पिंक -- रिफ्लेक्शन

Submitted by सई केसकर on 3 October, 2016 - 06:51

१. तू लग्नानंतर सुद्धा नोकरी/व्यवसाय चालू ठेवणार का?
२. घर सांभाळून काय करायच्या त्या नोकऱ्या करा
३. अगं काहीही काम करत नाही ती घरात. सगळ्या कामांना बायका लावून ठेवल्यात.
४. हल्ली काय पाळणाघरात टाका मुलांना की ह्या मोकळ्या नोकऱ्या करायला.
५. टिकली लाव. मंगळसूत्र घाल. सौभाग्यवती आहेस ना तू? दिसायला नको?
६. असंच असतं. कामावरून उशिरा येते आणि मग नवरा यायच्या आधी फोनवरून जेवण मागवते. पैसा आहे ना हातात!
७. हल्ली तर काय रस्त्यात उभ्या राहून मुलीदेखील सिगारेटी ओढायला लागल्यात. मुलांबरोबर ड्रिंक्स घेतात. निर्लज्ज!
८. आमच्या सुनेला तर काहीही येत नव्हतं. स्वयंपाकघरात जायची वेळच आली नसेल कधी.
९. अहो माझा मुलगा रोज हिला हातात नाश्ता देतो! आणि मग ही जाते ऐटीत ऑफिसला. बिचारा बाई अली नाही तर भांडी पण घासतो.
१०. तुम्ही इतक्या उच्च पदावर पोहोचलात. हे तुम्ही पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळून कसं केलं?
११. तू लग्नानंतर आडनाव बदललं नाहीस?

तुम्ही ओळखलं असेल की हे सगळे प्रश्न किंवा कॉमेंट्स बायकांना विचारले जातात किंवा त्यांच्याबद्दल केल्या जातात. पण आता एक गंमत म्हणून आपण हे सगळे प्रश्न किंवा टिप्पण्या एखाद्या पुरुषाला डोक्यात ठेऊन करू. एखाद्या मुलाला एखाद्या मुलीनी लग्नाआधी जर, "तू लग्नानंतर नोकरी करणार का?' असा प्रश्न विचारला तर तो विनोद ठरेल. नोकरी (आणि पगार) ही मुलाची लग्नाची (आणि कधी कधी हुंड्याची) लायकी ठरवते. तीच जर त्याला सोडावी लागली तर काय उपयोग. एखाद्या सासूनी आपल्या जावयाबद्दल चार चौघात, "याला काहीच स्वयंपाक यायचा नाही लग्नात. सगळं मी शिकवलं", असे उद्गार काढले तर कसं वाटेल? पुरुष घरातून बाहेर पडताना कधी "आपलं लग्न झालय" हे दाखवायला टिकली मंगळसूत्र घालून जातात का? रस्त्यात असंख्य ठिकाणी पुरुष मजेत सिगारेट ओढताना दिसतात. तंबाखू स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक करते का? दोघांनाही ती तितकीच घातक आहे. पण एखाद्या स्त्रीने सिगारेट ओढली की ती तिच्या आरोग्याचा नाही तर चारित्र्याचा निकष बनते. इंद्रा नूयी सारख्या महिलेला हमखास तुम्ही घर सांभाळून हे कसं जमवलं हा प्रश्न विचारला जातो. पण सुंदर पिचाईचं देखील घर कुणीतरी सांभाळत असतं म्हणून तो निर्धास्तपणे गूगलचा सीईओ होतो. पण स्त्रीला मदत करणाऱ्यांची (विशेष करून सासरच्यांची) नावे आणि त्यांच्याप्रती त्या स्त्रीला असलेली अपार कृतज्ञता ही त्या काळ्या शाईत उमटलीच पाहिजे.

आपल्या समाजातील या आणि अशा कितीतरी ढोंगी रूढींना पिंक हा सिनेमा वाचा फोडतो. पिंक खरंतर एका ठराविक विषयाभोवती फिरतो. तो म्हणजे स्त्रीने पुरुषाला कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास दिलेली अनुमती. ती अनुमती तिच्या कपड्यांमधून, तिच्या सवयी बघून, तिचे किती मित्र आहेत आणि ते "तसे" आहेत का हे बघून, तिनी आधी हे (कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर) अनुभवलंय म्हणून, अशा आणि यासारख्या इतर कुठल्याही कारणांनी परस्पर मिळत नाही. आणि स्त्री नाही म्हणत असताना तिच्याशी कुठल्याही मार्गाने (यात मानसिक ताणही आहे) ठेवलेले संबंध हे शोषणच आहे. तसंच तिनी आधी दिलेल्या आणि काही कारणांनी परत घेतलेल्या अनुमतीला डावलून तिच्यावर जबरदस्ती करणे हेदेखील शोषण आहे.

