मायबोली मास्टरशेफ - घोषणा

Submitted by संयोजक on 2 September, 2016 - 04:19

masterchef.jpg

आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!

या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड!!! म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.

चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.

स्पर्धेचे नियम -

१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.
२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.
४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.
९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.
१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.
११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.
___________________________________________________________________________

या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
खास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या Happy

'तिखट' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60250

'गोड' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60251

मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थिंकिंग अलाऊड
माठ बटाटा लसूण पराठा
मुळा बीट लवंग गोड वड्या
(हे पदार्थ बनवणार्‍याचं देव भलं करो आणि खाणार्‍ञाला सद्गती देवो)

Rupali Akole,

प्रशासक लवकरच तुमची रेसिपी लॅण्डिंग पेजवर टाकतील. सध्या ती नवीन लेखनात दिसते आहेच.

अजून अनंत चतुर्दशीपर्यंत स्पर्धा सुरू आहे. ती संपल्यानंतर मतदानाचे धागे उघडले जातील. तेही नवीन लेखनात दिसतील. Happy

मास्टरशेफांनी बर्‍याच छान-छान प्रवेशिका दिल्यात. तर तिखट आणि गोड किंवा अशी काही वर्गवारी करून एकाहून अधिक मत देण्याची सोय करणार का?

Please allow us to vote for our top 3 or top 4 recipes..even top 5 will do! This time the contestants have all done really well..

प्रवेशिका देताना 'नवीन लेखनाचा धागा' हाच प्रकार निवडायचा आहे का? मला 'नवीन पाककृती; हा पर्याय दिसला नाही. तसंच `मायबोली गणेशोत्सव २०१६' सोबत 'पाककृती आणि आहारशास्त्र;' हा गृप निवडता आला नाही.

गेले काही तास तांत्रिक कारणामुळे वेबसाईट अपडेट होऊ शकली नाही. आता अपडेशनचे काम सुरु आहे.

यावेळी मतदान किमान तीन पाककृतींना तरी करता आले पाहिजे प्लीज खुपच सुंदर पाककृती आहेत यावेळी.

रुपाली, काहीही प्रॉब्लेम नाही. आपले admin US मध्ये आहेत, त्यांच्या वेळेनुसार ते धागे अपडेट करतील. कृपया थोडा धीर धरा.

रुपाली ! तुम्ही नविन असल्याने तुमची उत्सुकता समजु शकते पण उत्सव जस्ट सन्पलाय, अ‍ॅडमिन लवकरच त्याविषयी रितसर घोषणा करतील.

Pages