कुरकुरीत फुलपाखरे ;)

Submitted by विनिगिता on 18 October, 2016 - 06:48

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी पिठीसाखर
पाव वाटी तेल
१ कप पाणी ( आपण भरतात वापरतो तो चहाचा कप)
मैदा/ गव्हाचे पीठ २ वाटी
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती:
एका बाउल मध्ये मैदा/ गव्हाचे पीठ आणी पिठीसाखर एकत्र करुन त्यावर तेलाचे कड्कडीत मोहन ओतवे.
थोडे थोडे करुन पाणी टाकत जा.
घट्ट पीठ मळुन २ तास झाकुन ठेवा.
चांगले मळुन घेऊन लाटायला घ्या.
फोटोत दाखवल्याप्रमाणे फुलपाखरे कातुन घ्यावीत.
सगळे करुन झाले की मध्यम आचेवर तळा.

IMG_20161008_155319.jpgIMG_20161008_155328.jpgIMG_20161008_155517.jpgIMG_20161008_160009.jpgIMG_20161008_162400.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तर वेगळ्या आकारातील शंकरपाळेच <<< आता खरी फुलपाखरे तळली असती तरी आपण रागावलो असतो Proud

butterfly-fries-13895471.jpg

ही घ्या अजुन एक प्रकारची फुलफाखरे. यांना butterfly fries असं म्हणतात.
मग मराठीत कुरकरीत फुलपाखरे का म्हणुन नये?

दक्षिणा, 'टायगर प्रॉन्स फ्राय'ला म्हणता येईल खरपूस वाघ. Proud

धन्यवाद!!!
छान प्रतिसाद.. या रेसिपी मागे एक छोटीशी गंमत आहे.माझ्या सासरी नवरात्रामध्ये कडाकन्या करत नाहीत.पण मला आणी नवर्याला खुप आवडतात. म्हणुन मला कडाकन्या च्या सहित्यापासुन बनणारा आणी माझ्या २ वर्षाच्या लेकिला आवडेल असा सोप्पा पदार्थ बनवायचा होता.म्हणुन हा खटाटोपः)

धन्यवाद विनिगीताजी
नमस्कार,आत्ताच बनवली खुश खुशीत फुल पाखरे

खूप सारे प्रेम तुमच्या छोटीच्या निमित्ताने
झटपट खाऊ करता आला, तिला गोड गोड पापा,
Bye for now,