दिल्लीत एका घरात रूममेट्स म्हणून राहणाऱ्या, नोकरी करणाऱ्या मुलींची ही गोष्ट आहे. ओळखीच्या मुलाच्या मित्रांबरोबर रात्री डिनर आणि ड्रिंक्ससाठी त्या जातात आणि त्या रात्री जे घडते त्याचा पोलीस कम्प्लेंट कोर्टकचेरीपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवलाय. अमिताभ बच्चन यांचा अभिनय या चित्रपटाचा कणा आहे. त्यांचे बोलके डोळे, संयमित अभिनय आणि दमदार आवाज यांच्या जोरावर आधीच चांगलं असलेलं कथानक उत्कृष्ट बनून जातं. हा सिनेमा बघताना पुन्हा पुन्हा जाणवतं की अभिनय कंट्रोल केल्यानी त्याचा परिणाम सगळंच व्यक्त केल्यापेक्षा कितीतरी जास्त होतो. पण तो कसा कंट्रोल करायचा हे अमिताभ बच्चनच जाणे! तापसी पन्नू आणि इतर मुली यांचा अभिनयदेखील वाखाणण्याजोगा आहे.

या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की बाहेर आल्यावर त्यावर बराच वेळ विचार केला जातो. आणि विषय जरी बलात्कार किंवा विनयभंगापुरता मर्यादित असला तरी तिथपर्यंत जाण्यात समाजच कारणीभूत आहे हे पुन्हा पुन्हा जाणवतं. सिनेमात तापसी पन्नू पोलिसात कम्प्लेंट करायला जाते तो सीनदेखील सिनेमागृहातील लोकांच्या मानसिकतेचा आरसा बनतो. पोलीस तिला तिनी कम्प्लेंट कशी करू नये आणि त्याचे कसे तिच्यावरच वाईट परिणाम होतील हे समजावू लागतात. आणि तसं करत असताना अतिशय निर्लज्जपणे वेगवेगळी उदाहरणे देऊन (तिच्या मैत्रिणीला "एक्सपीरियन्सड" संबोधून ) तिला तो परावृत्त करताना दाखवला आहे. त्याच्या प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो.

पिता रक्षति कौमार्ये, पती रक्षति यौवने ।
पुत्रो रक्षति वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती ।।

स्त्री आपली आई, बहीण किंवा बायको असेल तर तिची रक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे, या "पारंपरिक" विचारातून स्त्री स्वत:चे रक्षण करू शकत नाही आणि तिचे रक्षण करणारा पुरुष नसेल तर ती आपली मालमत्ता होते इथपर्यंत आपण कधी पोचलो हे विचार करण्याजोगे आहे. याही पुढे जाऊन जी स्त्री स्वतंत्रपणे जगू इच्छिते तिचा द्वेष करण्याची सुद्धा परंपरा आपल्यामध्ये आलेली आहे. आणि या मोठ्या मोठ्या अपराधांना सुरुवात करून देणारे छोटे छोटे किस्से असतात जे लहानपणापासून पुरुष बघत असतात. यातील पहिला संस्कार म्हणजे आपल्या सुनेच्या किंवा बायकोच्या पोटातील जीव पुरुष असावा यासाठी केलेला धार्मिक, शारीरिक आणि तांत्रिक अट्टाहास. आणि दुःखाची गोष्ट अशी की या अट्टाहासात स्त्रियादेखील भाग घेतात. स्त्रियांना मुली (नाती) नको असणे हे आपल्या समाजाचे सगळ्यात मोठे अपयश आहे. आणि मुलींना सबळ केल्याने मुलांवर आलेल्या अवास्तव अपेक्षा कमी कारण्यासदेखील मदत होईल. एखाद्या पुरुषाला घरी बसून आपल्या मुलांची काळजी घेणे जास्त प्रिय असेल तर त्याला ते करायचीही मुभा मिळाली पाहिजे.

