काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गवरीला उत्तरभारतीय स्वयंपाक येत नाही तर इंटरनेटवर बघायचे ना, उगाच आजीला उठवा, चौबे मामाला फोन करा, स्मार्ट फोन दिसला गवरीकडे..

राधिकाने इंटरनेटवर पाहून स्वैपाक केलेला की. शिवचे बाबूजी बोललेही तसं. मग गौरीने काही वेगळं नको का करायला?

आज शेवटी शुगोने निशाला चापल.

निशाचं हम्माकडून पैसे घेण कळलं पाहिजे.

घरातलच एक माणूस त्याचं वाईट कसं होइल हे वाट बघणारं पात्रं आहे निशा म्हणजे....

काहीही हां .
अगोदर पासूनच कशाला उत्तर भारतिय स्वयंपाक कशाला करायला पाहिजे ??
शिकेल ना ती हळूहळू . भारीच अपेक्षा

हल्दीरामचं आलु-भुजिया मुंबईत किमान खायला तरी मिळत नाही का? आयला आलु-भुजिया म्हणजे आलुचे भजे? नशिब भुजियाचा अर्थ भाजलेला आलु असा नाही घेतला.

काय चालू आहे सध्या?

टिपिकल सिरियल मधले सास - बहु प्रकरण. फरक एवढाच की आजुन लग्न झाल नसल्याने भावी सास बहु चा छळ करत आहे. Happy

तेच फालतु समज, जेवण येणारी मुलगी म्हणजे संस्कारी. पुरुषांनी स्वंयपाकात लक्ष घालू नये. ... ब्ला ब्ला...

काळ कुठला चालुय आणि काय दाखवतात.

बरं, राधिकाला जेवण येत नाही ते सांगितल्यावर हम्माची काही प्रतिक्रिया नाही. आणि ती मुंबईतली मुलगी चालते.

गौरी किचनमध्येच गचाळपण शिंकत असते कधी मध्येच हात धरून तर नुसता दुपट्टा नाकासमोर धरून आजूबाजूला सगळं जिन्नस उघडे असताना आणि तोच हात न धुवता पाण्याचा मग उचलणे, मसाल्याचा डबा उचल काम करते.

हे सगळं ठीक आहे, पण मला एक गहन प्रश्न पडलाय.. छोले ऐनवेळी भिजवून ते शिजले कसे? गवरीने डायरेक्ट डब्यातून काढून पाण्यात टाकले!! Uhoh
छोल्यांची चव घेतल्यावर शिव गंभीर झाला. मला वाटलं ते शिजले नसावेत, हेच कारण असेल, पण त्याने ते खारट असल्याचं कारण सांगितलं.

आणि भुजिया म्हणजे बारीक शेव ना? बिकानेरी भुजिया खाल्लंय
मी, त्यावरून मला असं वाटलं, पण गवरी ने तर फ्रेंच फ्राईज सारखे
बटाट्याचे काप केले. जाणकारांनी प्रकाश टाकावा कृपया!

>>पण मला एक गहन प्रश्न पडलाय.. छोले ऐनवेळी भिजवून ते शिजले कसे?<<

हो तेच ना, म्हणजे हे प्रश्ण आहेतच.. आणि छोल्यात मीठ ज्यास्त झाले तर एक बटाटा घालायचा ना उकडलेला. ते पीठ घाला आणि काढा... किती खटपटीचा प्रकार....
आणि ह्याच्यात त्याच्यात नुसते बटाटे खावून काय करतात हि लोकं?

आणि वर छोले अच्छे हुवे है..... काहिहि.... असे छोले भिजवून केले असते तर आमच्या साबांनी नापास केले असते. Proud पण अशी काही त्यांना ( आमच्या साबांना) बुद्धी झाली नाही. पण असे अमेरीकन लोकं करतात.

ते अगदी चिली सूप मध्ये बीन्स असेच टाकतात. मला वाटते आपण भारतीय असे भिजवून करतो( मा. मा. प्र.)

आणि वेणू आणि गौरी म्हणजे ह्यांची नोकर.....

कैच्याकै.

