काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिरीयल बनानेका है तुम्हे शौssssssक

काहे लेतो हो प्रेक्षकोंका रोsssssष...

गवरी गं गवरी, शिवची तू नवरी
अ‍ॅक्टिंगची का आली तुला सुरसुरी

निशाssss हा हा आहा धिंग की नाकधीन की नाकधीन, धिंग की नाकधीन

जानेजा नाम है तेरा थंडाक्का हो ओ ओ, जाने जां

बनी तू मोजोकी गवरी, शिव माने तुझे तो नवरी
नचीकी प्यारी है बहेना, पर अ‍ॅक्टिंग तुझे रास आयेना
करेगी अब क्या आगे ये बता.. ता ....ता... धिंग की नाकधीन्

प्रेक्षकहो रागवु नका. गौराक्काच्या अभिनयाने ज्या रागवल्यात त्यांनी कृपया थंड घ्या. लिम्का, सरबत, ज्युस, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, पेप्सी, लाही, कोल्ड कॉफी काहीही घ्या...

काल गवरीने शिवला ब्रेसलेट परत दिल्यावर शिवने बरेच डायलॉग्स मारले. (मेरा कुछ सामान ह्या नितांत सुंदर गाण्याची आठवण आली. आणि गवरीला बघुन हे गाणे आठवले म्हणून स्वतःचा Angry आला)

शिव तिला बरेच वेळा "आप इतनी अच्छी" असे काही म्हणाला. गवरी एवढं अच्छी कधी वागली Uhoh

ते डायलॉग मारायला जरा खर्जातला नाहीतर बॅरिटोनी आवाज हवा होता. मागच्या कविता वाचनासारखेच ते डायलॉग फ्लॅट वाटले.

हो ना......ही कधी इतकं चांगलं वागली त्याच्याशी..? काहीही! आप जरुरत से ज्यादा अच्छी न होती तो अच्छा होता..... ! Happy
ब्रेसलेट देतांनाही तीच ती थंड नजर..!! अयाई गं! बिच्चारा शिव!
ही हॉरर सिनेमातली भावना शून्य (नुसतीच दिसायला चांगली असलेली ) भूतनी छान शोभेल!
रश्मी...गाणे मस्त! गाता येतेय त्या चालीवर...!!

तडप तडप के इस दिल से आह निकलती रही
मुझको सजा दी प्यारकी ऐसा क्या गुनाह किया
के लुट गये, हा लुट गये, लुट गये हम तेरी मुहोबत में
>>>
हे गाणं फक्त काल ऐकण्यासारखं होत कालच्या एपिसोडात Wink

हम्मा, काल डॉयलॉग मस्त फेकत होती पण, जरी इमोशनल अत्याचार असले तरी

बाकी ती अम्मा, दरवेळी गौरीला जादुगरनी गौरी म्हणते तेंव्हा मला तिला गदागदा हलवुन विचारावस वाटत की काय जादू केली त्या थंडाक्काने ते आम्हाला पण सांग की जरा Rofl

गौरी फार बोअर कधी येवढ छान वागली देवाला माहिती
शिव फार बिचारा वाटला .. लै पिरमाने बघतो पन काय उपेग

इतका तमाशा होऊन काल शिव ची आम्मा त्याला नाश्त्याची प्लेट पुढे करते तो प्रसंग पाहून मी गडबडा लोळले हासू न Rofl

अरे चाल्लंय काय आणि तुम्हाला खायचं पडलंय ? कालपर्यंत ही बाई तोंडात पाणी घेत नव्हती... आज अचानक असं काय झालं? गवरी ने शिव से नही मिलुंगीची शपथ खाल्ली म्हणून? आणि ह्या हम्मा ला खरं वाटलं ते? Uhoh

एरंडेल घेतल्यासारखा चेहरा केला की दु:ख दाखवता येते असा गवरीचा समज दिसतो अभिनयाच्या बाबतीत.>> खरच. भेदरल्यासारखा. Proud

गवरी हिंजवडी चौकातल्या दहीहंडीत प्रमुख आकर्षण म्हणुन येणार आहे.. ह्या फ्लेक्सवर पण तिचा पडीक चेहर्याचा फोटो Proud

कदाचित गौरी, शूटिंगला जाताना रोज हिंजवडी चौकातून जात असावी, म्हणून तिचा चेहरा हा असा सदैव पडेल आणि विझलेला असतो ............. Happy

