भारतात व्हेगन जीवन पद्धती कशी सुरू करावी?

Submitted by अश्विनीमामी on 28 September, 2016 - 05:14

मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.

सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?

अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.

युट्यूब वर व्हेगन रेसीपीज चे बरेच व्हिडीओ आहेत.

खालील लिंका उपयुक्त आहेत.

http://www.nhs.uk/Livewell/Vegetarianhealth/Pages/Vegandiets.aspx

http://www.vrg.org/nutshell/vegan.htm

http://www.maayboli.com/node/13623
https://www.vegalyfe.com

http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...

https://m.facebook.com/Vegan-72085494764/

https://m.facebook.com/therealgreencafe/

http://www.forksoverknives.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या diet मुले sugar/BP and some other parameters सर्वसाधरण पातळीला आलेले काही रुग्न माहीते आहेत.
पण मग नक्की कस्समुळे झाले हे सांगत येत नही.कारण हे लोक बाकी lifestyle खुप आरोग्यपुर्ण follow करतात.
त्यांच्याशी बोलल्यावर मला खालील गोष्ती लकशात आल्या.

vegan diet follow करणे अश्क्य नाही, पण अवघड आहे.तुम्ही घरअसल्साल तर सहज करु शकाल,working असाल तर हाताशी चांगला माणुस पाहिजे.
मधुमेह असेल तर हे लोक मिलेट्सवाले diet follow करतात. गव्हाचा वापर शक्यतो टाळतात.
जे कही धन्य भाज्या आणतात ते सेंद्रिय असते.

calcium deficiency कशी बहरुन काढणार ह्यावर मला तरी समाधानकरक उत्तर मिलाले नाही.
गायी म्हशी चारा खाउनच दुध देतात न असे एक fanatic vegan follower चे उत्तर होते

टण्या, रेसिपी साईटवरच्या सगळ्याच रेसिप्या करतात का लोक?

झाडु आपले इन जनरल माहिती देतायत व्हेगान डाएटबद्दल.
मी पण त्याखालीच दुसरी पद्धत सांगितली चुना खायची.

त्यांना आवडेल ती त्या फॉलो करतील.

Happy

fanatic vegan follower ही अत्यंत इरिटेटींग लोक असतात. पार्टीत अगदी वात आणतात.

साखर, अंजीर, बीयर हे व्हेगन नाही.

तंबाखू वनस्पती उत्पाद असले तरी कॅल्शियम खायला तंबाखू का खावा?
>> मी निकोटिन अ‍ॅडिक्षनचे म्हणजे तंबाखू च्या व्यसनाचे दुष्परिणाम फार जवळून पाहिले आहेत. तंबाखू कोणत्याही फॉर्म मध्ये वाइट आहे ह्याचा फार परिणामकारक डाटा उपलब्ध आहे.

कोणत्या वनस्पती खायच्या हे स्वातंत्र्य आहे. मला मीठा पान फार आवड्ते पण ते जसे हैद्राबाद कडे बनवतात किंवा मघई पान तसे मुंबईत फार क्वचित मिळते. इथले पानवाले काय काय विकतात कोण जाणे. भ्याच वाट्ते.

हैद्राबादेस ब्ल्यू डायमंड हाटेल समोर व ओहरीज चे चार पाच हॉटेलं आहेत बशीर बाग येथे तिथे पायथ्यात एक पान पॅलेस म्हणून दुकान आहे. तिथे जगात भारी मीठा पान व इतर पाने मिळतात. आणि अहो अजून क्याल्शिअम साठी पान खावे इतकी म्हातारी नाही झाले मी. शौकसे खाते हैं. एक घरके लिये बांधके दो
म्हणून घेउन पण जाते आणि आटोतच खाते. Happy

मीठा पान म्हणजे तंबाकू नसलेले. गुलकंद आणि इतर १२-१५ चीजे असतात ते.

साखर, अंजीर, बीयर हे व्हेगन नाही.
>> अंजीर च्या आत फ्लाय असते ना. त्याचे परागी भवन फ्लायच करते. पेरू, आंबा केळी, चिकू सफरचंद, पपई कलिंगडाचे काय स्टेटस? मी देसी वेगन आहे आणि पार्ट्या करत नाही हो.

बीअर व साखर का नाही?

कॅल्शियम डेफिशीयन्सी व्हायला म्हातारी व्हायची गरज नाही.
ती कुठल्याही वयात होऊ शकते.

अमा, तुम्ही व्हेगन झाल्यावर कॅल्शियमसाठी काय खाणार?
(सप्लिमेंटस सोडून)

साखरेत हाडांचा चुरा टाकतात (पांढरी शुभ्र व्हायला) असे ऐकले आहे! Happy
बा़की फॅनटीक व्हिगन व्हायची काही गरज नाही.आपण सायलेंटली आपली जीवनशैली फॉलो करु शकतो . हे खरे आहे की अमेरिकेत खूपच व्हिगन ऑप्शन्स असतात. पण इथेही आपल्याला खरे तर ही कंसेप्ट काही नवी नाही. जैन लोक ऑलमोस्ट पाळतातच. आणि पोळी - भाजी,डाळ भात वगैरे कुठेही सहजी मिळते जे की अमेरिकेत शक्य नाही. मात्र वर म्हटल्या प्रमाणे हे उच्चभ्रू वर्गापुरतं सिमीत आहे सध्यातरी.

