काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सावंतांचा (इतका) त्रागा पटला नाही. म्हणजे त्याचे आकांडतांडव बघून साबा सुद्धा विचारायला लागल्या कि गौरीला दिवस वगैरे गेले आहेत का शिव पासून? Uhoh

खूप दिवसांनी काल रात्री १२ ला मुद्दामून बघितला भाग, मला पटला तो त्रागा कारण त्यांना काहीच अंदाज नसतो आणि समोर अचानक सर्व होतं आणि वरून लोकं काहीना काही बरळतात वरून घरी बाकीच्या सगळ्यांना अंदाज असतो त्यामुळे एका बाबांच्या दृष्टीकोनातून मला त्याचं कालचे वागणे खटकलं नाही. सर्व एकदम समोर आल्याने माणूस हडबडून जात असणार. तेव्हा विचारशक्ती काम करत नसेल. नंतर हळूहळू ते विचार करतील.

मला ही पटलं .त्यांच हताश होणं.. >>+१ त्यांना शिव-गौरीच्या नात्यापेक्षा, ते आपल्याला घरातल्यानी विश्वासात घेऊन न सांगता बाहेरुन कळल याच दु:ख जास्त झाल्याच दिसत होत.

नंतर हळूहळू ते विचार करतील. >> +११

काल निशाची रडण्याची नाटके जाम डोक्यात गेली माझ्या. अरे घरात चाललय काय आणि हिच काय चाललय?
अशी दाखवत होती कि मोजोची काळजी हिलाच आहे.

ह्या मालिकेचा दिग्दर्शक ह्याचे कल्पनादारिद्र आधीही दिसले होते ते पावसाने पूर आलेल्या भागात.
अगदी तसेच कल्पनादारीद्र बांगड्याच्या भागात दिसले.

आणि नेहमीप्रमाणेच गौरी, माशी न हलवता... आई... प..प्प... तुझ्या बां... इतकच बोलली. बरं, सारखं सारखं ते बाबांना नका सांगू पण लग्न मात्र शिवशीच करणार... मग कधी ते सांगणार होते बाबांना? आणि पत्नी म्हणून बायकोचा काहीच रोल नाही की स्पष्ट बोलणं नाही नवर्‍याशी सुद्धा नात्यात? आणि कारण काय तर त्यांना उच्चदाब आहे. मग कधी ना कधी माहित होणारच ना.... हे कळत नाही त्या बाईला जर मुलगी एकत नाही हे दिसतय तर..... अगदी कहर की सुनेला बांगड्या देणम....
मुळात त्या निशाचे भांडे का नाही फोडले गौरीने की निशाने सुद्धा पैसे खाल्ले. लावालावी करते. तो नचिकेत पण बायकोच्या नाटकांना ओळखत नाही. पण असतात असे महाभाग.

दहीहंडी भाग सुद्धा कळस होता. ते गौरीचे मध्येच आनंदाने नाचणे, उडी मारणे आणि ओरडणे हंडी फुटल्यावर इतकं भयानक वाटले की मलाच मध्येच दचकायला झाले की हिला काय झालं... इतकं खोटं वाटतो अभिनय.. अरेरे...

आणि खाली पळत येवून, किती ते फिल्मी, तुला काय झालं तर माझं काय होणार वगैरे? ते हि चेहर्‍याची माशी न हलवता.

निशाची ओवरॅ अ‍ॅक्टींग ... कोणालाच कळत नाही की सुनेला प्रेम नाही तर वचपा काढतेय?
शेवटी काय तो मधुसुदन कर्मठ आहे ना.....

>>>>म्हणजे त्याचे आकांडतांडव बघून साबा सुद्धा विचारायला लागल्या कि गौरीला दिवस वगैरे गेले आहेत का शिव पासून? अ ओ, आता काय करायचं
नशीब त्याच्यात खुलता कळी खुलेना चं प्रमोशन नाही केलं ते..:फिदी:

मोजोंचा अभिनय बेस्ट ! संवाद किती उस्फूर्त पणे म्हणत होते...पाठ केले आहेत असं वाटतच नव्हतं!!
आणि असतात असे लोक..बरेच असतात.
ग व री !! खरंच माठ अभिनय करते..शाळकरी मुलीसारखा..!! नाटकातून पहिल्यांदाच काम केल्या सारखा कोरा चेहेरा ठेवून वावरते! ग्लिसरीनचे अश्रू अगदी ओळखू येतात. कारण डोळ्यात काही दु:ख दिसत नाही!

