मायबोली गणोशोत्सव २००९ : स्पर्धा निकाल

Submitted by संयोजक on 17 September, 2009 - 00:05

मंडळी, आता आपण सगळे जण ज्याची आतुरतेने वाट पहात आहात तो कार्यक्रम म्हणजे स्पर्धांच्या निकालाची घोषणा. सर्वप्रथम स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या प्रवेशिकांना दिलखुलास दाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार.

सुरुवात करूया पाककला स्पर्धेपासून. यंदाच्या पाककला स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी स्विकारून ती पार पाडल्याबद्दल ह्या स्पर्धेच्या परिक्षक मायबोलीकर शोनू, कराडकर, मनुस्विनी आणि आर्च ह्यांचे संयोजकांतर्फे मन:पूर्वक आभार. परिक्षकांच्या मते ह्या स्पर्धेतले क्रमांक असे आहेत :

प्रथम क्रमांक : सखिप्रिया (sakhipriya) : वरणातला पास्ता
द्वितीय क्रमांक : लाजो (lajo) : ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस

ह्यावर्षी इतर सर्व स्पर्धांचे निकाल हे निनावी मतदानाने काढले गेले आहेत. स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.

कायापालट - द मेक ओव्हर अर्थात विडंबन स्पर्धा
-----------------------------------------
कविता १ : रंग नभाचे
प्रथम क्रमांक : स्लार्टी (slarti) : पाचक हझल
द्वितीय क्रमांक : शरद पाटील (sharadpatil) : फसगत

कविता २ : कविता
प्रथम क्रमांक : कविता नवरे (kavita.navare) : ओझ्याचा बैल
द्वितीय क्रमांक : मृण्मयी (mrinmayee) : कार्टा

कविता ३ : वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग
प्रथम क्रमांक : मृगनयनी (mriganayanee) : वारी चुकलेल्या पुढार्‍याचा अभंग
द्वितीय क्रमांक : कविता नवरे (kavita.navare) : महागाईग्रस्त मध्यमवर्गीयाचा अभंग

पर्यावरण : सकारात्मक आणि नकारात्मक अर्थात फोटोग्राफी स्पर्धा
-------------------------------------------------------
प्रथम क्रमांक : प्रकाश काळेल (prakashkalel) : वार्‍याची बात आणि पराक्रमाची की पापाची प्रतीके!
द्वितीय क्रमांक : चिऊ (chiuu) : इकोफ्रेंडली फोटो अल्बम आणि वॉटरपार्क

कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा
--------------------------------------------
प्रथम क्रमांक : विभागून
सुनिधी (sunidhee) : आरसा
माधवएम (madhavm) : प्रकाशाचे दूत
द्वितीय क्रमांक : अजय जावडे (ajayjawade) : पाऊस एक आशा

चित्रातल्या गोष्टी अर्थात लघूलेखन स्पर्धा
---------------------------------
प्रथम क्रमांक : स्लार्टी (slarti) : दिसते तसे नसते
द्वितीय क्रमांक : आशू_डी (aashu_d) : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है !

आधी घोषित केल्याप्रमाणे लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेतल्या सर्वच प्रवेशिकांना विजेते म्हणून गौरविण्यात येत आहे.

सर्व विजेत्याचे मन:पूर्वक अभिनंदन ! विजेत्यांना त्यांची प्रशस्तीपत्रके इमेल द्वारे येत्या दोन ते तीन दिवसात पाठवली जातील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जय गणेश!

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
सर्व संयोजकांचे, परिक्षकांचे आणि कार्यकर्त्यांचे शतशः आभार!!
सर्व मतदात्यांना आणि पडद्यामागच्या मायबोलीकरांना मनापासुन धन्यवाद!!!

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया!

अय्या, माझ्या 'कार्ट्या'ला चक्क दुसरं बक्षीस? माझ्या विडंबनास वोट देणार्‍यांना धन्यवाद!!

समस्त विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! Happy
'जय हेरंब' सीडीतील गाण्यांचे राग ओळखा स्पर्धेचे विजेते कोण आहेत?

सर्व विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन !!!!!
संयोजन समितीचेही अभिनंदन !!!!
प्रशस्तीपत्राची कल्पना छानच !!!!!!!!!!

गिरीश

धन्यवाद लोकहो! Happy

बो-विश, जय हेरंब स्पर्धेचे विजेते अजून काढले नाहीत.

मायबोलीवर संगीतातले अनेक दर्दी आणि जाणकार आहेत. पण उत्तर अगदी मोजकीच आली आहेत. तर सर्व मायबोलीकरांना एक नम्र विनंती आहे की इतर स्पर्धांप्रमाणेच ह्याही स्पर्धेत भाग घ्यावा. सगळ्या गाण्यांचे राग आणि ताल ओळखता नाही आले तरी चालतील. तसेच ताल आणि राग दोन्हीही ओळखलंच पाहीजे अशीही अट नाही. तेव्हा जे जे ओळखता येत असेल ते आम्हाला sanyojak@maayboli.com येथे इ-मेल करून पाठवा.

धन्यवाद. Happy

Pages