हॉकी (रिओ ऑलिंपिक्स)

Submitted by Adm on 7 August, 2016 - 16:22

रिओ ऑलिंपिक्स मधल्या पुरूष आणि महिलांच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी.. ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आपल्या या संघाचा खेळ व संघाची देहबोली खूपच आश्वासक आहे. भारताला हॉकीच्या सुवर्णयुगाकडे परत नेणार्‍या मार्गातला 'ऑलिंपिक २०१६' हा महत्वाचा मैलाचा दगड ठरो, ही प्रार्थना !

मम म्हणतो !

भारत वि.हॉलंड, मध्यंतर -स्कोअर ०-० ! सो फार, सो गुड !!
भारताची बचाफळी मजबूत. अजून दोन्ही संघ एकमेकाचा अंदाजच घेत असावेत. आतां आक्रमक खेळ सुरूं होईल, असं वाटतंय .

शेवटच्या सेकंदात ४वेळां कॉर्नर मिळूनही भारत बरोबरी नाही करूं शकला ! बॅड लक !!
व्हाट अ मॅच !! भारत १- नेदर. २ !
दुसर्‍या क्वार्टरच्या शेवटीं भारताचे दोन खेळाडू पिवळ्या कार्डाचे दर्शन घेवून कांहीं वेळ बाहेर गेले . त्यामुळे भारताने बचावात्मक पवित्रा घेतला . त्यातून सांवरून आक्रमण करायला त्याना वेळ लागला. तिथेंच डचानी वर्चस्व मिळवलं. पण हरूनही भारताने आत्मविश्वास कमावला असेल ह्या सामन्यातून.

बॅड लक ऑर नॉट एबल टू कन्वर्ट पेनल्टी कॉर्नर्स Sad

असो अजूनही उपौपांत्य फेरीत जायची संधी आहे. पण तिथे सामना आता दुसर्‍या गटातल्या पहिल्या किंवा दुसर्‍या संघाशी होईल

<< बॅड लक ऑर नॉट एबल टू कन्वर्ट पेनल्टी कॉर्नर्स >> एक कॉर्नर अडवताना तीन जादा कॉर्नर देणं हा हॉलंडचा गलथानपणाही म्हणतां येईलच कीं !

युरोपियन संघ ताकदीचे आहेत. जर्मनी आणि हाॅलंडविरूध्द आपण कुठे कमी पडलो याचा विचार केला पाहिजे. यावेळी संघाकडून पदकाची अपेक्षा आहे.

<< हि achilles' heels आजची नाहि आहे >> पण ह्या संघाचा 'कन्वर्जन रेट' इतका वाईट नक्कीच नाहीय, हें आधीच्या सामन्यांवरून सिद्ध होतय.. 'बॅड लक' म्हणणंच अधिक उचित .

गर्ल्स हॉकी नाही बघत आहे का कुणी ? युएस वि भारत !! वाईट हालत ३-० . चक दे ची आठवण आली मला- वाईट अर्थाने. भारतीय मुली आपापल्या खेळतायत. एकमेकीत काहीच समन्वय दिसत नाहीये. प्रत्येक जण आपल्या स्टेट ला रिप्रेझेन्ट करायला हजेरी लावतेय असे वाटतेय Sad

<< वाईट हालत ३-० ...एकमेकीत काहीच समन्वय दिसत नाहीये..>> स्पर्धेच्या सुरवातीला इतका चांगला जोष व समन्वय दाखवून ब्रिटनविरुद्ध हरल्यावर खेळात असा ढिसाळपणा येणं, याचं वाईट वाटतं.

महिलांचे ऑस्ट्रेलियानी मानसिक खच्चीकरण केलं. ६ - १ अशी मात दिल्यावर होणारच होतं, पण परत उसळी घ्यायला पाहिजे होती... शेवटच्या मॅच मधे अर्जेंटिना विरुद्ध काय दिवे लावतात ते बघायचं आता.. जिंकल्या तरच क्वॉर्टर फायनलला जातील.

भारत वि. कॅनडा नध्यंतर - ०-० !!
वास्तविक फॉर्म बघतां मध्यंतरापर्यंत आपले दोन तरी गोल होणं अपेक्षित होतं.
कोमेंटेटर परत परत सांगतोय भारत क्वार्टर्समधे पोचलाय आणि आता ग्रुपमधून तिसर्‍या क्रमांकावर येण्यासाठी जिद्दीने खेळतोय .

भारत २, कॅनडा -२ !
भारताकडून एक अप्रतिम फिल्ड गोल हीच जमेची बाजू. आणि अर्थात, कॅनडाची तोडीस तोड खेळी .

कॅनडा आतापर्यंतच्या ४ सामन्यांत हरला होता.त्यांच्यावर विजय अपेक्षित होता.
ज्यांना ऑलिंपिकमध्येअनेक वर्षांनी हरवले त्या अर्जेंटिनाचा संघ आता आपल्या पूलमध्ये तिसरा. भारत चौथा.
आता उपान्त्यपूर्व फेरीत दुसर्‍या पूलमधल्या टॉपवर आलेल्या बेल्जियमशी गाठ.तिथे ऑस्ट्रेलिया तिसरा आलाय.