Happy मी नेट वर शोधलं आलू भुजिया...तर तो बटाट्याच्या काचर्‍यांसारखा भाजीचा एक प्रकारही असतो!
आलु भुजिया सब्जी म्हणतात त्याला..बिहारी रेसिपी आहे!
वेणू आणि गवरी यांचे नोकर असल्या सारखे वागवतात, खरंच!
झंपी , मलाही तिचं ते शिंकणं अगदीच खटकलं. अम्माच्या जागी असते तर, या मुद्द्यावर मी तिला नापास केलं असतंच Happy

आणि मी अम्माच्या जागी असते तर तिचे एक्सप्रेशन्सलेस थंड डोळे बघुनच नापास केलं असत. Happy

पण सिरीयसली हे परीक्षा, नापस वैगेरे डोक्यात जाणारं आहे. कसलं आलयं एवढं मोठं शुक्ल नी फुक्ल खानदान?

>>>कसलं आलयं एवढं मोठं शुक्ल नी फुक्ल खानदान?<<

मुंबईतली नोकरी करणारी मुलगी ह्या असल्या परीक्षा देते तेच डोक्यात जाणारं आहे.

प्रेमासाठी आपले विचार आणि आवड सोडणं हिच गोची आहे. नोकरी करणारी मुलगी वाईट आणि सतत ते त्यागाची मुर्ती दाखवणं डोक्यात जाणे आहे.

पण असतात अश्या सासवा.... मग जरासे चुकले की एकवणार मी म्हटलं न्हवतं बाहेरच्या मुली कशा सूट नाही आपल्या घरात.....

इट्स ईरीटेटींग...

कसलं आलयं एवढं मोठं शुक्ल नी फुक्ल खानदान>>>>>>>>>>

Rofl

खरचं.. तिला नापासच केलं पण अम्मानी..
आज गौरी म्हणते की माझे बाबा एकवेळ आपल्या नात्याला स्विकारतिल पण तुझे मा बाबुजी नाही..
पण तिकडे (उ.प.) मधे बर्यापैकी अजुन असं वातावरण आहे असं वाटत..
माझी कलिग आहे यु पी ची ..
पण अम्मा जरा जास्तच घालुन पाडुन बोलते गौरी ला..आणि वेणुला पण .. वेणुला का पण?

गौरी जशी शिववर एक्स्ट्रा चिडायची तस अम्मा पण जरा एक्स्ट्राच बोलत आहे

मला वाटतं यामुळे च गौरी ची आई नाही म्ह्णते. पण म्हणतात ना प्यार अंधा होता हे. .
गौरी ला हे समजतं नाहीये..मुंबई ची मुलगी अशा वातावरणात कशी रहाणार.?
बाकी अम्मा तिच्या जागी बरोबर आहे असं वाटतं..फक्त वेणुला बोलते, ते सोडुन..

काल निशा आणि नचि रात्री जेवताना त्यांच्या खोलीत गौरीच्या अफेयर बद्दल बोलत होते आणि गौरी किंवा तिच्या आईने, आज्जीने सांगायला हवे होते नचिला असे ती त्याला साम्गत होती.
काय सांगायचे होते त्या नचिला यांनी की ज्या नात्यात काहिच राम नाहिये त्या नात्याला टिकवण्यासाठी किंबहुना ते नात जोडण्यासाठी तुझी बहिण शेजारी मोलकरणीचे काम करतेय परिक्षेच्या नावाखाली.

मला तर वाटतय की शिव गौरीच्या नात्यातला फोलपणा शुगोला कळलाय म्हणुनच ती म्हणतेय की हे शक्य नाहीये म्हणुन.

त्या शिवच्या अम्माला त्या राधिका सारखीच सून हविये म्हणजे काहीतरी चुरचुरीत बघता येइल नाहीतर गौरी आणि अम्मा म्हणजे
आवाज.......शांतता.......आवाज......शांतता......आवाज......शांतता

>>>बाकी अम्मा तिच्या जागी बरोबर आहे असं वाटतं.<<

कसं काय ते?
ती राधिका आहे ना मुंबईची मग ती रहाणार का घुंघट ओढून? हे हम्माला समजतय का?

कुठलीही येडीच युपीत जाईल. अगदीच मागसलेले असतात हे खरच आहे. पाया खूप पडायला लावतात आणि त्यांचे विचार तर बोलायला नकोच. जरी जनराईझ्ड केलं नाही तरी युपी जरा आहेच मागसलेलं.... तिथे रहाणं तर अब्बा...

आम्ही बनारसला गेलेलो फिरायला... मला तरी भयानक वाटले संध्याकाळी. गंगा तर बघवत नाही..... घाणीच आगार... सर्व प्रथा करतात लोकं... असो.

