भारतात व्हेगन जीवन पद्धती कशी सुरू करावी?

Submitted by अश्विनीमामी on 28 September, 2016 - 05:14

मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.

सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?

अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.

युट्यूब वर व्हेगन रेसीपीज चे बरेच व्हिडीओ आहेत.

खालील लिंका उपयुक्त आहेत.

http://www.nhs.uk/Livewell/Vegetarianhealth/Pages/Vegandiets.aspx

http://www.vrg.org/nutshell/vegan.htm

http://www.maayboli.com/node/13623
https://www.vegalyfe.com

http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...

https://m.facebook.com/Vegan-72085494764/

https://m.facebook.com/therealgreencafe/

http://www.forksoverknives.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा मराठी टायपिंग बिघडले का?
>> नाही रात्री फोन वरून केले होते.

धागा बंद करायला सांगितले आहे. आता इथे काही लिहीणार नाही. सर्वांचे धन्यवाद.

अमा, धागा बंद करु नका.
व्हेगनिझम तब्येतीला चांगला आहे/नाही, समाजाला चांगला/नाही चांगला हे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत, वी अ‍ॅग्री टु डिस अ‍ॅग्री.प्रत्येकाला आपापली आवडीची जीवन पद्धती जगता यावी.
पण हा एका जीवन पद्धतीबद्दलचा धाग आहे, आणि माहितीसाठी चालू रहायला हरकत नसावी.

अमा, धागा कशाला बंद करताय? तुम्ही काही तरी अवघड करु पाहताय.. सगळ्यांनाच नाही पटणार ते पण काय फरक पडतो?
सचिन काळे, उलट भेट स्विकारुन परस्पर दुसर्‍याला देऊन टाकणे हे अधिक असंवेदनशील आहे माझ्या मते. आणि जर नात्यात मला अमुक हवं आहे हे सांगण्याचा मोकळेपणा असेल तर सांगायला काय हरकत आहे?

मामे, धागा बंद कर वा नको, पण असले व्हेगन वगैरे काही करू नकोस.
नेहेमीचे सुग्रास जेवण जेव , फार फार तर भुकेपेक्षा चार घास कमी खा. Happy पण हे असले काही करु नकोस , कळकळीची विनंती आहे तुला.

सचिन काळे, अजिबात पटले नाही !

माझाच एक अनुभव आहे. अमेरिकेत राहत असताना एका सुट्टीत इथून सोनचाफा, पारिजातक, बकुळ, सोनटक्का अशा वासांचे सुंदर अत्तर रोल ऑन बाटल्या + मखमली बटवे असे भेट देण्यासाठी घेऊन गेले होते. ह्या फुलांचे अत्तर सहजासहजी मिळत नाही ( त्यावेळी तर पारिजातकाचा सुगंध मिळेल हेही लोकांना अप्रूपाचे वाटत असे. ) अमेरिकेत सेटल झालेल्या आमच्या नात्यातल्या एका ज्येष्ठ बाईंनाही मी ते दिले. काही महिन्यांनी परत भेटल्यावर अत्तर आवडले का असे विचारताच त्यांनी,"मला परफ्यूम्सची अ‍ॅलर्जी आहे. मी त्याचा वासही घेऊ शकत नाही." असे सांगितले. मला फार विचित्र वाटले त्यांचे वागणे आणि रागही आला ! त्यांना अ‍ॅलर्जी आहे हे मला कसे कळावे ? एकतर घेतानाच हे सांगून भेट नाकारायला पाहिजे होती किंवा 'मला अ‍ॅलर्जी आहे पण अमूक एकाला आवडेल तेव्हा ठेवून घेते.' असे सांगून ठेवून घ्यायला हवे होते. तेव्हा ह्यातले काहीच न करता नंतर तरी खरे का सांगितले हेही कळले नाही.

अगो, हा मुद्दा पटेश.
इतक्या दुर्मीळ भेटीबद्दल अत्तर आहे हे माहित असेल तर स्वीकारताना सांगायला हरकत नव्हती.
(जर उघडल्यावरच आत अत्तर आहे शोध लागला असेल तर गोष्ट वेगळी.)

@ अगो, तेव्हा ह्यातले काहीच न करता नंतर तरी खरे का सांगितले हेही कळले नाही.>>> खरेच! त्या ज्येष्ठ बाई अशा का वागल्या हे मलाही कळले नाही.

एकतर घेतानाच हे सांगून भेट नाकारायला पाहिजे होती >>> असे सांगून समोरच्याचे मन मोडण्याऐवजी आपले जे दुसरे म्हणणे आहे कि <<<मला अ‍ॅलर्जी आहे पण अमूक एकाला आवडेल तेव्हा ठेवून घेते>>> हेच मी करायला सांगितले कि <<<तोपर्यंत आपण आलेल्या भेटी स्विकाराव्यात.>>>

मग भले नंतर त्या देणाऱ्याच्या अपरोक्ष दुसऱ्या एखाद्या गरजवंताला देऊन टाकाव्या>>> असे न करता त्या ज्येष्ठ बाईंनी आपणांस<<< मला परफ्यूम्सची अ‍ॅलर्जी आहे. मी त्याचा वासही घेऊ शकत नाही>>> असे सांगितले.

