रीत स्वागताची ही न्यारी --

Submitted by विदेश on 19 October, 2016 - 03:51

रीत स्वागताची ही न्यारी बघुनी हासत आहे मी
खड्डे दिसती जिकडेतिकडे रस्ता शोधत आहे मी ..

कोसळला ना कधीच धो धो लहरी तो पाऊस जरी
भरून वाटी चिमणीपुरते पाणी ठेवत आहे मी ..

करतो उत्साहाने प्रयत्न धडपडून मी जगण्याचा
ससा नि कासव कथा तीच ती अजून ऐकत आहे मी ..

लागुन ठेचा होतो जखमी प्रेमाच्या खेळात जरी
असते आशा अमर जाणुनी तसाच खेळत आहे मी ..

कर्जातुन घेतल्या घराचे दार बंद ठेवतो सदा
"अतिथी देवो भव" म्हणण्याला किती घाबरत आहे मी ..

शिते जिथे ती भुतेहि जमती शिकलो ज्ञानातून असे
माया पोटापुरती जमवत नाती टाळत आहे मी ..
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users