हे बदलायचे असेल तर काही सुभाषितांना निवृत्त करून नव्याने सामाजिक घडी बसवली पाहिजे. आणि पिंक सारखे चित्रपट बनतायत आणि आवर्जून बघितले जातायत यातच तिची सुरुवात आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर पाहावा असा चित्रपट आहे.

http://saeechablog.blogspot.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले.
हा सिनेमा बघितला नहीये पण बघेन.
२४ सिजन २ मधिल १ प्रसंग डोक्यातुन जात नहिये..
घटना अशी आहे की...
एक बड्या मोठ्या हॉटेलच्या एसी व्हेन्ट मधे टेरिरिस्ट कडुन एक डेड्ली व्हायरस रिलीज केला जातो. जो हवे मुळे पसरणारा असतो. व्हायरस नवा असतो, त्यावर काहिही उपचार नसतात. आणखि पसरु नये यासाठी हॉटेल सील केले जाते. बर्‍याच वेळाने एक मुलगी एटीयु एजन्ट कडे येते आणि सांगते मी काल 'रात्री' ज्या माणसा बरोबर होते तो गायब आहे. त्याची ओळख विचारताच ती सांगते की, 'मी त्याला ओळखत नाही. मी एकटिच असते, ऑफ़िस कामासाठी मुंबईत आले. आम्ही एका बार मधे भेटलो आणि मी त्याला 'आमंत्रण' दिले आणि आम्ही रात्री एकत्र होतो.'
तो एजन्ट तिच्या कडे फ़क्त बघत असतो तेंव्हा ती म्हणते की मी एकटीच आहे आणि तो हॅन्डसम होता.. नॉट अ बिग डिल.
तिच्या या शांतपणे व आत्मविश्वासाने जे सत्य किंवा जे आहे ते सांगण्याने तो एजन्ट ही लगेच म्हणाला, 'मी तुझ्या चारित्र्या बद्दल काहिही आजमावत आणि विचारत नाहिये तर त्या माणसाची ओळख मिळण्यासाठी विचारतोय. जेणेकरुन त्या इसमास 'वेगळे' काढता येईल.
--------
मला त्या मुलीचे पात्र फ़ारच आवडले. जे आहे ते आहे हा एप्रोच च आवडला. आणि त्यातुन माझे चारित्र्य ठरवु नका हे ही आवडले.

 A  matriculation educated beautiful girl can easily be married off too the rich groom. There is almost negligible to none possibility that highly educated and well paid career woman would marry a handsome hunk who has just completed matriculation.  Is any of the girls in above scenarios are ready to break popular perception. Unless we start changing ourselves first, why society will change its popular perception of ladies. Less educated beautiful girl should marry within her social strata and would be indra nooyi should marry matriculation  educated handsome hunk who is ready to become a house husband. Let the change start from us.

(P.S. - I haven't yet seen the movie. Comment is only on reflection. )

राजसीताई,

आता लग्न होऊन गेलंय.
आता नॉर्म बदलायला मला मुलीच्या लग्नापर्यंत वाट बघायला लागेल.
तरीपण या एका नव्या मुद्द्याला इंग्रजीतून प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद!

सई, लेख चांगला आहे. पण या मुद्द्यांवर माबोवर आधीच खुप दळण दळून झालंय.;) कधी वेळ मिळाल्यास वाचणे.

राजसीताई,
मेजॉरिटी पुरुषांना अशिक्षित, अर्धशिक्षित, सुशिक्षित पण स्वतःपेक्षा कमी शिक्षित पार्टनर चालते म्हणून बायकांनी पण चालवून घ्यायलाच पाहिजे असा तुमचा हट्ट का? मलातरी माझ्यापेक्षा शिक्षणाने, बुद्धीने कमी नवरा अजिबात चालला नसता. नवर्‍याचा पगार माझ्यापेक्षा कमी चालत होता. आणि तो कमीच होता. दोघांमध्ये एकाचा पगार जास्त आणि एकाचा कमी असं आलटूनपालटून सुरुच असतं. त्यात आजकाल काहीही विशेष नाही. माझ्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींकडे (जिथे दोघे वर्किंग आहेत) हे कॉमन आहे.

