काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवचा चॉईस भंगार आहे. मीतू आणि राधिका दोघीही छान आहेत त्या सोडून हा त्या मुर्ख गवरीच्या प्रेमात आहे.

त्या गौरीमुळे आता शिवचा पण कंटाळा यायला लागलाय, मी परवा एक शॉट बघितला. ती रडत बहुतेक गच्चीवर जाते, मागे हा जातो फार बोअर झालं मला ते.

मोजो आत्ता सर्किट वाटत आहेत..
एकदम शेजारी जाउन धमक्या नी काय..
वर शिवचे बाबुजी नीट बोलत होते तर एकदम खडुस बोलत होते..

म्हणजे विरोध दर्शवायची पद्धत चुकीची वाटली..धमकी टाईप..

जर बाबुजी आता मित्र झाले होते तर जरा नीट बोलायच ना.

काल एक प्रोमो बघितला गणपती वर्गणीचा. शिवची अम्मा १००० रु द्यायला सांगते तर मोजो सांगतात जास्त आहेत, ५१ देतात सर्व. ह्यांना काय गरज त्यांच्यात पडायची, आणि स्वतःहून बोलायची.

अम्माचं माहितेय ना कसं असतं ते त्यांना, मग काहीतरी बोलली उलटून.

आणि ती हम्मा पण आमची ऐपत आहे वगैरे बोलते त्यांना. भारी होईल जुगलबंदी आता हम्मा वर्सेस बाबा Lol

प्रेमात फक्त शिवच असल्यासारखा प्रयत्न करणार आणि थंडाक्का फक्त बाबा, त्यांची निवड ती तिची आवड करत नर्मदेच्या गोट्याच्या गळ्यात हार घालणार.

काल मोजो फारच कुत्सितपणे बोलत होते शिवच्या बाबुजींशी. किती ते समजाऊन/ पटवुन सांगायचा प्रयत्न करत होते. अश्या माणसांमुळे बाहेर गेल्यावर आपली गोची होते भाषेच्या बाबतीत Wink

मोजो पहिल्या भागापासुनच डोक्यात गेले आहेत. परप्रांतियांना नाव ठेवणार्‍या मोजोंना कोणी विकीची आठवण का करुन देत नाही?? किमान स्वत:च्या सुनेची तरी

काल मितूने गौरीला चान्गल झापल. "जेव्हा मनाला वाटेल तेव्हा शिववर प्रेम कराव. मन भरल कि म्हणायच की माझ शिववर प्रेमच नाही. म्हणजे प्रत्येक वेळी तुझीच मनमानी." अगदी करेक्ट बोलली ती. काल शिवला सुद्दा कळून चुकल की गौरीचे आपल्यावर कधीच प्रेम नव्हते. आता त्याला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार. पुन्हा त्याला गौरीला आपल्या प्रेमात पाडाव लागणार. त्याने शपथ नाही का घेतली तशी की,"मी तुझ्या बाबान्ची निवड आणि "तुझी आवड" बनेन." त्यापेक्षा त्याने मितु/ राधिकाशी लग्न करावे.निदान त्या स्वतःशी प्रामाणिक तरी आहेत.

ज्या मितूला सुरुवातीला "बालिश, बावळट" म्हणून प्रेझेन्ट केल होत, ती उलट matured आणि जबाबदार मुलगी निघाली गौरीपेक्षा.

मी ही शिरेल बघायची सोडली. लईच कटाळा येतो. गौरीचा थंड चेहरा आणि शिवचं सारखं तिच्या मागे जाणं, पसरणीचे नाटकी हावभाव आणि नक्राश्रु,

जर गौरीला माहित असतं तिच्या बाबांच परप्रांतियांबद्दलच मत, ते कधीही तिच परप्रांतियाशी असलेलं प्रेमप्रकरण सहन / मान्य करु शकणार नाहीत, एखाद्यावर कितीही प्रेम असलं तरीही आपण कधीच आपल्या बाबांच्या मनाविरुद्ध लग्न करु शकणार नाही, मग तिने शिवला होकार द्यायलाच नको होता.
नाहीतर सरळ सांगायच की शिवला, तिच्याशी लग्न करण्यासाठी बाबांकडे मागणी घाल, ते हो म्हणाले तर करुया लग्न.

बाबांकडून होकार मिळवायची जबाबदारी गौरीने शिवच्या गळातच टाकलेली. पण मग त्यांचं बीपी, बिघडू शकेल अशी तब्बेत आडवे आले. मग हम्मा आली. .
बाबांचं आपल्यावरचं प्रेम आणि शिवबद्दलचं चांगलं मत, त्याने केलेली मदत यांचं पारडं त्यांच्या परंप्रातीयांप्रतीच्या द्वेषापेक्षा जड ठरेल असं तिला वाटलं असेल.
आताही त्यांना शिवगौरी लफड्यापेक्षा, घरात हे सगळ्यांना माहीत आहे आणि आपल्यापासूनच लपवून ठेवलं याचाच जास्त राग होता.
एवढं सगळं महाभारत होऊन त्यांचं बीपी इलुसंसुद्धा वाढलं नाही की पडलं नाही. असला कसला हा रक्तदाब?

मला एक भयंकर मुर्खासारखा प्रश्न पडलाय, कुणी उत्तर देईल का? त्यातुन कुणी फेसबुकावर असतील तर माझा प्रश्न वा आपली ही मायबोलीची लिंक तिथे देण्याची कृपा करा.