अगदीच मागसलेले असतात हे खरच आहे. या वरुन च म्ह्णते मी ..अम्मा तिच्या जागी बरोबर आहे असं वाटतं कारण त्यांचे विचार तसेच आहेत ..मागसलेले..
म्हणुन तिला अशी सुन हवी आहे जी घरात त्यांच्या नुसार काम करेल

राधिका आहे ना मुंबईची मग ती रहाणार का घुंघट ओढून? हे हम्माला समजतय का? ती त्यांच्या कडची आहे म्ह्णुन अम्माला खात्री असणार की ही मुलगी राहील बरोबर.

गवरीपेक्षा राधिकाच जास्त चिकणी व शिवला सुटेबल आहे. पात्र बदला. ती काम पण छान करत आहे. फिदीफिदी
>>>
शिवपण असच म्हणत असेल मनातल्या मनात Wink

त्या गवरीने स्वाभिमान काय गहाण ठेवलाय का? ती अम्मा वाट्टेल तस बोलतेय, अरेरावी करतेय आणि ही बया निमुटपणे ऐकुन घेतेय. कुछ हजम नही हुंआ

प्रेमात सगळ माफ पण अस लाचार होणं, परिक्षेच्या नावाखाली नोकरासारखी वागणुक मिळणं हे जरा अतिच होतय अगदी

शुके प्रत्यक्षात शिवला सांगीतले असते ना की बघ तुझं तु. या अम्म्मा या मै. पण शिरेलेतल्या लोकांना हौसच फर सर्वांना खुश ठेवायची.

एकता कपूरच्या वाटेवर आहे सिरियल,

चांगली सून म्हणजे, जेवणं करणं, साबाचे अपमान सहन करणं, सेवा करणं .... आपले मत नसणं.

ती आई गौरीला सरळ स्पष्ट पणे सांगत का नाही समोर बसवून, बाई त्यांच्या प्रथा एक दोन दिवस ठिकाय.
आणि तू नोकरी सोडून फक्त हेच करणार का?

फक्त आडून आडून बोलून काय फायदा.. मास्तरीण आहे ना.

( मी कशाला माझा जीव घालवतेय इथे.. सरळ स्वतः उठून चहा करते. नवरा आता घरी असता तर त्यालाच सांगितला असता... संस्कारीआहे तो. चहा उत्तम बनवतो.) Proud

मी कशाला माझा जीव घालवतेय इथे.. सरळ स्वतः उठून चहा करते. नवरा आता घरी असता तर त्यालाच सांगितला असता...>>>> Rofl

मला वाटतं यामुळे च गौरी ची आई नाही म्ह्णते. पण म्हणतात ना प्यार अंधा होता हे. .
गौरी ला हे समजतं नाहीये..मुंबई ची मुलगी अशा वातावरणात कशी रहाणार.?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

अ‍ॅक्च्युली प्रेमात असं होतही असेल.. वाटत असेलही की मी माझ्या जोडिदारा बरोबर कुठेही राहु शकेन ई.
पण गौरी इथे प्रेमाबिमात वाटतच नाही,,,

त्यामुळे किती त्रास झाला तरी शिवसाठी ती अशा वातावरणात निभावुन नेईल असं वाटत् नाही..

शिवच्या अम्माने गौरीची चान्गली जिरवली. मोठी शिवला " आपके हम मे हमे शामिल करो." भाषण देत होती त्यादिवशी. आता तिला आलु-भुजिया, छोले वै. वै. करताना कळुन चुकल असेल की, हे अस भाषण देण सोप्प असत, पण कृती करणे कठीण असते. त्या दिवशी शिवने कान्दे पोहे केले होते तेव्हा गौरीने साध त्याच कौतुकही केले नाही.

गौरी जशी शिववर एक्स्ट्रा चिडायची तस अम्मा पण जरा एक्स्ट्राच बोलत आहे>>> करावे तसे भरावे.

तेच फालतु समज, जेवण येणारी मुलगी म्हणजे संस्कारी. पुरुषांनी स्वंयपाकात लक्ष घालू नये. ... ब्ला ब्ला...>>>>सहमत

प्रेमासाठी आपले विचार आणि आवड सोडणं हिच गोची आहे. नोकरी करणारी मुलगी वाईट आणि सतत ते त्यागाची मुर्ती दाखवणं डोक्यात जाणे आहे.>>>+१

वेणू आणि गवरी यांचे नोकर असल्या सारखे वागवतात, खरंच!>>>> हो ना, अम्माने तिच्या दिराला कामाला लावाव. नाहीतरी तो सदा खालमानेने नोकरासारखा उभा असतो.

Pages