मायबोली मास्टरशेफ - बाईमाणूस - मलई बदाम मटका विथ लेमन झटका

Submitted by बाईमाणूस on 15 September, 2016 - 22:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. चॉकलेट बिस्किटे - ४-५
२.दाम - ८-१०
३.टर/लोणी - १ टे स्पून

१. शहाळ्यातील लई -२ कप
२.साखर- ५-६ टे स्पून
३.कॉर्न स्टार्च/ कस्टर्ड पावडर -२ टे स्पून
मलई

१.लिंबाचा रस - १-२ टे स्पून
२.कॉर्न स्टार्च -१ टे स्पून
३.टर/लोणी - १ टे स्पून
४.पाणी - १/२ कप
5.लिंबाच्या सालीचा बारीक कीस - १ टे स्पून

सजावटीसाठी - लिंबाची फोड,पुदिना

क्रमवार पाककृती: 

बदाम - बिस्कीटे थर:
१. मिक्सर मध्ये बदाम आणि बिस्किटे ह्यांची भरड करून घ्यावी.
२. त्यात १ चमचा वितळलेले बटर मिसळा. मिश्रण थोडे ओलसर झाले पाहिजे.
३. ह्या मिश्रणाचे ४ समान भाग करा म्हणजे थर लावताना कमी -जास्त होणार नाही.
४. आवडीच्या सर्विंग बोल मध्ये तळाला पहिली मिश्रणाचा थर लावा.
५. आता हे बोल फ्रीज मध्ये सेट करायला ठेवा.
बदाम बिस्कीटे थर

मलई पुडिंग
१. १ १/२ कप मलईमध्ये थोडे पाणी एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्या.
२.उरलेल्या १/२ कप मलईचे बारीक काप करून घ्या.
३. गँसवर एका पँनमध्ये वरील मलईचे मिश्रण कमी आचेवर गरम करायला ठेवा.
४. त्यात साखर टाकून मिश्रण ढवळा.
५. कॉर्नस्टार्च २-३ चमचे पाण्यात नीट एकत्र करा. ते आता गँसवरील मिश्रणात टाकून सारखे मिश्रण ढवळा जेणेकरुन गाठी होणार नाहीत.
६.मिश्रण दह्याइतपत घट्ट्सर झाले की गँस बंद करा व गार करण्यास बाजूला ठेवा.
७. आता ह्यात १/२ कप मलईचे तुकडे हलक्या हाताने एकत्र करा.
मलई पुडिंग

लेमन सॉस
१. अर्धा कप पाण्यात कॉर्नस्टार्च मिसळून घ्या.
२. गँसवर पँनमध्ये बटर वितळायला ठेवा.
३.लिंबाचा किस त्यात एकत्र करा.
४.बटर वितळले की त्यात वर मिसळलेले पाणी टाका.
५.२-३ मिनिटांत मिश्रण थोडेसे घट्ट होऊ लागेल. त्यात लिंबाचा रस मिसळा.

१. आता फ्रिजमधल्या बोल मध्ये सावकाश मलई पुडिंग ओता.
२. बोल पुन्हा फ्रीजमध्ये १५-२० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा.
३. त्यावर बिस्किटे-बदामाच्या मिश्रणाचा थर द्या. बोल पुन्हा फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवा.
४. पुन्हा बोल मध्ये सावकाश पुडिंग ओता आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
५. सगळ्यात वर आता लेमन सॉसचा थर द्या.
६.सजावटीसाठी लिंबाची फोड /पुदिन्याचे पान खोचा.
मलई बदाम मटका विथ लेमन झटका तयार...

मलई बदाम मटका विथ लेमन झटका

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१.थोडे मलईचे तुकडे आणि बदामाचे तुकडे खातांना मस्त लागतात.
२.मलईचे मिश्रण जास्त आचेवर गरम केल्यास त्यातील फँट आणि पाणी वेगळेवेगळे होईल.
३. अमेरिकेतील मायबोलीकरांनो चूकूनही शहाळे आणून ते घरी फोडण्याचे कष्ट घेऊ नका ( नाहीतर घेतलेल्या शहाळात मलई न निघाल्यास परत दुकानात फेरा घालावा लागेल - स्वानुभव)आशियाई दुकानातून फ़्रोजन किंवा कँन मधले आणा.

माहितीचा स्रोत: 
बंगाली मैत्रिणी + p f changs मध्ये मिळणारे मूस + आंतरजाल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतंय हे! लेमनवालं लेयर्ड डेझर्ट अजून कोणी स्पर्धेत टाकलं कसं नाही हा विचार आलाच होता डोक्यात तेव्हढ्यात ही रेसिपी आलीच!

भारी दिसतय, एक्दम प्रोफेशनल रेसिपी आणी फोटो प्रे़झेनटेशन, (लेअर्ड कॅन्डल सारख प्रेझेनटेशन आवडल)

भारी दिसतायत. मला पण मेणबत्या वाटल्या पटकन. Proud
मलई आपण शहाळ्यात खातो तशी लुसलुशीत कॅन्ड मिळते? ब्रांड फोटो प्लीज.

धन्यवाद मंडळी!

मैत्रेयी, सिंडरेला - खटपट एवढी नाहीयं गं .. एकंदरीत मलई मिक्सरमधून काढ्ल्यावर नारळ दूधाचे टेक्सचर आलेले , मलईच्या जागी नारळ दूध घेतले तरी चालेल असे वाटतयं.
आणि एक-एकच थर करायच असेल तर पहिला थर फ़्रीजात ठेवला असताना पुडिंग बनवायचे. पुडिंग सेट असताना लेमन सॉस बनवायचा Happy

>>लेमन झटक्यात अजिबात साखर नाहीये ना ?

धनि, लेमन सॉसमध्ये अजिबात साखर नाही म्हणूनच जेव्हा तो खातो तेव्हा एक झटका बसतो त्यावरूनच हे नाव सुचले.

मेणबत्या Proud Proud

मलई आपण शहाळ्यात खातो तशी लुसलुशीत कॅन्ड मिळते?
मी फ़्रोझन वापरली. अगदी पातळ - लुसलुशीत नव्हती थोडी जाडसर कडे झुकणारी होती.
वर फोटो टाकला. कँन्ड शुगर सिरप वाले होते म्हणून हे घेतले.

Pages