प्रसाद - केशर बदाम पेढे / मोदक

Submitted by लाजो on 7 August, 2013 - 09:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आजपासुन श्रावण सुरू... म्हणजे एकामागे एक सणासुदींचे दिवस....म्हणजेच गोडधोड-प्रसाद यांची रेलचेल....

श्रावणाची सुरूवात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पेढ्यांपासुन Happy

लागणारे जिन्नसः

२ कप मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली क्रिम *
१ टीन कंडेन्स्ड मिल्क (३९५ ग्रॅम च टीन मिळतो इथे),
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.

क्रमवार पाककृती: 

हे पेढे / मोदक करायला अगदी सोप्पे पण चवीला एकदम झक्कास Happy

१. एका मायक्रोवेव्ह सेफ बोल मधे मिल्क पावडर आणि बदाम पावडर मिक्स करा.
२. यात आता कंडेन्स्ड मिल्क घाला आणि मिश्रण सारखे करा.
३. या मिश्रणात थिकन्ड क्रिम आणि आवडीनुसार वेलची/केशर इ इ घालुन नीट ढवळा. अजिबात गुठळ्या रहाता कामा नयेत.
४. मिश्रण हाय पॉवर वर मावे मधे २ मिनीटे गरम करा. बाहेर काढुन एकदा सारखे करा आणि परत मावे मधे २ मिनीटे ठेवा.
५. अश्या प्रकारे साधारण ८ मिनीटे मिश्रण मावे मधे गरम करा. आता बाहेर काढुन कन्सिस्टंसी चेक करा. आणि परत १-१-१ मिनीटाच्या अंतराने मावेमधे गरम करा.
६. साधारण १०-११ मिनीटात मिश्रण एकत्र यायला लागले की बाहेर काढा.
७. हाताला (आणि साचा वापरणार असाल तर साच्याला) तूप लावा आणि आपल्या आवडीनुसार पेढे वळा. वरती हवे असल्यास पिस्ता/बदाम काप इ इ ने सजवा.

प्लेन मोदकः

आंबा पेढे:

पिस्ता पेढे:

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात मध्यम आकाराचे ३० एक पेढे सहज होतात
अधिक टिपा: 

१. मावेमधे लागणारा वेळ हा घेतलेले प्रमाण/घटक आणि तुमच्या मावेची पॉवर यावर अवलंबुन आहे. माझ्या ११००W च्या मावेमधे वरील घटक आणि प्रमाणासाठी १०-११ मिनीटे लागतात.
२. मिश्रण जास्त वेळ मावे मधे गरम करु नये... कोरडे पडेल.
३. मिश्रण कोरडे वाटलेच तर थोडे तूप लावुन मळून घ्या.
४. यात बदामा ऐवजी काजू/पिस्ता पावडर घालु शकता. मी केलेल्या पिस्ता पेढ्यांमधे ५०-५० बदाम-पिस्ता पावडर आहे.
५. आंबा पेढा/मोदक बनवायचे असल्यास आंब्याचा रस न घालता आंब्याचा मावा/आटवलेला रस घाला.
६. डेकोरेशन करताना मोल्डच्या तळाला काप घालुन त्यावर पेढ्याचे मिश्रण दाबुन भरा आणि मग मोल्ड किंचित टॅप करुन पेढा बाहेर काढा.
*७. थिकन्ड क्रिम, साधे फ्रेश क्रिम किंवा साय फेटुन वापरता येइल पण प्रमाण अंदाजाने कमी/जास्त करावे लागेल.
८. मिल्क पावडर लो फॅट/ फुल्ल फॅट कुठलिही चालेल. मी फुल्ल फॅट वापरली आहे.
९. हे पेढे मावे नसल्यास गॅसवर पण करता येतिल.
१०. ट्रे ला तूपाचा हात लावुन त्यात थापुन याचे काप करून बर्फी पण बनवता येते.

हे पेढे फ्रिजमधे ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.

पुढच्यावेळेस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढेन Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या बाप्पा साठी लाजो कृपेने झक्कास नैवेद्य झाला. धन्यवाद लाजो ईतक्या सोप्या रेसिपी साठी.
modak.jpg

प्राडीचे मोदक आणि चंचलचे पेढे... अप्रतिम दिसतायत... बाप्पा खुष झाला असणार Happy

शूम्पे, तुझे पेढे/मोदक कुठ्येत?

वॉव!!!!

फोटो बघूनच तृप्त झालो. रेसिपी वगैरे बघायच्या भानगडीत पडलोच नाही.
लाजो, या वेळेस येताना माझ्याकरता हे पेढे आणि मोदक करून आणायचे.. बास्स. Lol

.

Pages