वेज मेकरोनी

Submitted by कामीनी on 1 October, 2016 - 01:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बारिक चीरलेला
२ टोमॅटो बारिक चीरलेला
१ वाटी मेकरोनी
१ भोपळी मिरची बारिक चीरलेला
१/२ गाजर बारिक चीरलेला
१ हिरवी मिरची बारिक चीरलेला
१ छोटा चमचा आले पेस्ट
टोमॅटो सॉस - ४ टि. चमचे
चाट मसाला १ छोटा चमचा
लाल तिखट १/४ चमचा
2 चमचे तेल
कोथींबीर बारिक चीरलेली
मीठ चविनुसार

क्रमवार पाककृती: 

१. मेकरोनी गरम पाणी मधे थोडे तेल, मीठ टाकुन १५ मिनीट शीजवुन घ्यावी.
२. शीजवुन झाल्यावर पाणी काढुन टाकुन थंड करावी.
३. कढई मधे थोडे तेल गरम करुन त्यात आले पेस्ट, हिरवी मिरची टाकुन परतुन घ्यावे.
४. नंतर चीरलेली भोपळी मिरची, गाजर टाकुन परतुन घ्यावे.
५. नंतर चीरलेला कोबी आणी टोमॅटो टाकुन परतुन घ्यावे.
६. चविनुसार मीठ , टोमॅटो सॉस, चाट मसाला , लाल तिखट टाकुन निट परतुन घ्यावी.
७. आता यामधे शीजवलेली मेकरोनी टाकुन मिक्स करा. १ मिनिट परतुन घ्यावी.
८. गॅस बंद करुन बारिक चीरलेली कोथींबीर टाकुन सजवावे.

टिप : हि रेसीपी मी निशा मधुलीका यांची वाचुन ट्राय केली. छान लागते चविला.

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारिक चीरलेला>>> कॉपी पेस्ट केलंय वाट्तं. Happy

नी बरेचदा अशी मॅकरोनी करते. मला आवडते. फक्त आलं आनी टो सॉ नाही घालत.

यम्मी दिसतंय. ह्यात चिकन टाकलं तर? असं विचारावे वाटले पण शीर्षक बघून राहूदे. मस्त. भूक लागली पाहून.

भोपळी मिरची, गाजर, हिरवी मिरची पुल्लिंगी आणि कोथिंबीर तेवढी स्त्रीलिंगी.
सगळे र्‍हस्वाचे दीर्घ आणि दीर्घचे र्‍हस्व करायला कुठे शिकलात?