तुम्ही व्हेगन झाल्यावर कॅल्शियमसाठी काय खाणार?
>> भेंडी, ताहिनी पेस्ट, बदाम/ केल व इतर पालेभाज्या. / शिजवलेली ब्रोकोलि. तोफू शोधावे लागेल तोपरेन्त हेच.
१२०० मि ग्राम पर डे कॅल्शिअम ची गरज आहे.

पण इथेही आपल्याला खरे तर ही कंसेप्ट काही नवी नाही. जैन लोक ऑलमोस्ट पाळतातच.>> अरे तेच तर मी म्हणते आहे. देसी व्हेगन खूप सोपे आहे. फॅनेटिक बनायची गरज नाही आहे. पतंजलीत बरेच ऑप्शन्स मिळतील. जसे व्हेज टूथ पेस्ट. आणि सुती कपडे खडावा आपण फार पूर्वी पासून घालतो.
टण्या: फार लहान पणी पाटीवर लिहायची पेणसील कधी कधी तुकडा खाउन बघत असू त्याची आठवण झाली. भारतात कॅल्शिअम डेफिशिअन्सी असलेल्या प्रेगनंट बायका भिंतीवरचा चुना चाटून खातात किंवा माती खातात असे पण ऐकले आहे.

माझी एक मैत्रीण व्हेगन आहे. ती एकटीच व्हेगन असल्याने कंपनी किटी पार्टीमध्ये केवळ तिच्यासाठी वेगळा मेनू ठरवावा लागायचा. इंडियन मेनूमध्ये दूध दही नसलेले बरंच काही अव्हेलेबल असते पण तूप बटरमध्ये बनवलेले असले तर चालणार नाही. शिवाय तिला रीफाईन्ड तेलदेखील चालत नाही. पनीर नाही. चीज नाही. एकंदरीत सर्वच वैताग प्रकार व्हायचा. तिला वस्तू गिफ्ट करतानाही ती व्हेगन आहे की नाही ते तपासावे लागायचे. एकदा तिच्या वादिला बॉसच्या बायक्कोने सिल्क स्कार्फ आणला. त्यावरून बरीच तणातणी झाली असे ऐकून आहे. हळूहळू ती आमच्या सोशल सर्किटमधूनच वेगळी पडत गेली. हल्ली तिला फारसं कुणी बोलावत नाही आणि बोलावलं तर वेगळं काही बनवण्यापेक्षा सरळ पाकिटातले ओट्स वगैरे करून देतात.

मी पाटी पेन्सिल अ‍ॅडिक्ट होते.(साधारण ५ वर्षे)
वेगवेगळ्या दुकानांतून खरेदी करायचे कारण मला लोकांना हे जाणवू द्यायचे नव्हते की मी पेन्सिल खाते.रोज १ पूर्ण पेन्सिल.आता ते दिवस आठवले की ड्रग अ‍ॅडिक्ट च्या वागण्याची आठवण येते मासिकांत वाचलेल्या.
पेन्सिल ची सवय मोडायला कॅल्शियम च्या गोळ्या पण खायचे मधून मधून.पण त्यांना औषध वाला वास असायचा तो आवडायचा नाही.
हेमोग्लोबिन ६ झाले होते २००७ मध्ये.याच्यामुळे असेल किंवा एकंदर आहार निगलेक्ट मुळे.
प्रेग्नन्सी मध्ये नियमीत आयर्न कॅल्शियम फॉलिक अ‍ॅसिड गोळ्या घ्यायला लागल्यावर ही सवय सुटली.(अजूनही दगडी पेन्सिल चा तुकडा पाहिला की तोंडात टाकायला हात शिवशिवतातच.)

मुंबईत चणे फुटाणे विक्रेत्यांकडे कसलेसे दगड मिळतात. युपी बिहारकडल्या गरोदर बायका ते दगड खातात. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता भरून निघते असे म्हणतात.

ज्यांना अशी जीवनशैली स्वीकारायची आहे त्यांना शुभेछा, पण......
मुळात हे फॅड आहे याच्याशी १ लाख वेळा सहमत.
आता याही पुढची पायरी म्हणजे वनस्पतींना तरी कशाला दुखवा ? फक्त पाणी व खनिजे खावून जगावे ! असे आयुष्य खूप कमी असणार. तेही बरेच की. तेवढाच पृथ्वीचा भार कमी !!

सातीला प्रचंड अनुमोदन.

माझी एक व्हेज मैत्रीण तात्पुरती विगन झाली होती. तात्पुरती अशासाठी की लवकरच तिच्या लक्षात आलं की हे प्रकरण सस्टेनेबल नाहीये.