@ जिज्ञासा, उलट भेट स्विकारुन परस्पर दुसर्‍याला देऊन टाकणे हे अधिक असंवेदनशील आहे माझ्या मते.>>> म्हणूनच मी परस्पर हा शब्द न वापरता <<<मग भले नंतर त्या देणाऱ्याच्या अपरोक्ष दुसऱ्या एखाद्या गरजवंताला देऊन टाकाव्या>>> असे म्हटलंय.

<<<आणि जर नात्यात मला अमुक हवं आहे हे सांगण्याचा मोकळेपणा असेल तर सांगायला काय हरकत आहे?>>> बरोबर! पण मोकळेपणा नसेल तर सांगितल्याने समोरच्याचे मन मोडू शकते. त्याऐवजी न सांगता भेटीचा स्वीकार केल्याने, मोकळेपणा असो अथवा नसो, विषय तिथेच संपतो.

सचिन काळे, <देणाऱ्याच्या अपरोक्ष> म्हणजेच परस्पर नाही का? (माझं चुकतंय का?)
<पण मोकळेपणा नसेल तर सांगितल्याने समोरच्याचे मन मोडू शकते. > मोकळेपणा नसेल तर असं सांगता येणार नाही. शिवाय आत्ता न सांगितल्याने अगो ने लिहिल्यासारखं उगीच वाईटपणा येईल नंतर. अमा, अवांतरासाठी सॉरी पण मला तुम्ही योग्य केलंय असं वाटतंय म्हणून इतकं लिहीत आहे.

जर उघडल्यावरच आत अत्तर आहे शोध लागला असेल तर गोष्ट वेगळी. >>> अत्तर आहे हे सांगूनच दिले होते. त्यांनी ते "Oh Wow !!" अशी कमेंट देऊन घेतले होते.

अमा, अवांतरासाठी सॉरी पण मला तुम्ही योग्य केलंय असं वाटतंय म्हणून इतकं लिहीत आहे. >> + १

सचिन काळे, एखाद्या व्यक्तीने मनाशी काही तत्त्वे ठरवली असतील तर उगाच भेटी स्वीकारण्यात काय हशील आहे ? आणि लोकांचे मन न मोडण्यासारखे कारण असलेच पाहिजे असेही बंधन कशासाठी ? म्हणजे मी व्हेगन झालेय किंवा वैद्यकीय कारणांसाठी घेऊ शकत नाही ही जितकी सबळ कारणे आहेत तितकेच 'मी यापुढे अमूक एका प्रकारची गिफ्ट स्वीकारणार नाही.' हे कारणही असू शकतेच की.
असो. हेमाशेपो.

हा धागा बंद वगैरे करू नकोस. ज्या कोणाला ही जीवनशैली आचरायची आहे त्यांना फायदाच होईल. भारतात आजच्या घडीला तरी ती अवघडच आहे. तेंव्हा या धाग्याचा उपयोग नक्कीच आहे.

@ अगो, पारीजातकाचे अत्तर कुठे मिळते? नाव / ब्रँड ?

@ अमा, हाच प्रश्न तुला पण आहे Happy

पोलीस जी गाडी टो करून नेतात ते ती वापरू शकत नाही. ती तुम्ही सोडवून आणली नाही तर कायमची त्यांच्या इथे भंगार म्हणून पडून राहील. आता हे किती पर्यावरण पूरक आहे याचा विचार करून निर्णय घ्या.

अमा, Happy world vegan day 2016! होते आहे का डाएट नीट फॉलो? काय फायदे तोटे जाणवलेत आतापर्यन्त?

Vegan diet is slowly becoming quite popular in India. One can get vegan products like milk / yoghurt in Metro cities at least, am not sure about tier-2 cities. Dr.Amit Tripathi from Pune is spreading this lifestyle and people are following it. They do have vegan cooking classes too.

Apart from food, one can easily manage without Pure Silk and leather products. Mazi aai kityek varshan pasun leather goods and pure silk vaparat nahi. She does not buy bone china crockery.

एक खूप मस्त हॉट सुंदरी ओलिव्हिया वाईल्ड पण व्हेगन होती असं काल हाऊस एम डी च्या एका सीन वरुन माहिती शोधत असताना कळलं.
व्हेगनिझम पाळावा ज्यांना आवडतो त्यांनी, पण त्यातून पटकन डिटेक्ट न होणारे कुपोषण होणार नाही याची नीट काळजी घ्यावी.

लेदर / सिल्क न वापरणे सर्वात सोपे आहे( माझ्यासाठी किंवा मला) . दही व चहातले दूध सोडणे अवघड जाते आहे. दोन किलो वजन कमी झाले. सर्वत्र चालतच गेल्याने आत्म विश्वास वाढला आहे ( चालायच्या बाबतीत. ) गुढगे दुखी कमी झाली.