>>>बाकी ती अम्मा, दरवेळी गौरीला जादुगरनी गौरी म्हणते तेंव्हा मला तिला गदागदा हलवुन विचारावस वाटत की काय जादू केली त्या थंडाक्काने ते आम्हाला पण सांग की जरा
म्हणुनच तर ती तीला जादूगरनी म्हणते खरी युपी वाली बाई तिला चुडेल म्हणाली असती Lol

कळ्ळ का मोजोला एकदाच, किती तो आटापिटा त्याला न समजू द्यायचा.
आता निशा बांगड्या परत करेल का?
शिवची हम्मा शिवला तिथुन तरातरा ओढुन नेइल का?
शिवचे बाबुजी निर्मला सुनो तो, असच म्हणत राहतील का?
गौरीची आई गौरीला जाब विचारेल का?
नचिदादा, गौरी का मोडलास मला दिलेला शब्द अस म्ह्यणुन गौरीशी अबोला धरेल का?
..
.
.
.
.
.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी आज बघा काहे दिया परदेस

खरेच, गौरीला नाचतांना बघून विचित्र वाटलं..........
तिला अजिबात आनंद व्यक्त करता येत नाही, दु:खही नाही! अगदी निर्विकल्प आहे!!

काल दहीहंडी आणि शिवचं खाली पडणं हे सगळं जरा फास्ट (पटकथेच्या दृष्टीने) दाखवायला हवं होतं. म्हणजे गौरीच्या वडिलांना बसलेला धक्का प्रेक्षकांनाही पटला असता. कालचा स्पीड असा होता - "ओ बाबा... इकडे बघत रहा... मी आता पळत येणार... इकडे बघा हं, बाबा... मी शिवबद्दल काळजी व्यक्त करणार... आम्ही दोघं काहीतरी बोलणार... इकडेच बघा... मग लोकं कुजबुजणार... तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघायचं.... मग माझ्यावर ओरडायचं" Uhoh

...आणि शिव पडल्याचं पाहिल्यावर गौरी धावत सुटते, दाराचा पडदा, रॉड सगळं पाडते, जिन्यावरून खाली धावत जाते... कुठेच चेहर्‍यावर सैरभैर झाल्याचे, घाबरल्याचे, काळजीचे भाव नाहीत Lol

पण बेसिकली, टायटल-साँगलाच `बाबुल का घर मैं छोड के चली ओलांऽऽऽडून वेस' या ओळीच्या वेळी ती धावत पायर्‍या चढत जाते तेव्हाचा तिचा चेहरा कुणी पाहिलायत का लक्षपूर्वक? तिथेच मुळात तिचं थंडाक्कापण जाणवतं. Biggrin

काही अपरीहार्य कारणामुळे आम्ही गवर्‍या बदलुन त्या जागी राधीकाला घेत आहोत असे चालत नाही का. थोडे Out of the way शिव-राधीका हे काँबो कसले भारी आहे. आधीचे १०० घडे माफ करु आम्ही दिग्दर्शकाचे. Proud

पूर्वी एमटीव्हीवर वर्षभरातल्या टुकार नायक नायिकांना 'हॉल ऑफ शेम' पुरस्कार देत होते. काही वर्षांपूर्वी पाहिल्याचे आठवते, सध्याचे माहित नाही. या वर्षी तो खास पुरस्कार थंडाक्काला द्यायला झी मराठीला सांगितला पाहिजे. इतका निर्जीव चेहरा शोधून सापडणार नाही. प्रोमोमध्ये सुध्दा अगदी भयाण दिसते ती!

काल दहीहंडीचे थर अगदी खरेखुरे लावलेले. कॅमेरा वापरून चीटिंग नाही केली. वेणू खरंच शिवला खांदा द्यायला उभा असलेला दिसला. मग हंडी फोडण्यापासूनचे एडिटेड असावेत.

काही अपरीहार्य कारणामुळे आम्ही गवर्‍या बदलुन त्या जागी राधीकाला घेत आहोत असे चालत नाही का. थोडे Out of the way शिव-राधीका हे काँबो कसले भारी आहे. आधीचे १०० घडे माफ करु आम्ही दिग्दर्शकाचे. ...

आम्ही पण, तसे झाले तर आम्ही पण ही सिरियल परत बघायला चालु करु. गेल्या आठवड्यापासुन ही सिरियल ( in fact झी वरिल सगळ्याच नविन सिरियलस ) बघायच्या सोडुन देउन जुळुन येति रेशिम गाठी आणि एका लग्नचा दोन गोष्टी बघायला चालु केल्या आहेत. त्या वेळी झी तेव्ही नसलयाने ह्या मालिका बघितल्या न्हवत्या.

Pages