मुळात आपल्याला आयुष्यात नक्की काय हवंय हे एकदा ठरवा. आयुष्य 'आता पुढच्या खाण्याची काय तजवीज करू?' या प्रश्नाभोवती रचायचं असेल तर ठीक आहे. पण आपला तो पिंड आहे का हे ही एकदा तपासून पाहिलं पाहिजे.

हार्ड वेअर वाल्यांकडे मुलतानी मिट्टी/केओलीन क्ले चे दगड मिळतात, तेही खातात.आता या सगळ्यातून पोटात किती प्रकारचे बॅक्टेरिया गेले याची कल्पना न करणेच योग्य.एका आफ्रिकन देशात खाण्यासाठी माती विकत मिळते.

तंबाखू-चुनावाला चुना अशासाठी सांगितला, की तो खाण्याचा चुना असतो. रंगाचा चुना खायचा प्रयत्न केला तर उगंच तोंड-अन्ननलिका भाजेल, जिवावर बेतेल.

मी तंबाखू खा असं अजिबात लिहिलं नाहिये, तर ती अ‍ॅडिक्शन घडवते, म्हणून न खाता पान खा. पानाला काथ-चुना लावलेला असतो, असं म्हटलं होतं.
*
बीयर (दह्याप्रमाणे) फर्मेंटेशनने बनते, व इतर दारूसारखी डिस्टिल केलेली नसते, तस्मात प्राणिज घटके असतात. म्हणून व्हेगन नाही.
साखर = बोन अ‍ॅश मुळे.
अंजीर उंबरासारखाच किडेबाज प्रकार.
*
>>
आता याही पुढची पायरी म्हणजे वनस्पतींना तरी कशाला दुखवा ? फक्त पाणी व खनिजे खावून जगावे ! असे आयुष्य खूप कमी असणार. तेही बरेच की. तेवढाच पृथ्वीचा भार कमी !!
<<
प्रकाशसंश्लेषण कसे करणार? हिरवट म्हातार्‍यांनी करायची डायेट होईल ती. हिरव्या रंगामुळे चालेल बहुतेक. Wink

मला जपानमधे वेगन जेवणात पोर्क आणि बीफ चे पदार्थही सातत्याने मिळाले होते Proud ते मी अर्थातच बाजूला काढून इतर खाल्लं. उकडलेल्या भाज्या आणि भात. मीठसुद्धा नाही (का कोण जाणे). त्यामुळे देशादेशानुसार वेगनची व्याख्या बदलत असावी असा मी माझ्यापुरता तरी समज करून घेतला आहे.

मुंबईत चणे फुटाणे विक्रेत्यांकडे कसलेसे दगड मिळतात. > पुण्यातही मंडई च्या जवळ खायची माती (!) / की दगड असे काहीतरी मिळते .

प्राण्यांना अपाय होवु नये म्हणुन जपता......
वनस्पतींना अपाय होवु नये म्हणुन केव्हा जपणार ???????????????????????????

एक प्रश्न आहे...इथे अयोग्य असल्यास उडवेन.

व्हेगन लोक धार्मिक कार्याच्या वेळी काय करतात?
जवळपास सगळ्याच पुजा आणि धार्मिक कार्यात आपण दुध, दही, मध, पंचामृत वापरतोच ना...

जवळपास सगळ्याच पुजा आणि धार्मिक कार्यात आपण दुध, दही, मध, पंचामृत वापरतोच ना...>>पंचामृत स्नानाऐवजी साधे कोमट पाणी वापरायचे.

वेगन लोक सत्यनारायणाचे पंचामृत तीर्थ पण नाही घेणार?
प्रसाद भक्षण न करिता कलावती गेली....

राहुल,
श्रद्धा असेल तर साधे पाणी तीर्थ म्हणून चालेल ना! तसेही प्रसाद म्हणून फळही देता येते.
अमा, तुम्हाला शुभेच्छा! लाईफस्टाईल म्हणून करणार असाल तर मोती, कोरल्स वगैरे, हस्तीदंत वापरुन बनवले वगैरेही चालणार नाही.
अमेरीकेत बरेचजण विगन जीवनपद्धती अंगिकारतात. त्याच्या मागचे कारण फॅड नसून डेअरी आणि पोल्ट्री/मीट इंडस्ट्री ज्या पद्धतीने चालते ते आहे. इथे हॅपी काऊची टिवीवर जाहिरात केली जाते त्यावरुन काय ते समजावे.
जनावरांना क्रुर पद्धतीने वागवले जाते त्याचा निषेध म्हणून बरेच जण हे करतात. पण असे करताना दूध, दही, चीज, मांस या भोवती फिरणारी आधीची आहारशैली असते . मग बदाम दूध, विगन चीज, विगन मीट वगैरे पर्याय शोधायचा हट्ट देखील पहायला मिळतो.

अवांतर- मी विगन नाही.

Pages