फेसबुक वर वेगन आउटरीच, व जवळ जवळ प्रत्येक मेट्रोसीटीचे वेगन गॄप्स आहेत. आपापल्या शहराचा जॉइन करता येइल. इंडिअन वेगन तर आहेच. हे कॉपिराइटेड नाव आहे. तिथे चीज सबस्टिट्यूट, बटर सबस्टिट्यूट, वेगन कढी वगिअरे प्रकारांच्या रेसीपीज आहेत. पण हे सर्व सब्स्टि ट्यूट बाजूला ठेवूनही जे उपलब्ध आहे त्यातच आहार बसवणे खरे फार सोपे आहे. दिवाळीत तूप घातलेली एकही रेसी पी बनवलीच नाही. १०० ग्रॅम श्रीखंडाचा डबा आणला होता. लक्ष्मी पूजनाला व पावकिलो पेढे. नैवेद्याला. त्यातला अर्धा पेढा खाल्ला. दोन चमचे श्रीखंड. पण हे परत आयुश्यात नाही खाल्ले तरी चालेल अश्या पैकी आहेत. बंगाली मिठाई अतिशय आवडत असे ती आजिबात आणलीच नाही. बाय बाय डेअरी.

जालावर प्लांट बेस्ड प्रोटीनची टनाने माहिती उपलब्ध आहे. त्यातले सोर्सेस निवडायचे. सप्लीमेंट एक पण आणलेली नाही. मला ते फार एलीट वाट्ते. नोव्हेंबर मध्ये कलीग बरोबर एक हेल्थ चेक अप शेड्यूल केला आहे.

नारळाचे पाणी रोज पिते. १ डिसेंबर पासून चहा पूर्णच सोडून तेच प्यायला लागेन. व एखादे व्हेज ज्यूस.
सिझलर माझा अति आव्डता प्रकार. त्यात चिकन सोडून नुसते गार्लिक पेपर सॉस व व्हेजीज खाते.
चिकन व अंडी सोडायला त्रास झाला. पण मग फुकट परिवर्थनीय बाफ कशाला काढतेस असा स्वतःलाच प्रश्न विचारून सोडले ते.

सो फार गुड गोइन्ग.

अमा, चहातल्या दूधासाठी नॉन फ्लेवर्ड आमंड मिल्क वापरता येईल.ते फार महाग नाही.आणि फ्रिज मध्ये टिकेल १-२ दिवस.

ओके अनू. करून बघीन . बेसिकली पिस्ता, काजू बदाम ह्या बियाचे चीज, स्प्रेड, दही दूध सदृश्य पदार्थ व्हेगन लोक्स बनवतात असे निरीक्षणास आले आहे. मी मधे पिस्ते आणले ते नुस्तेच खाउन संपले.

एक महत्वाचा फरक म्हणजे जसे तुम्ही प्रोसेस्ड, आर्टिफिशेअली गोड पदार्थ खाणे कमी करता तसे इतर नैसर्गिक पदार्थांची चव अधिक जाणवू लागते. जसे टोमॅटो ज्यूस व हल्के मीठ मिरेपूड. गार करून एकदम फ्रेस चव. सर्व प्रकारची फळे व बिया. नारळ पाणी तर एकदम अमृतासारखे वाट्ते. मी डिलिवरी मॅन कडून प्लास्टिकची स्ट्रॉ पण घेत नाही. पाणी ग्लासात उतरवून घेते. व घोट घोट पिते. स्वीट कॉर्नचे दाणे फ्रेश असतील तर ते नुसते पण फार छान लागतात. बटर मीठ लावायची गरज नाही. परवाच मी स्वीट कॉर्न व मीठ मिरची जिरे कोथिंबीर असे मिक्सरला लावून त्याचे डोसा बॅटर सारखे बनवले. दोन चमचे रवा घातला व मस्त धिरडी बनवून खाल्ली.

जितके फ्रेश व लोकल मटेरिअल खाल, व ऑफकोर्स दूध दही बटर मटन चिकन फिश एग नाही तितके तुम्हाला फ्रिज ची गरज कमी पडते. व डिफ्रॉस्ट करायला मायक्रोवेव्ह लागत नाही युअर इलेक्ट्रिसिटी बिल गोज वे डाउन. मिक्सर्॑ व प्रेशर कुकर आहे अजून. वरी नॉट. Happy

अमा, तुमच्या हल्लीच्या प्रतिसादांवरुन तुम्ही व्हिगनिझम ला राम राम ठोकल्याचे जाणवते.
का? काय प्रॉब्लेम झाला? इथे शक्य नाही असे तुम्हाला वाटते का? की एकूणातच व्हिगनिझम मधे काही तथ्य नाही असे वाटले?

Just read the bb . You can see how the idea was blasted. You have fun dear.

Pages