्षांच्या बालकाशी लैंगिक चाळे करताना कुठला सूड उगवायचा असतो? निर्भया प्रकरण पहा, किंवा एका खाजगी टॅक्सिचालकाकडून परदेशी महिलेवर झालेल्या बलात्काराची केस पहा. बहुतांश प्रकरणे अशी आहेत, जिथे आरोपी आणि पीडित व्यक्तीची साधी तोंडओळख देखील नव्हती, तर सूडाचा प्रश्न येतोच कुठे?

तेव्हा मूळ प्रश्न सूडबुद्धीशी कमी आणि लैंगिक दमनाशी जास्त निगडित आहे. मुक्त लैंगिक समाज, हा यावरचा उपाय मला दिसतो. नसेल अगदी जालीम, पण किमान यामुळे प्रत्येकाला लैंगिक भूक भागवण्याची संधी तर मिळेल. त्याउप्पर झालेल्या बलात्कारासंबंधी कडक शिक्षा अन त्याची प्रभावी अंमलबजावणी हे सयुक्तिक राहील.

अहो लग्ना आधी, लग्नानंतर, हे संबंध स्त्री व पुरुष दोघेहि भरपूर करतात, पूर्वीहि केले, व पुढेहि चालू रहातील. पण त्यात उभयता संमति असते.>> अपवाद सोडले, तर गावात सोडा, शहरातसुद्धा असे परस्परसहमत संबंध फार कमी होत असतील. सुरुवातीपासूनच शारीरिक संबंध म्हणजे जणू अघोर पाप, हेच मुलांच्या मनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बिंबवले जाते. लहानपणी याने फारसा त्रास होत नाही, पण वयात आल्यावर जसजशा लैंगिक भावना मनात येतात, तसतसे मनातले द्वंद्व वाढत जाते.

शारीरिक सुख हवेहवेसे तर वाटते, पण ते मिळवण्याची चोरी, कोणाशी बोलायची मारामार. एका मुलीशी बोलले तरी लोक वाकड्या नजरेने पाहणार. हळू हळू आवेग अनावर झाला की मग चोरट्या मार्गाने तो मिळवायचे प्रयत्न चालू होतात.
सुरवात पिवळी पुस्तके, पॉर्न क्लिप्स यांनी होते, अन तेही उघडपणे करू शकत नाही , म्हणून लपून छपून करावे लागते.काहीजण लहान मुलांची छेडछाड,नात्यातल्या/ओळखीच्या मुलींशी गैरवर्तन असे मार्ग अवलंबतात. हळूहळू याची तीव्रता वाढून एखाद्याचा तोल ढळतो आणि बलात्कार होतो.

यात बलात्कार्याला पाठीशी घालण्याचे समर्थन नसून तो त्या स्थितीपर्यंत पोहोचलाच कसा, यासंबंधीचे माझे मत आहे. समाजाने मुक्त लैंगिक संबंध स्वीकारले, तर असे बरेच बलात्कार समाज अप्रत्यक्षपणे रोखू शकतो.

Free sex is available abundantly.

Earn and take room or rent a lodge
Call call boys , call girls
Live in option is there.

So unavailability of sex is not a reason behind rape

खूप चर्चिला गेलाय हा विषय आधी पण.
काही मुद्दे मुख्य दिसतात.
१. बलात्काराला 'रिव्हेंज टूल' म्हणून वापरणे बंद करा.
२. माणसांना योग्य वय झाल्यावर शारीरिक बदलांची माहिती आणि त्याबरोबर येणार्‍या नैतिक जबाबदार्‍या यांची माहिती द्या, कायदे कडक करा.
३. फिमेल रेशो वाढवा

सगळ्या क्षेत्रांत स्त्रियांचे वर्चस्व ठेवले तर बलात्कार कमी होतील. पुरषी महत्वाकांक्षेला आळा बसेल आणि त्यातून येणारी स्वामित्वाची भावनाही कमी होऊ शकेल. बलात्कार अजिबात होणारच नाहीत अशी पद्धत सापडणं कठीण नाही तर सर्वथैव अशक्य आहे. मातृसत्ताक पद्धती मधे काय होत होतं हे शोधावं लागेल. जर ती पद्धत फुलप्रुफ असेल तर स्वीकारायला हरकत नाही. असे मला वाटते. पुरुषाच्या मानसिकतेत बदल करणं कठीण आहे. मिळालेली सत्ता कोणी का सोडावी ? स्त्रियां नी सत्ता मिळवण्याचं काम करावं.

घरी जा, घरात कोणी वयस्क ६० वर्षावरील आई, आजी, काकी, आत्या कोणी असतील तर त्यांना विचारा....
४० वर्षापुर्वी एवढ्या बलात्काराच्या घटना घडत होत्या का? जर नाही उत्तर आले तर विचारा की याचा अर्थ की त्यावेळी सर्वांनी मुक्त लैंगिक व्यवहाराचा स्विकार केला होता का? आणि याचेही उत्तर नाही असेल तर तुम्ही विचार करा की त्या काळी मुक्त लैंगिक व्यवहाराचा स्विकार केला नसुन देखील बलात्काराच्या घटना का घडत नव्हत्या?

रिकाम टेकड्यांनी फालतु टाइमपास चालवलाय नुसता

बलात्काराची चौकशी करुन दोषी आढळ्ल्यास त्या गुन्हेगाराचा अवयव कापुन टाका, मानवता वादी मधे पडले तर त्यांचा ही कापा आणि बघा....... नाही बलात्कार थांबले तर बापाचे नाव नाही लावणार

आणि ज्यांना वाटतंय की या घटना घडण्यामागे मुख्य कारण म्हणजे बंधन हे आहे तर मग आपल्या मुलांसोबत रोज एक पॉर्न फिल्म बघण्याचे धाडस करुन दाखवा म्हणजे मुलांवर बंधन नाही राहणार आणि पुढची पिढी सुधारित होईल, पण हे कोणी करेल काय? ......................................... शिवाजी जन्माला आला पाहीजे पण तो शेजारच्या घरी असले विचार आहेत हे.

Pages