कुणी दिला हिला लीड रोल?

मोजोंचा अभिनय बेस्ट ! संवाद किती उस्फूर्त पणे म्हणत होते...पाठ केले आहेत असं वाटतच नव्हतं!!>>> सहमत.

पण काल मोजो सतत त्या चौबेचा अपमान करतात हे मात्र पटले नाही. बिचार्या त्या चौबेची काय चूक ह्या सगळ्यात?

माझ्या सा बा इतकी तन्मयतेने ही सिरीयल बघतात ना.....परवा मोजो पाठमोरे जिना चढतांना दाखविले...तर म्हणे दोन दिवसांत किती तब्येत खालवली यांची...एकदम बारीक दिसताहेत.!! Uhoh
Happy

सावंत लैच चिडुन राहिले..

कालचा भाग अ आणि अ सदरात मोडणारा..

शिवला हाताला धरुन हाकललं अक्षरशः
एकदम येवढ काय झाल..आणि एकमेकांच्या आई बाबांकडुन येवढ घालुन पाडुन बोलण ऐकल्यावर कोणाला इच्च्छा राहिलं लग्न करायची?

शिवची तर गोष्ट च वेगळी त्याने तर गौरी कडुनही असं बोलण ऐकल आहे.. :फिदीफिदी:

सगळेच जरा हार्श बोलतात इथे..आस्थिन का साप, नोकरानी, जादुगरनी, काय नी काय.....

अ आणि अ झाली आहे ही मालिका.
कोणत्याही मुलीचे वडिल असं काही कळाल्यावर ,पहिले तिच्या लग्नाच बघतील..ईथे तर बाबा त्यांच्या च दु:खात बुडालेले आहेत..!

आपल्या मुलीचं प्रकरण आहे यापेक्षा घरच्या सगळ्यांना ते माहीत आहे आणि आपल्यापासून लपवलं याने ते जास्त दुखावले गेलेत. सो त्यांचं वागणं बरोबर आहे.
निशाचं नाटकी वागणं आता सहन करायच्या पलीकडे जातंय. वर तिची री ओढायला नचीबाळ आहे. काल एकदाचं सरूबाईंनी आणि गौरीने तोंड उघडलं.
आजीबाईं इतक्यात येत नाहीत म्हणून त्यांची हाडं मोडून ठेवली. त्या असत्या तर त्यांनी निशाची हाडं मोडली असती.

कालचं गौरी जा जा म्हणून सांगत असतानाही शिवचं मागे लागणं पण इरिटेट झालं. गर्लफ्रेंडची शुद्धी करून घेणार्‍या आईसमोर काही चालत नाही, तो कसा काय त्यांना लग्नासाठी तयार करणार?

गौरी जाम डोक्यात जाते! प्रेम निभावण्याची हिंमत नव्हती अंगात तर कशाला त्या शिवला नादाला लावायच? वडलांची संकुचित विचारसरणी माहीत नव्हती का आधी? शिवची निवड तिने का केली, तो माणूस किंवा जोडीदार म्हणून कसा चांगलाय याबद्दल काहीच बोलत नाही. वडलांच मत बदलण्याचा प्रयत्न पण करत नाही. रडुबाई कुठली! मला फार राग येतो अशा लोकांचा..

नादाला लावलं म्हणजे काय? सुरुवातीला तर तिने शिवला त्या तिच्या मैत्रिणीला देऊन टाकलेलं ना?

आणि शिवला तरी जमतंय का आपल्या आईचं मत बद्लायला? निदान हिने आता निवड तरी केलीय. शिव आणि बाबांमध्ये बाबांची.

नादाला लावल म्हणजे हिंडली फिरली त्याच्याबरोबर..गौरी शिवची नवरी म्हणुन होकार दिला त्याला. आणि शिव अम्माच मन बदलण्याचा प्रयत्न तरी करतोय निदान..हिच्यासारखे लगेच हातपाय नाही गालले लगेच.

.हिच्यासारखे लगेच हातपाय नाही गालले लगेच. अगदी..
घरी कळाल तर लगेच म्हणे..मला विसरुन जा. बाबाचं मत वळवायच नव्ह्तं तर कशाला गेलेली खाली सगळ्यांसमोर?

Pages