या पुरूष हॉकी संघाचीं मला जाणवलेलीं खास वैशिष्ठें -
शेवटच्या क्षणापर्यंत न थकतां वेगवान खेळ;
पासिंगसाठी अजिबात वेळ न दवडणे;
नेमके 'लाँग पास' व त्यांचं अचूक ट्रॅपींग [ कालचा फिल्ड गोल हे बोलकं उदाहरण ] ;
जबरी गोली व बचाव फळी व
दोन्ही, डाव्या व उजव्या, बगलेवरून वेगवान आक्रमण करायची क्षमता.
फक्त 'कॉर्नर कन्व्हर्जन' व मध्य भागातून आक्रमण यांत सुधारणा गरजेची असावी.
खूप वर्षानी भारतीय संघ ऑलिंपिकमधे असं अभिमानास्पद व सुंदर हॉकी खेळतोय. त्याची परिणती घवघवीत यशात होवो, ही वाजवी प्रार्थना !

बेल्जियम ३- भारत १ ! Sad
आजचा बेल्जियमचा खेळ नि:संशय भारतापेक्षां खूपच सरस होता . ८०% वेळ चेंडूचा ताबा त्यानी स्वतःकडे ठेवला व सतत आक्रमण केलं. गोली श्रीजेशमुळे आपण इतक्या कमी फरकाने हरलो ,असंच म्हणावं लागेल. भारत आज इतक्या बचावात्मकच कां खेळत राहिला हें कोडंच आहे. आजचं हरणं खूपच निराशाजनक !!!

सेमी- फायनल -
अर्जेंटीना ५, जर्मनी १ ! अनपेक्षित, अचंब्यात टाकणारा निकाल ! भारत सेमीत आला नाहीं , याचं दु:ख अधिकच तीव्रतेने जाणवलं आज !!
अर्जेंटीना,अभिनं दन व शुभेच्छा.

आपण ग्रुप स्टेजमध्ये अर्जेन्टिनाला बरोबरीत ठेवले पण अर्जेन्टिनाचा खेळ आपल्यापेक्षा सरस होता. त्यांचा अ‍ॅटॅक सातत्याने होत होता विशेषतः शेवटच्या १५ मिनिटात

<< पण अर्जेन्टिनाचा खेळ आपल्यापेक्षा सरस होता >> मीं अर्जेंटीनाला अजिबात कमी लेखत नाहीय. पण एखादे दिवशीं एखाद्या संघाचा खेळ भलतीच उंचीही गाठूं शकतो, याचं आजची मॅच हें बोलकं उदाहरण आहे. भारताचा हा संघही निश्चितपणे सेमी-फायनल गाठण्याच्या लायकीचा होता व अर्जेंटीनाच्या आजच्या खेळासारखा 'इन्स्पायर्ड' खेळ खेळण्याच्याही. हें जाणवलं व वाईट वाटलं इतकंच .

हॉकीची जर्मनी विरुद्ध न्यूझीलंडची मॅच अतर्क्य, अनाकलनीय, अशक्य, अशी झाली..

शेवटच्या ५ मिनिटांपर्यंत न्यूझीलंड सहजपणे जिंकतील अश्या २ - ० गोल आघाडीवर होते. आणि तिथून जर्मनीने मॅच फिरवली. ५ मिनिटे बाकी असताना जर्मनीला एक पेनल्टी कॉर्नर मिळाल, त्या वर त्यांच्या कर्णधाराने ड्रॅग फ्लिकवर गोल केला, त्यानंतर परत बॉल इकडून तिकडे पास होत राहिला, आणि ह्या वेळात जर्मन गोल मध्ये त्यांचा गोल किपर अनुपस्थित होता, तरीही न्यूझीलंडला जर्मनीवर आक्रमण करता आले नाही, त्यानंतर परत एकदा शेवटच्या मिनिटांत जर्मनीला परत एक पेनल्टी कॉर्नर मिळाल आणि त्यावर कर्णधाराने परत एक गोल केला, आणि बरोबरी झाली, बरोबरी नंतर पुढचा एक्स्ट्रा टाईम खेळायला लागेल की काय असे वाटत असतानाच जर्मनीचा खेळाडूने एक जोरकस फटका गोलच्या दिशेने मारला आणि तेव्हा तिथे असलेल्या जर्मन खेळाडूने न्यूझीलंडच्या गोलकिपरच्या बाजूने बॉल गोल मध्ये जाईल एवढीच दिशा दिली आणि गोल झाला आणि तेव्हा शेवटचे २ सेकंद शिल्लक होते आणि लगेचच मॅच संपल्याची शिट्टी वाजली..

मॅच मधला एकूण एक खेळाडू आणि प्रेकक्ष आणि समालोचक सगळेच काही क्षणांसाठी स्तब्ध झाले होते. न्यूझीलंडवाले तर हताशच झाले. ५ मिनिटांपूर्वी आपण नक्की सेमीफायनल खेळणार असे वाटत असतानाच त्यांना घरी जाणार्‍या विमानात बसावे लागले.

जर्मनीने भारता विरुद्ध पण असाच शेवटचे काही सेकंद बाकी असताना गोल केला होता. पण सेमी मध्ये अर्जेंटिनाने काही जर्मनीची डाळ शिजू दिली नाही.. त्यांनी ५ - १ अशी जबरदस्त आघाडी घेतल्याने जर्मनीला काहीच करता आले नाही.. शेवटपर्यंत गोल करायचा पूर्ण प्रयत्न केला गेला पण अर्जेंटिनाच्या बचाव फळीने जर्मनीच्या आक्रमणाला चांगलेच थोपावून धरले.

Pages