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येSपि स्युः पापयोनयः |
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेSपि यान्ति परां गतिम् |
. . . . . भारतीय संस्कृती ही स्रियांच्या विरोधात आहे असा गैरसमज नेमका कधी पसरवला गेला ? भारतामधे स्त्रिया ह्या दुर्बल नव्हत्या. गार्गी, मैत्रेयी किंवा सर्व उदारमतवाद्यांची अम्मी शोभेल अशी कुंती किंवा नव-याबरोबर युद्धात सामील होऊन त्याला विजय मिळवून देणारी कैकेयी ह्या सर्व स्त्रिया भारतवर्षातच होऊन गेल्या.
http://supersamir.blogspot.in

कुंती, कैकयी आठवल्या पण त्याच काळातल्या द्रौपदी, सीता ह्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या बळी आठवल्य नाहीत? Lol
आणि प्लीज त्या गार्गी, मैत्र्यी ना सोडा आता. त्यांच्याशिवाय अजून उदाहरणं नाहीयेत का त्या काळातली? Wink

भारतीय संस्कृती ही स्रियांच्या विरोधात आहे असा गैरसमज नेमका कधी पसरवला गेला ? भारतामधे स्त्रिया ह्या दुर्बल नव्हत्या. गार्गी, मैत्रेयी किंवा सर्व उदारमतवाद्यांची अम्मी शोभेल अशी कुंती किंवा नव-याबरोबर युद्धात सामील होऊन त्याला विजय मिळवून देणारी कैकेयी ह्या सर्व स्त्रिया भारतवर्षातच होऊन गेल्या.>>> Uhoh Lol

पुराणातल्या बायका पुराणातच ठेवा. चालू काळात नजर / ज्ञानेंद्रियं उघडी ठेवून आजूबाजूला बघा. निर्भयासारखी अनेक प्रकरणं भारतीय संस्कृतीतच घडली आणि घडतात.

नताशा म्हणते तसं इथे बरंच दळण दळून झालेले मुद्दे आहेत. पण तरीही Happy
इंद्रा नूयीच्या उल्लेखावरून सानिया मिर्झाने राजदीपला सणसणीत सुनावले होते ते आठवले. जियो! Proud

@ पियू
अवश्य! लेखन शेअर करायला परवानगीची काहीच गरज नाही!

पुराणातील काही उदाहरणे आपण घेतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना सूट देतो.

मला जे माहिती आहे आणि मी जे वाचलंय त्या बऱ्याच पौराणिक साहित्यात स्त्रियांचा उल्लेख मनुस्मृतीमध्ये जसा केलाय तसाच होतो. गीतेतही स्त्रियांमुळे वर्णसंकर होईल असे कित्येक ठिकाणी म्हंटले आहे आणि मला ते खटकले आहे. पुराणकाळापासून नुसत्याच भारतीय संस्कृतीने नाही तर इतरही संस्कृतींमध्ये स्त्रीला बंधने घातली आहेत. याचं एक सायकॉलॉजिकल कारण मला असं वाटतं की स्त्रीला मातृत्व उघडपणे मिळतं. पण संततीचा पिता कोण आहे हे फक्त स्त्री (आणि हल्ली पॅटर्निटी टेस्टच) सांगू शकते. पण म्हणून स्त्रीला असं जखडून ठेवण्यापेक्षा तिला विश्वासात घ्यावं!

बोअर होण्याचा प्रश्न नाही. आता इथे ठराविक आयडी (ज्यांना माबोवर पालथे घडे म्हणतात) येऊन थयथयाट सुरु करतील, म्हणून सांगितले. तुम्ही अजून तो मनोरंजक कलाविष्कार बघितला नसल्याने तुम्हाला कल्पना नाही. सुरुवात वर झालीच आहे Wink

लेख आवडला. पिंक बघायचा आहे. पायरेटेड कॉपी हाताशी आहे. पण चांगला पिच्चर आहे असे ऐकून असल्यास थिएटरातच बघणे पसंद करतो. तरी येत्या एखाद दोन आठवड्यात नाहीच संधी मिळाली तर आहे तोच बघेन. पण बघणार हे नक्की.

