स्टँड अप कॉमेडी

Submitted by विहम on 29 August, 2016 - 07:33

२००५ मध्ये चालू झालेल्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या रिऍलिटी शो ने स्टॅन्ड अप कॉमेडी ला प्रतिष्ठा मिळवून दिली त्या शो मधले सगळे कोमेडिअन रातोरात स्टार झाले. सुनील पाल, राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी, नवीन प्रभाकर, भगवंत मान यांची नावे प्रत्येकाच्या ओठी आली.
शाळा कॉलेज संपेपर्यंत एक दोन चार ठरलेले पोलिटीशियन, बॉलीवूड स्टार यांची मिमिक्री, चित्रपटातून असणारे विनोदी पात्र, लाईव्ह परफॉर्मन्स/तमाशात दोन गाण्यांच्या मध्ये लोकांना हसवायला जोक सांगणारे इतकीच काय ती मला कॉमेडीअनची ओळख होती.

स्टॅन्ड अप कॉमेडीला सध्या फॉर्म मध्ये आहे. भारतातून बरेच स्टॅन्ड अप कॉमेडीअन वर येत आहेत. पॉलिटीक्स, बॉलिवूड या सारखे नेहमीची सॉफ्ट टार्गेट सोडून कित्येक सामाजिक विषयांना पण कॉमेडिअन समोर आणत आहेत. विनोदाच्या माध्यमातून लोकांना हसवत हसवत विचार करायला लावत आहेत.

नमनाला घडाभर तेल झालंय. आता मूळ विषय Happy तुमचे आवडते स्टॅन्ड अप (देसी/विदेसी) कॉमेडीअन्स कोण? कोणाचे शो आवर्जून पाहता ? कोण कोणते लाईव्ह पाहिलेत?
हे सर्व आणि लेटेस्ट पाहिलेला आवडलेला कॉमेडी/स्टॅन्ड अप परफॉर्मन्स
सर्वांशी शेअर करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पाहिलेले स्टॅन्ड अप कोमेडिअन्स आणि यु ट्यूब चॅनेल्स

देसी:-

AIB, EIC, SNG, Evam entertainment, Kenny Sebastian, Zakir khan, Sanjaycomedy, Abijit ganguly, Appurv Gupta, Amit tandon, Daniel Fernandese

परदेसी :-

Gabriel iglesias, Peters Russell, Dave Chapelle, Kevin Hart, Ellen Degeneres

स्वप्निल जोशी ईन कॉमेडी सर्कस !

कॉमेडीमध्ये अभिनय देखील कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण !!!

कॉमेडीमध्ये अभिनय देखील कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण !!! >> पण अभिनयात कायम्ची ट्रॅजेडी होवून बसली आहे त्याचं काय Lol

परदेशींमध्ये जेफ डन्हॅम सारखे वेंट्रीलोक्विस्ट पण सॉलिड फेमस आहेत.

भारतातून टीव्ही वर येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सध्या दर्जेदार कॉमेडी परफॉर्मन्स येत नाहीत.

त्यातल्या त्यात कपिल शर्माचा शो बराच प्रसिद्ध आहे.

जेफ डन्हॅम च्या काही क्लिप्स पहिल्या आज शोधून. काही पोलिटिकल जोक्स संदर्भ न समजल्यामुळे कळले नाही. पण जे कळले ते जोक्स बरे वाटले. Happy