सावंतांनी, विकीने त्यांना पुरते लुबाडल्यावर पोलिसांकडे चोरी वा विकी सापडला या विषयी काहीच पाठपुरावा केला नाही का?:अओ: त्यांची वचावचा बोलणारी सून, तिचा बायल्या नवरा यांनी पण पोलिसांना काहीच विचारले नाही का? ( सगळ्यांना शिवची काळजी आहे, पण मला सावंतांच्या पैसे व दागिन्यांची काळजी आहे.:फिदी:)

माझ्या एका नातेवाईकांकडे चोरी झाली होती. त्या वेळेस त्यांना जेव्हा चार आण्या एवढा पुरावा सापडला तर त्याच्या धाग्यावरुन ते मध्य प्रदेशात जाऊन ( पोलिसांना बरोबर घेऊन, त्यांचा खर्चा पाणी करुन ) चोराला मुद्देमाला सकट घेऊन आले होते. इथे हे तिघे वचवचे काहीच हालचाल का करत नाहीत?

रश्मी, ती काळजी तुला कायम वाहायला लागेल, जानुच्या शिरेलीत बाबांच्या पायाची काळजी कशी शेवटपर्यंत वाहायला लागली, शेवटी सिरीयलचं वाहीली. तसंच इथे असेल, उत्तर वगैरे मिळवायचा लॉजिकल विचार करु नकोस Wink .

मालिकांमध्ये जन्म, मरण, आजारपण, बरं होणं. इ.इ. ला काहीही काळवेळ लागू होत नाही. जसं डायरेक्टरला वाटते तसे पात्र आजारी पडतात किंवा बरे होतात. Lol Lol Lol

रश्मी, ती काळजी तुला कायम वाहायला लागेल, जानुच्या शिरेलीत बाबांच्या पायाची काळजी कशी शेवटपर्यंत वाहायला लागली, शेवटी सिरीयलचं वाहीली. तसंच इथे असेल, उत्तर वगैरे मिळवायचा लॉजिकल विचार करु नकोस>> Rofl

मी तर प आ मु मधल्या ऊर्मी ला मिस करते. किती ठाम असायची स्वतः शी आणि किती व्यवस्थित समोरच्याला पटवून द्यायची स्वतःच म्हणण..तिच्याही लग्नाला वडलांचा विरोध होताच की!

आज ग व री चं गाणं ऐकलं का??? आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी गत झालीये. ना सुर ना ताल . गायना पेक्षा नाकावरची माशी कशी हलेल याकडे ससिरीयल वाल्यांनी लक्ष द्यायला हवंय

पआमु क्वचित बघितलीय पण उर्मीचा अभिनय उत्तम होता, दिसायचीपण छान. झीच्या फेसबुकवर एकीने लिहीलं होतं मागे कादिपच्या डायरेक्टरला की गौरीला जरा अभिनय शिकवा, ती उर्मी किती छान करते.

पआमु क्वचित बघितलीय पण उर्मीचा अभिनय उत्तम होता, दिसायचीपण छान.>>येस्स.. ऊर्मीच पात्र खरच खुप छान लिहील आणि प्रेझेंट केल गेल होत!

काल सगळं कसं नॉर्मल झाल, बाबांनी गौरीला घास खाऊ घातला, गौरीने कारल्याच्या भाजीचे कौतुक केल, पसरणीने नेहमीप्रमाणे नाक मुरडल, शिव उदासिन राहिला आणि वेणूने जेवणं टेबलावर आणुन ठेवलन Wink

उर्मी बोलायची ना किती छान !>> म्हणून ती सिरियल लवकर संपली. Happy

समस्त शिरेलीतल्या शपथग्रहण आणि शपथदान विधीवर बंदी घातली तरी बहुतेक शिरेली वेळेवर संपतील.

बाबांनी माफ केल्याने गौरीला कडू कार्लं आवडायला लागलं.
शिवच्या हम्माने शिवचा रडका चेहरा पाहून गौरीलाही स्वीकारायला तयार असल्याचं बोलून दाखवलं. अर्थात तिकडून ऑफर मागे घेतल्यावर ती अ‍ॅक्सेप्ट करण्यातली तिची हुशारी बाबूजींच्या शिकवणीतून आलीय.

आता चार सहा भाग, इतर नवरे मुलगे बघायचे, ते जातीतले नवरे मुलगे अस्सूनही दिवटे असायचे मग मधूसूदनाला उपरती असे असतील.

काय ते घर! सावंत अतिशय विक्षिप्त माणूस, सतत त्याला घाबरून असलेली बायको, वेडपट मुलगा, सून तर अगदीच अवतार, आणि काय ते गौरीला घास भरवणं! प्रेमाचा दुरून सुद्धा संबंध वाटत नाही. निर्विकार गौरी कायम भेदरलेली, आणि कस्ली लाडकी लेक. वडील-लेकीचं अपेक्षित मायेचं घट्ट नातं कधी दिसलच नाही.

वडील-लेकीचं अपेक्षित मायेचं घट्ट नातं कधी दिसलच नाही.
>> खरे आहे त्यामानाने उर्मी व तिच्या बाबांचे आईचे नाते खूप छान दाखवले होते.

Pages