@ राजसी यांचा ईंग्लिशमध्ये लिहिलेला आणि मी मोठ्या नेटाने वाचलेला मुद्दाही तसा पटणेबल आहे. पण हे तेव्हा लागू होईल जेव्हा स्त्रियांना पुरुषप्रधान संस्कृती उलथून स्त्रीप्रधान संस्कृती आणायची असेल. पण त्यांची (स्त्रियांची) इच्छा तशी नक्कीच नसावी. त्यामुळे नताशा यांनी मांडलेला `बरोबरीचा' मुद्दा पटतो. फक्त त्यांनी म्हटल्याप्रमाणे बरोबरी शिक्षणाची वा बुद्धीचीच न करता ईतर कुठल्याही कलागुणांना वा अगदी स्वभावालाही ठराविक वेटेज देत होऊ शकते.

आमच्या नात्यात तुर्तास आम्ही दोघांनी एकमेकांना बिनधास्त घालूनपाडून बोलायचे समसमान अधिकार दिले आहेत. लग्नानंतरही हे असेच कायम राहतील हा विश्वास आहे Happy

सई, अतिशय आवडलाय लेख..माझ्या आवडत्या दहात आहे Happy
माबोकर नसणार्‍या मित्रमंडळी पर्यन्त तुझा लेख तुझ्या नावासकट पोहचवणारे Happy

There is almost negligible to none possibility that highly educated and well paid career woman would marry a handsome hunk who has just completed matriculation. >> Let me check with Mrs. Anjali Sachin Tendulkar and get back to you.

>>>आमच्या नात्यात तुर्तास आम्ही दोघांनी एकमेकांना बिनधास्त घालूनपाडून बोलायचे समसमान अधिकार दिले आहेत. लग्नानंतरही हे असेच कायम राहतील हा विश्वास आहे

अरे वा! कदाचित लग्नानंतर तुझे घालून पाडून बोलण्याचे अधिकार थोडे कमी होतील.

@राजसी

शिक्षण असो वा नसो, मला स्वतःला असं वाटतं की उद्या जर माझ्या नवऱ्यानी घरी राहायचा निर्णय घेतला तर त्याला मी बिलकुल विरोध करणार नाही.
आणि घरी बसणारा नवरा आणि काम करणारी बायको या टोकाला जायच्या आधी घरातल्या कामाच्या जबाबदाऱ्या समान वाटून घेणे ही पायरी येते.

Let me check with Mrs. Anjali Sachin Tendulkar and get back to you.>>>conveniently ignoring mention of such a husband ready to become / becoming house husband, are we? Happy who left the career for marriage? Even matriculation passed husband is good enough to prevent a medical doctor's career. ( if she is still practising doctor then definitely a very good example and way to go change is here)

शिक्षण असो वा नसो>>>> I don't think so. Emancipation of women was needed because she wasn't educated earlier. Now let us say we are financially emancipated, just because we are educated. But are we socially emancipated? Moreover, I feel ladies or gentleman no one is really socially emancipated, maybe try and pick winning battle at individual level. If each lady pick a winning battle at individual level then maybe one fine day we all will be winners when no one was looking. Since winner writes the history, we can choose if we want to write history of equality
Or ladies dominance Happy

ladies dominance >>Please read the crime file of UP state and give a thought to women from all over the world who are not as privileged as you madam. there is a large percentage of ladies who are still assaulted and verbally abused, not to mention sexual crimes against them even by family members, the pressure to deliver a male child. The intense amount of house work, field work and ill health, lack of nutrition. Even girls and female cancer patients are not provided healthcare because usko marne de. attitude. YEZDI girls forced to act as sex slaves, The college students feeling insecure in American Campuses, Women who were forced to abort second children in china before policy take down, girls raped by fathers in Guatemala, the stifling lives of Japanese housewives, Mistresses of chinese business men, school girls kidnapped by Boko Haram, women killed by their boyfriends for simply wanting to opt out of the relationship, acid attack victims, they are all many facets of women being exploited in one way or the other.

Before espousing half baked Ideas on Ladies Dominance please do some reading up and data correct. All over the world safety and security of women of any age is a serious issue. and NO means NO is a very valid answer which the men folk should get right in their brains.

A woman must exercise her emotional and financial freedoms and have the last word in exercising her reproductive rights.

Even the Queen feels a bit assaulted by the absurd use of her language. Wink

Pages